Maharashtra

Bhandara

CC/19/69

SHIVA SHRIPAT BHOYAR - Complainant(s)

Versus

TROUGH MANAGER MAHINDRA AND MAHINDRA FINANCIAL SERVICES LTD - Opp.Party(s)

MR.N.S.POPTANI

05 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/69
( Date of Filing : 10 Jun 2019 )
 
1. SHIVA SHRIPAT BHOYAR
SHIVANI PO. MADGI TAH . TUMSAR
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TROUGH MANAGER MAHINDRA AND MAHINDRA FINANCIAL SERVICES LTD
NEAR ALLAHABAD BANK,SAI MANDIR ROAD
BHANDARA
MAHARASHTRA
2. DIVISION MANAGER, MAHINDRA AND MAHINDRA FINANCIAL SERVICE LTD
NARANG TOWER FIRST FLOWER CO-OPERATION HOUSE IN FRONT OF TRAFFIC POLICE ,PALAM ROAD CIVIL LINE
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 05 Jan 2021
Final Order / Judgement

 

          (पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.पिठासीन अध्‍यक्ष)

                                                                            (पारीत दिनांक– 05 जानेवारी, 2021)

01.    तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या खाजगी वित्‍तीय कंपनी विरुध्‍द  दोषपूर्ण सेवे बद्दल तसेच ईतर अनुषंगीक कारणांसाठी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्ता हा उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहतो तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 महिन्‍द्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फॉयनान्शियल सर्व्‍हीसेस कर्ज पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारकर्त्‍यास शेतीचे कामा करीता ट्रॅक्‍टरची गरज होती त्‍यासाठी त्‍याने स्‍वराज्‍य मॉडेल एजन्‍सी भंडारा या ट्रॅक्‍टर विक्रेत्‍याशी संपर्क साधला व कर्जाने ट्रॅक्‍टर विकत घेण्‍याची ईच्‍छा व्‍यक्‍त केली, त्‍यावरुन ट्रॅक्‍टर विक्रेत्‍याचे               कर्मचा-याने विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनीशी संपर्क साधून दिला. विरुध्‍दपक्ष क्रं 1) कर्ज पुरवठा करणा-या कंपनीचे अधिकारी यांनी  कर्जावरील व्‍याजाचा दर हा स्थिर वार्षिक-8.5 टक्‍के (Flat Rate) असल्‍याचे सांगितले, त्‍यास तक्रारकर्त्‍याने सहमती दिली. विरुध्‍दपक्ष क्रं 1) कंपनीने तक्रारकर्त्‍याच्‍या विविध फार्मवर सहया घेतल्‍यात तसेच कर्जाचे सुरक्षीतेसाठीत्‍याचे कडून बॅंक ऑफ बडोदा शाखा तुमसर येथील बॅंकेचे 07 कोरे धनादेश विरुध्‍दपक्ष कंपनीने घेतलेत. कर्जाची व्‍याजासह परतफेडीची मुदत ही 02 वर्ष राहिल असेही तक्रारकर्त्‍यास सांगण्‍यात आले. संपूर्ण कर्ज प्रक्रिया पार पाडल्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने रुपये-71,000/- स्‍वराज्‍य ट्रॅक्‍टर या विक्रेत्‍याकडे जमा केलेत आणि उर्वरीत रक्‍कम रुपये-5,20,000/- एवढया रकमेचे कर्ज स्थिर वार्षिक 8.5 टक्‍के दराने विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून घेतले. तक्रारकर्त्‍याचे ट्रॅक्‍टरचा क्रमांक-MH-36-Z-0597 तसेच इंजिन क्रमांक- 421001/SYG16252  आणि चेसीस क्रं-WSCG92654101546     असा आहे. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 कंपनी कडून ट्रॅक्‍टरचे कर्ज घेतल्‍याने व त्‍या कर्जाची व्‍याजासह परतफेड करणार असल्‍याने तसेच कर्जा संबधात विरुध्‍दपक्ष कंपनी सेवा देणारी असल्‍याने तो विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 चा ग्राहक आहे. तसेच प्रस्‍तुत तक्रारीचे कारण हे भंडारा जिल्‍हयात घडले असल्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोग भंडारा यांना तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र आहे.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने एक धनादेश रक्‍कम रुपये-85,000/- चा दिनांक-11.12.2017 रोजी वटविण्‍या करीता सादर करुन धनादेशाची रक्‍कम प्राप्‍त केली. तसेच दिनांक-11.06.2018 रोजी त्‍याचे खात्‍यातून धनादेशाव्‍दारे रुपये-85,000/- रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनीने प्राप्‍त केली.

       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-10.12.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनीचे कर्मचारी श्री रायभान भुरे याने त्‍याचेशी संपर्क साधून उर्वरीत रक्‍कम व्‍याजासह भरण्‍यास सांगितले त्‍यास त्‍याने सहमती दर्शविली. त्‍यानंतर दिनांक-26.12.2018 रोजी सदर कर्मचारी श्री रायभान भुरे याने त्‍यास उर्वरीत रक्‍कम व्‍याजासह अंदाजे-4,00,000/- एवढी होईल आणि तात्‍काळ रुपये-50,000/- चा भरणा करण्‍यास सांगितले, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने तात्‍काळ रुपये-50,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनीचे कर्मचारी श्री भुरे याचे जवळ दिले व दिनांक-26.12.2018 रोजीची पावती प्राप्‍त केली, त्‍यावेळी कर्मचारी  भुरे याने उर्वरीत रकमेचा हिशोब पत्राव्‍दारे कळविण्‍यात येईल असे सांगितले, त्‍या घटनेच्‍या वेळी तक्रारकर्त्‍याचे मित्र कर्ज हमीधारक श्री श्रीधर कहाळकर उपस्थित होते. परंतु त्‍यानंतर वेळोवेळी संपर्क साधूनही विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनी तर्फे उर्वरीत कर्ज रकमेचा हिशोब त्‍याला कळविला नाही.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-07.03.2019 रोजी अंतिम हिशोबा पोटी अंदाजे रक्‍कम रुपये-3,50,000/- स्विकारण्‍यात यावे अशी विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनी मध्‍ये विनंती केली परंतु सदर रक्‍कम स्विकारण्‍यात आली नाही व सध्‍याची रक्‍कम रुपये-35,000/- एवढी रक्‍कम धनादेशाव्‍दारे देण्‍यास सुचित केले, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 कंपनी मध्‍ये बॅंक ऑफ बडोदा शाखा तुमसर येथील धनादेश क्रं-00028, धनादेश दिनांक-18.03.2019 अन्‍वये रुपये-35,000/- एवढी रक्‍कम  जमा केली, सदर धनादेश दिनांक-20.03.2019 रोजी वटविण्‍यात आला. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी विरुघ्‍दपक्ष क्रं 1 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी मध्‍ये एकूण रुपये-2,55,000/- एवढी रक्‍कम कर्ज परतफेडीपोटी जमा केली. तो उर्वरीत रक्‍कम वार्षिक-8.5 टक्‍के प्रमाणे व्‍याजासह भरण्‍यास वेळोवेळी तयार होता परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने त्‍याला कोणताही प्रतिसाद दिला नाही व जास्‍तीत जास्‍त विलंब करुन व्‍याज कमाविण्‍याचा विरुध्‍दपक्ष कंपनीचा हेतू आहे.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असेही नमुद केले की, त्‍याला विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून दिनांक-15.03.2019 रोजीचे सुचनापत्र पाठवून त्‍याव्‍दारे रुपये-39,700/- एवढया रकमेचा भरणा करण्‍यास कळविण्‍यात आले होते परंतु त्‍यापूर्वीच त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 चे म्‍हणण्‍या प्रमाणे दिनांक-18.03.2018 रोजी रक्‍कम रुपये-35,000/- जमा केली होती त्‍यामुळे सदरचे सुचनापत्र् त्‍यास लागू पडत नाही. तक्रारकर्त्‍याने वकील श्री पोपटानी यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष कंपनीला  दिनांक-01.04.2019 रोजीची नोटीस पाठवून तो उर्वरीत कर्ज रक्‍कम वार्षिक 8.5 टक्‍के दराने व्‍याजासह भरण्‍यास तयार आहे असे कळविले.  सदर नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना दिनांक-03.04.2019 रोजी मिळूनही त्‍यांनी कोणताही प्रतीसाद दिला नाही व त्‍याचे कर्ज रकमेचा अंतिम हिशोब दिला नाही वा नोटीसला कोणतेही उत्‍तर दिले नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली म्‍हणून त्‍याने प्रस्‍तुत ग्राहक तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा पुढे दाखल करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 कंपनी विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-

  1. तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टरचे कर्ज परतफेडी पोटी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी मध्‍ये वेळोवेळी भरणा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,55,000/- वजा करुन उर्वरीत शिल्‍लक कर्जाची रक्‍कम वार्षिक-8.5 टक्‍के दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम त्‍याला कळविण्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 ला आदेशित व्‍हावे.
  2. तक्रारकर्त्‍याने कर्जाची उर्वरीत रक्‍कम व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 कंपनी मध्‍ये भरणा केल्‍या नंतर त्‍याचे बॅंक ऑफ बडोदा शाखा तुमसरचे जमा असलेले 05 कोरे धनादेश विरुध्‍दपक्ष यांनी परत करण्‍याचे तसेच ना-देय-प्रमाणपत्र तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांना आदेशित व्‍हावे.
  3. प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी. 

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 महिन्‍द्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनान्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड तर्फे एकत्रित लेखी उत्‍तर पान क्रं 44 ते 52 वर दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍या सोबत दिनांक-30.06.2017 रोजी करार क्रं-4854829 मधील परिच्‍छेद क्रं 15 व 16 प्रमाणे कर्ज प्रकरणात वाद उदभविलयास तो सोडविण्‍याचे अधिकार मुंबई येथील लवादाच (Arbitrator) असल्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोगास तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येत नाही. तक्रारकर्त्‍याचा स्‍वराज्‍य ट्रॅक्‍टर-742 ट्रॅक्‍टर नोंदणी क्रमांक-MH-36-Z-0597 तसेच इंजिन क्रमांक- 421001/SYG16252  आणि चेसीस क्रं-WSCG92654101546  या संबधात दिनांक-30.06.2017 रोजी करारनामा करण्‍यात आला होता आणि त्‍यातील अटी व शर्ती उभय पक्षांवर
बंधनकारक आहेत. तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्षामध्‍ये “कर्जदार व कर्ज प्रदाता” असे संबध येत असल्‍याने तक्रारकर्ता हा “ग्राहक” होऊ शकत नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे विरुध्‍द खोटी व बिनबुडाची तक्रार दाखल केलेली आहे. त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्‍याने स्‍वराज्‍य मॉडेल एजन्‍सी यांचे कडून ट्रॅक्‍टर खरेदी केला परंतु त्‍यांना या प्रकरणात प्रतीपक्ष केलेले नाही.

    विरुध्‍दपक्ष यांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष कंपनीचे कर्ज मंजूरीचे दिनांक-17.06.2017 रोजीचे पत्रात कर्जावरील व्‍याजाचा दर हा स्थिर (Flat Rate) वार्षिक 12.69 टक्‍के एवढा नमुद आहे व तो दर तक्रारकर्त्‍याने मान्‍य केलेला आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे तक्रारी मध्‍ये कर्जा वरील नमुद केलेला व्‍याजाचा दर वार्षिक 8.5 टक्‍के असल्‍याची बाब नामंजूर करण्‍यात येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनी कडून रुपये-5,20,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते आणि त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनी मध्‍ये वेळोवेळी एकूण रुपये-2,55,000/- एवढी रक्‍कम कर्ज परतफेडीपोटी जमा केली होती ही बाब मान्‍य केली. परंतु विरुध्‍दपक्ष कंपनीचे कर्मचारी श्री रायभान भुरे यांनी तक्रारकर्त्‍यास रुपये-4,00,000/- भरल्‍यास कर्ज प्रकरण संपुष्‍टात येईल असे सांगितल्‍याची
बाब नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून दिनांक-15.03.2019 रोजीचे सुचनापत्र पाठवून त्‍याव्‍दारे रुपये-39,700/- एवढया रकमेचा भरणा करण्‍यास तक्रारकर्त्‍यास कळविण्‍यात आले होते ही बाब मान्‍य आहे परंतु सदर नोटीस तक्रारकर्त्‍यास लागू पडत नाही ही बाब नामंजूर आहे.

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी आपल्‍या विशेष कथनात असे नमुद केले की, उभय पक्षांमध्‍ये दिनांक-30.06.2017 रोजी कर्ज करार क्रं-4854829 करण्‍यात आला होता. करारनाम्‍या प्रमाणे अर्धवार्षिक 10 हप्‍त्‍यांमध्‍ये म्‍हणजे पाच वर्षात प्रत्‍येक अर्धवार्षिक हप्‍ता रुपये-85,000/- प्रमाणे कर्ज परतफेडीचे हप्‍ते तक्रारकर्त्‍यास जमा करावयाचे होते. परंतु त्‍याने कर्ज परतफेडीचे हप्‍ते नियमित वेळेवर न भरल्‍यामुळे तसेच तक्रारकर्त्‍याने दिलेले धनादेश हे वटविल्‍या न गेल्‍याने करारातील अटी व शर्ती प्रमाणे त्‍याच्‍यावर काही दंड बसविलेला आहे. कर्ज करारनाम्‍याची मुदत दिनांक-10.06.2022 पर्यंत आहे.        
दिनांक-17.06.2017 रोजीचे कर्ज मंजूरीचे पत्रात कर्जावरी व्‍याज दर वार्षिक-12.69 टक्‍के असल्‍याचे स्‍पष्‍ट नमुद असून त्‍या पत्रावर तक्रारकर्त्‍याने सही केलेली असल्‍याने ते पत्र त्‍यास मान्‍य आहे. तसेच कर्ज वाटप केल्‍या नंतर दिनांक-05.06.2017 रोजीचे वेलकम पत्रात सुध्‍दा कर्ज संबधी सविस्‍तर माहिती देण्‍यात आली होती व सदरचे पत्र रजिस्‍टर पोस्‍टाने तक्रारकर्त्‍यास पाठविण्‍यात आले होते.

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे कडून पुढे असे नमुद करण्‍यात आले की, दिनांक-10.06.2019 पर्यंत कर्ज करारा प्रमाणे तक्रारकर्त्‍या कडून कर्ज परतफेडीपोटी रुपये-3,40,000/- एवढी रक्‍कम येते परंतु तक्रारकर्त्‍याने आज पर्यंत फक्‍त रुपये-2,55,000/- एवढीच रक्‍कम जमा केलेली असून उर्वरीत रक्‍कम रुपये-85,000/- करारा नुसार व्‍याज व दंडासह तक्रारकर्त्‍या कडून घेणे बाकी आहे, सदर रक्‍कम भरल्‍या नंतर कर्ज खाते व्‍यवस्थित होईल. परंतु जर तक्रारकर्ता हा मुदतपूर्व संपूर्ण कर्जाची रक्‍कम भरण्‍यास तयार असेल तर दिनांक-30.06.2017 रोजीचे कर्ज करारनाम्‍यातील परिच्‍छेद क्रं 9 ची पुर्तता करुन त्‍याने आज पावेतो विरुध्‍दपक्ष कंपनीमध्‍ये जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,55,000/- वजा जाता खाते पुस्‍तीके प्रमाणे रक्‍कम रुपये-4,83,074/-
व 3 टक्‍के व्‍याजाची रक्‍कम असा भरणा केल्‍यावर तक्रारकर्त्‍यास ना-देय-प्रमाणपत्र (No-Due-Certificate) देण्‍यास विरुध्‍दपक्ष यांना कोणतीही अडचण नाही. तक्रारकर्त्‍यास दिनांक-15.06.2019 रोजीची रितसर नोटीस पाठवून थकीत रकमेची मागणी करण्‍यात आली होती परंतु त्‍याचे अनुपालन न करता तक्रारकर्त्‍याने खोटी तक्रार दाखल केलेली आहे सबब तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी केली.

04.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 14 वरील यादी अनुसार अक्रं 1 ते 7 दस्‍तेएवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात ज्‍यामध्‍ये अनुक्रमे वाहन नोंदणी प्रमाणपत्र, बॅंक ऑफ बडोदा येथील पासबुक, पावती प्रत, कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्‍टर पोस्‍टाची पावती, पोच, विरुध्‍दपक्ष कंपनीने पाठविलेले मागणी पत्र अशा दसतऐवजाचे प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 72 ते 77 वर स्‍वतःचे पुराव्‍या दाखल शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 78 ते 81 वर  श्री श्रीधर जोशी कहालकर यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 88 ते 93 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी एकत्रित लेखी उत्‍तर पान क्रं 44 ते 52 वर दाखल केले. सोबत पान क्रं 53 वरील यादी प्रमाणे अक्रं 1 ते 5 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये कर्ज मंजूरी वेलकम पत्र व पोच, कर्ज करारनामा,  कर्ज मंजूरीचे पत्र, कर्ज खात्‍याचे विवरण, कर्ज मागणी पत्र व रजि.पोस्‍टाची पावती अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. विरुध्‍दपक्ष यांनी पान क्रं 83 वर पुरसिस दाखल करुन त्‍यांचे लेखी उत्‍तरालाच पुराव्‍याचे शपथपत्र समजावे असे नमुद केले. तसेच पान क्रं 84 वरील यादी प्रमाणे तक्रारकर्त्‍यास व श्रीधर कहालकर यास दिनांक-20.09.2019 रोजीची पाठविलेली नोटीसची प्रत दाखल केली. विरुध्‍दपक्ष यांनी पान क्रं 94 वर पुरसिस दाखल करुन त्‍यांचे लेखी उत्‍तरालाच लेखी युक्‍तीवाद समजावे असे नमुद केले.

06.  प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारकर्त्‍याने स्‍वतः मौखीक युक्‍तीवाद केला तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 तर्फे वकील श्री मोटवानी यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

07.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर, उभय पक्षांनी दाखल केलेले दसतऐवज, तक्रारकर्त्‍याचे पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद इत्‍यादीचे काळजीपूर्वक अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे करण्‍यात आले, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची कारणमिमांसा खालील प्रमाणे आहे-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष कंपनीचा ग्राहक होतो काय

-होय-

02

प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र जिल्‍हा ग्राहक आयोगास येते काय

-होय-

03

विरुध्‍दपक्ष कंपनीने तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

04

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

::कारणे व मिमांसा::

मुद्दा क्रं-1

08.    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून स्‍वराज्‍य ट्रॅक्‍टर खरेदी करीता दिनांक-30.06.2017 रोजी कर्ज करार क्रं-4854829 अन्‍वये एकूण रुपये-5,20,000/- कर्ज घेतले होते आणि त्‍याचे मोबदल्‍यात व्‍याजासह कर्ज रकमेची परतफेड करण्‍याची हमी तक्रारकर्त्‍याने घेतली होती व काही रक्‍कम परतफेडीपोटी जमा सुध्‍दा केली त्‍यामुळे तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष कंपनी यांचेमध्‍ये “ग्राहक आणि सेवा देणारे” असे संबध निर्माण होत असल्‍याने तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष कंपनीचा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार “ग्राहक” होतो त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2

09.      तक्रारकर्त्‍याने त्‍याचे शेतीचे कामा करीता स्‍वराज्‍य मॉडेल एजन्‍सी भंडारा यांचे कडून  ट्रॅक्‍टर विकत घेतला तसेच डाऊन पेमेंट म्‍हणून रुपये-60,000/- एवढी रक्‍कम ट्रॅक्‍टर विक्रेता यांचेकडे जमा केली  आणि सदर ट्रॅक्‍टर  करीता विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून उर्वरीत रुपये-5,20,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले त्‍यामुळे तक्रारीचे कारण हे भंडारा जिल्‍हयात घडलेले आहे. विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनीचा असा आक्षेप आहे की,  तक्रारकर्त्‍या सोबत दिनांक-30.06.2017 रोजी झालेल्‍या करार क्रं-4854829 मधील परिच्‍छेद क्रं 15  मध्‍ये लवादाची (Arbitrator) तसेच परिच्‍छेद क्रं  16 प्रमाणे कर्ज प्रकरणात वाद उदभविलयास तो सोडविण्‍याचे अधिकार मुंबई येथील लवादालाच असल्‍याचे नमुद आहे. या संबधात जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे विशेषत्‍वाने नमुद करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष हा वाद सोडविण्‍याचे अधिकारक्षेत्र निश्‍चीत करु शकत नाही या बाबत वेळोवेळी मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी न्‍यायनिवाडे पारीत केलेले आहेत. लवादाची (Total Arbitration Proceeding) संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्‍या नंतर अधिकारक्षेत्र जिल्‍हा ग्राहक आयोगास येत नाही परंतु या प्रकरणात लवादाची प्रक्रिया  पार पाडलेली नाही त्‍यामुळे जिल्‍हा ग्राहक आयोगास प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येत नाही या विरुध्‍दपक्षाचे कथनात तथ्‍य दिसून येत नाही. प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र जिल्‍हा ग्राहक आयोगास येते त्‍यामुळे मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर आम्‍ही “होकारार्थी” नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं-3

10.   या प्रकरणातील संपूर्ण विवाद हा संक्षीप्‍त स्‍वरुपाचा आहे. तक्रारकर्त्‍याचे कथना प्रमाणे त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने ट्रॅक्‍टरसाठी कर्ज देताना कर्जावरील व्‍याजाचा दर हा वार्षिक-8.5 टक्‍के स्थिर दर (Flat Rate) एवढा असल्‍याचे मौखीक सांगितले होते, त्‍यावेळी त्‍याचा मित्र  श्री श्रीधर जोशी कहालकर उपस्थित होता. या संदर्भात तक्रारकर्त्‍याने पान क्रं 72 ते 77 वर स्‍वतःचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले तर त्‍याचा मित्र    
तसेच कर्ज प्रकरणातील हमीधारक (Guarantor) श्री श्रीधर जोशी कहाळकर यांनी पान क्रं 78 ते 81 वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. श्री श्रीधर जोशी कहाळकर यांनी पुराव्‍याचे शपथपत्रा मधील परिच्‍छेद क्रं 3 मध्‍ये असे नमुद केले की, महिन्‍द्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनान्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड भंडारा येथील अधिकारी यांनी कर्जावरील व्‍याजाचा दर हा स्थिर दर (Flat Rate) वार्षिक 8.5 टक्‍के इतका असल्‍याचे सांगितले होते. तसेच तक्रारकर्ता आणि तो निरक्षर व्‍यक्‍ती आहेत. तसेच सदर अधिकारी यांनी कर्ज परतफेडीची मुदत दोन वर्ष राहिल असे सांगितले होते.

11.  तर विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तरा नुसार उभय पक्षांमध्‍ये दिनांक-30.06.2017 रोजी कर्ज करार  क्रं-4854829 करण्‍यात आला होता. करारनाम्‍या प्रमाणे अर्धवार्षिक 10 हप्‍त्‍यांमध्‍ये म्‍हणजे एकूण पाच वर्षात प्रत्‍येक अर्धवार्षिक हप्‍ता रुपये-85,000/- प्रमाणे कर्ज परतफेडीचे हप्‍ते तक्रारकर्त्‍यास जमा करावयाचे होते. परंतु तक्रारकर्त्‍याने कर्ज परतफेडीचे हप्‍ते नियमित वेळेवर न केल्‍यामुळे तसेच तक्रारकर्त्‍याने दिलेले धनादेश हे वटविल्‍या न गेल्‍याने करारातील अटी व शर्ती प्रमाणे त्‍याच्‍यावर काही दंड बसविलेला आहे. कर्ज करारनाम्‍याची मुदत दिनांक-10.06.2022 पर्यंत आहे. दिनांक-17.06.2017 रोजीचे कर्ज मंजूरीचे पत्रात कर्जावरी व्‍याज दर वार्षिक-12.69 टक्‍के असल्‍याचे स्‍पष्‍ट नमुद असून त्‍या पत्रावर तक्रारकर्त्‍याने सही केलेली असल्‍याने ते पत्र त्‍यास मान्‍य आहे. तसेच कर्ज वाटप केल्‍या नंतर दिनांक-05.06.2017 रोजीचे वेलकम पत्रात सुध्‍दा कर्ज संबधी सविस्‍तर माहिती देण्‍यात आली होती व सदरचे पत्र रजिस्‍टर पोस्‍टाने तक्रारकर्त्‍यास पाठविण्‍यात आले होते.

12.   आम्‍ही विरुध्‍दपक्षा तर्फे पान क्रं 57 ते 61 वरील दाखल उभय पक्षांमध्‍ये झालेल्‍या कर्ज करारनाम्‍याचे प्रतीचे अवलोकन केले. सदर कर्ज करारनाम्‍याच्‍या प्रतीवर विरुध्‍दपक्षाचा अधिकारी, कर्जधारक-तक्रारकर्ता (Barrower) तसेच सह कर्जधारक (Co-Borrower) श्री संतोष भोयर आणि कर्ज हमीदार (Guarantor) म्‍हणून श्री श्रीधर यांच्‍या स्‍वाक्ष-या असून सदर कर्ज करार हा दिनांक-30 जून, 2017 रोजीचा आहे. सदर कर्ज करारनाम्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍यास रुपये-5,20,000/- एवढया रकमेचे कर्ज मंजूर केलेले आहे. परंतु विशेषत्‍वाने येथे नमुद करण्‍यात येते की, या कर्ज करारनाम्‍या मध्‍ये कर्जावरील व्‍याजाचा दर कुठेही नमुद केलेला नाही, जेंव्‍हा की कर्ज करारनाम्‍या मध्‍ये व्‍याजाचा दर आणि परतफेडीचा कालावधी नमुद करणे आवश्‍यक व बंधनकारक (Mandatory) आहे परंतु तसे झालेले दिसून येत नाही.   

13   विरुध्‍दपक्षा तर्फे पान क्रं 62 वरील दाखल शेडयुल 1 मध्‍ये  कर्ज परतफेडीचा कालावधी हा एकूण पाच वर्षा करीता दर्शविलेला असून  अर्धवार्षिक हप्‍ता रुपये-85,000/- प्रमाणे एकूण 10 अर्धवार्षिक हप्‍त्‍या प्रमाणे कर्जाची परतफेड ही दिनांक-10.12.2017 ते दिनांक-10.06.2022 पर्यंत अशी करावयाची आहे. सदर शेडयुल क्रं 1 वर सुध्‍दा विरुध्‍दपक्षाचा अधिकारी, कर्जधारक-तक्रारकर्ता(Barrower) तसेच सहकर्जधारक श्री संतोष भोयर          (Co-Borrower)  आणि कर्ज हमीदार (Guarantor)  म्‍हणून श्री श्रीधर यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. तसेच फोर क्‍लोजर चॉर्जेस 3 टक्‍के नमुद आहे. परंतु कर्ज परतफेडीच्‍या शेडयुल क्रं 1 मध्‍ये सुध्‍दा कुठेही कर्जावरील व्‍याजाचा दर नमुद केलेला नाही, जेंव्‍हा की कर्ज परतफेडीचे शेडयुलवर कर्जावरील व्‍याजाचा दर नमुद करणे बंधनकारक (Mandatory) आहे. विरुध्‍दपक्षा तर्फे पान क्रं 63 वर दाखल कर्ज मंजूरीचे दिनांक-17.06.2017 रोजीचे पत्रात कर्जावरील व्‍याजाचा दर हा स्थिर दर (Flat Rate) 12.69 टक्‍के नमुद आहे या कर्ज मंजूरीचे पत्रावर तक्रारकर्ता, विरुध्‍दपक्षाचे अधिकारी, सहकर्जधारक व हमीधारक यांच्‍या सहया आहेत परंतु वर नमुद केल्‍या प्रमाणे कर्ज करारनामा आणि शेडयुल मध्‍ये कर्जावरील व्‍याजाचा दर नमुद नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता आणि त्‍याचा मित्र  श्री श्रीधर जोशी कहाळकर यांचे म्‍हणण्‍या प्रमाणे व त्‍यांनी दाखल केलेल्‍या शपथपत्रा प्रमाणे जेंव्‍हा ते विरुध्‍दपक्ष कंपनीचे भंडारा येथील कार्यालयात गेले होते त्‍यावेळी तेथील अधिकारी यांनी कर्जावरील व्‍याजाचा दर हा स्थिर वार्षिक 8.5 टक्‍के असल्‍याचे त्‍यांना सांगितले होते ही बाब दाखल पुराव्‍या वरुन सिध्‍द होते. विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने कर्ज करार हा दिनांक-30 जून, 2017 रोजी केला परंतु कर्ज करारामध्‍ये आणि कर्ज परतफेडीचे शेडयुल मध्‍ये व्‍याजाचा दर नमुद केलेला नाही. दिनांक-17.06.2017 रोजीचे कर्ज मंजूरीचे पत्रात व्‍याजाचा दर स्थिर दर (Flat Rate) 12.69 टक्‍के वार्षिक नमुद केला जो तक्रारकर्त्‍यावर बंधनकारक नाही कारण तक्रारकर्ता हा एक अशिक्षीत व्‍यक्‍ती आहे. वस्‍तुतः विरुध्‍दपक्षाने कर्ज करारनाम्‍यात आणि परतफेडीचे शेडयुल मध्‍ये सुध्‍दा व्‍याजाचा दर नमुद करणे बंधनकारक आहे.

14.     विरुध्‍दपक्ष कंपनीने तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेले वेलकम लेटर जे पान क्रं 54 वर दाखल आहे त्‍यामध्‍ये कर्जाची रक्‍कम रुपये-5,20,000/- कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्ष, एकूण व्‍याज रुपये-3,30,000/- असे मिळून एकूण रुपये-8,50,000/- कर्जाचा अर्धवार्षिक हप्‍ता रुपये-85,000/- प्रमाणे एकूण 10 अर्धवार्षिक हप्‍ते, प्रथम कर्ज परतफेडीचा  हप्‍ता दिनांक-30 जून, 2017 देय होता आणि  त्‍यानंतर महिन्‍याच्‍या 10 तारखेस पुढील हप्‍ते देय होते, तयाप्रमाणे  10 डिसेंबर, 2017, 30 जून, 2018, 10 डिसेंबर, 2018,   10 जून, 2019, 10 डिसेंबर, 2019, 10 जून, 2020, 10 डिसेंबर, 2020, 10 जून, 2021, 10 डिसेंबर, 2021 आणि 10 जून, 2022 असे कर्ज परतफेडीचे हप्‍ते देय होते.

15.   तक्रारकर्त्‍याने प्रथम कर्ज परतफेडीचा हप्‍ता रुपये-85,000/- दिनांक-11.12.2017 रोजी जमा केला. त्‍यानंतर दुसरा कर्ज परतफेडीचा हप्‍ता रुपये-85,000/-  दिनांक-11.06.2018 रोजी जमा केला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनीचे कर्मचारी श्री भूरे यांचे जवळ दिनांक-26.12.2018 रोजी रुपये-50,000/- जमा केलेत. त्‍यानंतर दिनांक-20.03.2019 रोजी रुपये-35,000/- जमा केलेत. अशाप्रकारे कर्ज परतफेडीपोटी एकूण रुपये-2,55,000/- जमा केलेत. यावरुन असे दिसून येते की, प्रथम दोन कर्ज परतफेडीचे हप्‍ते वेळेवर जमा झालेत.

16.   उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनीचे अधिका-यांनी कर्ज देण्‍यापूर्वी वार्षिक व्‍याजाचा दर स्थिर दराने 8.5 टक्‍के असल्‍याचे सांगितले नंतर मात्र कर्ज करारनाम्‍या मध्‍ये तसेच कर्ज परतफेडीचे शेडयुल मध्‍ये कर्जावरील व्‍याजाचा दर नमुद केलेला नाही.  मात्र दिनांक-17.06.2017 रोजीचे कर्ज मंजूरीचे पत्रात व्‍याजाचा दर 12.69 टक्‍के वार्षिक नमुद केला. विरुध्‍दपक्ष कर्ज पुरवठा करणा-या कंपनीची सदरची कृती ही अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब (Unfair Trade Practice) आणि तक्रारकर्त्‍यास दिलेली दोषपूर्ण सेवा (Deficiency in service) ठरते. ही सर्व बाब मागाहून तक्रारकर्त्‍याचे लक्षात आल्‍या नंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनी कडे उर्वरीत संपूर्ण कर्ज रक्‍कम परतफेड करण्‍याची तयारी दर्शविली परंतु त्‍यास कोणताही प्रतिसाद विरुध्‍दपक्ष कंपनीने दिला नाही आणि त्‍याने मागणी केल्‍या प्रमाणे त्‍यास कर्ज खात्‍याचा अंतिम हिशोब दिलेला नाही. तक्रारकर्त्‍याने आपली बाजू सिध्‍द करण्‍या करीता त्‍याचा आणि कर्जहमीधारक श्री श्रीधर जोशी कहाळकर यांचा शपथेवरील  पुरावा दाख केलेला आहे. विरुध्‍दपक्ष कंपनीने लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने दिलेले धनादेश अनादरीत झाले असल्‍या बाबत आक्षेप घेतला परंतु त्‍यासंबधाने कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्‍यास कर्ज खात्‍याचा उतारा पुरविल्‍या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.

17.   तक्रारकर्त्‍याची कर्ज परतफेडीची मुदत  दिनांक-10 जून, 2022 अशी आहे परंतु तक्रारकतर्याने त्‍याचे तक्रारी मध्‍ये मुदतपूर्व कर्ज परतफेड करणार असल्‍याची मागणी केलेली आहे. वरील सर्व परिस्थिती पाहता तक्रारकर्ता हा त्‍याचे वाहन कर्जावर वार्षिक स्थिर 8.5 टक्‍के व्‍याजाचा दर मिळण्‍यास हक्‍कदार आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.  विरुध्‍दपक्ष कंपनीने चुकीची  व्‍याजाची आकारणी स्थिर वार्षिक 12.69 टक्‍के केल्‍यामुळे (Flat Rate) तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याला या सर्व प्रकारात निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला असल्‍याने त्‍याला नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

18  उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे मुद्दा क्रं 1 ते 3 यांचे उत्‍तर “होकारार्थी”  आल्‍याने  मुद्दा क्रं 4 अनुसार जिल्‍हा ग्राहक आयोग प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                                                                :: अंतिम आदेश ::

 

01)   तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष  क्रं-1) शाखा व्‍यवस्‍थापक, महिंद्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनान्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड, शाखा भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) विभागीय व्‍यवस्‍थापक, महिंद्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनान्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

02)   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनान्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड यांना आदेशित करण्‍यात येते की, प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून पंधरा दिवसांचे आत तक्रारकर्त्‍याचे कर्ज रकमेचा अंतिम हिशोब तयार करावा. अंतिम हिशोबाचे दिनांकास  तक्रारकर्त्‍याचे कर्ज रकमेवर सुरुवाती पासून ते अंतिम हिशोबाचे दिनांका पर्यंत वार्षिक-8.5 टक्‍के स्थिर (Flat Rate) व्‍याजाचा दर आकारावा तसेच त्‍यामध्‍ये उशिरा रक्‍कम भरल्‍या बद्दल दंडनीय व्‍याज व दंडनीय रकमा आकारु नये. अशी अंतिम हिशोबाची रक्‍कम आल्‍यानंतर त्‍या आलेल्‍या रकमे मधून तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी कर्ज परतफेडीपोटी विरुध्‍दपक्ष कंपनी मध्‍ये जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,55,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष पंचावन्‍न हजार फक्‍त) समायोजित (Adjusted) करावी व अशी रक्‍कम समायोजित झाल्‍या नंतर आलेला अंतिम हिशोब तक्रारकर्त्‍यास पुरवावा. तक्रारकर्त्‍याने असा अंतिम हिशोब प्राप्‍त झाल्‍या नंतर पंधरा दिवसांचे आत सदर रकमेचा भरणा विरुध्‍दपक्ष कंपनीकडे करावा. तक्रारकर्त्‍या कडून अंतिम हिशोबाची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष कंपनीने कर्ज रकमे संबधात ना-देय-प्रमाणपत्र (No Due Certificate) तक्रारकर्त्‍याला दयावे.

03)    तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा रकमा विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत दयाव्‍यात. 

04)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1) शाखा व्‍यवस्‍थापक, महिंद्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनान्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड, शाखा भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) विभागीय व्‍यवस्‍थापक, महिंद्रा अॅन्‍ड महिन्‍द्रा फायनान्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या उपरोक्‍त नमुद कालावधी मध्‍ये करावे.

          05)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन  दयावी.

          06)    तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.