निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 09/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 14/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 28/07/2011 कालावधी 05 महिने 14 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. राधा भ्र.ज्ञानेश्वर गजमल अर्जदार वय 25 वर्ष.धंदा.घरकाम. अड.व्हि.पी.चोखट. रा.डासाळा ता.सेलु जि.परभणी. विरुध्द 1 तहसिलदार साहेब. गैरअर्जदार. तहसिल कार्यालय,सेलू.ता.सेलू जि.परभणी. 2 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. भास्करायन,एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग. प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर. सिडको.औरंगाबाद. 3 व्यवस्थापक. रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडिया. 570,रेक्टेफायर हॉउस.इंदोरी जिन. इलेक्ट्रीक लि.नायगम क्रॉस रोड,नेकस्ट टु रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट,वडाळा वेस्ट मुंबई. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदारानी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, दिनांक 29/11/2008 रोजी अर्जदारच्या पतीस ट्रक्टर क्रमांक MH 22 H 6710 व ट्रॉली नं. MH – 22 H 8908 च्या चालकाने ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन जोराची धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेची खबर पोलीस स्टेशन सेलू येथे दिली.त्याची गुन्हा क्र. 207/08 असा असून ट्रक्टरच्या चालका विरुध्द कलम 279, 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.अर्जदाराने तिच्या मयत पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळणेसाठी विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सादर केला.गैरअर्जदारक क्रमांक 1 यांनी पुढिल कार्यवाहीस्तव दिनांक 25/02/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे (विमा प्रस्ताव) सादर केला,परंतु अद्याप पावतो अर्जदाराच्या विमा प्रस्तावा बाबत कोणताही निर्णय न घेता प्रलंबित ठेवला अर्जदाराने या संदर्भात अनेक वेळा विचारणा केली असता गैरअर्जदार क्रमांक 1 ने उडवा उडवीची उत्तरे दिली.शेवटी दिनांक 31/01/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरील नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ केली म्हणून अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करुन अर्जदाराने रक्कम रु.1,00,000/- मृत्यू झाल्या तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावे अशी मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/13 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1,2 व 3 ला तामिल झाल्यानंतर नेमल्या तारखेस गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्याच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.गैरअर्जदार क्रमांक 2 व गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी निवेदन मंचासमोर अनुक्रमे नि.9 वर व नि.20 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, महाराष्ट्र शासनाने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे लाभार्थी शेतक-यांचा फायदा व्हावा या एकमेव उद्देशाने त्याची नियुक्ती झालेली आहे.विमा कंपनीस प्रस्ताव पाठविण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पुर्तता योग्य रितीने करण्यात आल्याची खातरजमा करण्याची व परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याची त्यांची जबाबदारी आहे.त्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा शेतक-यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा मानधन ते स्वीकारत नाही.सदर प्रकरणात ज्ञानेष्वर दिगांबर गजमल याचा दिनांक 29/11/2008 रोजी अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांना प्रस्ताव दिनांक 05/03/2009 रोजी मिळाला परंतु क्लेम हा परिपूर्ण नव्हता म्हणजे सर्व कागदपत्राच्या फक्त झेरॉक्स कॉपीज Attestation न करता पाठविण्यात आल्यामुळे अर्जदाराची फाईल DSAO परभणी कडे परत पाठविण्यात आली.तदनंतर विमा प्रस्ताव अद्याप पावेतो आवश्यक व योग्य कागदपत्रासह न मिळाल्यामुळे पुढील कार्यवाही करता आलेली नाही.गैरअर्जदार क्रमांक 2 ला विनाकारण या प्रकरणात पक्षकार केलेले आहे.त्यामुळे गैरअर्जदारास खर्चापोटी रक्कम रु.2,000/- द्यावे व सदर प्रकरणातून वगळण्यात यावे अशी विनंती मंचासमोर गैरअर्जदार क्रमांक 2 ने केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी निवेदना सोबत कागदपत्र नि.10 ते नि.14 मंचासमोर दाखल केली. गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्रमांक 3 ला अर्जदाराचा विमा प्रस्ताव अद्याप ही प्राप्त न झाल्यामुळे अर्जदाराचा क्लेम मंजूर अथवा नामंजुर करण्या विषयीचा प्रश्नच उदभवत नाही.तसेच तक्रार मुदतीत दाखल न केल्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.21 वर दाखल केले आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू दिनांक 29/11/2008 रोजी झाला शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळणेसाठी विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला,परंतु अद्याप पावेतो गैरअर्जदारांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की,अर्जदाराने क्लेमफॉर्म सोबत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती Attestation न करता जोडण्यात आल्या होत्या म्हणून फाईल D.S. A.O.कडे परत पाठविण्यात आली होती व योग्य औपचारीकता पूर्ण करुन प्रस्ताव पुन्हा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल करण्या बाबतची सुचना D.S.A.O.परभणीला करण्यात आली होती, परंतु त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 ला अर्जदाराचा प्रस्ताव अद्याप ही मिळालेला नाही.या विधानाच्या पृष्टायर्थ त्याने नि.10 ते नि.14 वर कागदपत्र दाखल केली आहेत.त्याचे बारकाईन अवलोकन केले असता नि.13 वर गैरअर्जदार क्रमांक 2 ने एकपत्र अपूर्ण क्लेमच्या यादीसह (नि.14) जोडलेले आहे ते पत्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,परभणी यांना उद्देशून पाठविण्यात आले आहे.यादी क्रमांक 37 वर अर्जदाराच्या पतीचे नाव आहे.तसेच नि.12 वर यादी जोडलेली आहे यात क्रमांक 11 वर अर्जदाराच्या पतीचे नाव आहे.Remarks या कॉलम खाली Incomplete Recqirement या कॉलमखाली Wanted all documents असा शेरा मारलेला दिसतो यावरुन योग्य कागदपत्रासह अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 ला मिळालेला नसल्याचे स्पष्ट होते.त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 कडे प्रस्ताव पाठविण्याचा प्रश्नच उदभवत नाही.तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर झालेले नाही.त्यामुळे कागदपत्रा विषयीची सुचना त्यांनी अर्जदारास दिली होती किंवा नाही हे स्पष्ट होत नाही,शिवाय अर्जदाराने सर्व व योग्य कागदपत्राची पुर्तता केल्याचेही ठोसरित्या मंचासमोर शाबीत केलेले नाही. म्हणून वरील सर्व बाबीचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आ दे श 1 अर्जदाराने निकाल कळाल्यापासून 15 दिवसांच्या आत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आवश्यक कागदपत्राची पुर्तता करावी.गैरअर्जदार क्रमांक 1 ने कागदपत्र मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर गैरअर्जदार क्रमांक 2 कडे कागदपत्र दाखल करावी व गैरअर्जदार क्रमांक 3 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्जदाराचा क्लेम मंजूर करावा. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |