जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/51. प्रकरण दाखल दिनांक – 26/02/2009. प्रकरण निकाल दिनांक –10/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. निझार पि. नुरुद्यीन लालाणी वय, 38 वर्षे, धंदा व्यापार, रा.ए/10, करीमाबाद हाऊसिंग सोसायटी, नांदेड. अर्जदार विरुध्द 1. दि युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि. तर्फे शाखा व्यवस्थापक, डायरेक्ट एजंटस ब्रँच, 3-5-317 व 318, पाचवा मजला, बशिरजंग, हैद्राबाद-500 029. गैरअर्जदार 2. दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. तर्फे विभागीय अधिकारी, जी.जी. रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.राहूल कूलकर्णी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.श्रीनिवास मददे निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून हॉस्पीटलायझेशन व डोमिसिलरी हॉस्पीटलायझेशन पॉलिसी घेतली ज्यांचा नंबर 051504/48/04/02230 असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 03.01.2005 ते 02.01.2006 असा होता. डिसेंबर 2004 मध्ये आवाजाची समस्या निर्माण झाल्यामूळे त्यांने दि.7.12.2004 रोजी व दि.11.12.2004 व दि.16.12.2004 रोजी अनूक्रमे डॉ.नचिकेत देशमुख व डॉ. नेवासेकर यांना दाखविले. फरक न पडल्यामूळे त्यांनी अर्जदारास थाईरॉईड टेस्ट करण्याचा सल्ला दिला.त्यानुसार अर्जदाराने दि.19.1.2005 रोजी मुंबई येथे थाईरॉईड टेस्ट केली. त्यांचा रिपोर्ट नकारात्मक आला. नंतर अर्जदाराने डॉ.कोमावार नांदेड व डॉ. हेंमत फटाले औरंगाबाद येथे तपासणी करुन औषधी घेतली पण त्यांचा काहीही परीणाम झाला नाही. नंतर अर्जदाराने दि.14.5.2005 रोजी तेपन इएनटी हॉस्पीटल पूणे व हिंदूजा हॉस्पीटल मुंबई येथे दाखविले. त्यांनी औषधी लिहून दिली पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. दोन्ही ठिकाणी मिळून अर्जदारास रु.1500/- खर्च आला. त्यानंतर दि.24.5.2005 रोजी वासवी इएनटी व कॅन्सर इस्टिटयूट हैद्राबाद येथे दाखविले. नोंदणी फिस व तपासणी फिस म्हणून रु.950/- घेतले. तेथे व्हीएल स्कोपी केल्यानंतर अर्जदारास Right Vocal Cord Polyp झाला आहे व त्याकरिता डॉक्टरांनी शस्ञक्रिया करण्याचा सल्ला दिला व अर्जदारास शस्ञक्रियेसाठी दि.16.6.2005 रोजी बोलावले. शस्ञक्रिया करण्यापूर्वी पीडी. हिंदूजा हॉस्पीटल, मूंबई येथील तज्ञाचे मत घेतले त्यांनी हेल्थ चेकअप व टेस्ट करण्यास सांगितले. त्यासाठी रु.1120/- खर्च करुन चाचण्या केल्या. रिपोर्ट मध्ये Right Vocal Cord Polyps near ANT Commissure in Throat असे निदान झाले. अर्जदाराने दोन्ही रिपोर्टस नुसार दि.18.6.2005 रोजी हैद्राबाद येथे शस्ञक्रिया करुन घेतली व दि. 16.6.2005 रोजी रु.,5000/- जमा केले. उर्वरित रक्कम रु.20,483/- दिले. डॉक्टरांनी अर्जदारास दि.19.6.2005 रोजी डिस्चार्ज दिला. अर्जदाराला पूर्ण उपचाराकरिता रु.40,200.47 पैसे खर्च आला. अर्जदारास हा आजार विमा पॉलिसी रिनीवल करुन घेते वेळेस नव्हता. सदरचा आजार प्रथमतः दि.24.5.2005 रोजी निदर्शनास आला. अर्जदाराचा क्लेम नंबर (UHID) no./FHAU 452189 असा आहे. सदरचा क्लेम अर्जदाराने नोव्हेंबर 2005 मध्ये केला. अर्जदाराने क्लेम फॉर्म सोबत बिल्स व रिपोर्टस गैरअर्जदाराकडे जमा केले आहेत. गैरअर्जदार यांच्या मार्फत फॅमीली हेल्थ प्लॅन लि. यांनी दि.30.7.2008 चे पञ पाठवून त्या सोबत रु.10,801/- चा धनादेश पाठविला तो अर्जदाराने अंडर प्रोटेस्ट स्विकारला आहे, तसे दि.12.9.2008 रोजी पोस्टाने कळविले. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, झालेला खर्च व्याजासहीत रु.58,538.47 गैरअर्जदार यांनी वजा केलेली रक्कम रु.10,801/- कमी करुन रु.47,737.47 तसेच त्यावर 18 टक्के प्रमाणे व्याज रु.4803/- असे एकूण रु.52,540.47 तसेच रु.2,000/- नोटीसीचा खर्च व रु.25,000/- मानसिक ञासाबददल व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश करावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदारास आजार हा पॉलिसी घेण्यापूर्वीपासून होता, तो अर्जदाराने लपवीला आहे. डिसेंबर 2004 मध्ये आवाजाची समस्या निर्माण झाली हे खोटे आहे. अर्जदारास प्रत्येक गोष्ट पूराव्याचे आधारे सिध्द करावे लागेल. तसेच झालेला खर्च बिलाच्या आधारे सिध्द करावे लागेल. अर्जदारास रु.40,200/- खर्च झाला हे त्यांना मान्य नाही. अर्जदाराने पॉलिसी रिनीवल केलेली नाही. अर्जदाराने प्रपोजल फॉर्म मध्ये सदर आजाराचे विवरण दिले नाही तसेच आजार लपवून ठेवला व गैरअर्जदाराची दीशाभूल केली आहे. त्यामूळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदाराने पॉलिसीचे अटीचे व नियमाचे उल्लंघन केलेले आहे. अर्जदारास फॅमिली हेल्थ प्लॅन लि. यांनी दि.30.7.2008 रोजी आपले पञासोबत रु.10,801/- चा धनादेश दिला. तो स्विकारल्यानंतर अंडर प्रोटेस्ट स्विकारल्याबददल कळविले नाही. अर्जदारास झालेल्या रक्कमेवर कोणतेही व्याज मागता येणार नाही. अर्जदाराची तक्रार कायद्याने टेनेबल नाही. अर्जदारास एकाच कारणासाठी दोन फोरममध्ये दावा दाखल करता येणार नाही. गैरअर्जदाराने एक आक्षेप असा घेतला आहे की, अर्जदाराची तक्रार ही मूदतीत नाही. अर्जदाराचा क्लेम दि.17.6.2006 रोजी नाकारला असे जरी गृहीत धरले तरी तेव्हापासून येणारे दोन वर्षाचे आंत तक्रार अर्ज मंचामध्ये दाखल नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे हॉस्पीटलायजेशन पॉलिसी वर्ष,2005 ते 2006 या कालावधीसाठी घेतलेली होती. सन 2004 मध्ये अर्जदार यांना त्यांचे आवाजाच्या समस्येमूळे डॉक्टरांना दाखवावे लागलेले आहे व त्या अनुषंगाने वेगवेगळया टेस्ट कराव्या लागलेल्या आहेत व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. सदर औषधोउपचारावर व उपचाराकरिता आलेल्या खर्चाची रक्कम गैरअर्जदार यांचेकडून मिळावी म्हणून अर्जदार यांनी प्रस्तूतचा अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये अर्जदार यांनी पॉलिसी घेतली होती ही बाब नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व शपथपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी त्यांचे अर्जात नमूद केल्याप्रमाणे अर्जदार यांना झालेल्या औषधी व उपचाराकरिता खर्चाची रक्कम विमा पॉलिसी अंतर्गत मिळण्यासाठी अर्जदार यांनी Before The Insurance Ombudsman (Maharashtra & Goa) Mumbai यांचेकडे 2006-07 मध्ये तक्रार अर्ज दाखल केलेला होता. सदर तक्रार अर्जाचे दि.27.6.2008 रोजी आदेश झालेला आहे. सदर आदेशाप्रमाणे अर्जदार यांना रक्कम रु.10,801/- एवढी रक्कम गैरअर्जदार इन्शूरन्स कंपनी यांचेकडून दि.30.7.2008 रोजीचे पञासोबतच्या धनादेशाने स्विकारली आहे. म्हणजेच अर्जदार यानी इन्शूरन्स औम्बूडसमन यांचे अवार्ड प्रमाणे आदेशीत झालेली रक्कम म्हणजेच रु.10,801/- ही स्विकारली आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी या मंचामध्ये दि फायनान्स एक्सप्रेस मधील दि रुल ऑफ इन्शूरन्स औम्बूडसमन या बाबतचे कागदपञ दाखल केलेले आहेत. सदर कागदपञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी औम्बूडसमन यांचे तक्रार अर्ज दाखल केलेले होते. सदरील अर्जावर आदेश झाल्यानंतर अर्जदार यांनी जर आदेश मान्य नसेल तर त्यांना दूस-या कोर्टामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्याचा हक्क राहील अन्यथा राहणार नाही असे म्हटले आहे. This award is to be sent to the complainant as well as to the insurance Company. The complainant has one months time to consider whether to accept the award or not. If the complainant is satisfied and willing to accept the order, he must communicate his acceptance to the insurance company within one month. The insurance company has to comply with the order with 15 days thereafter. In case the complainant does not communicate the acceptance of the order, then the insurance company may not implement the award. The complainant would then be entitled to take recourse to any other legal remedy which may be available to him. Thus, while the award is binding upon the insurance company, the complainant has to option to choose whether or not to accept the award. याप्रमाणे अर्जदार यांनी एकदा एका फोरमच्या निकालपञाप्रमाणे रक्कम स्विकारली असेल तर अर्जदार यांना आता परत तोच वादविषय घेऊन दूस-या फोरममध्ये त्यांच विषयी दाद मागता येणार नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे अवार्ड प्रमाणे अर्जदार यांना रक्कम अदा केलेली आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी एकदा गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार उपचार व औषधाकरिता झालेल्या खर्चापोटी विमा क्लेमची रक्कम व इन्शूरन्स कंपनीच्या औम्बूडसमन फोरम समोर केलेली होती व त्यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर आदेश झालेले आहेत. सदर आदेशाप्रमाणे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून रक्कम ही स्विकारली आहे. त्यामूळे अर्जदार यांना आता त्यांच विषयावर या कोर्टात दाद मागता येणार नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेली कागदपञ, तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच दोन्ही पक्षकारांनी वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद यांचा विचार आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) अध्यक्ष. सदस्या जे.यु, पारवेकर लघुलेखक. |