Maharashtra

Nagpur

CC/11/359

Shri Deepak Lilaram Amesar - Complainant(s)

Versus

TheStar Health and Allied Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Adv. C.F. Bhagwani

19 Dec 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/359
 
1. Shri Deepak Lilaram Amesar
Chhapur Nagar Co-op. Housing Society No. 1, Garoba Maidan,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. TheStar Health and Allied Insurance Co.Ltd.
1, New Tak Street, Waluwar Koitum High Road, Nugambakkam
Chennai 600034
Tamilnadu
2. The Star Health and Allied Insurance Co.Ltd.
Shop No. 4, Ground Floor, Suraj Palace, Near Dande Hospital, Ravinagar Chowk,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Adv. C.F. Bhagwani, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

श्री. विजयसिंह राणे, मा. अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 19/12/2011)
 
 
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍यांचे कथनानुसार, त्‍यांनी गैरअर्जदाराकडून मेडी क्‍लासिक व्‍यक्‍तीगत विमा पॉलिसी, 12.03.2010 ते 11.03.2011 या काळाकरीता, विमा राशी रु.3,00,000/- करीता घेतली होती. तक्रारकर्ता दि.06.02.2011 ते 11.02.2011 या काळात रुग्‍णालयात औषधोपचाराकरीता भरती होता व त्‍याबाबत त्‍याला रु.56,500/- चे बिल आले. गैरअर्जदारांनी रुग्‍णालयाला फक्‍त रु.24,754/- राशी प्रदान केली व उर्वरित राशी रु.22,525/- तक्रारकर्त्‍यांना द्यावी लागली. तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार कंपनीला रकमेच्या मागणीकरीता नोटीस दिला असता त्‍यांनी रु.9,953/- रकमेचा धनादेश दिला. उर्वरित रक्‍कम त्‍वरित दिली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी ही तक्रार दाखल करुन रु.22,525/- गैरअर्जदारांनी द्यावे, शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केल्‍या. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत एकूण 10 दस्‍तऐवज दाखल केले आहेत.
 
2.          सदर तक्रारीत गैरअर्जदारांना नोटीस देण्‍यात आला. मात्र ते गैरहजर, म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित झाला. तक्रार युक्‍तीवादाला आल्‍यानंतर तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद त्‍यांचे वकील प्रतिनीधीमार्फत ऐकण्‍यात आला. गैरअर्जदार गैरहजर. प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजांचे व शपथपत्रांचे मंचाने सुक्ष्‍म अवलोकन करता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
 
-निष्‍कर्ष-
 
3.          तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍याप्रमाणे पॉलिसीमध्‍ये आजारपणात एकूण रक्‍कम किती प्रमाणात द्यावी यासंबंधीची तरतूद आहे. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे नाही की, विमा संपूर्ण खर्च द्यावयाची जबाबदारी गैरअर्जदाराने स्विकारलेली होती. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे मागणीनंतर रु.9,953/- चा धनादेश, आधी दिलेली रक्‍कमेव्‍यतिरिक्‍त दिले आणि सोबत तक्रारकर्त्‍यांना पत्र देऊन फुल अँड फायनल स्‍टेटमेंट मान्‍य करण्‍यास कळविले व तो धनादेश स्विकारण्‍यास कळविले. तक्रारकर्त्‍याने ती रक्‍कम स्विकारले. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यांना बील असेसमेंट शीट देऊन किती रक्‍कम ते पॉलिसीप्रमाणे देणे लागतात तेही कळविले. या सगळया बाबी लक्षात घेऊन तक्रारकर्त्‍यांनी ती रक्‍कम स्विकारतांना कोणत्‍याही प्रकारे हक्‍क राखून ठेवले नाही व उजर नोंदविला नाही व खुलासाही केला नाही. पॉलिसीच्‍या शर्तीप्रमाणे गैरअर्जदाराने दिलेली रक्‍कम कशी चुकीची आहे. यासंबंधी तक्रारकर्त्‍यांनी योग्‍य खुलासा केला नाही. यास्‍तव तक्रारकर्त्‍याची तक्रार विचारात घेणे शक्‍य नाही असे आमचे मत आहे, म्हणून खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
 
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यात येते.
2)    तक्रारीचा खर्च आप-आपला सोसावा.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.