सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.61/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.03/11/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 11/12/2015
सौ. पल्लवी वीरेश नाईक
वय सु.35 वर्षे, व्यवसाय – गृहिणी,
पोर्णिमा, मु.कलमठ, कलेश्वर मंदीर रोड,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग
पिन-416 602 ... तक्रारदार
विरुध्द
1) टायटन कंपनी लिमिटेड
भारतीय कंपनी कायदा अन्वये
नोंदणीकृत कंपनी, प्रधान कार्यालय,
132/133, दिव्यश्री टेक्नोपॉलीस,
HAL एअरपोर्ट रोड,
पोस्ट – येमलूर, बेंगलुरु – 560 037
कर्नाटक राज्य.
2) टायटन कंपनी लिमिटेड
शाखा कार्यालय,
691, नारायण पेठ, सरस्वती विलास बिल्डींग,
लक्ष्मीरोड पुणे- 411 030 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री भालचंद्र पाटील.
विरुद्ध पक्षातर्फे प्रतिनिधी – श्री बाबाजी अ. देसाले
आदेश नि.1 वर
(दि.11/12/2015)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी अध्यक्ष.
1) विरुध्द पक्ष हे तनिष्क या बँड नावाने सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय करत असून ‘सोने भिशी’ प्रकारची योजनाही चालवतात. विरुध्द पक्ष यांनी कणकवली शहरात प्रदर्शन व विक्री केंद्र उभारलेले होते. सदर योजनेत तक्रारदार सहभागी होऊन विरुध्द पक्ष यांचेकडे दागिने खरेदी केले. त्यानंतर काही दिवसांतच सदरचे दागिने काळे पडू लागल्याने विरुध्द पक्ष यांस कळवून तसेच वकीलामार्फत नोटीस पाठवूनही कोणताही दोष दूर करुन दिलेला नसल्यामुळे सदरची तक्रार मंचात दाखल करण्यात आलेली आहे.
2) सदरचे प्रकरण दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष हे प्रकरणात हजर झाले.
3) दरम्यान आज दि.11/12/2015 रोजी नि.8 वर तक्रारदाराने प्रकरण बोर्डवर घेण्याचा अर्ज दाखल केला. तसेच नि.9 वर उभय पक्षात झालेला तडजोडनामा दाखल केला. विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे प्राधिकारपत्र दाखल करण्यात आले (नि.10). तसेच उभय पक्षामध्ये तडजोड झाली असल्याने प्रकरण निकाली काढणेबाबत नि.11 वर संयुक्त पुरसीस दाखल करण्यात आली. सदरच्या पुरसीसला अनुसरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) उभय पक्षाच्या पुरसीसला अनुसरुन तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 11/12/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.