आदेश (दि.13/06/2012) द्वारा : मा. अध्यक्ष, श्री.एम.जी.रहाटगांवकर 1. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणे - त्याने दि.24/05/2011 रोजी रु.6,200/- या किमतीस विरुध्द पक्षाकडुन ऑलींपस कॅमेरा विकत घेतला. विकत घेतल्यापासुनच हा कॅमेरा दोषपुर्ण असल्याचे त्याचे निदर्शनास आले विरुध्द पक्ष हा वितरक असुन कॅमेरा दोषपुर्ण असल्याबाबत त्यांचेकडे संपर्क साधणेत आला या कॅमे-याचा हमी कालावधी 2 वर्षाचा होता. मात्र हमी कालावधीत तो नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आल्याने कॅमेर-याची रक्कम रु.6,200/- परत मिळावी नुकसान भरपाई व न्यायीक खर्च एकुण रु.1,00,000/- मिळावा अशी त्याची मागणी आहे. निशाणी 2 अन्ये तक्रारीचे समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र, निशाणी 4(1) व 4(3) अन्वये कागदपत्रे दाखल करण्यात आले. यात दि.20/05/2011 रोजीचे कॅमे-याचे बिल, हमीपत्र व कॅमेरा माहीतीपत्रकाचा समावेश आहे. 2. विरुध्द पक्षाने निशाणी 12 अन्वये आपला जबाब दाखल केला व निशाणी 13 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले. विरुध्द पक्षाचे म्हणणे थोडक्यात असे की - तक्रारदाराने केवळ त्याला वितरक या नात्याने पक्षकार केलेले असुन कंपनीला पक्षकार केलेले नाही. हमी पत्रानुसार उत्पादनातील दोषासंदर्भात वितरकाला जबाबदार धरता येणार नाही. कॅमे-याची बॅटरी, चार्चर, एडॉप्टर, केबल, लेप कार्ड याची हमी नसते. या वादग्रस्त कॅमेरॉत कोणता दोष आहे हे तक्रारदाराने नमुद केलेले नाही. विकत घेतांना तक्रारदारांनी संपुर्ण पहाणी केल्यानंतरच कॅमेरा विकत घेतला होता. हमी पत्रानुसार कॅमेरा सर्विस सेंटरकडे पाठविल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदार कंपनीची होती, मात्र त्यासाठी तक्रारदार तयार नव्हता. या कॅमे-यात कोणताही दोष नाही त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे त्याचे म्हणणे आहे. 3. सुनावणीचे वेळेस मंचाने उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकला, तसेच त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले त्या आधारे खालील प्रमख मुद्दांचा विचार करण्यात आला. मुद्दा क्र. 1 - वादग्रस्त कॅमे-यात उतपादक दोष आहे असे तक्रारदार सिध्द करु शकला काय? उत्तर - नाही स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 - सदर मुद्दासंदर्भात विवेचन सुरू करण्याआधी हि बाब स्पष्ट कारणे आवश्यक ठरते की, ज्या दुकानातुन त्याने कॅमेरा विकत घेतला त्या वितरकाला त्याने पक्षकार केले आहे मात्र त्याचा आरोप हा कॅमे-यात उत्पादनातील दोष असल्याने तो विकत घेतल्यापासुन काम करित नसल्याने नवीन कॅमेरा बदलुन मिळावा अशी त्याची मागणी आहे. उत्पादनातील दोषासंदर्भात आरोप असल्याने वादग्रस्त कॅमेरा उत्पादक कंपनीला विरुध्द पक्षकार करणे आवश्यक होते कारण एखाद्या वस्तुच्या कथीत उत्पादनाच्या दोषाबाबत वितरकाला जबाबदार धरता येत नाही त्यामुळे उत्पादक कंपनी आवश्यक पक्षकार असुनही त्यास पक्षकार केले नाही या कारणाखातर सदर प्रकरण खारीज करण्यायोग्य आहे असे मंचाचे मत आहे. दुसरा महत्वाचा भाग असा की, वादग्रस्त कॅमेरा काम करित नाही असे तक्रारदार म्हणतो पण निश्चितपणे कॅमे-यात कोणता दोष आहे याचा उल्लेख तक्रारीत कोठेही नाही. कॅमे-यात असलेले दोष पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदाराची आहे परंतु त्यांने त्याबाबत कोणताही पुरावा मंचासमक्ष आणलेला नाही म्हणुन तो हे सिध्द करु शकला नाही. तीसरा महत्वाचा भाव असा की, वादग्रस्त कॅमेरा विकत घेतल्यापासुन तक्रार दाखल करेपर्यंत त्यात असलेल्या कथीत दोषाबाबत एकदाही त्याने विरुध्द पक्षाला पत्राद्वारा/नोटिसद्वारे कळविल्याचे आढळत नाही. सबब वादग्रस्त कॅमेरॅत उत्पादनातील दोष असल्याची बाब पुराव्यानिशी तक्रारदार सिध्द करु शकलेला नाही त्याचप्रमाणे वर उल्लेख केलेल्या कारणामुळे तक्रारदार विरुध्द पक्षाकडुन नवीन कॅमेरा अथवा नुकसान भरपाई व खर्च मिळण्यास पात्र नाही हि बाब स्पष्ट करण्यात येते. 4. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1.तक्रार क्र. 89/2011 खारीज करण्यात येते. 2.खर्चाचे वहन उभय पक्षाने स्वतः करावे. दिनांक – 15/06/2012. ठिकाण - कोकण भवन, नवी मुंबई. |