निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 08/06/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 15/06/2012
तक्रार निकाल दिनांकः- 06/07/2013
कालावधी 01 वर्ष. 21 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पांडुरंग पिता मल्हारराव पत्की. अर्जदार
वय 39 वर्षे. धंदा.शेती. अड.एस.यु.ई.पाटील.
रा.पत्की गल्ली राममंदिरा जवळ,पालम.
ता.पालम जि.परभणी.
विरुध्द
1 मा.कृषी अधिक्षक. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित. अड.डि.यु.दराडे.
अकोला,महाबिज भवन कृषी नगर,
अकोला (महाराष्ट्र राज्य सिड सर्टिफिकेशन एजन्सी अकोला)444104
2 कृषी अधिकारी.
सिड सर्टिफिकेशन एजन्सी,शाखा परभणी.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ.
आयटीआयच्या पाठीमागे,जिंतूर रोड जवळ,परभणी
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
निकृष्ट दर्जाचे बियाण्यांची नुकसान भरपाई मिळणेसाठी गैरअर्जदार यांच्या विरुध्द प्रस्तुतची तक्रार आहे.
तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत खालील प्रमाणे. अर्जदार हा मौजे पालम येथील रहिवाशी असून तो शेतकरी आहे व अर्जदारास मौजे पालम येथे गट क्रमांक 306 मध्ये 4 हेक्टर 91 आर. जमीन आहे व सदर जमीन अर्जदार स्वतः कसून खातो अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमाक 1 ही संस्था असून त्यांचे अकोला येथे कार्यालय आहे. व त्या संस्थे मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 ने महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतक-यांना विविध जातीचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करुन देतात व ते विविध शाखा मार्फत विक्री करतात, तसेच प्रस्तुत संस्थे मार्फत खरीप हंगाम 2011 मध्ये सोयाबीन बियाण्यांचे विक्री करण्यात आली, गैरअर्जदार क्रमांक 2 ही गैरअर्जदार क्रमांक 1 ची शाखा आहे, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याच्या शेतामध्ये खरीप हंगाम 2011 घेण्याकरीता अर्जदाराने सदर जमीन व्यवस्थीत कसून ते ट्रॅक्टरची पाळीने अंतर्गत मशागत करुन व बैलाव्दारे सदर जमीन नागरुन पेरणी योग्य जमीन जुन - जुलै 2011 मध्ये तयार केली होती, सदरच्या अर्जदाराची जमीन ही काळी कसदार असून त्या जमिनीमध्ये सोयाबीन पिक करीता उच्चप्रतीची जमीन आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, खरीप हंगाम 2011 मध्ये अर्जदाराच्या शेतामध्ये सोयाबीनचे पिक घेण्याचे ठरविले, त्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमाक 1 यांच्याकडे प्रती एकरी 30 किलो या प्रमाणे 450 किलोग्रँमच्या बियाण्यांची मागणी केली, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या नियमा प्रमाणे अर्जदाराने महाराष्ट्र बँक गंगाखेड येथे 1596/- दिनांक 07/06/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिलेल्या बँक चलनव्दारे प्रस्तुत रक्कमे मध्ये बियाण्यांच्या किमती सहीत इतर फिस देखील नमुद केली होती. ज्यामध्ये चलन पावती दाखविल्यानंतर व मजुरी व हमाली रु.225/- नगदी घेतल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदार यांना सोयाबीन जे जे –एस-335 ओसीटी-10/13-2201 जे महाराष्ट्र सिड्स सर्टिफिकेशन कंपनीचे उत्पादीत बियाणे होते ज्याचा सर्टिफिकेट कमांक 2630 होता, अशा एकुण प्रत्येकी 30 किलोच्या 15 बँगा गैरअर्जदारांनी दिली, गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्यांचा सही शिक्का मारला अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, प्रस्तुतचे बियाणे जुन 2011 महीन्यात खरेदी केल्यानंतर अर्जदाराने पूर्ण योग्य पाऊस झाल्यानंतर शेताची मशागत करुन 14/07/2011 रोजी पेरणीसाठी सुरवात केली व साधारण त्याची पेरणी 3 दिवस चालली, अर्जदाराने सदर बी पेरणी करते वेळी बियाण्यांसोबत प्रत्येक एकरी एक बॅग या प्रमाणे एकुण 15 बॅग डि.ए.जी.खताची मात्रा देखील दिली होती, अर्जदाराने पेरणी केलेले बियाणे व शेतामध्ये आवश्यक असलेला ओलावा योग्य प्रमाणात केलेली निवड याचा एकत्रित विचार केला तर प्रस्तुतचे बियाणे हे पेरणी नंतर 3 दिवसांमध्ये उगवणे आवश्यक होते, परंतु 8 दिवसामध्ये योग्य त्या रितीने सदरचे बी उगवले नाही व साधारणपणे 10 ते 12 टक्के त्याची क्षमता लक्षात आल्यानंतर अर्जदाराला त्याची खात्री पटली की, सदरचे सोयाबीन बियाणे हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ते योग्य प्रमाणात उगवले नाही व तो योग्य दर्जाचे नव्हते सदर बाब लक्षात आल्या नंतर अर्जदाराने त्वरित 21/07/2011 रोजी तालुका कृषी अधिकारी पालम व तसेच गट विकास अधिकारी पालम यांच्याकडे लेखी तक्रार दिली व पंचनामा करण्याची विनंती केली, त्या अनुषंगाने कृषी अधिकारी पालम यांनी अर्जदाराच्या शेतावर प्रत्यक्षरित्या येवुन स्थळ पंचनामा केला व बियाणे तक्रार निवारण समिती होती ज्यामध्ये तीन सदस्य होते,प्रत्येक क्षेत्रामध्ये तज्ञ व्यक्ति असून त्याच्या पंचनाम्यावर सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. त्याचा अभिप्राया प्रमाणे बियाणे हे कमकुवत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सदर सायोबीनच्या 10 ते 12 टक्के उगवण झाली असे नमुद केले आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 ने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविल्या बाबत संपूर्ण राज्यातील ब-याच तक्रारी आल्या आहेत. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याने खरेदी केलेले गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडून बियाणे विकत घेतलेले असून त्याची किंमत 15,960/-, हमाली 225/- एकत्रित केलेतर 16,185/- रुपये खर्च झाला व डि.ए.पी.खत 550/- X 15 = 8250/- रुपये व मजुरी खर्च 10,000/- खर्च करावा लागला.असे एकुण 34,435/- रुपये अर्जदाराची नुकसानी झाली जर सदरचे बियाणे योग्यरित्या उगवले असते तर प्रत्येक एकरी 8 क्विंटल उतारा विचारात घेतला तर एकुण क्षेत्रफळावर 96 क्विंटल उत्पन्न झाले असते ज्याची बाजाराची किंमत 2,000/- प्रमाणे 96 क्विंटलचे 1,92,000/- अर्जदारास झाले असते, परंतु वर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी उपलब्ध करुन दिलेले निकृष्ट दर्जाचे बियाणांमुळे अर्जदाराचे 2,26,435/- रुपयांचे नुकसान झाले आहे, तसेच अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विरुध्द यापूर्वी तक्रार दाखल केली होती, ज्याचा क्रमांक 188/11 होता सदरची तक्रार दिनांक 10/05/2012 रोजी डी.आय.डी. झाली, म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बीया पोटी 2,26,435/- प्रमाणे देण्याचा आदेश व्हावा, व अर्जदारास झालेले शारिरीक व मानसिकत्रासापोटी 10,000/- रुपये हे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडून देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 3 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 3/1 वर बँक ऑफ महाराष्ट्रचे चलन, 3/2 वर बियाणे बॅग लेबल, 3/3 वर सोयाबीन बॅगवरील टॅग, 3/4 वर कृषी अधिकारी पालम यांचा अहवाल, 3/5 वर गटविकास अधिकारी पालम यांना दिलेल्या अर्जाची प्रत, 3/6 वर गट क्रमांक 306 ची 7/12 ची प्रत. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी जबाब दाखल करण्याकरीता गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे पुरशिसव्दारे मंचासमोर हजर नि.क्रमांक 6 वर गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपले लेखी जबाब दाखल केले आहे.त्यामध्ये त्याचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी असून ती खारीज होणे योग्य आहे तसेच त्याचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हे गैरअर्जदार क्रमांक 1 ची शाखा नाही व गैरअर्जदार क्रमांक 2 हे विभागातील सर्व बियाणे निर्मिती व प्रक्रिया कंपनीवर नियंत्रण ठेवतात व बियाणांची गुणवत्ता व तपासणीचे काम करतात.गैरअर्जदार क्रमांक 2 हे स्वतःच्या नियंत्रणामध्ये बियाणे उत्पादन प्रक्रीया करतात, त्याकरीता गैरअर्जदार क्रमांक 1 हे बिजोत्पादन घेणा-या बिजोत्पादकाचे नाव गैरअर्जदर क्रमांक 2 यांच्याकडे नियमानुसार शुल्क भरुन नोंदणी करतात व गैरअर्जदार क्रमांक 2 चा आमच्याशी काही एक संबंध नाही व गैरअर्जदारांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदरील बियाणे खरेदी केल्यानंतर योग्यती काळजी घेवुन त्याची पेरणी केली नाही व जमिनीची मशागत केली नाही व सदर बियाणे खरेदी केल्यानंतर अर्जदाराने 37 दिवस उशिराने बियाणांची पेरणी केली, त्यामुळे गैरअर्जदार यास जबाबदार नाही, केवळ अर्जदाराचे चुकीमुळे व चुकीच्या पध्दतीच्या पेरणीमुळे बियाणांची उगवण झालेली नाही व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अधिका-यांशी हात मिळवणी करुन व संगणमत करुन बनावट अहवाल अर्जदाराने तयार करुन घेतला आहे. व तो अहवाल पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही, कारण सदरचे बियाणे सदोष असल्यास शासकीय प्रयोगशाळे कडून अहवाल आल्याशिवाय सदर बियाणे सदोष आहे असे म्हणता येणार नाही. व तसेच कृषी अधिका-याने सदरच्या पाहणीवेळी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना अर्जदाराने कोणतीही सुचना दिलेली नाही व ते अहवाल गैरअर्जदार क्रमांक 1 वर बंधनकारक नाही, अर्जदार हे मंचाची दिशाभुल करीत आहे.व गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने यापूर्वी गैरअर्जदारा विरुध्द तक्रार दिली होती ती सी.पी.सी.ऑर्डर – 9- रुल 9 प्रमाणे खारीज झाली आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण मंचासमोर चालू शकत नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 7 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 वकिला मार्फत नि.क्रमांक 4 वर पुरशिस देवुन हजर, परंतु मुदतीत आपला लेखी जबाब सादर न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विना जबाबाचा आदेश पारीत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर.
1 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडून संयुक्तिरित्या
सोयाबीन बियाणे कमी उगवणशक्तीचे व निकृष्ट दर्जाचे
होते हे अर्जदाराकडून कायदेशिररित्या सिध्द झाले आहे काय ? नाही
2 तक्रार अर्जावर मागणी केलेली नुकसान भरपाई मिळणेस
अर्जदार पात्र आहे काय ? नाही
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदार हा पालम येथील गट क्रमांक 306 मधील शेत जमिनीचा मालक व कब्जेदार आहे, ही बाब नि.क्रमांक 3/6 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने सदरचे बियाणे उगवले नसल्यामुळे पाहणी पंचनामा करणे बाबत अर्जदाराने गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम यांना सदरचे बियाणे उगवले नसल्यामुळे व चौकशी पंचनामा करण्यासाठी अर्ज दिला होता, ही बाब नि.क्रमांक 3/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, परंतु अर्जदाराने दाखल केलेला पाहणी अहवाल नि.क्रमांक 3/4 वर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सदरचा अहवाल मंचास योग्य वाटत नाही, कारण त्या अहवालावर संबंधीत कार्यालयाचा शिक्का नाही व तसेच पाहणी अहवाला मध्ये रितसर पंचनामा केलेला दिसत नाही.तसेच पाहणीच्या वेळेस गैरअर्जदारांना बोलावलेले दिसून येत नाही,तसेच अर्जदाराने पाहणी अहवाल व्यतिरिक्त बियाणे उगवले नसल्याबद्दलचा इतर कोठलाही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही, दाखल केलेल्या पुराव्यावरुन बियाणे सदोष होते असे म्हणणे योगय ठरणार नाही.तसेच शासन निर्णय 28/ जुलै /2011 च्या परिपत्रका नुसार तालुका तक्रार निवारण समितीची रचना पूढील प्रमाणे आहे.
1) संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी.अध्यक्ष. 2) कृषि विद्यापीठ / कृषि संशोधन केंद्र / कृषि विज्ञान केंद्र प्रतिनिधी.सदस्य.3) महाबीज प्रतिनिधी. सदस्य. 4) तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषि अधिकारी.सदस्य. 5) कृषि अधिकारी, पंचायत समिती.सदस्य सचिव.व या समितीने तक्रार प्राप्त झाल्यावर आठ दिवसांत तपासणी करुन संबंधीतांना अहवाल सादर करावा असे म्हंटलेले आहे,पण सदरच्या तक्रारीत वरील प्रमाणे तपासणी केलेली दिसत नाही, तसेच कंपनीच्या ज्या बियाणे उत्पादका विरुध्द अर्जदाराची तक्रार आहे त्याना पिक पहाणीच्या पूर्वी नोटीस देवुन त्यांचे समक्ष पाहणी करणे बंधनकारक असतांना अर्जदाराच्या शेताची पाहणी बियाणे उत्पादकांना पूर्व नोटीस न देताच परस्पर केली असल्याचे दिसते व तसेच प्रत्यक्ष पाहणी संबंधीचा स्वतंत्र पंचनामा करणे बंधनकारक असतांना समितीने पंचनामा केलेला नाही.
खरेदी केलेले बियाणे सदोष व उगवण क्षमता नसलेले होते या कारणास्तव अर्जदाराने नुकसान भरपाईसाठी गैरअर्जदारां विरुध्द कायदेशिर दाद मागीतल्यावर बियाणे सदोष आहे हे सिध्द करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारावरच येते आणि बियाणांच्या प्रयोगशाळेतील तपासणीतील निष्कर्षा खेरीज तो सदोष अथवा निकृष्ट आहेत हे कायदेशिररित्या ग्राहय धरता येत नाही, तोच एकमेव सबळ पुरावा ठरतो. या संदर्भात
(1) रिपोर्टेड केस 2009 (2) सी.पी.जे.पान 414 (महाराष्ट्र राज्य आयोग)
Field inspected by committee – Report of committee could not be acted upon as expert if not associated as required by Govt. Resolution – Seed Defective not proved – No Relief entitled.
(2) रिपोर्टेड केस 2008 (3) सी.पी.आर.पान 260 ( महाराष्ट्र राज्य आयोग) मध्ये असे मत व्यक्त केले आहे की,
Seed Committee report placed on record not at all sufficient to establish infirior quality of seeds
(3) रिपोर्टेड केस (अ) 2007 (2) सी.पी.जे.पान 148 (राष्ट्रीय आयोग)
(ब) 2008 (2) सी.पी.आर.पान 193 (राष्ट्रीय आयोग)
When there was no laboratory testing report, then complaint was liable to be dismissed.
(4) रिपोर्टेड केस 2003 (3) सी.पी.जे पान 628 या प्रकरणात देखील मा.महाराष्ट्र राज्य आयोगाने वरील प्रमाणेच मत व्यक्त केले आहे.
(5) रिपोर्टेड केस 2009 (1) सी.पी.आर.पान 182 (राष्ट्रीय आयोग)
Question of quality of seeds is to be determined procedure contemplated under section 13 (1) (c) of Consumer Protection Act and not on the besis of assumption or presumption .
(6) रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.जे.पान 266 ( राष्ट्रीय आयोग )
If Laboratory testing report supports the seed manufacturer that seed was of 99.6 % purity. Then he is not liable for any compensation
यावरुन अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे.त्यामुळे अर्जदार कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही, असे मंचास वाटते.म्हणून मुद्दा क्रमाक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष