Complaint Case No. CC/427/2015 | ( Date of Filing : 12 Aug 2015 ) |
| | 1. Printers Trading Company Nagpur, Through Prop. Shri. Prbhakar Keshavrao Londhe | Off.at, Near Abhyankar Putla, Tilak Road, Mahal, Nagpur R/o. Kothi Road, Mahal, Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Trackon Couriers Pvt Ltd. | Off.at, Dnyanganga Plot no.24, Pragati Colony, near Sai Mandir, Wardha Road, Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केली असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता हा प्रिन्टर ट्रेडिंग कंपनीचा मालक असून त्यानी ही कंपनी स्वतःची दैनदिन उपजीविका चालविण्याकरिता स्थापन केली आहे. तसेच त्याच्याकडे या व्यतिरिक्त अन्य कुठलेही उपजीविकेचे साधन नाही. विरुध्द पक्ष ही कुरियर कंपनी असून त्यांचा उद्देश त्यांच्या ग्राहकांना कुरियर सेवा प्रदान करणे हा आहे.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, त्याने लोकमत न्यूज पेपर लि. पुणे यांना पाठवावयाचा माल विरुध्द पक्षा द्वारे पाठविला. सदर माल लोकमत न्यूज पेपर लि. पुणे यांनी तक्रारकर्त्याकडून रुपये 7,875/- एवढया किंमतीत विकत घेतला होता व सदरचा माल लोकमत न्यूज पेपर लि. पुणे यांना तक्रारकर्त्याकडून प्राप्त झाल्यानंतर लोकमत न्यूज पेपर लि. पुणे ही कंपनी तक्रारकर्त्याला मालाची किंमत रुपये 7,875/- अदा करणार होती.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दि. 10.07.2014 रोजी लोकमत न्यूज पेपर पुणे यांना माल पाठविण्याकरिता (Sponge visaovita) 100 नग रुपये 7,875/- किंमतीचे पार्सल केले होते. विरुध्द पक्षाने रुपये 100/- कुरियर भाडे स्वीकारुन 401117525 क्रमांकाची पावती तक्रारकर्त्याला दिली. परंतु विरुध्द पक्षाने लोकमत न्यूज पेपर लि. पुणे यांच्याकडे तक्रारकर्त्याने पाठविलेला माल पोहचविला नाही. याबाबत तक्रारकर्त्याने वारंवांर विरुध्द पक्षाकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 09.10.2014 ला विरुध्द पक्षाला पत्र पाठवून त्याद्वारे लोकमत न्यूज पेपर पुणे यांना माल पोहचविण्याची विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही. लोकमत न्यूज पेपर पुणे यांनी दि. 04.02.2015 ला तक्रारकर्त्याला पत्र पाठवून दि. 04.02.2015 पर्यंत माल न मिळाल्याचे कळविले. शेवटी तक्रारकर्त्याने दि. 09.03.2015 ला विरुध्द पक्ष कुरियर कंपनीला रजि. पोस्टाद्वारे पत्र पाठवून त्याद्वारे संबंधित माल लोकमत न्यूज पेपर पुणे यांना पोहचविण्याची विनंती केली. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे कळविले. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पत्राची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करून खालील प्रमाणे मागणी केली आहे.
अ. विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात यावे की, त्याने तक्रारकर्त्याला मालाचे पार्सल किंवा मालाची किंमत रुपये 7,875/- द्यावे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही द्यावा. - विरुध्द पक्षाने आपला लेखी जबाब दाखल केला असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याची प्रिन्टर्स ट्रेडिंग कंपनी असून तक्रारकर्ता हा त्याचा मालक आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की, त्याचा प्रिन्टींग मशीन तसेच त्याचे सुटे भाग विकण्याचा व पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की, लोकमत न्यूज पेपर लि. पुणे यांनी त्याच्याकडून रुपये 7,875/- एवढया किंमतीचा माल विकत घेतला व सदरच्या मालाचा पुरवठा पुणे येथे करावयाचा होता व सदरचा माल विरुध्द पक्ष कंपनी यांच्याकडे बुक केला होता.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून त्याने व्यापारामध्ये नफा कमविण्याकरिता सेवा घेतली होती , त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून मागणी करण्यास प्रतिबंधीत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने Economic Transport Organising VS. Charan Spinning Mills लि. या प्रकरणात दिलेल्या न्यायनिवाडयांचा जर तक्रारकर्ता वाणिज्य कारणास्तव सेवा घेत असेल तर तो ग्राहक नाही. त्यामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्षाने बुकिंग पावतीच्या पहिल्या पानावर दर्शविलेले आहे की, ..
If not covered by special risk surcharges, claim value on the shipper shall in no circumstances exceed Rs. 2000/- for parcel and Rs. 100/- for packet document. अट कबूल केल्यानंतर माल पाठविणारा नंतरच्या टप्प्यात आपल्या मनाने व इच्छेनुसार अटीच्या बाहेर जाऊन मागणी करु शकत नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला निर्गमित केलेल्या पावतीवर कुठे ही मालाचा उल्लेख नमूद केलेला नाही. तक्रारकर्त्याने सदरचा माल विरुध्द पक्षाकडे बुक केल्याचा पुरावा नाही. नोंदणी पावती माल पाठविणा-याला किंमती वस्तू पाठविण्याकरिता विरुध्द पक्षाचे एक्सप्रेस सेवा प्राईम ट्रैकने पाठविण्याची मुभा देते. परंतु तक्रारकर्त्याने सदर माल ऑडनरी डिलीव्हरी द्वारे पाठविण्याचा आग्रह धरला कारण त्याने कोणतीही किंमती वस्तू बुक केली नव्हती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला निर्गमित केलेल्या पावतीवर तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये झालेल्या करारातील शर्ती व अटी नमूद आहे व तक्रारकर्ता एकदा करार झाल्यानंतर त्यातील शर्ती व अटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. - तक्रारकर्त्याने रुपये 7,875/- इतक्या रक्कमेचा माल बुक केल्याचे नाकारण्यात येत आहे. दि. 10.07.2014 ला पार्सल हे नागपूर वरुन पुणे येथे पाठविण्याकरिता ऑडनरी मार्गाने पाठविण्याकरिता बुक करण्यात आले होते आणि सदर पार्सल मध्ये कोणतीही किंमती वस्तू असल्याबाबत बुकिंग करते वेळी दर्शविण्यात आले नव्हते. तक्रारकर्त्याकडून विरुध्द पक्षाला निर्देशित न केल्यामुळे पार्सल मधील वस्तू बाबत काहीही माहिती नव्हती. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेली बुकिंग पावती ही फेरफार दस्तावेज आहे. ठळक अक्षरातील सुचनेच्या खाली असलेल्या रिकाम्या जागे मध्ये पार्सल मध्ये 100 sponge viskovita असे लिहिण्यात आले. तक्रारकर्त्याने जाणूनबुजून त्याला दिलेली मुळ पावती दाखल केली नाही. तक्रारकर्त्याला मुळ पावती दाखल करण्यास सांगण्यात यावे. तक्रारकर्त्याचे पार्सल नागपूर ते पुणे प्रवासा मध्ये अनावधानाने गहाळ झाले आहे आणि शोध घेऊन ही मिळाले नाही. सदर पार्सल गहाळ झाल्याबाबत तक्रारकर्त्याला सूचित करण्यात आले आणि तक्रारकर्त्याला पार्सलच्या शर्ती व अटीनुसार पार्सल बुकिंगच्या चारपटीने रक्कम देण्याची मुभा देण्यात आली. करारातील शर्ती व अटीनुसार तक्रारकर्ता सदर प्रस्तावाला बांधील आहे. Indrapuri Express Courier Pvt. Ltd. VS. Allied Business 2007 (3) CLT 673 मधील न्यायनिवाडयानुसार तक्रारकर्ता करारातील शर्ती व अटीनुसार बांधील आहे. सदर प्रकरणात विरुध्द पक्षाच्या बुकिंग पावती मधील नमूद शर्ती व अटीनुसार कुरियर माल पाठविणा-यास बुकिंग रक्कमेच्या 4 पट रक्कम देण्यास बांधील आहे की, ज्या प्रकरणात पार्सल मधील वस्तू गहाळ झाली असेल व ती बुकिंग पावतीवर नमूद नसेल.
- ज्या प्रकरणात पावतीवर मालाचे वर्णन केले नसेल, त्या प्रकरणात कुरियर हे बुकिंग कुरियर चार्जेसच्या चारपट रक्कम देण्यास जबाबदार आहे किंवा दस्तावेजाचे पॅकेटबाबत रुपये 1000/- किंवा पार्सल प्रकरणात रुपये 2000/- सदर तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
- उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज, लेखी युक्तिवाद व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाला करिता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले
1 तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय 2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय? होय 3 विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय? होय 4 आदेश ? अंतिम आदेशानुसार कारणमीमांसा - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्याने लोकमत न्यूज पेपर लि. पुणे यांना नागपूरवरुन पुणे येथे पाठवावयाचे पार्सल विरुध्द पक्ष Track on Courier Pvt Ltd. यांचे वर्धा रोड नागपूर येथील ब्रान्चला दि. 10.07.2014 ला रुपये 100/- अदा करुन बुक केले होते. विरुध्द पक्ष कुरिअर कंपनीने तक्रारकर्त्याकडून रुपये 100/- प्राप्त झाल्याचे व पार्सल sponge viskovita 100 नग नमूद असलेली पावती क्रं. 401117525 तक्रारकर्त्याला दिली असल्याचे नि.क्रं. 2(2) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे पार्सल नागपूर ते पुणे प्रवासा दरम्यान गहाळ झाल्याचे मान्य केले आहे व सदरच्या पार्सलमध्ये गहाळ झालेल्या वस्तुची किंमत रुपये 7,875/- इतकी असल्याचे नि.क्रं. 2( 1 व 5) वर दाखल असलेल्या दस्तावेजावरुन दिसून येते. CARRIAGE BY ROAD ACT, 2007 मधील कलम 17 General responsibility of common carrier या मथळयाखाली नमूद आहे की, Save as otherwise provided in this Act, a common carrier shall be responsible for the loss, consignment entrusted to him for carriage, arising from any cause except the following, namely:-
- act of God,
- act of war or public enemy;
- riots and civil commotion;
- arrest, restraint or seizure under legal process;
- order or restriction or prohibition imposed by the Central Government or a State Government or by an officer or authority subordinate to the Central Government or a State Government authorised by it in this behalf:
त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून गहाळ झालेल्या वस्तूची भरपाई किंमत मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 7,875/- व त्यावर दि. 10.07.2014 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याजसह रक्कम द्यावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई करिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
| |