मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक :07/2010 (मूळ तक्रार क्र.174/2007) वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.20/02/2010 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.21/03/2011 गणपूर्ती श्री.महेंद्र म.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या डॉ.मकरंद रामचंद्र पिलणकर रा.ऋतुराज आनंदनगर, थिबा पॅलेसजवळ, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्री.तुकाराम बोटांगळे रा.व्दारा – प्रविण कॅमेरा, जयसिंगपूर स्टँड चौक, ता.शिरोळ, जि.सांगली. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.एम.आर.पिलणकर सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.एम.सी.नलावडे -: नि.1 वरील आदेश :- 1. मंचाने तक्रार क्र.174/2007 मध्ये पारीत केलेल्या आदेशाची अंमलबजावणी विहीत मुदतीत विरुध्द पक्षाने न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे. 2. सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्ष/आरोपी यांना बजावण्यात आले. त्यानुसार आरोपी हे मंचासमोर दि.01/04/2010 रोजी हजर झाले व आरोपीने केलेल्या विनंती अर्जानुसार त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. मात्र त्यानंतर आरोपी मंचासमोर हजर झाला नाही. त्यामुळे मंचाने आरोपीचेविरुध्द जमानती वॉरंटची कारवाई केली. 3. दरम्यान आरोपी हा मंचासमोर हजर रहात नसून तक्रारदार व त्यांचे वकिल हे दि.28/10/2010 पासून मंचासमोर हजर झाले नाहीत व त्यांनी आरोपीचे विरुध्द पुढील कार्यवाही करणेसाठी कोणतीही तजवीज केली नाही. आज मंचासमोर तक्रारदार किंवा त्यांचे वकिल हजर नाहीत. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली करण्याचे दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदार व त्यांचे वकिल सतत गैरहजर असल्यामुळे सदरचे दरखास्त प्रकरण डिसमीस फॉर डिफॉल्ट (Dismissed for Default) करण्यात येते व निकाली काढण्यात येते. 2. आरोपीचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात. रत्नागिरी दिनांक : 21/03/2011 (महेंद्र म.गोस्वामी) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT | |