सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 04/2012
तक्रार दाखल दि.28/02/2012
तक्रार निकाल दि.01/03/2013
श्री वल्लभानंद घनःश्याम प्रभू
वय 41 वर्षे, व्यवसाय – नोकरी,
राहणार – मु.पो. सांगवे (शिवाजीनगर)
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
श्री तुकाराम दादा जाधव
वय – सज्ञान, व्यवसाय – ठेकेदार,
राहणार – मु.पो. सांगवे (शिवाजीनगर)
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर(गावकर),सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्रीमती एम.डी. सावंत
विरुध्द पक्षातर्फे – विधिज्ञ – श्री ए.पी. बर्वे
आदेश नि.1 वर
(दि.01/03/2013)
श्री. डी.डी. मडके, अध्यक्षः- विरुध्द पक्ष यांनी घराचे बांधकाम योग्य दर्जाचे करुन न दिल्यामुळे तक्रारदारास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासपोटी झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळण्यासाठी सदरचे प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे.
2) विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविल्यानंतर त्यांनी त्यांचे म्हणणे नि.12 वर दाखल केले.
3) दरम्यान नि.19 वर वैयक्तिक कारणास्तव तक्रार मागे घेत असलेबाबतचे पुरसीस तक्रारदार यांनी दिलेले आहे. दरम्यानच्या कालावधीत मंचाची बैठक होऊ न शकल्याने सदरचे प्रकरण आज आदेशासाठी ठेवण्यात आले. त्यामुळे आम्ही सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराने नि.19 वर दिलेल्या अर्जाप्रमाणे तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास परवानगी देण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 01/03/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का पावसकर(गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग