जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 131/2010. तक्रार दाखल दिनांक : 17/03/2010. तक्रार आदेश दिनांक : 01/02/2011. श्री. मधुकर सिंगम, वय 34 वर्षे, व्यवसाय - व्यापार, रा. 24/ए/23, न्यू पाच्छा पेठ, अन्नपुर्णा बिल्डिंग, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. तिरुपती कुरिअर सर्व्हीस, व्यवसाय - कुरिअर सर्व्हीस, पत्ता : 603, साखर पेठ, सोलापूर. 2. श्री. नागेश पोगुल, वय सज्ञान, व्यवसाय : तिरुपती कुरिअर सर्व्हीसचे प्रोप्रायटर, 603, साखर पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : जी.ए. मेहता विरुध्द पक्ष गैरहजर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, दि.29/6/2009 रोजी त्यांना 'सिटी टेक्स्टाईल', द्वारा : हसमुखभाई, अहमदाबाद येथे तात्काळ टॉवेल सॅम्पल पाठविण्याचे असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्या कुरिअर कंपनीशी संपर्क साधला आणि रु.200/- किंमतीचे दोन टर्कीश टॉवेल रु.30/- फी भरणा करुन अहमदाबाद येथे पाठवून देण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी सिटी टेक्सटाईल यांच्याकडे चौकशी केली असता, टॉवेल अप्राप्त असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत विरुध्द पक्ष यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे रु.20,000/- चे व्यवसायिक नुकसान झाले आहे. प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारदार यांनी रु.25,000/- नुकसान भरपाईसह मानसिक त्रासापोटी रु.5,000/-, तक्रार खर्च रु.5,000/- व टॉवेलची किंमत रु.200/- विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावी, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन तक्रार सुनावणीसाठी घेण्यात आली. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी दि.29/6/2009 रोजी विरुध्द पक्ष यांच्यामार्फत पावती नं.9481 द्वारे सिटी टेक्सटाईल यांना एक पार्सल पाठविल्याचे निदर्शनास येते. तसेच त्याकरिता एकूण रु.30/- मोबदला विरुध्द पक्ष यांना दिल्याचे रेकॉर्डवर दाखल पावतीरुन दिसून येते. टॉवेलचे पाठविलेले पार्सल सिटी टेक्स्टाईल यांना अप्राप्त असल्यामुळे त्याबाबत विरुध्द पक्ष यांच्याकडे चौकशी करुनही दखल घेण्यात आली नसल्याचे तक्रारदार यांनी नमूद केले. तसेच त्यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीसही पाठविलेली असून सदर नोटीस विरुध्द पक्ष यांना प्राप्त झाल्याची पोस्टाची पोहोच रेकॉर्डवर दाखल आहे. 5. विरुध्द पक्ष यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्हणणे दाखल केले नाही. तसेच त्यांनी तक्रारदार यांच्या नोटीसला उत्तर दिले नसल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन तक्रारदार यांचे पार्सल सिटी टेक्स्टाईल, अहमदाबाद येथे पोहोच झाले किंवा कसे ? हे पुराव्याद्वारे सिध्द करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मंचासमोरील अनुपस्थिती, मंचासमोर म्हणणे दाखल न करणे, तक्रारदारांच्या नोटीसला उत्तर न देणे इ. कृतीवरुन तक्रारदार यांची तक्रार विरुध्द पक्ष यांना मान्य आहे, या अनुमानास आम्ही येत आहोत. 6. तक्रारदार यांनी सिटी टेक्स्टाईल, अहमदाबाद यांना पाठविलेले पार्सल इच्छित स्थळी पोहोचले नाही किंवा ते तक्रारदार यांनाही परत मिळालेले नाही. तक्रारदार यांनी ज्या विश्वासाने टॉवेलचे पार्सल अहमदाबाद येथे पोहोच करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात दिले होते, त्या विश्वासास पात्र राहून ते सुस्थितीत, नुकसान न करता व गहाळ न करता पोहोच करण्याची विरुध्द पक्ष यांची जबाबदारी होती. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे पार्सल गहाळ केलेले आहे आणि त्याशिवाय तक्रारदार यांना ते परत मिळवून देण्याबाबत किंवा इच्छित स्थळी पोहोच करण्यासह त्यांची किंमत परत करण्याबाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. 7. मा.सर्वोच्च न्यायालयाने 'नाथ ब्रदर्स एक्झीम इंटरनॅशनल लि. /विरुध्द/ बेस्ट रोडवेज लि.', 1 (2000) सी.पी.जे. 25 (एस.सी.) या निवाडयामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, The liability of a carrier to whom the goods are entrusted for carriage is that of an insurer and is absolute in terms, in the sense that the carrier has to deliver the goods safely, undamaged and without loss at the destination, indicated by the consignor. So long as the goods are in the custody of the carrier, it is the duty of the carrier to take due care as he would have taken of his own goods and he would be liable if any loss or damage was caused to the goods on account of his own negligence or criminal act or that of his agent and servants. 8. तक्रारीची वस्तुस्थिती व वरील नमूद न्यायिक तत्व पाहता, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे टॉवेल पार्सल गहाळ करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार सदर पार्सलमध्ये असणा-या टॉवेलची किंमत रु.200/- दि.29/6/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने नुकसान भरपाई स्वरुपात मिळविण्यास पात्र आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. 9. विरुध्द पक्ष यांनी टॉवेल पार्सल गहाळ केल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांना रु.25,000/- व्यवसायिक नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. मा.राष्ट्रीय आयोगाने 'पुर्वांचल केबल्स अन्ड कंडक्टर्स (प्रा.) लि. /विरुध्द/ आसाम स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड व इतर', 3 (2008) सी.पी.जे. 195 (एन.सी.) या निवाडयामध्ये असे नमूद केले आहे की, Para. 9 : The Consumer Protection Act, 1986 (hereinafter referred to as CPA) has been designed to determine the point of 'deficiency in service' and if after following due procedure as per Section 13 of the Consumer Protection Act, 1986, if any party is found deficent, then only 'compensation' has to be given, in view of which we are not inclined to grant anything for 'loss of business' as claimed by the complainant. 10. निर्वादीतपणे, तक्रारदार यांनी व्यवसायिक नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु उपरोक्त निवाडयातील न्यायिक तत्वानुसार व्यवसायिक नुकसान भरपाई मंजूर करता येत नाही. योग्य विचाराअंती तक्रारदार हे सेवेतील त्रुटीबाबत विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.2,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आलो आहोत. 11. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.200/- दि.29/6/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना नुकसन भरपाईपोटी रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देय राहील. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/24111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |