Maharashtra

Nagpur

CC/307/2022

MR. RAGHUNATH ROHITDAS BHURKURIYA - Complainant(s)

Versus

TOPPER TECHNOLIGIES PVT LTD. - Opp.Party(s)

ADV. BHARTI TAMGADGE

11 Nov 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/307/2022
( Date of Filing : 13 Apr 2022 )
 
1. MR. RAGHUNATH ROHITDAS BHURKURIYA
R/O. QUARTER NO.EC22/2, JUNA KAMPTEE ROAD, KALAMNA RAILWAY STATION, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TOPPER TECHNOLIGIES PVT LTD.
OFF. ADD. 3RD FLOOR, PLOT NO.17/1, AMAR PLAZA, IT PARK GAYATRI NAGAR, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
2. TOPPER TECHNOLOGIES PVT LTD.
OFF.AT, 602, POWAI PLAZA, OPP. HIRANANDANI GARDENS, SAINATH NAGAR, POWAI, MUMBAI 400076
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT
 HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER
 
PRESENT:ADV. BHARTI TAMGADGE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Nov 2024
Final Order / Judgement

आदेश  

मा. अध्यक्ष श्री. सचिन शिंपी यांचे आदेशान्वये.

 

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 अंतर्गत दाखल केली आहे. 
  2. तक्रारदाराचा मुलगा रिशभ भूरकुरिया हा 9 व्या वर्गात शिकत असतांना वि.प. यांचे क्लासेस विषयी तक्रारदार यांना माहिती मिळाल्याने तक्रारदाराने वि.प. यांचे प्रतीनीधीं  आकाश काळमकर आणि फैजान मलीक यांचेशी संपर्क केला व तक्रारदार यांचा मुलगा स्टेट बोर्ड मध्‍ये शिकत असल्यांने त्यांना वर्ग 10 व 12 वर्गाचे शिकवणीकरिता प्रत्यक्ष हजर राहुन शिकविण्‍याबाबत सांगीतले त्यानुसार तक्रारदाराने वि.प. यांना दिनांक 24.10.2020 रोजी रक्कम रुपये 16,000/- दिले व उर्वरित रक्कम रुपये 64,000/- बजाज फायनान्स यांचेकडुन कर्ज घेऊन वि.प. यांना अदा करण्‍यात आले. सदर कर्जाचा हप्ता रुपये 8,000/- इतका  तक्रारकर्ता नियमित भरणा करित होता.
  3. वि.प.यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे त्यांनी दोन अभ्‍यासाचे व्हीडीओ तक्रारदाराचे मुलाचे भ्रमणध्‍वनीवर पाठविले. परंतु त्यातील संपूर्ण अभ्यासक्रम हा CBSE पॅटर्न चा असुन तक्रारदाराचे मुलगा हा State Board चे अभ्‍यासक्रम शिकत असल्याने वि.प. यांना कळविले. वि.प. यांनी पाठविलेला अभ्यासक्रम हा CBSE पॅटर्न चा असल्याने तक्रारदाराचे मुलाला तो समजत नव्हता म्हणुन वि.प. मार्फत दिनांक 8.12.2020 रोजी तक्रारदाराचे मुलाला टॅब पाठण्यिात आला.
  4. त्‍्यानंतर तक्रारदाराने वि.प. यांचे प्रतीनीधी तुषार हेडाऊ यांचेशी प्रत्यक्ष संपर्क करुन देखील वि.प. यांनी तक्रारदाराच्या तक्रारीचे निवारण केले नाही.  तक्रारदारांचा मुलगा State Board पॅटर्न मध्‍ये शिकत असतांना देखिल CBSE पॅटर्नचा अभ्‍यासक्रम पाठविला. तसेच वेळोवेळी नोटीसव्दारे मागणी करुन देखिल तक्रारदाराने वि.प. यांचेकडे फी म्हणुन भरलेली रक्कम रुपये 80,000/- परत केली नाही.  सदरची बाब ही वि.प.चे सेवेतील कमतरता असल्याने  सदर तक्रार दाखल करुन टयुशन फी करिता भरलेली रक्कम रुपये 80,000/- व्याजसह परत मिळावी. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक शारीरिक त्रासाबद्दल रुपये रु.50,000 व तक्रारीचा खर्च रु.25,000/- मिळावे अशी मागणी केली.
  5. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. वृत्तपत्रातुन यांना नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प.क्र.2 यांना दिनांक 7 मार्च 2024 वि.प.क्रं. 1 यांना दिनांक 6.3.2024 रोजी दैनिक नवभारत मध्‍ये नोटीस प्रसिध्‍द करुनही वि.प. तक्रारीत हजर झाले म्हणुन सदर तक्रार दिनांक 22.4.2024 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश नि.क्रं.1 पारित करण्‍यात आला पारित करण्‍यात आला.
  6. तक्रारदाराचे वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला व दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ खालील मुद्दे आले त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे देण्‍यात आली.
    •                              उत्तरे
  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?           होय
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा देवून

अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ?             होय

  1. काय आदेश ?                              अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. मुद्दा क्रं.1 2 बाबत - तक्रारदाराने वि.प. यांचेकडे शिकवणीकरिता दिनांक 2.2.2021 रोजी रुपये 16,000/- दिल्याची बाब अभिलेखावर दाखल स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे स्टेटमेंट वरुन नि.क्र.2(1) वरुन स्पष्‍ट होते. तसेच तक्रारदाराने रक्कम रुपये 64,000/- बजाज फीन सर्व्‍ह यांचे कडुन कर्ज घेऊन वि.प.यांना अदा केल्याने नि.कं.15 व 16 वर दाखल स्टेटमेंट व वि.प. यांनी दिलेली पावती नि.क्रं. 15(2)(3) वरुन स्पष्‍ट होते. परिणामी तक्रारदार हा वि.प.चा ग्राहक असल्याचे सिध्‍द होते. तक्रारदार यांचा मुलगा State Board मध्‍ये शिकत असतांना वि.प.यांनी तक्रारदाराचे मुलाला CBSE चे SYLLUBES पाठविल्यामूळे तक्रारदाराने टयुशन क्लासकरिता भरलेली फी ची रक्कम परत मिळण्‍याकरिता वि.प. यांना नोटीस पाठविल्याची बाब दिनांक 27.7.2021 रोजीचे नोटीसवरुन स्पष्‍ट होते. तक्रारदार यांना वि.प. यांनी सदोष सेवा दिल्याबाबत शपथेवर पूरावा दाखल केला असुन वि.प. तक्रारीत हजर न झाल्याने तक्रारदाराचे तक्रारीतील कथन ग्राहय धरण्‍यात येते. परिणामी तक्रारीत दाखल दस्तवेजांवरुन वि.प.ने तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली असल्याने मुद्दा क्रं.2 चा निष्कर्ष  आम्ही होकारार्थी देत आहोत.  
  2. सबब तक्रारकर्ता वि.प. यांचेकडुन रक्कम रुपये 80,000/, रक्कम अदा केल्याची दिनांक 2.2.2021 पासुन द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो येणारी रक्कम मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे. तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 15,000/- व तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 10,000/- मंजूर करणे न्यायोचित आहे असे आयोगाचे मत आहे. 

सबब अंतिम आदेश खालीलप्रमाणे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. वि.प. यांनी तक्रारदार यांचे कडुन टयुशन क्लासकरिता स्व‍िकारलेली रक्कम रुपये 80,000/, रक्कम अदा केल्याची दिनांक 2.2.2021 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो येणारी रक्कम अदा करावी.
  3. तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी  रक्कम रुपये 15,000/- व तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 10,000/-अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेश पारित दिनांकापासून 45 दिवसाचे आत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

तक्रारकर्त्याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. B.B. CHAUDHARI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.