जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.34/2009. प्रकरण दाखल दिनांक – 28/01/2009. प्रकरण निकाल दिनांक –30/04/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. मोहनलाल पि. रामकीशन सारडा वय वर्षे 65 , व्यवसाय व्यापार, रा. हदगांव ता. हदगांव जि. नांदेड. अर्जदार विरुध्द दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. तर्फे विभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार जी.जी. रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.शाहेद. गैरअर्जदार 1 तर्फे - अड.श्रीनिवास मददे. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार हा मिनी डोअर पिकअप व्हॅन नंबर एम.एच.-26-एच-0642 या वाहनाचं मालक असून वाहनाच्या सूरक्षेसाठी त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून पॉलिसी नंबर 230600/31/05/01248 याद्वारे दि.03.07.2005 ते 02.07.2006 या कालावधीसाठी विमा घेतलेला होता. दि.17.08.2005 रोजी मिनी डोअर अर्धापूर येथून नांदेड येथे असताना राञी आठ वाजता वाहन थांबविलेले असताना मागून येणारा ट्रक नंबर सीजी-08/बी-0613 या ट्रकने जोराने धडक दिली त्यामूळे माझे वाहन डाव्या बाजूला पलटी मारुन वाहनाचे बरेच नूकसान झाले. घटनेची तक्रार पोलिस स्टेशन अर्धापूर येथे देण्यात आली व गेरअर्जदार यांना सूचना दिल्यानंतर स्पॉट सर्व्हे करण्यासाठी त्यांनी सर्व्हेअरला पाठविले. सर्व्हेअर मार्फत सर्व्हे केला. दि.19.08.2005 रोजी वाहनाची पाहणी करुन इस्टीमेंट तयार केले ते रु.30,751/- चे होते. वाहन दूरुस्त केल्यानंतर प्रत्यक्ष अर्जदाराला रु.32,525/- खर्च आला. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर यांना परत पाठवून दूरुस्ती झाल्यानंतरचा सर्व्हे करुन बिल चेक रिपोर्ट सादर केला. यानंतर अनेक वेळा विचारणा केल्यानंतरही क्लेम मिळाला नाही, परंतु अर्जदारास अचानक दि.13.12.2006 रोजी एक पञ मिळाले त्यात चूकीचे कारणा वरुन क्लेम नामंजूर केल्याचे अर्जदाराचे लक्षात आले, असे करुन गैरअर्जदाराने अर्जदारास वाहनाची नूकसान भरपाई दिली नाही म्हणून सेवेत ञूटी केली आहे. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांस रु.44,334/- व त्यावर 18 टक्के व्याज तसेच मानसिक ञासाबददल रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु,5000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. प्रथमतः त्यांनी असा आक्षेप घेतला आहे की, तक्रार ही मूदतीत नाही, प्रत्यक्ष अर्जदाराच्या वाहनाचे अपघातामध्ये किरकोळ नूकसान झालेले आहे. अपघाता संबंधी माहीती मिळताच गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर नेमून वाहनाची पाहणी केली. त्यानंतर अंदाजीत खर्च यांची तपासणी केली व एकूण सर्व बिल व्यवस्थीत तपासून सव्हेटरनी बिल चेक रिपोर्ट गैरअर्जदाराकडे दाखल केला. यानुसार वाहन नंबर एम.एच.-26-एच-0642 चे दि.17.08.2005 रोजीच्या अपघातामध्ये केवळ रु.10,700/- चे नूकसान झालेले आहे. यात पॉलिसी एक्सेस व साल्वेज या बाबी लक्षात घेऊन प्रत्येक वस्तूचे टक्केवारी व नियमाप्रमाणे कपात केल्यानंतरचा आहे. गेरअर्जदाराने अर्जदारास विनंती करुन सूध्दा कागदपञ गैरअर्जदाराचे कार्यालयात जमा केले नाही. म्हणून गैरअर्जदाराने क्लेम नामंजूर केला व दि.13.12.2006 रोजी पञ दिले. अर्जदार यांनी वस्तूस्थिती लपवून मंचापूढे खोटा दावा दाखल करुन मंचाची दीशाभूल केली आहे. त्यामूळे अर्जदार यांचा दावा खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मूदतीत आहे काय ? नाही. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द नाही. होते काय ? 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात परिच्छेद नंबर 9 मध्ये दि.13.12.2006 रोजी क्लेम नामंजूर केल्याचे पञ पाठविले असे म्हटले आहे. ही कॉज ऑफ अक्शन असल्याकारणाने येथून ग्राहक संरक्षण कायदा,1986 नुसार तक्रार दाखल करण्यास दोन वर्षाचा कालावधी मिळतो परंतु प्रत्यक्षात अर्जदार यांनी आपली तक्रार दि.28.01.2009 रोजी म्हणजे जवळपास दिड महिन्यांचे नंतर तक्रार दाखल केली आहे व ही तक्रार दाखल करीत असताना विलंब माफीचा अर्ज ही दिलेला नाही. त्यामूळे तक्रार ही मूदतीत नाही. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी त्यांचे पिकअप व्हॅन नंबर एम.एच.-26-एच’0642 यांचा दि.17.08.2005 रोजी अपघात झाल्याबददल दि.17.08.2005 चा एफ.आय.आर. दाखल केलेला आहे. अपघाता बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. पॉलिसी बददल ही वाद नाही. वाद खर्चा बददलचा आहे. अर्जदार म्हणतात की, रु.32,525/- खर्च झाला व गैरअर्जदार म्हणतात की, सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे रु.10,700/- चे नूकसान झाले. अर्जदार यांनी बिल व गैरअर्जदारांनी सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेले आहेत. पण हे सर्व पाहण्याची आवश्यकता नाही कारण गैरअर्जदार यांनी दि.19.12.2006 रोजी पञ पाठवून आवश्यक ती कागदपञ दिले नाही म्हणून त्यांचा क्लेम नामंजूर केला असे म्हटले आहे. सर्व कागदपञाची तपासणी केल्याचे नंतरह आमचे लक्षात येते की, अपघातग्रस्त वाहन चालविणा-या चालकाचे ड्रायव्हींग लायसन्स अर्जदाराने दाखल केलेले नाही. अर्जदारांनी वाहनाचे रजिस्ट्रेशन, आर.सी. बूक, दाखल केले परंतु ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले नाही. गैरअर्जदाराच्या मते लायसन्स हे आवश्यक कागदपञात येते म्हणून दावा नामंजूर केला आहे. परंतु वाहन हे एका जागेवर उभे होते व मागून ट्रकने धडक दिली म्हणजे ड्रायव्हरच्या लायसन्स बददल किंवा ड्रायव्हींग बददल यात काही दोष नाही परंतु वाहन हे दशमेश धाब्याजवळ आणण्यासाठी ड्रायव्हरने आणले असेल व ते त्यांने आणले असेल तर त्यांचेकडे ड्रायव्हींग लायसन्स असणे आवश्यक आहे. इत्यादी गोष्टीचा उहापोह करणे जरुरी आहे परंतु मूळातच अर्जदाराने आपली तक्रार ही मूदतीनंतर दाखल केलेली आहे. त्यामूळे यावीषयी आता जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही. प्रकरणावर स्पष्ट प्रकाश अर्जदाराने पाडला नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली हे सिध्द होत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |