Maharashtra

Beed

CC/13/66

शिंदे जगन्‍नाथ किसनराव - Complainant(s)

Versus

Tokita Seeds India (p) Ltd - Opp.Party(s)

12 Feb 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/66
 
1. शिंदे जगन्‍नाथ किसनराव
रा.टाकळी देशमुख पो.पागंरी ता.परळी
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. Tokita Seeds India (p) Ltd
360 13th Main[80 Geed Road,sector, yelahanka,New Town Banglore,64
Banglore
Karnataka
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 12.02.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
तक्रारदार जगन्‍नाथ किशनराव शिंदे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी सदोष बियाणाची विक्री केली म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

 

तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे व्‍यवसायाने शेतकरी आहे.सामनेवाला क्र.1 हे हायब्रीड सीडस उत्‍पादीत करणारी कंपनी आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांनी उत्‍पादन केलेल्‍या बियाणांची विक्री करतात. तक्रारदार यांनी दि.03.04.2013 रोजी सामनेवाला क्र.2या दुकानातून चार पाकीट श्‍वेता कारले बियाणाचे वान विकत घेतले. सदरील बियाणाचा लॉट नं.211316 आहे. तक्रारदार यांनी सदर बियाणे रक्‍कम रु.880/- मध्‍ये विकत घेतले. तक्रारदार यांनी दि.17.04.2013 रोजी श्‍वेता वाणाचे कारल्‍याचे बियाणे परळीतील एजन्‍टामार्फत खरेदी केले. तक्रारदार यांनी दि.17.05.2013 रोजी त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या शेतात वर नमुद केलेल्‍या बियाणाची लागवड केली.सदर बियाणाची उगवण झाली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे त्‍याबाबत तोंडी तक्रार केली. सामनेवालाक्र.1 यांनी तक्रारदार यांना सांगितले की,त्‍यांनी कंपनीकडे तक्रारदार यांची तक्रार पाठविलेली आहे. तक्रारदार यांनी दि.03.05.2013 रोजी तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, तालुका कृषी अधिकारी परळी यांच्‍याकडे रितसर तक्रार दिली. तालुका कृषी अधिकारी परळी यांनी तक्रारदार यांनी खरेदी केलेले बियाणे सदोष असल्‍याबाबत कळवले. सदरील बियाणे सदोष असल्‍यामुळे त्‍याची उगवण झाली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचे रु.3,60,000/- चे नुकसान झाले आहे.सदरील नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 व 2 यांची आहे. सामनेवाला यांनी सदोष बियाणाची विक्री केली आहे., सदर बियाणाची उगवण न झाल्‍यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍याकडून वैयक्तिक व सामाईक नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.3,60,000/- व त्‍यावरील व्‍याज देण्‍याची मागणी केलेली आहे.

सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी निशाणी 9 अन्‍वये आपले लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेल्‍या सर्व बाबी स्‍पष्‍टपणे नाकारलेल्‍या आहेत. तक्रारदार यांनी सदरील बियाणे हे व्‍यापारी कारणासाठी (कमर्शियल पर्पज) साठी विकत घेतले आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ग्राहक नाही, या मंचास सदरील तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. तक्रारदार यांनी सदरील बियाणे खरेदी केल्‍याबाबत सामनेवाला यांनी वाद उपस्थित केला नाही. सामनेवाला क्र.1 यांनी सदरील बियाणे सदोष आहे ही बाब नाकारलेली आहे. सदरील बियाणाची उगवण झाली नाही ही बाब कृषी अधिकारी यांनी तपासली आहे. तपासणी करीत असताना सामनेवाला क्र.1 यांना नोटीस देणे गरजेचे होते, तशी नोटीस सामनेवाला क्र.1 यांना दिली नाही. सदरील तपास यंत्रणा यांनी शासनाने विहीत केलेल्‍या बाबीचे अवलोकन केले नाही, तक्रारदार यांनी दाखल केलेले रिपोर्ट हे चुकीचे आहे. सामनेवाला क्र.1 यांनी पुढे असे कथन केले आहे की, त्‍यांनी उत्‍पादीत केलेले बियाणे हे शास्‍त्रीयदृष्‍टया आवश्‍यक त्‍या तपासण्‍या करुन उत्‍पादन केलेल्‍या आहे. सदरील बियाणे सदोष आहे याबाबत प्रयोगशाळेमधून बियाणाची तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच तक्रारदार यांनी सदरील बियाणे मंचासमोर हजर केले नाही, अगर सामनेवाला क्र.1 यांनी उत्‍पादीत केलेल्‍या लॉटची तपासणी करुन घेण्‍याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. बियाणाची उगवण न होणे हे ब-याचशा गोष्‍टीवर अवलंबून असते. कोणत्‍या कारणामुळे बियाणाची उगवण झाली नाही ही बाब सिध्‍द झाली नाही. बियाणे सदोष आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत करावयाची आहे. सामनेवाला क्र.1 यांनी उत्‍पादीत केलेले बियाणे हे क्‍वालिटी कंट्रोल यांचेकडून प्रमाणित केलेले बियाणे आहे. तक्रारदार यांना विक्री केलेल्‍या बियाणाच्‍या लॉट बाबत दुस-या कोणत्‍याही शेतक-याने तक्रार केलेली नाही. सामनेवाला क्र.1 यांनी त्‍या वाणाची 22 किलो बियाणे उत्‍पादीत केलेले होते. जर बियाणे सदोष असते तर इतर शेतक-यांनी त्‍याबाबत तक्रार केली असती. तक्रारदार यांनी खोटया समजुतीच्‍या आधारे सदरील तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात यावी.

सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांनी, तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन स्‍पष्‍टपणे नाकारलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी, तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या दुकानातून सदरील बियाणे घेतले आहे ही बाब मान्‍य केली आहे. बियाणे हे सदोष होते हीबाब नाकारली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे बियाणाची उगवण झाली नाही याबाबत तक्रार केल्‍याचे स्‍पष्‍टपणे नाकारलेले आहे. कृषी अधिकारी यांनी शेतात जाऊन पिकाची पाहणी केली व अहवाला दिला ही बाब ही त्‍यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी, सामनेवाला क्र.1 यांनी दिलेले त्‍यांचे कैफियतीमधील नमुद केलेले कथन त्‍यांचे कैफियतीमध्‍ये लिहीलेले आहे. तक्रारदार यांना विकलेले बियाणे हे उत्‍कृष्‍ट दर्जाचे होते. बियाणाची उगवण ही सदोष बियाणे पुरविल्‍यामुळे झाली आहे ही बाब नाकारली आहे.

तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच निशाणी 3 सोबत तालुकास्‍तरीय बियाणे नियंत्रण तक्रार निवारण समिती क्षेत्र पाहणीचा पंचनामा, तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीचा निष्‍कर्ष अहवाल, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या बियाणाच्‍या पावत्‍या सादर केलेल्‍या आहे. तक्रारदार यांनी निशाणी 19 सोबत त्‍यांनी गट विकास अधिकारी यांच्‍याकडे दिलेला तक्रारी अर्ज, तालुका कृषी अधिकारी यांचा अहवाल, तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल व बियाणे खरेदी केल्‍याच्‍या मुळ पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी शिवाजी कृष्‍णा क्षिरसागर यांचे शपथपत्र निशाणी 14 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी स्‍वतःचे शपथपत्र निशाणी 16 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी निशाणी 30 सोबत दस्‍त हजर केले आहेत. त्‍यामध्‍ये सामनेवाला क्र.2 यांनी माल दिलेल्‍या पावत्‍या, गुणवत्‍ता अहवाल, सामनेवाला क्र.1 व 2 यांनी‍ निशाणी 37 अन्‍वये लेखी युक्‍तीवाद हजर केला आहे. तक्रारदार यांनी स्‍वतः युक्‍तीवाद केला. सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे अड.तापडीया यांचा युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, संपूर्ण दस्‍तऐवज याचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्‍त याचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

मुददे उत्‍तर 1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष बियाणे देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार यांनी विकत घेतलेले बियाणे सदोष उत्‍पादीत दोषामुळे उगवण झाले नाही, ही बाब
तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? नाही.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.

कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार श्री.जगन्‍नाथ शिंदे यांनी या मंचाचे लक्ष त्‍यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावर वेधले व असा युक्‍तीवाद केला की, त्‍यांनी सामनेवाला क्र.2 या कृषी सेवा केंद्रातून चार पाकीटे श्‍वेता हायब्रीड जातीचे कारल्‍याचे बियाणे विकत घेतले. सदर बियाणे हे दि.17.05.2013 रोजी त्‍यांच्‍या शेतात लागवड केली परंतू सदरील बियाणे उगवले नाही. सदरील बियाणे न उगवल्‍यामुळे त्‍यांनी सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे तक्रार केली, परंतू सामनेवाला क्र.2 यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांच्‍याकडे तक्रार केली. सदरील अधिकारी यांनी तक्रारदार यांच्‍या शेतात जाऊन पाहणी केली व अहवाल दिला. सदरील बियाणे सदोष असल्‍यामुळे उगवण झाली नाही असा निष्‍कर्ष कृषी अधिकारी यांनी काढला. तक्रारदार यांनी असा युक्‍तीवाद केला की, सदर बियाणाची उगवण न झाल्‍यामुळे त्‍याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. सबब त्‍यांनी तक्रारीत नमुद केलेली नुकसान भरपाई मिळावी.

सामनेवाला क्र.1 व 2 यांचे वकील श्री.तापडीया यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी बियाणे सदोष आहे ही बाब सिध्‍द केलेली नाही. तक्रारदार यांनी या मंचासमोर बियाणाचे वाण हजर केलेले नाही. सदरील वाण हे सक्षम प्रयोगशाळेकडून तपासून घेतल्‍या गेलेले नाही. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांनी उत्‍पादीत केलेल्‍या बियाणाचा जो लॉट होता, तो सदोष आहे. या बाबत सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे कधीही तक्रार केली नाही अगर सदर लॉटची तपासणी करुन घेण्‍याबाबत मागणी केलेली नाही. तक्रारदार यांचे कथन की, बियाणाची उगवण झाली नाही बियाणाची उगवण होण्‍यास ब-याचशा गोष्‍टी अनुकूल असाव्‍या लागतात. नैसर्गिक कारणामुळे बी अत्‍यंत उच्‍च दर्जाचे असून त्‍याची उगवण होत नाही. केवळ बियाणाची उगवण झाली नाही, बियाणे सदोष आहे असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. सामनेवाला यांच्‍या वकीलांनी त्‍यांचे युक्‍तीवादाचे समर्थनार्थ खालील नमुद केलेल्‍या केसेसचा हवाला दिला आहे.

1) 2013 (3) CPR 386 (NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
Syngenta India Ltd. V/s. P.Chowdaiah & Ors.

Consumer Protection Act, 1986- Sections 15, 17, 19 and 21- Agriculture – Seeds- Low yield – Complaint allowed by State Commission in appeal – As per inspection report complainants have stated that they did not observe flowering even though crop attained age of 100 days – There is also no explanation as to why even after three months of sowing of seeds, complainants did not make any complaint to manufacturer or seller of seeds – There is nothing on record to show that due to quality of seeds only crop can be infected with Thrips and Viruses – Crop can be affected by so many factors such as, quality of soil or due to nature of pesticides and fertilizers and other chemicals used, if in excess or in less quantity – Inspection report has nowhere put any blame upon Petitioner’s Company – Defects in seeds cannot be detected on the basis of visual inspection of fields alone – Inspection conducted by Agricultural Officials shows that plants were infected – Whatever inspection have been conducted same were done at back of petitioner’s company – Impugned order passed by State Commission cannot be sustained – Order dismissing complaint restored.

2) 2013 (3) CPR 282 (NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
Sasi P.K. V/s. Director H & J Infomark & Ors.

Consumer Protection Act, 1986 – Sections 21 (b) – Revision Petition – Complainant/petitioner planted 227 rubber plants in 1 acre of land – Complainant purchased 8 Kg. Well Coat @ 55 % from OP-3/Respondent-3, which was manufactured by OP-1/Respondent-1 and marketed by OP-2/Respondent 2 – Complainant applied Well Coat to the plants, but after a week, all plants dried up and perished-Complaint alleging deficiency in service – dismissed by District Forum – Appeal – Dismissed – Revision Petition – Complainant failed to place any expert opinion to show that Rubber plants perished due to application of Well Coat – Complainant had not placed any laboratory report and in the absence of laboratory report, it could not be inferred that on account of application of injurious Well Coat Rubber plants dried – It was obligatory on the part of complainant to get sample tested by laboratory to prove that Well Coat purchased from OP-1 and manufactured by OP-3 was injurious-No error committed by State Commission in upholding order of District Forum dismissing complaint – No illegality, irregularity or jurisdictional error found in the impugned order – Revision petition dismissed.

3) 2012 (3) CPR 238 (NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
Mahyco Seeds Ltd. V/s. Sharda Motirao Kankale and Anr.

Consumer Protection Act, 1986 – Sections 15, 17, 19 and 21- Agriculture – Seeds- Supply of poor uality of seeds – District For directed petitioners to pay Rs.12,000 as compensation along with Rs.5,000 as cultivation costs, Rs.5,000 towards mental and physical agony, Rs. 1,000 as costs and Rs.560 towards cost of seeds purchased – State commission while concluding that there was no evidence on record to prove that seeds were defective, upheld order of the District Forum regarding amount of compensation to be paid to Respondent and set aside rest of order of District Forum except payment of Rs.1,000 as costs – There is no report of any agricultural expert to confirm that seeds were defective – There is no evidence that crops failed because of any genetic defects in seeds – State Commission as a Court of fact has also reached conclusion that there is no evidence on record regarding any defect in seeds – Orders of For a below set aside – Revision petition allowed.

Crop can fail because of several reasons including not following correct agricultural practices and not taking proper pest control measures.

4) (2012 ) 2 CPR (NC) 28
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
Suresh Kumar V/s. Indian Farmers Fertilizers Co-op.Ltd. Regional Officer, Karnal & Anr.
Consumer Protection Act, 1986- Sections 2(1)(g), 2(1)(o), 15, 17, 19 and 21- Agriculture – Seeds- Low germination – Compensation of Rs.20,000 alongwith cost of Rs. 5,000 awarded by State Commission – Earlier, District Forum awarded Rs.75,000/- as compensation towards loss of crop and Rs.25,000/- as compensation – It is for complainant to establish loss suffered by him on account of any defect in goods supplied or deficiency in any service availed of by producing acceptable evidence supported by documents – Mere claim of loss and/or compensation of a certain amount cannot be accepted at face value – Award of District Forum was more a conjecture than being based on any cogent evidence – State Commission was justified in modulating award – Revision Petition dismissed.

It is for complainant to establish loss suffered by him on account of any defect in goods supplied or deficiency in any service.

5) (2013 ) 2 CPR (NC) 703
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
Banta Ram V/sJai Bharat Beej Company and Anr.

Consumer Protection Act, 1986- Sections 13(1)(c), 15, 17, 19 and 21- Agriculture – Seeds- Crop failure – Complaint dismissed by For a below – Low germination may perhaps due to reasons totally external to uality of seed – Germination of seeds depends upon so many factors such an appropriate period of sowing, soil condition, climate lessor of lack soil, moisture, pests and disease, application of fertilizers and nutrient availability in soil – Petitioner purchased seeds for commercial purpose – Petitioner is not a consumer of respondents – Seeds was of good quality and is certified by Central Government of India – Report of team formed by Deputy Director Agriculture is false and has been prepared in collusion with petitioner without inspection of field – No notice was given to respondents for alleged inspection of team – Petitioner had not got seed tested from any laboratory as required under provisions of section 13 (1) (c) – He had also not moved application before concerned authorities for getting seed of same batch number tested from any laboratory – Report of Agriculture Department cannot be accepted as there was no notice of inspection of field for associating them with inspection – Petitioner has failed to prove that seed supplied by respondents to petitioner were of inferior quality – Revision petition dismissed.

6) (2006 ) 1 CPC (NC) 36/(2005) 4 CPJ (NC) 47/(2006) 1 CPR (NC) 113/(2006) 1 CLT(NC) 223
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
HINDUSTAN INSECTICIDES LTD. V/s. KPOPLU SAMBASIVA RAO & ORS.

Crops can fail due to various reasons viz, poor quality of seeds, fertilizers, inadequate rainfall or irrigation, and also due to poor quality or inadequate or overdose of pesticides/ insecticides. Therefore, whether the cotton crop failed due to poor quality of insecticides is required to be proved by reliable evidence or the procedure prescribed by law. In this connection, it would be useful to go through Section 13(1)(c), Consumer Protection Act for sending the samples to the analysis. This was not done.

Complainant should have procured the sample before the District Forum from the material with the complainant and got tested u/s. 13(1)(c) of C.P.Act. It was not done.Thus there is no reason to discard the Report of Quality Control Inspector produced by OP.

वर नमुद केलेल्‍या केस लॉ चे काळजीपूर्वक अवलोकन केले. तक्रारदार यांचा युक्‍तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज व तक्रारीतील मजकूर पाहता क्रारदार यांचे कथन की, त्‍यांनी सामनेवाला यांच्‍याकडून घेतलेल्‍या बियाणाची उगवण झाली नाही. बियाणाची उगवण होणे कामी ब-याचशा पोषक बाबींची आवश्‍यकता असते. तक्रारदार यांनी बियाणाची लागवड केली व ते बियाणे उगले नाही या कारणास्‍तव बियाणे सदोष आहे असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. तक्रारदार यांनी सदर बियाणे योग्‍य त्‍या प्रयोगशाळेमधून तपासून त्‍यामध्‍ये उत्‍पादकीय दोष आहे ही बाब शाबीत केलेली नाही. तक्रारदार हे कृषी अधिकारी यांनी दिलेल्‍या अहवालावर विसंबून आहे. कृषी अधिकारी यांच्‍याकडे तक्रारदार यांनी दिलेल्‍या तक्रारीनंतर त्‍यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना कळविले नाही अगर त्‍यांचे प्रतिनिधी हजर राहणे बाबत कोणतीही तजवीज केली नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍या गैरहजेरीत सदरील अहवाल तयार केला गेला आहे. सदरील अहवाल याचे बारकाईने निरीक्षण केले असता त्‍यामध्‍ये केवळ बियाणाची उगवण झाली नाही असे नमुद केलेले आहे परंतू बियाणे उगण्‍यासाठी इतर सर्व बाबी अनुकूल होत्‍या ही बाब त्‍यात नमुद केलेली नाही. तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारदार यांच्‍याकडून बियाणाचे वाण घेतलेले नाही अगर ज्‍या बियाणाची उगवणझाली होती, त्‍याची काय परिस्थिती होती या बाबत ही त्‍याच्‍या अहवालामध्‍ये सविस्‍तर वर्णन केलेले नाही. अहवालामध्‍ये अंदाजे 28 ते 30 टक्‍के उगवण झाल्‍याबाबत नमुद केले आहे. अहवालामध्‍ये उगवण न झालेल्‍या क्षेत्रामध्‍ये अनुकूल क्षेत्रातील उगवण दुबार लागवड बियाणे चांगल्‍याप्रकारे उगवले असल्‍याबाबत लिहीलेले आहे. यावरुन तक्रारदार यांनी कोणत्‍या बियाणाची लागवड केली होती व कोणते बियाणे उगवले नाही याचा बोध होत नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केले आहे की, त्‍यांनी दि.17.05.2013 रोजी बियाणाची लागवड केली आहे. तक्रारदार यांनी कृषी अधिकारी यांच्‍याकडे दि.03.05.2013 रोजी बियाणाची उगवण झाली नाही या बाबत तक्रार नोंदविलेली आहे,त्‍या तक्रारीमध्‍ये दि.14.04.2013 ते 17.04.2013 पर्यंत बियाणाची लागवड केली आहे असे नमुद केले आहे. तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांनी दि.10.05.2013 रोजी तक्रारदार यांच्‍या शेतावर जाऊन प्रत्‍यक्ष पाहणी केलेली आहे व निष्‍कर्ष काढलेला आहे. सदरील निष्‍कर्ष काढत असताना सामनेवाला यांच्‍याकडे कोणताही प्रतिनिधी हजर नव्‍हता, सदरील अहवाल हा कोणत्‍या शास्‍त्रीय कारणावर आधारीत नाही. ढोबळ मानाने जे जाग्‍यावर दिसले त्‍याचे वर्णन रिपोर्टमध्‍ये केलेले आढळते.

सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन असे निदर्शनास येते की, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना जे बियाणे विकले, त्‍याचा लॉट मोठया प्रमाणात उत्‍पादीत केला होता व त्‍याची विक्री ब-याचशा शेतक-यांना करण्‍यात आली. कोणत्‍याही शेतक-याने बियाणे सदोष असल्‍याबाबत सामनेवाला यांच्‍याकडे तक्रार केलेली नाही.जर बियाणे सदोष असे तर इतर शेतक-यांनी ही बियाणाची उगवण झाली नाही या बाबत सामनेवाला यांच्‍याकडे तक्रार केली असती. केवळ बियाणाची उगवण झाली नाही म्‍हणून बियाणे सदोष आहे असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. सबब वर नमुद केलेल्‍या कारणमिमांसेवरुन या मंचाचे मत की, तक्रारदार हे बियाणे सदोष आहे, ही बाब शाबीत करु शकले नाही. तसेच सामनेवाला यांनी सदोष बियाणे विक्री करुन तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान केले आहे ही बाब ही तक्रारदार शाबीत करु शकले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून म्‍हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.


श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्‍य अध्‍यक्ष
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.