::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, मा.रत्नाकर ल.बोमिडवार, अध्यक्ष(प्रभारी)) (पारीत दिनांक : 01.02.2013) 1. अर्जदाराने, सदर तक्रार गै.अ.चे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असुन, तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदार प्रमोद वसंत भेंडे असून त्याचा दुर्गा ईलेक्ट्रीकल या नावाने बल्लारपुर येथे व्यवसाय आहे. अर्जदाराने गै.अ.(ज्यांचा मारोती कंपनीचे कार विकण्याचा अधिकृत व्यवसाय आहे.) यांचे कडे कार खरेदी करण्यासाठी चौकशी केली. अर्जदाराने स्वि़फट व्हिडीआय व्हाईट कलरची कार खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. सदर कारची डिलेव्हरी लवकर देतो म्हणून गै.अ.ने सांगीतल्यावर अर्जदाराने दि.17/08/2011 रोजी रु.25,000/- गै.अ.कडे जमा करुन स्विफट व्हिडीआय व्हाईट कलरची बुक केली. 3. अर्जदाराने गै.अ.कडे वारंवार चकरा मारुन कारची डिलीव्हरी देण्याची मागणी केली. शेवटी दि.02/02/2012 रोजी गै.अ.ला पंजीबध्द डाकेने पञ पाठवून कारची मागणी केली असता गै.अ.ने अर्जदाराला दि.02/02/2012 रोजी पञ देवून कार उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सूचित केले. गै.अ.चे अधिका-यांनी अर्जदाराला सांगीतले की, स्विफट डिझायर कार अव्हेलेबल आहे. परंतू किंमत जास्त होईल. अर्जदाराने पैशाचा विचार न करता जास्तीत जास्त किंमतीची स्विफट डिझायर कार घेण्याचा विचार केला. परंतू गै.अ.ने अर्जदाराला सांगीतले की, दि.17/08/2011 रोजह बुकींग केलेल्या तारखेची किंमत अर्जदार गै.अ.यास देणार. गै.अ.चे अधिका-याने अर्जदाराकडून लेखीपञ लिहून घेवून स्विफट डिझायर गाडीची बुकींग फरवरी 2012 मध्ये घेतली ज्या तारखेला बुकींग केली त्याच तारखेची किंमत गै.अ.ने अर्जदाराकडून घेतली पाहिजे. 4. फरवरी 2012 पासुन अर्जदाराने कडे वारंवार जावून स्विफट डिझायर कारची मागणी केली असता कारची डिलीव्हरी देण्यास टाळाटाळ केली. कार उपलब्ध नाही असे कारण देवून मानसिक व शारिरीक ञास दिला. अर्जदाराने दि.28/05/2012 ला लेखीपञ पाठवून कारची डिलीव्हरी देण्याची विनंती केली. त्यापञाची गै.अ.ने अद्याप दखल घेतली नाही. 5. अर्जदाराने दि.17/08/2012 रोजी गै.अ.कडे बुकींगची रक्कम रु.25,000/- जमा केली. तेव्हापासुन वारंवार चकरा मारल्या असता फरवरी 2012 मध्ये गै.अ.चे अधिका-याचे सांगण्यावरुन स्विफट डिझायर कारची डिलीव्हरी लवकर मिळणार आहे असे सांगीतल्यावर अर्जदाराने फरवरी 2012 मध्ये लेखीपञ देवून स्विफट कारची मागणी केली. तेव्हापासुन गै.अ.ने कार उपलब्ध नाही असे कारण देवून कारची डिलीव्हरी देण्यास टाळाटाळ केली. कार बुकींग केलेल्या तारखेची किमंत गै.अ.ने अर्जदाराकडून घेवून कारचा ताबा द्यावा व झालेल्या ञासाबद्दल भरपाई देण्याची जबाबदारी गै.अ.ची आहे. 6. सदर मामल्यात दि.17/08/2011 ला कार बुक केली. वारंवार कारची मागणी केली. त्यानंतर फरवरी 2012 रोजी स्विफट डिझायर कार करीता लिहून घेतलेल्या तारखेला व त्यानंतर दि.28/05/2012 ला पञ देवून वारंवार व्यक्तीशः जावून कारचा ताबा मागीतला. परंतु अद्याप कारची डिलीव्हरी न मिळाल्याने सदर तक्रार दाखल केली. 7. गै.अ.ने अर्जदारास दि.17/08/2011 रोजी बुकींग केलेल्या तारखेची स्विफट डिझायरची किमत घेवून स्विफट डिझायर कारचा ताबा द्यावा. दि.17/08/2012 ला ताबा न दिल्यामुळे अर्जदारास शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.30,000/- द्यावे तक्रारीच्या खर्चापोटी रु.20,000/- द्यावे अशी मागणी केली आहे.
8. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठर्थ नि. 4 नुसार अ 1 ते अ 6 वर 5 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.विरुध्द नोटीस काढण्यात आले. नि.क्रं. 5 दि.22/08/2012 ला नोटीस तामील झाल्याचा अहवाल सादर झाला. नि.क्रं. 6 वर अर्जदाराने पुरसीस दाखल करुन तक्रारीची मूळ प्रत म्हणजेच शपथपञ समजा असे म्हटले. 9. गै.अ.व त्यांचे अधिकारी किंवा प्रतिनिधी हजर झाले नाही. तसेच लेखीउत्तर, बयाण किंवा कोणतेही कथन त्यांनी दाखल केले नाही. 10. त्यामुळे नि.क्रं. 1 वर गै.अ.विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. // कारणे व निष्कर्ष // 11. अर्जदार प्रमोद वसंत भेंडे रा.बल्लारपुर यांनी गै.अ.कडे दि.17/08/2012 रोजी रु.25,000/- भरुन स्विफट व्हिडीआय कार बुक केली. वारंवार मागणी केल्यानंतरही व लेखीपञ देवूनही कारची डिलीव्हरी दिली नाही. 12. शेवटी फरवरी 2012 मध्ये कार उपलब्ध होण्यास अद्याप वेळ असल्याने गै.अ.च्या अधिका-याचे सांगण्यानुसार दि.17/08/2011 रोजी बुकींग केलेल्या तारखेची किमतीवर स्विफट डिझायर गाडीची फरवरी 2012 मध्ये केली. अद्यापही डिलिव्हरी दिली नसल्यामुळे अर्जदार यांनी सदर तक्रार दाखल केली. 13. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपञाचे (दस्ताऐवज) अवलोकन केले असता नि.क्रं 4 अ 1 वर रु.25,000/- चा चेक क्रं. 436210 दि.16/08/2011 ट्रायस्टार वर काढलेला भारतीय स्टेट बँकेचा चेक प्राप्त झाल्याची दि.17/08/2011 ची पावती दिसुन येते. अ 2 वर दि.02/02/2012 चे ट्रायस्टर कारकडून स्ट्राईक मुळे कारची डिलीव्हरी होण्यास विलंब लागत असल्याने पञ असल्याने गै.अ.ने विलंब मान्य केल्याचे सिध्द होते. अ 3 वर दि.09/02/012 व अ 5 वर दि.28/05/2012 नुसार ट्रायस्टारला पञ पाठवून कारची डिलीव्हरी देण्यासंबंधी वारंवार मागणी केल्याचे दिसुन येते. यावरुन अर्जदार हा स्विफट कारचा ताबा मिळण्यास व नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे असे या न्यायमंचाचे मत आहे. 14. गै.अ.नोटीस तामील झाल्यापासुन न्यायमंच मध्ये हजर झाला नाही. तसेच लेखीउत्तर किंवा शपथपञ सादर केले नाही त्यामुळे त्याचे विरुध्द नि.क्रं. 1 वर दि.17/09/2012 ला एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. 15. गै.अ.याने अर्जदारास सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे सिध्द होते. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन व गै.अ.याने आपले म्हणणे सादर न केल्यामुळे सर्व (घटनेत) कारणांना (मुक सम्मती असल्याचे) गै.अ.जबाबदार असल्याचे सिध्द होते. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
16. वरील कारणे व निष्कर्षा नुसार तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे. या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे तक्रार मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. (2) दि.17/08/2011 चे किंमतीनुसार स्विफट डिझायरची किंमत अर्जदाराकडून घेवून स्विफट डिझायरची डिलीव्हरी गै.अ.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. (3) गै.अ.ने अर्जदारास मानसिक, शारिरीक ञासापोटी रु.2,000/- व ग्राहक तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. (4) उभयपक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 01/02/2013 |