Maharashtra

Nagpur

CC/535/2017

R. GOPIKRISHNAN R. - Complainant(s)

Versus

THE TITAN EYE COMPANY, THE AUTHORIZED SIGNATORY, AR. A. S. ENTERPRISES PVT. - Opp.Party(s)

ADV. RAVI B. NIKULE

30 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/535/2017
( Date of Filing : 28 Nov 2017 )
 
1. R. GOPIKRISHNAN R.
R/O. 184, ANUSHRI APARTMENT, BAJIPRABHU NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE TITAN EYE COMPANY, THE AUTHORIZED SIGNATORY, AR. A. S. ENTERPRISES PVT.
REG. OFF. AT- RAKESH TOWER, D. NO. 30-C, S.S. COLONY 5TH STREET SUBRAMAIA PILLAI STREET, MADURAI-625010
NAGPUR
MAHARASHTRA
2. THE TITAN EYE COMPANY,THE BRANCH OFFICE, YASHSHREE TRADER
MONA ENCLAVE 245(277), GOKULPETH, OPP. TIMES OF INDIA, WHC ROAD, DHARAMPETH, NAGPUR-4400101.
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. RAVI B. NIKULE, Advocate for the Complainant 1
 K.S.Laxmi / Jaishree Rao, Advocate for the Opp. Party 1
 A.P.WACHASUNDAR, Advocate for the Opp. Party 1
Dated : 30 Sep 2019
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.       तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्ता त्‍याच्‍या भावाकडे मदुराई येथे काही दिवसाकरिता गेला असता विरुध्‍द पक्ष 1 यांचे मदुराई स्थितीत दुकानाला भेट दिली, त्‍यावेळी तेथील उपस्थित मॅनेजर व इतर कर्मचारी यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या विनंतीवरुन दुकानातील वाचायचा (Spectacle) चष्‍मा दाखविला. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने रुपये 10,290/- चा वाचायचा (Spectacle) चष्‍मा बिल दिनांक 11.11.2016 अन्‍वये विकत घेतला. संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर दुकानातील कर्मचा-यानी सांगितले की, (Spectacle)e चष्‍म्‍याची डिलीव्‍हरी 10 दिवसानंतर देण्‍यात येईल. तेव्‍हा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ला सांगितले की, ते अजून 3 दिवस मदुराई येथे आहे,  त्‍यामुळे (Spectacle) चष्‍मा 3 दिवसात देण्‍यात यावा. त्‍यावेळी मॅनेजरने सांगितले की, वाचायचा (Spectacle) चष्‍मा तक्रारकर्त्‍याच्‍या नागपूर येथील घरच्‍या पत्‍त्‍यावर कुरिअरने पाठविण्‍यात येईल या गोष्‍टीला तक्रारकर्त्‍याने सहमती दिली. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्‍याचा वाचयाचा (Spectacle) चष्‍मा नागपूर येथील पत्‍त्‍यावर पाठविला.
  2.       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याला (Spectacle) चष्‍म्‍याचे  पार्सल प्राप्‍त झाल्‍यानंतर ते उघडून वापरावयास सुरुवात केली तेव्‍हा तक्रारकर्त्‍याला लक्षात आले की, सदरचा (Spectacle) चष्‍मा हा तक्रारकर्त्‍याच्‍या ऑर्डरप्रमाणे वाचायचा (Spectacle)चष्‍मा नव्‍हता. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला  सदरचा (Spectacle) चष्‍मा हा पावर चष्‍मा असल्‍यामुळे तो वाचण्‍याकरिता वापरता आला नाही व त्‍याचा वापर करण्‍यात अनेक अडचणी येत होत्‍या. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मदुराई येथील विरुध्‍द पक्ष 1 च्‍या दुकानात फोनद्वारे संपर्क साधला असता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या दुकानातील कर्मचारीका गोपीका यांनी फोन उचलला.  तेव्‍हा तेथील कर्मचा-याने मदुराई येथे इतक्‍या दूर येण्‍या ऐवजी चष्‍म्‍यातील आवश्‍यक बदलावकरिता नागपूर येथील TITAN EYE  विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या शोरुमला भेट देण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या शो-रुमला भेट दिली, त्‍यावेळी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रं. 1 मदुराई (ज्‍यांनी चष्‍म्‍याचे बिल बनविले) यांच्‍याशी संपर्क करण्‍यास सांगितले आणि सांगितले की, (Spectacle) चष्‍म्‍याचा वाचायचा लेन्‍स बदलविण्‍याची गरज आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी सुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍या दुकानातील कर्मचा-यांशी बोलणी केली व त्‍यानुसार जेव्‍हा तक्रारकर्ता मदुराई येथे येईल त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला (Spectacle) चष्‍म्‍याच्‍या बिलासमवेत (Spectacle) चष्‍मा घेऊन येण्‍याबाबत सूचविले व त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याच्‍या चष्‍म्‍यामध्‍ये चुकिने बसविण्‍यात आलेला पावर लेन्‍स काढून त्‍याऐवजी वाचायचा लेन्‍स बसवून देण्‍यात येईल  असे सांगितले. त्‍यानंतर तक्रारकर्ता माहे फेब्रुवारी 2017 मध्‍ये मदुराई येथे आल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 च्‍या दुकानाला भेट दिली आणि वादग्रस्‍त चष्‍मा  त्‍यांच्‍याकडे दिला आणि त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सांगितले की, ते वरि‍ष्‍ठ अधिकारी यांच्‍याशी बोलणी केल्‍यावर व आवश्‍यक त्‍या गरजेप्रमाणे  दोन दिवसानंतर तक्रारकर्त्‍याला संपर्क करावयास सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला दोन दिवस मदुराई येथे थांबावे लागले. दोन दिवसानंतर दुकानातील कर्मचारी गोपीका यांनी तक्रारकर्त्‍याला दूरध्‍वनीवर सांगितले की, चष्‍म्‍यातील बदलाव करण्‍यात आलेला नाही आणि तक्रारकर्त्‍याला नविन चष्‍मा विकत घेण्‍याबाबत सूचविण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष 1 च्‍या दुकानदाराकडून सहकार्य न मिळाल्‍यामुळे त्‍याने वि.प.क्रं. 1 ला दि. 05.04.2017 ला पत्रा द्वारे कळविले की, सदोष चष्‍मा बदलून देण्‍यात यावा किंवा (Spectacle) चष्‍म्‍याकरिता घेतलेली रक्‍कम परत करण्‍यात यावी, अन्‍यथा आपल्‍या विरुध्‍द कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.  सदरचे पत्र प्राप्‍त होऊन ही वि.प. 1 ने कुठलीही कार्यवाही न केल्‍यामुळे त.क.ने दि. 27.09.2017 ला वि.प. 1 व 2 ला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस वि.प. 1 व 2 ला प्राप्‍त होऊन ही त्‍यांनी कुठलीही दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
  3.       तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याकडून (Spectacle) चष्‍मा खरेदीपोटी घेतलेली रक्‍कम रु.10,290/- ,18 टक्‍के व्‍याजासह दि. 11.11.2016 पासून परत करावी. तसेच शारीरिक व मानसिक त्रासकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.
  4.       विरुध्‍द पक्ष 1 ने आपला  लेखी  जबाब नि.क्रं. 14 वर दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍या विरुध्‍द  जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर येथे तक्रार दाखल केली असून वि.प. 1 ची ब्रान्‍च किंवा ऑफिस नागपूर येथे नाही, त्‍यामुळे सदरची तक्रार TITAN EYE + कंपनीला प्रस्‍तुत प्रकरणात आवश्‍यक पक्षकार न केल्‍यामुळे सदरची तक्रार (non joinder of party) खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने  वि.प. 1 च्‍या दुकानातून (Spectacle)चष्‍मा विकत घेतला व तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन तो त्‍याच्‍या नागपूर येथील पत्‍त्‍यावर कुरिअर द्वारे पाठविण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याला (Spectacle) चष्‍म्‍याचा पुरवठा त्‍याच्‍या पसंतीनुसार व Prescription प्रमाणे करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍या सोबत अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे हे म्‍हणणे अमान्‍य केले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष 1 हे  चष्‍मा TITAN EYE + कंपनीचे विक्रेता असून लेन्‍सचे नि‍र्माते नाही, त्‍यामुळे वरिष्‍ठ अधिका-यांशी चर्चा करुन लेन्‍स बदलविण्‍याबाबत चर्चा करण्‍यात आली परंतु त्‍याचा उपयोग झाला नाही व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला नविन (Spectacle) चष्‍मा घेण्‍याबाबत सांगण्‍यात आले.  तक्रारकर्त्‍याने पाठविलेल्‍या नोटीसचे उत्‍तर देण्‍यात आले आहे. वि.प. 2 हे  TITAN EYE चे विक्रेते आहे, परंतु ते  वि.प. क्रं. 1 चे ब्रान्‍च कार्यालय नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नसल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.
  5.       विरुध्‍द पक्ष 2 ने आपले लेखी उत्‍तर नि.क्रं. 13 वर दाखल केले असून त्‍यात नमूद केले की, संपूर्ण तक्रारी मध्‍ये तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 विरुध्‍द कुठलाही आरोप केलेला नाही. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 चे  स्‍वतंत्र व वेगळे व्‍यावसायिक दुकान आहे व ते  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे ब्रान्‍च ऑफिस नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (a a) च्‍या व्‍याख्‍ये अंतर्गत येत नाही व ग्राहक वाद हा तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍या मध्‍ये झालेला नाही. वि.प. 2 हे सदर ग्‍लासचे निर्माते नाही व तक्रार दाखल करण्‍याचे कारण वि.प. 2 यांच्‍या विरुध्‍द घडलेले नसून संपूर्ण तक्रार दाखल करण्‍याचे कारण वि.प. 1 यांच्‍या विरुध्‍द घडलेले आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍या विरुध्‍द चालण्‍या योग्‍य नसून ती खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.
  6.       तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2 वर दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व उभय पक्षांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्‍यावर खालीलप्रमाणे निष्‍कर्ष नोंदविला.

 

  •                मुद्दे                          उत्‍तर

 

  1.  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चा ग्राहक आहे कायॽ   होय
  2.  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 2 चा ग्राहक होतो काय ॽ    नाही
  3.  विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण

सेवा दिली कायॽनाही.

  1.  काय आदेश ॽ                           अंतिम आदेशाप्रमाणे

                                                                            निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत  -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडून रुपये 10,290/- ला वाचायचा (Spectacle) चष्‍मा बिल दिनांक 11.11.2016 अन्‍वये विकत घेतला हे नि.क्रं. 2 (1) वर दाखल दस्‍तावेजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ला दिलेल्‍या Prescription प्रमाणे (Spectacle) चष्‍मा बनवून तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन त्‍याच्‍या नागपूर येथील घरच्‍या पत्‍त्‍यावर पाठविला होता हे तक्रारकर्त्‍याने स्‍वतः मान्‍य केलेले आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत Spectacle Prescription बाबतचा कागद दाखल केला नाही. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू चष्‍मा हा Prescription प्रमाणे बनविलेला नाही हे सुध्‍दा सिध्‍द केलेले नाही.  त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे असे म्‍हणता येणार नाही.
  2.       तसेच विरुध्‍द पक्ष 2 चा विरुध्‍द पक्ष 1 शी कुठलाही संबंध नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्रं.1 यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या व्‍यवहाराशी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 चा कुठलाही संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. तसेच तक्रारकर्ता  व  विरुध्‍द पक्ष 2 मध्‍ये कुठलाही प्रकारचा ग्राहक वाद म्‍हणजेच सेवा संबंधीत व्‍यवहार झालेला नसल्‍याने तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 2 ग्राहक होत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2.  उभय पक्षांनी तक्रारीच्‍या खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.