Maharashtra

Nagpur

CC/251/2018

RASHMI SANJAY KALE (JAIN) - Complainant(s)

Versus

THOMAS COOK (INDIA) LTD. - Opp.Party(s)

ADV. SHRI. S. B. SOLAT

14 Jun 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/251/2018
( Date of Filing : 23 Mar 2018 )
 
1. RASHMI SANJAY KALE (JAIN)
R/O. 657, WALKAR ROAD, BADKAS SQUARE, MAHAL, NAGPUR-440032
Nagpur
Maharashtra
2. SANJAY VASANTRAO KALE (JAIN)
R/O. 657, WALKAR ROAD, BADKAS SQUARE, MAHAL, NAGPUR-440032
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. THOMAS COOK (INDIA) LTD.
REG. OFF. AT, DR. D.N. ROAD, FORT, MUMBAI-440001
MUMBAI
Maharashtra
2. SHAILEE MEHTA, SERVICE QUALITY & CUSTOMER CARE, THOMAS COOK (INDIA) LTD.
DR. D.N. ROAD, FORT, MUMBAI-440001
MUMBAI
Maharashtra
3. MANOJ INDURKAR, ASSISTANCE MANAGER, THOMAS COOK (INDIA) LTD.
BESIDE HALDIRAM HOTEL, ABHYANKAR ROAD, MUNJE CHOWK, SITABULDI, NAGPUR
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHRI. S. B. SOLAT, Advocate for the Complainant 1
 ADV. S.S. Dongare, Advocate for the Opp. Party 1
Dated : 14 Jun 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.             तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष 1 हे परदेशी पर्यटन सहल आयोजन करण्‍याचा व्‍यवसाय करतात आणि विरुध्‍द पक्ष  2 व 3 हे विरुध्‍द पक्ष 1 ला पर्यटन कार्यक्रम आयोजनास मदत करतात. विरुध्‍द पक्षाने Grant Bargain Tour of Europe ही पर्यटन सहल 14 रात्री/ 15 दिवसाकरिता असून दि. 25.09.2016 ते 10.10.2016 या कालावधीकरिता आयोजित केली होती व यात  9 देशांना भेट देण्‍याची पॅकेज ऑफर होती.  यामध्‍ये U.K., France, Belgium, Nederland, Germany, Switzerland, Australia, Italy & Vatican City      (यु.के. ,फ्रान्‍स, बेलजियम, नॅदरलॅन्‍ड, जर्मनी, स्विझरलॅन्‍ड, ऑस्‍ट्रैलिया, इटली आणि वॅटीकन सिटी) इत्‍यादीचा समावेश होता. विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या टुर प्रोग्रामबाबत   संपूर्ण चर्चा केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे परदेश सहलकरिता आगाऊ रक्‍कम जमा करुन नोंदणी केली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला व्हिसा मिळून देण्‍याकरिता दिलेल्‍या आश्‍वासनानुसार व वचनाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दि. 16.07.2016 ला  धनादेश क्रं. 249773 अन्‍वये रुपये 1 लाख अदा केले त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने   तक्रारकर्त्‍याला टूर कलेक्‍शन स्‍लीप नं. 57738 ची पावती दिली.
  2.       तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याकडून रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर 15 दिवसानी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, ना हरकत प्रमाणपत्र महाराष्‍ट्र शासनाकडून मिळाल्‍याशिवाय तक्रारकर्त्‍याला व्हिसा मिळू शकत नाही, परंतु तक्रारकर्ता क्रं. 2 हे नियत वयोमानानुसार दि. 31.08.2016 ला सेवानिवृत्‍त होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं. 2 ला ना हरकत प्रमाणपत्र मिळू शकत नाही. सेवानिवृत्‍तीला काही दिवस शिल्‍लक असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळू शकत नसल्‍याची अडचण तक्रारकर्त्‍याने टूर प्रोग्रामच्‍या नोंदणी वेळी विरुध्‍द पक्षाला समजून सांगितली होती, परंतु विरुध्‍द पक्षाने रुपये 27,000/- एवढी रक्‍कम जमा करण्‍यास सांगितली.
  3.      तक्रारकर्त्‍याने दि.26.08.2016 ला पत्र पाठवून विरुध्‍द पक्षाला कळविले की, ते फास्‍ट ट्रक व्हिसा पोटी अतिरिक्‍त रक्‍कम अदा करण्‍यास इच्‍छूक नाही आणि विरुध्‍द पक्षाला नियमाप्रमाणे (रुटीन कोर्स मध्‍ये) त्‍यांच्‍या स्‍तरावर व्हिसाची व्‍यवस्‍था करण्‍याबाबत सांगितले अन्‍यथा टूर प्रोग्राम पोटी जमा केलेली रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि.21.09.2016 व 25.10.2016 व 28.02.20217 ला पत्र पाठवून रुपये 1,00,000/- परत करण्‍याची विनंती केली. तक्रारकर्त्‍याने वारंवांर पत्र पाठवून व ई-मेल पाठविल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 14.03.2017 ला धनादेश क्रं. 292578  अन्‍वये रुपये 69,695/- पाठविले. परंतु उर्वरित रक्‍कम रुपये 30,305/- परत केली नाही.
  4.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोन व्हिसा दि. 02.09.2016 ते 24.09.2016 या 23 दिवसात उपलब्‍ध करुन देण्‍याचे आश्‍वासन देऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला फास्‍ट ट्रक व्हिसाकरिता रुपये 27,000/- ची मागणी केली होती आणि सदरचा प्रस्‍ताव नाकारल्‍यानंतर व बुकिंग रक्‍कमेची मागणी केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची रक्‍कम दि. 16.07.2016 पासून वापरुन फक्‍त रुपये 69,695/- एवढी रक्‍कम दि. 14.03.2017 ला परत केली व उर्वरित रक्‍कम रुपये 30,305/- परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाची दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवंलब करणारी कृती आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची उर्वरित रक्‍कम रुपये  30,305/- दि. 16.07.2016 पासून 18 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचे आदेशित करावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा.    
  5.      विरुध्‍द पक्ष  1 ते 3 ने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की,  तक्रारकर्त्‍याने   विरुध्‍द पक्षाकडे दि. 25.09.2016 पासून सुरु होणा-या पर्यटन सहलीकरिता बुकिंग रक्‍कम अदा केली होती याबाबत वाद नाही. परंतु याच कालावधीमध्‍ये तक्रारकर्ता त्‍याच्‍या शासकीय सेवेतून सेवानिवृत्‍त होत असल्‍याबाबतची माहिती दिली नव्‍हती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला व्हिसा मिळून देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने धनादेश क्रं. 249773 प्रमाणे  दि. 25.09.2016 पासून सुरु होणा-या पर्यटनाकरिता रुपये 1 लाख अदा केले.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला व्हिसा मिळून देण्‍याचे कधीही आश्‍वासन दिले नव्‍हते आणि व्हिसा निर्गमित करणा-या प्राधिका-यावर कोणताही प्रभाव नियंत्रण (authority अथॉरटीवर कोणताही control of influence कन्‍ट्रोल ऑफ इन्‍फल्‍यूअन्‍सचा)  नाही. संपूर्ण दस्‍तावेज सादर केल्‍यानंतर ही व्हिसा देणे अथवा नाकारणे हा (embassy) एम्‍बसीच्‍या अधिकारात आहे. विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याकडून टूर रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वतीने संबंधीत एम्‍बसीला तक्रारकर्त्‍याचा अर्ज सादर केला. त्‍यानुसार विरुध्‍द पक्षाने व्हिसा मिळण्‍याच्‍या आवश्‍यकतेनुसार तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या खात्‍याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्‍याची मागणी केली. परंतु तक्रारकर्ता नजिकच्‍या काळात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्‍ती होत असल्‍यामुळे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्‍यास त्‍यांनी अयोग्‍यता दर्शविली. त्‍यानंतर तक्रारकर्ता क्रं. 2 ने विरुध्‍द पक्षाला कळविले की, त्‍याला सप्‍टेंबर 2016 च्‍या पहिल्‍या हप्‍त्‍यात ना हरकत प्रमाणपत्र प्राप्‍त होईल. आणि एम्‍ब्‍सीला व्हिसा देण्‍याकरिता सर्वसामान्‍यपणे इतर वेळेस 15-30 दिवस लागतात. तक्रारकर्त्‍याचा टूर हा दि. 25.09.2016 ला सुरु होणार होता आणि  तक्रारकर्त्‍याचा टूर मध्‍ये समावेश करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला आवश्‍यक शुल्‍क भरुन फास्‍ट ट्रक व्हिसा मिळविण्‍याचे सुचविले होते. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला अतिरिक्‍त रक्‍कम रुपये 27,000/- जमा करण्‍यास कधीही आग्रह केलेला नाही.
  6.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने दि. 26.08.2016 ला पत्र पाठवून त्‍याद्वारे टुरला जाण्‍यास इच्‍छूक नसल्‍याचे कळविले आणि दि. 21.09.2016 ला पत्र पाठवून रक्‍कम परत करण्‍याची मागणी केली व त्‍यात नमूद केले की, If you are not enable to arrange visa in routine course you written aware advance amount of Rs. 1 lace for we are not interested for addition amount to be paid for fast track visa and it is not hard and fast for us for Europe tour as said above.

तक्रारकर्त्‍याने व इतर प्रवाशांकडून टूर प्रोग्रामची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर एअर लाईन्‍स इन्‍श्‍युरन्‍स, व्हिसा चार्जेस, हॉटेल amusement shows , internal travel, transport  इत्‍यादीकडून घेण्‍यात येणा-या सेवा बुक केल्‍या होत्‍या. तक्रारकर्त्‍याने  त्‍याचा टूर रद्द केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला कॅन्‍सलेशन शुल्‍काला समोर जावे लागले.

  1.      तक्रारकर्त्‍याने दि. 25.09.2016 ला सुरु होण्‍या–या पर्यटनाच्‍या 29 दिवसापूर्वी टूर रद्द केल्‍याचे कळविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला रुपये 69,695/- परत करण्‍यात आले. जर तक्रारकर्त्‍याने टूर सुरु होण्‍यापुर्वी टूर रद्द केल्‍याचे कळविले तर खालीलप्रमाणे चार्जेस आकारण्‍यात येते.

Cancellation Charges

  •  

35 days or more prior to the departure of the tour

  1.  

34-25 days prior to the departure of the tour

INR 80,000/-

24-15 days to the departure of the tour

INR 1,00,000/-

14 days or less prior to departure of the tour OR A “No-Show” on the tour.

100% of the tour cost.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला व इतर प्रवाशांना टूर प्रोग्रामच्‍या वेळी सूचित केले होते की, थॉम्‍स कुक हॉलीडे टूर ने प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना वैध व्हिसा आवश्‍यक आहे. सर्व दस्‍तावेज सादर केल्‍यानंतर एम्‍बसीच्‍या अधिका-याचा प्रश्‍न आहे की, व्हिसा मंजूर किंवा नामंजूर करायचा, याकरिता विरुध्‍द पक्षाला  जबाबदार धरु नये. तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष सत्‍य बाब मांडलेली नाही. म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.  
  2.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

1    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?            होय

2    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय?     होय

3    विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय?  होय

4    आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – विरुध्‍द पक्षाने Grant Bargain Tour of Europe ही पर्यटन सहल 14 रात्री/ 15 दिवसाकरिता दि. 25.09.2016 ते 10.10.2016 या कालावधीकरिता आयोजित केली होती  व यामध्‍ये U.K., France, Belgium, Nederland, Germany, Switzerland, Australia, Italy & Vatican City      (यु.के. ,फ्रान्‍स, बेलजियम, नॅदरलॅन्‍ड, जर्मनी, स्विझरलॅन्‍ड, ऑस्‍ट्रैलिया, इटली आणि वॅटीकन सिटी) इत्‍यादीचा समावेश होता. सदरच्‍या विदेशी पर्यटन सहलीकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 16.07.2016 ला  धनादेश क्रं. 249773 अन्‍वये रुपये 1 लाख अदा केले होते ही बाब उभय पक्षांना मान्‍य आहे व हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  
  2.      तक्रारकर्त्‍याने दि. 26.08.2016 ला वि.प. ला पत्र पाठवून त.क.  दि. 25.09.2016 ते 10.10.2016 पर्यंत आयोजित केलेल्‍या विदेशी पर्यटन सहलीकरिता तक्रारकर्त्‍याचा व्हिसा उपलब्‍ध न झाल्‍याच्‍या कारणावरुन जाण्‍यास असमर्थता दर्शविली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे बुकिंग पोटी जमा केलेल्‍या रक्‍कमेची मागणी केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने पर्यटना पोटी जमा केलेल्‍या रुपये 1,00,000/- मधून रुपये 30,305/- वजा करुन उर्वरित रक्‍कम रुपये 69,695/- करारनाम्‍यातील कॅन्‍सलेशन ऑफ टुरच्‍या शर्ती व अटीनुसार अदा केल्‍याचे नमूद केले आहे. परंतु विरुध्‍द पक्षाने सदरची रक्‍कम रुपये 30,305/- कोणत्‍या शर्ती व अटीप्रमाणे कपात केली आहे याबाबतचे कुठलेही दस्‍तावेज दाखल केलेले नाही.  तसेच बुकिंगच्‍या वेळी तक्रारकर्त्‍याने भरलेला फॉर्म अभिलेखावर दाखल केलेला नाही  ही विरुध्‍द पक्षाची दोषपूर्ण सेवा असल्‍याचे दिसून येते.  त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून उर्वरित रक्‍कम रुपये  30,305/- परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाकडे असलेली उर्वरित रक्‍कम रुपये 30,305/-तक्रारकर्त्‍याला दिनांक 19.03.2017 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याजसह अदा करावी. 

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई करिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसांच्‍या  आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.