Maharashtra

Washim

CC/1/2017

Raju Sakharam Pisal - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd.Washim through Branchofficer - Opp.Party(s)

Reshwal

27 Dec 2017

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/1/2017
 
1. Raju Sakharam Pisal
Shukrawarpeth,Paralkar Chowk,Washim
Washim
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Co.Ltd.Washim through Branchofficer
Zanzari Complex,Washim
Washim
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MR. Shri.Kailas Wankhede MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Dec 2017
Final Order / Judgement

                          :::     आदेश   :::

        (  पारित दिनांक  :   27/12/2017  )

माननिय अध्‍यक्षा, सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार  : -

1.    तक्रारकर्ते यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्‍वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दाखल केली आहे.

      तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्‍द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, उभय पक्षाचा लेखी व तोंडी युक्तिवाद, तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले न्‍यायनिवाडे, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निर्णय पारित केला.

2.   उभय पक्षात हा वाद नाही की, तक्रारकर्ते यांचे वाहन कार हे विरुध्‍द पक्षाकडे विमाकृत होते. सदर पॉलिसी नंबर व कालावधी यात वाद नाही, त्‍यामुळे तक्रारकर्ते विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्‍कर्षाप्रत मंच आले आहे.

3.   उभय पक्षात हा वाद नाही की, सदर कारचा दिनांक 07/08/2016 रोजी अपघात होवून, त्‍यात गाडीला क्षती पोहचली होती, त्‍याबद्दलची सुचना विरुध्‍द पक्षाला देण्‍यात आली व नुकसान भरपाई मिळण्‍याबद्दलचा क्‍लेम विरुध्‍द पक्षाकडे सादर करण्‍यात आला. विरुध्‍द पक्षाला ही बाब देखील मान्‍य आहे की, अपघातानंतर अपघातग्रस्‍त वाहनाचा त्‍यांच्‍या सर्वेअरने सर्वे केला होता व त्‍याची फी रुपये 3,910/- तक्रारकर्त्‍याने दिली होती. तक्रारकर्ते यांचे असे म्‍हणणे आहे की, अपघातग्रस्‍त कार फियाट कंपनीची असल्‍यामुळे जयका कार्स, नागपूर येथील कंपनीच्‍या अधिकृत वर्कशॉपमध्‍ये दुरुस्‍तीसाठी क्रेनच्‍या मदतीने टोचन करुन नेली, त्‍यासाठी रुपये 9,800/- खर्च आला, तक्रारकर्ते यांनी सर्वेअरची फी रुपये 3,910/- भरली आहे तसेच वर्कशॉपचे बील व ईतर खर्च मिळून, तक्रारकर्ते यांना एकंदर रक्‍कम रुपये 1,31,782/- ईतका खर्च आला. त्‍याबद्दलचे सर्व बील विरुध्‍द पक्षाला देण्‍यात आले, परंतु विरुध्‍द पक्षाने चुकीचा गाडी नंबर लिहलेले स्‍मरणपत्र पाठविले होते व कोरे डिस्‍चार्ज व्‍हाऊचर पाठविले होते. हयाबद्दल विचारणा केल्‍यावर विरुध्‍द पक्षाने दुसरे व्‍हाऊचर रक्‍कम रुपये 56,000/- लिहून, दावा फुल अॅंन्‍ड फायनल सेटल करा, असे सांगितले. परंतु तक्रारकर्ते यांना सदर रक्‍कम मान्‍य नसल्‍याचे सांगितल्‍यावर विरुध्‍द पक्षाने पुन्‍हा रुपये 800/- वाढवून रुपये 56,800/- देण्‍यास तयार असल्‍याचे सांगितले. परंतु सदर रक्‍कम, फुल अॅंन्‍ड फायनल सेटलमेंटचे व्‍हाऊचर अगोदर भरुन द्या, असे सांगितले. त्‍यामुळे ही नियमबाहय पध्‍दत विरुध्‍द पक्ष वापरत आहेत. म्‍हणून तक्रार प्रार्थनेसह मंजूर करावी, अशी तक्रारकर्ते यांची विनंती आहे.

     तक्रारकर्ते यांनी त्‍यांची भिस्‍त खालील न्‍यायनिवाडयावर ठेवली आहे.

  1.  रामदास सेल्‍स कार्पोरेशन X दि न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लि.   निकाल तारीख 10/02/2016 (NC).
  2.  IRDA’s Circular dt. 24 th Sept. 2015

4.    यावर विरुध्‍द पक्षाचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍द पक्षाने अपघातग्रस्‍त गाडीचा सर्वे केला व त्‍यांच्‍या सर्वेअरने पॉलिसी अटी-शर्तीनुसार जी नुकसान भरपाई मुल्‍यांकीत केली ती रक्‍कम रुपये 56,800/- देण्‍यास विरुध्‍द पक्ष आजही तयार आहेत. विरुध्‍द पक्षाला विमा दावा, फुल अॅंन्‍ड फायनल सेटलमेंटच्‍या दृष्‍टीकोनातून निकाली काढावा लागतो व देय नसलेल्‍या रकमेवर तक्रारकर्त्‍याला त्‍याचा हक्‍क अबाधित ठेवण्‍याचा कुठलाही अधिकार देण्‍याचा, विरुध्‍द पक्ष कंपनीला अधिकार नाही. त्‍यामुळे यास सेवा न्‍युनता म्‍हणता येणार नाही.

5.    यावर मंचाचे असे मत आहे की, विरुध्‍द पक्षाचे त्‍यांच्‍या लेखी जबाबातील व युक्‍तीवादातील कथन तसेच त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास दिनांक 08/12/2016 रोजी पाठविलेल्‍या पत्रातील कथन विचारात घेतले तर, ते खालीलप्रमाणे आहे. जसे की, . . .

  On receipt of intimation of accident to your said vehicle, we had deputed surveyor Shri Rupesh Laddha for spot survey and on receipt of “ Estimate of loss ” dtd. 11/08/2016 issued by JAIKA CARS, Nagpur, at our Regional Office, Nagpur, surveyor Shir Jabbal, Nagpur, was deputed by our Regional Office, Nagpur to inspect and assess the loss. We wish to inform that loss is assessed by surveyor on the basis of “estimate of loss” which is issued by repairer and submitted by claimant in our office. Surveyor consider/allow the parts only those parts which are mentioned in “estimate of loss” and relavant to cause and nature of accident mentioned in claim form. Accordingly surveyor has asessed the loss for Rs. 52,890/- after deduction of depreciation, policy excess and salvage. Date of registration of your said vehicle, is 29/07/2009 and as such 40 % depreciation on metal parts and 50 % depreciation on plast/fibre/rubber parts is deducted as per terms and conditon of the policy.

You have submitted the bills 1) Rs. 99929/- 2) Rs. 15142/- and 3) Rs. 9800/- Bill for Rs. 15142/- is for inst/cluster assembly and this part is not in “estimate of loss” and hence this parts in not inspected by surveyor at the time of survey. Moreover, bill for Rs. 9800/- is for crane charge for towing the vehicle at Nagpur. Please note that as per policy terms and condition for towing/shifting the vehicle, maxi.num charge is payable for Rs. 1500/- only.

PLEASE BE SURE that surveyor has assessed the loss as per terms and condition of the policy.

We have sent you Discharge voucher with a request to submit the same duly signed by you, so that, we may transfer the amount of Rs. 56800/- in your account. But in response of the same, we have received your letter dtd. 21/11/2016 mentioning that you are not satisfied with the surveyor’s assessement and requested for payment of Rs. 56800/- without submitting the discharge voucher duly discharged by you.

Please note that as per our procedure any claim has to be paid in full and final and not partially for which you are requesting.

     विरुध्‍द पक्षाच्‍या हया पत्रावरुन असा बोध होतो की, विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरने अपघातग्रस्‍त वाहनाचे Estimate of loss जे जायका कार्स, नागपूर ( दुरुस्‍ती करणारे वर्कशॉप ) यांनी दिले होते, ते गृहीत धरुन, त्‍यातून Depreciation policy excess and salvage व गाडीचे रजिस्‍ट्रेशन 29/07/2009 चे असल्‍यामुळे 40 % Depreciation on metal parts, 50% Depreciation on plast/fibre/rubber parts वजा करुन रक्‍कम असेस केली आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरने, जायका कार्स यांनी वाहन दुरुस्‍ती झाल्‍यानंतर जी बिले तक्रारकर्त्‍यास दिली व जी रक्‍कम तक्रारकर्त्‍याने दुरुस्‍तीपोटी अदा केली, त्‍यावरुन नुकसान असेस का केले नाही ? याचे स्‍पष्‍टीकरण रेकॉर्डवर सर्वेअरचे शपथपत्र नसल्‍यामुळे रेकॉर्डवर आले नाही. तसेच सर्वेअरने तक्रारकर्त्‍याचे बील रुपये 15142/- ते Estimate of loss मध्‍ये नमुद नसल्‍याने गृहीत धरले नाही. परंतु तक्रारकर्त्‍याने जेंव्‍हा, वाहन पूर्ण दुरुस्‍त झाल्‍यावर रक्‍कम अदा केली ती व Estimate of loss मधील रक्‍कम ह्यात फरक असतो. त्‍यामुळे सर्वेअरचा सर्वे रिपोर्ट संदिग्ध आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्‍द पक्षाने रेकॉर्डवर सदर पॉलिसीची प्रत दाखल केली, त्‍यावरुन वाहन towing and shifting करिता जास्‍तीत जास्‍त रक्‍कम रुपये 1,500/-  देय आहे, असे समजते. म्‍हणून या सर्व गोष्‍टी लक्षात घेता, तक्रारकर्ते वाहनाच्‍या दुरुस्‍ती बिलाप्रमाणे सर्व मिळून रक्‍कम रुपये 1,20,481/- ( रुपये 99929 + रुपये 15142 + रुपये 1,500/- + रुपये 3910 ) मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाडयातील निर्देशानुसार,  विरुध्‍द पक्षाने ठरवलेली विमा रक्‍कम ग्राहकाने फुल अँण्‍ड फायनल च्‍या दृष्‍टीकोनातूनच स्विकारुन तसे व्‍हाऊचर सही करुन दिले पाहिजे, असा आग्रह धरणे, ही व्‍यापारातील अनुचित प्रथा ठरते. त्‍यामुळे त्‍याबद्दलची दंडात्‍मक स्‍वरुपाची नुकसान भरपाई, सदर प्रकरणाच्‍या न्‍यायिक खर्चासह तक्रारकर्ते विरुध्‍द पक्षाकडून मिळण्‍यास पात्र आहेत, या निष्‍कर्षाप्रत सदर मंच आले आहे.   

  म्‍हणून, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला. 

                 अंतिम आदेश

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ते यांना वाहन विमा क्‍लेम पोटी रक्‍कम रुपये 1,20,481/- ( अक्षरी रुपये एक लाख वीस हजार चारशे एक्‍यांशी फक्‍त ) दरसाल, दरशेकडा 9 % व्‍याजदराने दिनांक 11/11/2016 पासुन ( क्‍लेम फाईल क्‍लोज करणारे विरुध्‍द पक्षाचे पत्र) तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत व्‍याजासहीत दयावी. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई व प्रकरणाचा न्‍यायिक  खर्च मिळून रक्‍कम रुपये 15,000/- (रुपये पंधरा हजार फक्‍त) अदा करावी.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत करावे.
  4. उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्‍क पुरवाव्या.

 

                 ( श्री. कैलास वानखडे )      ( सौ. एस.एम. उंटवाले )  

                       सदस्य.                           अध्‍यक्षा.

         Giri    जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.

          svGiri

 

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Shri.Kailas Wankhede]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.