Maharashtra

Nagpur

CC/29/2019

SHRI KESHAV MORESHWAR MANEKAR - Complainant(s)

Versus

TIRUPATI CONSTRUCTIONS - Opp.Party(s)

ADV GIRISH PUROHIT

06 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/29/2019
( Date of Filing : 14 Jan 2019 )
 
1. SHRI KESHAV MORESHWAR MANEKAR
PLOT NO 26, MADHAV NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TIRUPATI CONSTRUCTIONS
PLOT NO 8, SHRADDHANANDPETH, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI EKALAWYA BABURAOJI WASEKAR
PARTNER OF TIRUPATI SONCSTRUCTIONS PLOT NO 8, SHRADANANDPETH, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV GIRISH PUROHIT, Advocate
For the Opp. Party: Adv. Abhijeet V. Khare/ Vidya Umale, Advocate
Dated : 06 Jan 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ही तृप्‍ती कन्‍स्‍ट्रक्‍शन  फर्म असून विरुध्‍द पक्ष 2 व 3 हे त्‍याचे भागीदार आहेत व ते विरुध्‍द पक्ष 1 च्‍या  नावाने व्‍यवसाय करतात व त्‍यांचा मुख्‍य व्‍यवसाय जमीन विकसित करुन त्‍यावर बहुमजली इमारती बांधकाम करण्‍याचा आहे. विरुध्‍द पक्ष 3 ते 8 हे मौजा- अंबाझरी, भूमापन क्रं. 1976, घर क्रं. 311/ए253, शिट क्रं. 88, मौजा- अंबाझरी, प्‍लॉट क्रं. 53, एकूण क्षेत्रफळ 5600 चौ.फु. या जमीनीचे मालक आहेत. विरुध्‍द पक्ष 3 ते 8 यांनी संयुक्‍तपणे सदर जमिनीवर दुकाने आणि सदनिकेचे बांधकाम आणि विकसन करण्‍याचा करार विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याशी विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांच्‍या मार्फत केला व त्‍या कराराद्वारे सदर करारनाम्‍याद्वारे सदनिका विकत घेणा-याला विक्रीपत्र नोंदणी करुन देण्‍याबाबतचा करार केला. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 ते 8 यांनी सदनिका घेणा-या व्‍यक्‍तीला विक्रीपत्र करुन देण्‍याचे अधिकारपत्र विरुध्‍द पक्ष 3 ला दिले होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, करारानुसार विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी सदर जमीनीवर आर्शिवाद टावर अपार्टमेंट या नावाने बहुमजली इमारतीचे बांधकाम केले आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या बहुमजली इमारतीमध्‍ये सदनिका क्रं. 203, सुपर बिल्‍टअप एरिया 68.217 स्‍के.मी. दुसरा मजला, एकूण रक्‍कम रुपये 8,50,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा दि. 22.12.2003 रोजी करार केला व कराराप्रमाणे तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍द पक्षाला सदनिकेची संपूर्ण रक्‍कम अदा केलेली आहे आणि या व्‍यतिरिक्‍त पाणी मीटर, विद्युत मीटर, स्‍टॅम्‍प डयुटी, नोंदणी फी आणि इतर कर बाबतचे शुल्‍क विरुध्‍द पक्षाच्‍या मागणीप्रमाणे अदा केलेले आहे.  त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याला  दि. 12.03.2004 रोजी बोलाविले आणि सदनिका क्रं. 203 चा प्रत्‍यक्ष ताबा दिला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 22.12.2003 ला केलेल्‍या करारानुसार सदनिकेचे विक्रीपत्र नोंदणी करुन द्यावयाचे होते,  परंतु सदनिकेचे विक्रीपत्र नोंदणी करुन दिले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिकेचे विक्रीपत्र नोंदणी करुन देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीची दखल न घेतल्‍यामुळे दि. 15.06.2018 ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस  विरुध्‍द पक्ष क्रं. 1, 2 6 व 7 ला प्राप्‍त होऊन ही त्‍याची दखल घेतली नाही. व विरुध्‍द पक्ष क्रं. 3, 4 ,5 व 8 यांनी नोटीस घेण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली.
  3.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे तसेच अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. विरुध्‍द पक्षांनी संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला वादग्रस्‍त सदनिकेचे विक्रीपत्र करुन द्यावे. तसेच विरुध्‍द पक्षाने कायद्या अंतर्गत बांधकाम पूर्ण केल्‍याचे प्रमाणपत्र Building Completion Certificate / Occupancy Certificate & Fire Compliant Certificate उपलब्‍ध करुन द्यावे. विरुध्‍द पक्षाने वाहन पार्किंग व जनरेटर बॅक अप उपलब्‍ध करुन द्यावे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.  
  4.      विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या सदनिकेचा ताबा दि. 12.03.2004 दिलेला आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार सदनिकेचा ताबा मिळाल्‍यापासून 2 वर्षाच्‍या आत दाखल करावयास पाहिजे होती. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार मुदतबाहय असल्‍याने खारीज करण्‍यात यावी. तसेच दि. 22.12.2003 च्‍या करारामधील क्‍लॉज 33 नुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधून सदरचा वाद आर्बिट्रेडरकडे दाखल करणे आवश्‍यक होते. सदरच्‍या तक्रारीतील विरुध्‍द पक्ष क्रं. 4 व 5 यांचे सन 2014 पूर्वीच निधन झालेले आहे.
  5.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, दि. 22.12.2003 ला सदरच्‍या बहुमजली इमारतीमधील सदनिका क्रं. 203, एकूण रक्‍कम रुपये 8,50,000/- मध्‍ये तक्रारकर्त्‍याला विकण्‍याचा करार झाला होता व करारानुसार सदनिकेची संपूर्ण रक्‍कम, पाणी मीटर, विद्युत मीटर व इतर सुविधाबाबतची संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त झालेली आहे व त्‍याप्रमाणे बहुमजली इमारतीत पाणी मीटर, विद्युत मीटर स्‍थपित करण्‍यात आलेले आहे. तसेच  दि. 12.03.2004  रोजी तक्रारकर्त्‍याला सदनिका क्रं. 203 चे ताबा  पत्र दिलेले आहे. तक्रारकर्त्‍याची सदनिका क्रं. 203 वगळता विरुध्‍द पक्षाने इतर  एकूण 12 सदनिका धारकांना सदनिकेचे विक्रीपत्र 2005 पूर्वीच करुन दिले आहे. तक्रारकर्त्‍याने मंचात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्‍यास व सदनिकेच्‍या विक्रीपत्राचा खर्च स्‍वतः केल्‍यास विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला वादग्रस्‍त सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने पॉवर बॅकअपची केलेली मागणी व तक्रारकर्त्‍याला स्‍वतंत्र पार्किंग करुन देण्‍याबाबत उभय पक्षात झालेल्‍या  करारनाम्‍यात नमूद नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 15.06.2018 ला पाठविलेली नोटीस प्राप्‍त झाली होती व त्‍या नोटीसला उत्‍तर विरुध्‍द पक्षाने  उत्‍तर पाठविले नाही परंतु दूरध्‍वनीवरुन तक्रारकर्त्‍यास कळविले होते की, ते तक्रारकर्त्‍याला  सदनिका विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.    
  6.      विरुध्‍द पक्ष क्रं. 4, 5 व 8 यांना वृत्‍तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिध्‍द करुन ही विरुध्‍द पक्ष मंचात हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द दि. 15.11.2019 ला एकतर्फी प्रकरण चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  7.      विरुध्‍द पक्ष क्रं. 6 व 7 यांना मंचामार्फत प्राप्‍त पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 25.06.2019 रोजी पारित करण्‍यात आला.
  8.  उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ           होय

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

            निष्‍कर्ष

  1.  मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी विरुध्‍द पक्ष 3 ते 8 यांच्‍या मालकीची असलेली जमीन मौजा- अंबाझरी, भूमापन क्रं. 1976, घर क्रं. 311/ए253, शिट क्रं. 88, मौजा- अंबाझरी, प्‍लॉट क्रं. 53, एकूण क्षेत्रफळ 5600 चौ.फु. यावर आर्शिवाद टावर अपार्टमेंट या नावाने बहुमजली इमारतीचे बांधकाम केले व विरुध्‍द पक्ष 3 यांना विरुध्‍द पक्ष क्रं. 3 ते 8 यांनी सदरच्‍या इमारती मधील सदनिका घेणा-या व्‍यक्‍तीला विक्रीपत्र करुन देण्‍याचे अधिकारपत्र दिले होते. तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या बहुमजली  इमारती मधील  सदनिका क्रं. 203, सुपर बिल्‍टअप एरिया 68.217 स्‍के.मी. दुसरा मजला, एकूण रक्‍कम रुपये 8,50,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा दि. 22.12.2003 रोजी करार केला होता व कराराप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला उपरोक्‍त नमूद सदनिकेची संपूर्ण रक्‍कम अदा केलेली असून त्‍यासोबत पाणी मीटर, विद्युत मीटर, स्‍टॅम्‍प डयुटी, नोंदणी फी आणि इतर कर बाबतचे शुल्‍क देखील विरुध्‍द पक्षाला अदा केले व त्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदनिकेचा प्रत्‍यक्ष ताबा व ताबा पत्र लिहून दिलेले आहे व याबाबत उभय पक्षात वाद नाही. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
  2.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला उपरोक्‍त नमूद इमारती मधील सदनिका क्रं. 203 चा प्रत्‍यक्ष ताबा दिला व लेखी स्‍वरुपात सुध्‍दा ताबा पत्र दिले आहे, परंतु सदरच्‍या सदनिके विक्रीपोटी व इतर आवश्‍यक सुविधांकरिता लागणारी सर्व रक्‍कम स्‍वीकारलेली असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला उपरोक्‍त वादग्रस्‍त सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिलेले नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारकर्त्‍याने सदनिका विक्रीपोटी लागणारी  स्‍टॅम्‍प डयुटीचा खर्च दि. 22.12.2003 रोजीच भरलेला असल्‍याचे नि.क्रं. 2 वरील दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला सदनिका विक्रीपोटी लागणारी स्‍टॅम्‍प डयुटीचा खर्च देण्‍यास जबाबदार नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच पॉवर बॅकअप व स्‍वतंत्र पार्किंगच्‍या मागण्‍या करारनाम्‍यात नमूद नसल्‍यामुळे मंजूर करणे योग्‍य नाही.  

                   सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला आशिर्वाद टावर अपार्टमेंट मधील दुसरा मजल्‍यावरील सदनिका क्रं. 203, (सुपर बिल्‍टअप एरिया 68.217 स्‍के.मी.)चे विक्रीपत्र कायदेशीर बाबींची पूर्तता स्‍वखर्चाने करुन द्यावे आणि विक्रीपत्राचा खर्च विरुध्‍द पक्ष यांनी सोसावा.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व

तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याच्‍या इतर मागण्‍या अमान्‍य करण्‍यात येते.

 

  1. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.