Maharashtra

Solapur

CC/10/568

the manager anndlaxmi narayan chilveri - Complainant(s)

Versus

transport corporation india (TCI) - Opp.Party(s)

ravindra patil

31 Mar 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/568
1. the manager anndlaxmi narayan chilverishripad textile 13/14 konda nagar solapursolapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. transport corporation india (TCI)pune solapur road bhagavat nagar bale solapursolapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBERHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :ravindra patil, Advocate for Complainant

Dated : 31 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

ग्राहक तक्रार क्रमांक : 568/2010.

 

                                                                 तक्रार दाखल दिनांक : 19/11/2011.    

                                                                तक्रार आदेश दिनांक : 31/03/2011.   

 

मॅनेजर, श्री. आनंद लक्ष्‍मी नारायण चिलवेरी, श्रीपाद टेक्‍स्‍टाईल,

13/14, कोंडा नगर, अक्‍करकोट रोड, सोलापूर.                           तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

ट्रान्‍सपोर्ट कार्पोरेशन इंडिया (टी.सी.आय.),

सोलापूर-पुणे रोड, भागवत नगर, बाळे, सोलापूर.                       विरुध्‍द पक्ष

 

       गणपुर्ती  :-   सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                      सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

                  सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  आर.व्‍ही. पाटील

          विरुध्‍द पक्ष गैरहजर / एकतर्फा

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, त्‍यांनी दि.18/1/2010 रोजी दिल्‍ली येथील विविध कॉलेज येथे नॅपकीन (टरकीस) चे पार्सल 1000 नग किंमत प्रतिनग रु.10.50 पैसे याप्रमाणे एकूण रु.10,500/- किंमतीचा माल विरुध्‍द पक्ष यांच्‍या ताब्‍यात दिला आणि तो पाठविण्‍यासाठी रु.552/- खर्च देऊन पावती घेतली. त्‍यानंतर तो माल विरुध्‍द पक्ष यांनी दिल्‍ली येथील कॉलेजमध्‍ये पोहोच केला नाही. त्‍याबाबत विचारणा केली असता कोणतेही उत्‍तर दिले नाही आणि नुकसान भरपाईही दिली नाही. विरुध्‍द पक्ष यांनी सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रु.10,500/- व्‍याजासह मिळावेत आणि मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

2.    विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले नाही आणि मंचासमोर ते हजर झालेले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फी तक्रार चालविण्‍याचा आदेश करुन तक्रार सुनावणीसाठी ठेवण्‍यात आली.

 

3.    तक्रारदार यांची तक्रार व त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                             उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष  यांनी  तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                             होय.

2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?      होय.       

3. काय आदेश ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

 

 

 

4.    मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी दि.18/1/2010 रोजी दिल्‍ली येथील विविध कॉलेज यांना पार्सल पाठविल्‍याचे निदर्शनास येते. तसेच त्‍याकरिता विरुध्‍द पक्ष यांना  एकूण रु.552/- मोबदला दिल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावतीरुन दिसून येते. नॅपकीनचे पार्सल विविध कॉलेज, दिल्‍ली यांना अप्राप्‍त असल्‍यामुळे त्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे चौकशी करुनही दखल घेण्‍यात आली नसल्‍याचे तक्रारदार यांनी नमूद केले.

 

5.    विरुध्‍द पक्ष यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्‍हणणे दाखल केले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन तक्रारदार यांचे पार्सल विविध कॉलेज, दिल्‍ली येथे पोहोच झाले किंवा कसे ? हे पुराव्‍याद्वारे सिध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न केलेला नाही. मंचासमोरील अनुपस्थिती, मंचासमोर म्‍हणणे दाखल न करणे इ. कृतीवरुन तक्रारदार यांची तक्रार विरुध्‍द पक्ष यांना मान्‍य आहे, या अनुमानास आम्‍ही येत आहोत.

 

 

6.    तक्रारदार यांनी विविध कॉलेज, दिल्‍ली यांना पाठविलेले पार्सल इच्छित स्‍थळी पोहोचले नाही किंवा ते तक्रारदार यांनाही परत मिळालेले नाही. तक्रारदार यांनी ज्‍या विश्‍वासाने नॅपकीनचे पार्सल दिल्‍ली येथे पोहोच करण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष यांच्‍या ताब्‍यात दिले होते, त्‍या विश्‍वासास पात्र राहून ते सुस्थितीत,  नुकसान न करता व गहाळ न करता पोहोच करण्‍याची विरुध्‍द पक्ष यांची जबाबदारी होती.  परंतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचे पार्सल गहाळ केलेले आहे आणि त्‍याशिवाय तक्रारदार यांना ते परत मिळवून देण्‍याबाबत किंवा इच्छित स्‍थळी पोहोच करण्‍यासह त्‍यांची किंमत परत करण्‍याबाबत कोणतेही प्रयत्‍न केलेले नाहीत.

 

7.    मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने 'नाथ ब्रदर्स एक्‍झीम इंटरनॅशनल लि. /विरुध्‍द/ बेस्‍ट रोडवेज लि.', 1 (2000) सी.पी.जे. 25 (एस.सी.) या निवाडयामध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे म्‍हटले आहे की,

 

 

                The liability of a carrier to whom the goods are entrusted for carriage is that of an insurer and is absolute in terms, in the sense that the carrier has to deliver the goods safely, undamaged and without loss at the destination, indicated by the consignor. So long as the goods are in the custody of the carrier, it is the duty of the carrier to take due care as he would have taken of his own goods and he would be liable if any loss or damage was caused to the goods on account of his own negligence or criminal act or that of his agent and servants.

 

8.    तक्रारीची वस्‍तुस्थिती व वरील नमूद न्‍यायिक तत्‍व पाहता, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचे नॅपकीनचे पार्सल गहाळ करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते आणि तक्रारदार सदर पार्सलमध्‍ये असणा-या नॅपकीनची किंमत रु.10,500/- दि.18/1/2010  पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने नुकसान भरपाई स्‍वरुपात मिळविण्‍यास पात्र आहेत, या मतास आम्‍ही आलो आहोत.

 

9.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.10,500/- दि.18/1/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

      2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

      3. विरुध्‍द पक्ष यांनी उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्‍यास मुदतीनंतर संपूर्ण देय रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

 

 

 (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

अध्‍यक्ष

(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)                              (सौ. संजीवनी एस. शहा)

          सदस्‍य                                           सदस्‍य

        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

(संविक/स्‍व/31311)

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER