निकालपत्र :- (दि. 26/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 अ,ब,क , 2, व 21 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले. तसेच, सामनेवाला क्र. 3 ते 16 यांनीही एकत्रित म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र. 20 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरीत सामनेवाला गैरहजर. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार तर्फे वकील हजर. सामनेवाला यांचे वकील गैरहजर. तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदार संस्था ही सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी बँक आहे. सामनेवाला क्र.1 ही सहकारी बँक असून सामनेवाला क्र. 1 अ, ब, क हे अवसायक मंडळ आहेत. तर सामनेवाला क्र. 2 हे शाखाधिकारी आहेत. तर सामनेवाला क्र. 3 ते 21 हे संचालक आहेत. यातील तक्रारदार संस्थेने सामनेवाला बँकेकडे सेव्हिंग्ज व मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम रुपये | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | ठेव परतीची रक्कम | 1. | 10221 | 50,000/- | 12/09/2008 | 12/10/2009 | 56,535/- | 2. | 10120 | 50,810/- | 6/07/2008 | 6/08/2009 | 58,503/- | 3. | 10214 | 50,000/- | 8/09/2008 | 8/10/2009 | 56,535/- | 4. | 10215 | 50,000/- | 8/09/2008 | 8/10/2009 | 56,535/- | 5. | 10174 | 50,000/- | 26/07/2008 | 26/08/2009 | 57,462/- | 6. | 10222 | 50,000/- | 13/09/2008 | 13/10/2009 | 56,535/- | 7. | 10077 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57, 701/- | 8. | 10078 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57,701/- | 9. | 10079 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57,701/- | 10. | 10079 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57,701/- | 11. | 10213 | 50,000/- | 8/09/2008 | 8/10/2009 | 56,535/- | 12. | 10173 | 50,000/- | 26/07/2008 | 26/08/2009 | 57,462/- | 13. | 10205 | 50,000/- | 29/08/2008 | 29/09/2009 | 56,535/- | 14. | सेव्हिंग्ज खाते क्र. 1222 | 2,369/- | 29/09/2008 | - | - |
(3) तक्रारदार हे ज्येष्ठ नागरीक आहेत. तक्रारदारांना त्यांच्या औषधोपचारासाठी ठेवींच्या रक्कमांची आवश्यकता होती. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. सामनेवाला यांची वैयक्तीक व संयुक्तिकरित्या जबाबदारी असतानादेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत, ठेव पावत्या, सेव्हिंग्ज खात्यांचे पासबुक इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 अ,ब,क व 2, 21 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बँकेतील संपूर्ण व्यवहारास अनुसरुन भारतीय रिझर्व्ह बँकेने दि.20.04.2009 रोजीचे पत्राने दि बॅंकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 चे कलम 35 ए प्रमाणे निर्बंध लागू केले होते. तदनंतर दि.16.10.2009 रोजीच्या पत्राने आर.बी.आय.ने आर्थिक निर्बंधास पुन्हा मुदतवाढ दिली. तसेच, आर.बी.आय. यांनी दि.08.02.2010 रोजीच्या आदेशान्वये सामनेवाला बँकेचा परवाना रद्द केला असून सह.आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.04.03.2010 रोजीच्या आदेशानुसार सामनेवाला बँकेवर अवसायक मंडळाची नेमणुक केलेबाबतचा आदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे सामनेवाला बँक ही अवसायनात काढलेली असल्याने सध्या बॅंकेचे संपूर्ण कामकाज अवसायक मंडळ पहात आहे. (6) सामनेवाला क्र. 1 अ,ब,क व 2, 21 यांनी त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, बँकींग रेग्युलेशन अक्ट 1949 कलम 35 ए प्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. 20/04/2009 रोजीच्या पत्राने सामनेवाला बँकेच्या संपुर्ण व्यवहाराला निर्बंध घातलेले आहेत. सामनेवाला बँक ही अवसायनात गेली असलेने म.स.का.नुसार रजिस्ट्रार हे शासकिय प्रतिनिधी असलेने त्यांची लेखी परवानगीशिवाय अर्ज दाखल करता येणार नाही. तक्रारदारांच्या ठेवीचा विमा संरक्षण असलेने त्यांना व्याजासहीत रक्कम तात्काळ परत मिळणेसाठी विमा महामंडळाकडे कारवाई सुरु आहे. तक्रारदारांनी विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन कागदपत्रांची पुर्तता अद्याप केलेली नाही त्यामुळे रक्कम रु. 1.00 लक्ष तक्रारदारंना अदा केलेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. (7) सामनेवाला क्र. 1 अ,ब,क व 2, 21 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ अवसायक मंडळाची नेमणुकीचे पत्र दि.04.03.2010 चे पत्र, दि. 7/07/2010 रोजीचा ठराव इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) सामनेवाला क्र. 3 ते 17 यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. त्यांच्या म्हणण्यात ते पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे संचालक आहेत. सामनेवाला क्र. 1 व 2 हे अवसायक व सदस्य आहेत. सहकार कायदा कलम 102 प्रमाणे संचालक पद संपुष्टात आलेले आहे. सामनेवाला बँकवर अवसायकांची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांचेवर कोणतीही जबाबदारी येत नाही. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 107 प्रमाणे अवसायकांविरुध्द दाखल दाखल करणेचे झालेस मे. रजिस्ट्रार यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अवसायकाविरुध्द सहकार न्यायालय व दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येत नाही. तसेच कलम 88 प्रमाणे प्रस्तुत सामनेवाला यांची जबाबदारी निश्चित केली नाही. तक्रारदारांनी चुकीचे पक्षकार केले असलेमुळे कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु. 10,000/- मिळावी अशी विनंती केली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. (9) सामनेवाला क्र. 20 यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील परिच्छेदनिहाय कथने नाकारली आहेत. त्यांच्या म्हणण्यात ते पुढे सांगतात, बँकींग रेग्युलेशन अक्ट 1949 कलम 35 ए प्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. 20/04/2009 रोजीच्या पत्राने सामनेवाला बँकेच्या संपुर्ण व्यवहाराला निर्बंध घातलेले आहेत. प्रस्तुत सामनेवाला हे संचालक नाताना चुकीचे पक्षकार केलेले आहे. तक्रारदारांकडून रक्कम रु. 25,000/- कॉम्प्नेसेटरी कॉस्ट मिळाली अशी विनंती केली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. (10) या मंचाने तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे. तक्रारदारांची तक्रार व सामनेवाला यांनी दाखल केलेले म्हणणे यांचे या मंचाने अवलोकन केलेले आहे. सामनेवाला हे सहकार कायद्यान्वये नोंद झालेली सहकारी बँक आहे व इतर सामनेवाले हे सदर बँकेचे पदाधिकारी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेमध्ये मुदत बंद ठेवी ठेवलेल्या आहेत. प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेवींच्या मुदती या संपलेल्या आहेत. मुदत संपूनही तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह तक्रारदारांना अदा केलेल्या नाहीत याबाबतच्या तक्रारदारांची तक्रार आहेत. सामनेवाला यांनी दाखल केलेले म्हणणे तसेच उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला यांनी सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2 (1)(ओ) यातील तरतुद विचारात घेतली असता सामनेवाला बँकेने त्यांच्या सभासदांच्याकडून ठेवी स्विकारलेल्या आहेत व त्या अनुषंगाने सदर ठेवीवर ते व्याज देतात. याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या तरतुदीखाली येते. सबब, प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्च न्यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्द मेसर्स युनायटेड वैश्य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे. (11) सामनेवाला बँकेवरती सद्यस्थितीत सामनेवाला हे संचालक व पदाधिकारी म्हणून कार्यरत नाहीत, तसेच सामनेवाला बँकेवर अवसायकांची नियुक्ती केली असल्याने प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 खाली दाखल करता येणार नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा, कलम 105 यातील तरतुदी सामनेवाला यांच्या वकिलांनी या मंचाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकींग रेग्युलेशन अक्ट 1949 कलम 35 (ए) प्रमाणे सामनेवाला बँकेवर निर्बंध घातले असल्याने या कारणावरुनही प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. सामनेवाला बँकेवरती अवसायकांची नेमणुक केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 यातील तरतुद विचारात घेतली असता सदर कायद्यातील तरतुदी या इतर अस्तित्त्वात असणा-या कायद्यास न्युनतम आणणा-या नसून पुरक आहेत. याचा विचार करता अवसायकांची नेमणुक झालेनंतर सामनेवाला बँक अथवा त्यांच्या पदाधिका-यांविरुध्द राज्य शासनाच्या सहकार खात्याचे निबंधक यांची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, कलम 107 अन्वये पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे याबाबतचा सामनेवाला यांनी केलेले कथन हे मंच फेटाळत आहे. तसेच, सहकार खात्याच्या निबंधकांची तक्रार दाखल करणेपूर्वी पूर्व परवानगी घेणेची आवश्यकता नाही. सदर विवेचनास हे मंच खालीलप्रमाणे पूर्वाधार विचारात घेत आहे :- Hon.National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - Order dated 24th July, 2008. (1) Revision Petition No. 2528 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (2) Revision Petition No. 2529 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (3) Revision Petition No. 2530 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (4) Revision Petition No. 462 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Bhimsena Tukaramsa Miskin (5) Revision Petition No. 463 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Subhas (6) Revision Petition No.2254 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Ramdas Bhosale (7) Revision Petition No.2255 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Shettar (8) Revision Petition No.2256 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Saraswati R. Bhosale (9) Revision Petition No.2746 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari (10) Revision Petition No.2747 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Savitri Desaigoudar 11) Revision Petition No.2748 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari (12) Revision Petition No.2591 462 of 2007 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Basangouda R Kandagal उपरोक्त विवेचन व पूर्वाधार यांचा विचार करता प्रस्तुतची तक्रार या मंचामध्ये चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे व उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेमध्ये मुदतबंद व सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपात ठेव ठेवली आहे व त्याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्कमा व्याजासह दिलेल्या नाहीत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर रक्कमा देणेची कायद्याने कोणतीही जबाबदारी त्यांचेवर येत नसल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार संस्थेने सामनेवाला संस्थेकडे मुदतबंद व सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपात रक्कम ठेवली आहे. तक्रारदारांनी मागणी करुनही सदर रक्कम सामनेवाला संस्थेने दिलेली नाही. त्यामुळे सदर ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्थेची येत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 21 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्कम देणेबाबत आहे असा युक्तिवाद तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला आहे. परंतु, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्थेच्या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्तुत सामनेवाला यांची त्याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही. त्यामुळे सामनेवाला क्र. 2 ते 21 यांची ठेव रक्कम व्याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्हणून मा.ना.उच्च न्यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्त्वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :- “The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.” (13) तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे ठेवलेल्या ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (14) तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपातदेखील रक्कमा ठेवल्याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्ज खाते क्र. 1222 वर दि.29/09/2008 रोजीअखेर रुपये 2,369/- जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (15) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श (1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना खालील तपशिलातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम रुपये | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | ठेव परतीची रक्कम | 1. | 10221 | 50,000/- | 12/09/2008 | 12/10/2009 | 56,535/- | 2. | 10120 | 50,810/- | 6/07/2008 | 6/08/2009 | 58,503/- | 3. | 10214 | 50,000/- | 8/09/2008 | 8/10/2009 | 56,535/- | 4. | 10215 | 50,000/- | 8/09/2008 | 8/10/2009 | 56,535/- | 5. | 10174 | 50,000/- | 26/07/2008 | 26/08/2009 | 57,462/- | 6. | 10222 | 50,000/- | 13/09/2008 | 13/10/2009 | 56,535/- | 7. | 10077 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57,701/- | 8. | 10078 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57,701/- | 9. | 10079 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57,701/- | 10. | 10079 | 50,000/- | 13/06/2008 | 13/07/2009 | 57,701/- | 11. | 10213 | 50,000/- | 8/09/2008 | 8/10/2009 | 56,535/- | 12. | 10173 | 50,000/- | 26/07/2008 | 26/08/2009 | 57,462/- | 13. | 10205 | 50,000/- | 29/08/2008 | 29/09/2009 | 56,535/- |
(4) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना त्यांच्या सेव्हिंग्ज खाते क्र. 1222 वरील रक्कम रुपये 2,369/- (अक्षरी रुपये दोन हजार तीनशे एकोणसत्तर हजार फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.29/05/2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे. (5) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |