जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/243 प्रकरण दाखल तारीख - 03/11/2009 प्रकरण निकाल तारीख – 25/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मा.श्रीमती एस.आर.देशमुख - सदस्या प्रभावती सुभाष मोरे, वय वर्षे 30 व्यवसाय घरकाम, अर्जदार. रा.पार्डी ता.मुदखेड जि.नांदेड. विरुध्द. 1. तहसिलदार, तहसिल कार्यालय, गैरअर्जदार. मुदखेड ता.मुदखेड जि.नांदेड, 2. व्यवस्थापक, नॅशनल इन्शरन्स कंपनी लि, स्टर्लिंग सिनेमा बिल्डींग दुसरा मजला, 65, मर्झबान रोड, डि.ओ.14 ख फोर्ट,मुंबई 400 001. 3. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि, मार्फत शाखा व्यवस्थाक, शाखा नगिना घाट रोड,नांदेड. 4. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. मार्फत मुख्य व्यवस्थापक, दिशा अलंकार, शॉप नं.2,टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.बी.कदम. गैरअर्जदार क्र.1 - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.रियाझुल्ला खॉन. गैरअर्जदार क्र. 4 - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख,सदस्या) अर्जदाराने ही तक्रार तीला झालेल्या त्रासामुळे मंचा समोर दाखल केली. अर्जदार हीचे पती दि.23/06/2007 रोजी शेतात साप चालवल्यामुळे इजा होऊन दि.28/06/2007 रोजी मरण पावले. अर्जदाराच्या पतीला महाराष्ट्र शासना तर्फे राबविण्यात आलेल्या विमा योजनेचे संरक्षण असतांनाही आजपर्यंत तिला नुकसान भरपाईची रककम मिळालेली नाही म्हणुन अर्जदाराने ही तक्रार गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्या विरुध्द दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे रा.पार्डी ता.मुदखेड जि.नांदेड येथील असुन मयत सुभाष मोरे त्यांचे पती होते. अर्जदाराचे पती सुभाष दि.23/06/2007 रोजी दुपारी 12.20 च्या दरम्यान शेतात काम करत असतांना सर्पदंश झाला त्यांना नांदेड येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले व उपचारा दरम्यान दि.28/06/2007 रोजी त्यांचा मृत्यु झाला. पोलिस स्टेशन मुदखेड येथे अपघाती रिपोर्ट म्हणुन अर्जदाराने माहीती नोंदविली आहे. तसेच घटनास्थळ पंचनामा व एफ.आय.आर. हे देखील केलेले आहे. अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे व त्यांच्या नांवावर पार्डी येथे गट क्र.230, 61 आर एवढी जमीन आहे. महाराष्ट्र शासनाने विमा संरक्षण योजने अंतर्गत शेतक-याचे अपघाती विमा योजना काढली होती व अर्जदाराचे पतीचा हप्ता शासना तर्फे भरलेला होता त्यामुळे सर्व प्रकारची जोखीम ही गैरअर्जदार क्र. 2 हे शेतक-याच्या हक्कात स्विकारलेली होती. म्हणुन ते सदर योजनेचे लाभार्थी होते. सदरची पॉलिसी दि.15/07/2006 ते 14/07/2007 च्या कालावधी पुरती होती. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या जी.आर.प्रमाणे तलाठी सज्जा यांचेकडे हप्ता देऊन क्लेम फॉर्म घेतलेला होता व त्यानंतर तहसिल कार्यालय मुदखेड यांना विनंती अर्ज, क्लेम फॉर्म व सर्व आवश्यक कागदपत्र दाखल करुन विम्याची रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला होता. तहसिलदार व तलाठी यांना या घटनेची माहीती त्वरीत दिली होती. दि.18/08/2007 रोजी अर्जदाराने तहसिलदार यांना अर्ज दिलेला होता पण गैरअर्जदार क्र. 1 तहसिलदार यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे सदरील क्लेम चुकीच्या कंपनीस पाठविले त्यामुळे अर्जदारास आजपर्यंत सदरील योजनेचा लाभ मिळालेला नाही. अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांचेकडे क्लेम दाखल केल्या पासुन विम्याची रक्कम मिळण्यासाठी तोंडी चौकशी केलेली होती पण अर्जदारास वरवरचे उत्तर मिळाले व आश्वासन मिळाले व आजपर्यंत रक्कम दिलेली नाही व ही सेवेतील त्रुटी अर्जदाराने मंचा समोर आणलेली आहे. अर्जदार यांनी तीस मिळालेले नो क्लेम पत्र, गैरअर्जदार क्र. 1 तहसिलदार यांचे कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस औरंगाबाद यांना लिहीलेले दि.28/09/2007 चे पत्र, तहसिलदार यांनी आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड यांना क्लेम पाठविलेले पत्र , अपघाती रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, 7/12 चा उतारा, नमुना 8 चा उतारा, वारसाचे प्रमाणपत्र, तहसिलदार यांनी एस.डी.ओ. यांना दिलेले पत्र हे सर्व कागदपत्र दाखल केली व पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- त्यावर 12 टक्के व्याज तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांना विनंती पत्रामध्ये असे लिहीले आहे की, संदर्भीय विषयीच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्र.2007/अ/जमा-1/शे.अ.वि.यो/प्र.क्र. दि.18/08/2007 अन्वये शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव अनावधानाने आसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि, झोनिंग हाऊस केशवराव खाडे मार्ग, महालक्ष्मी, मुंबई या पत्यावर पाठवला होता व आता आवश्यक कागदपत्रे आपणांकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात येत आहेत. दि.18/02/2009 या रोजी दिलेल्या पत्रात तहसिलदार मुदखेड असे लिहीतात की, अनावधानाने पाठविलेल्या प्रस्तावाचा विचार करावा सदर प्रस्ताव पुनश्च कबाल इंशुरन्स सर्व्हीसेस औरंगाबाद यांना दि.29/07/2008 रोजी निर्गमित करण्यात आले व सदर प्रस्ताव उशिरा प्राप्त झाल्यामुळे कंपनीने प्रस्ताव नामंजुर करुन परत पाठविला होता. अर्जदार प्रभावतीबाई सुभाष मोरे, पार्डी यांना अपघाती विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास योग्य आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दिला. क्लेम दाखल करण्यासाठी वेळ झाले असल्यामुळे सदरील क्लेम नामंजुर करण्यात येत आहे. गैरअर्जदार क्र. 4 हजर झाले त्यांचे म्हणणे प्रमाणे क्लेम हे पॉलिसी कालावधी मधील आहे व तो 90 दिवसामध्ये मिळालेला नाही तरी देखील तहसिलदार यांना क्लेम पुन्हा पाठविण्यात आलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी जबाब, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांना नुकसान भरपाई मागण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. गैरअर्जदार हे अर्जदाराने मागीतलेली नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 ते 4 गैरअर्जदार क्र. 1 यांनी चुकीने क्लेम हे पेपर्स हे आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड या कंपनीकडे पाठविल्यामुळे अर्जदारास लाभ मिळण्यास उशिर झाला. वास्तविक पहाता क्लेम दि.18/08/2007 रोजी अर्जदाराने क्लेम फॉर्म व इतर कागदपत्र तहसिलदार कार्यालयाकडे सादर केला होता व हे 90 दिवसांच्या आंत होते, पुढील कार्यवाही ही गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी करावयाची आहे, त्यामुध्ये अर्जदाराची कुठेही कागदपत्र दाखल करण्यास दिरंगाई झाली नव्हती हे मंचा समोर स्पष्ट झालेले आहे. अर्जदार ही अशीक्षित असल्यामुळे तिला पुरेशे नियम हे माहीत नाहीत असे गृहित धरावे लागेल. क्लेम दाखल होण्यास किंवा गैरअर्जदारापर्यंत पोहचण्यास विलंब झाला हे जरी सत्य असले तरी घडलेली घटना ही अपघाती मृत्यु असुन ते शासनाच्या काढलेल्या योजने अंतर्गत काढलेले असल्यामुळे पॉलिसीच्या कालावधीतील असुन घटनेमध्ये काहीच बदल होणार नाही. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या क्लेम फॉर्म, कागदपत्र, अर्ज हे देखील मुदतीत होते. अर्जदाराच्या पतीच्या नांवाने असलेली जमीन 7/12, नमुना 8 चा उतारा, वारस प्रमाणपत्र व तहसिलदार यांनी आय.सी.आय.सी.आय. ऑफीसला लिहीलेले पत्र या सर्व गोष्टीमुळे अर्जदाराचा क्लेम दाखल करण्यास उशिर झालेला नाही, ही गोष्ट स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र. 1 यांच्या चुकून झालेल्या चुकीमुळे अर्जदाराचे नुकसान होऊ नये, विमा संरक्षण योजने अंतर्गत लाभ प्राप्त होण्यास ते पात्र आहेत, या निर्णयास्तव हे मंच येत आहे. अर्जदाराच्या वकीलांने आपला युक्तीवाद हा लेखी स्वरुपात दिलेला आहे व त्यासोबत एक ऑथॉरिटी जोडलेली आहे. आय.सी.आय.सी.आय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि विरुध्द श्रीमती. सिंधुताई खैरनार हा केस लॉ या प्रकरणांस तंतोतंत लागु पडते. म्हणुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास नुकसान भरपाई रु.1,00,000/- निर्णय लागल्या पासुन एक महिन्यात द्यावे या निर्णयास्तव हे मंच येत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 4 यांच्या विरुध्द कुठलाही आदेश नाही. वरील सर्व बाबींचा विचार होऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास पॉलिसी नियमाप्रमाणे रु.1,00,000/- नुकसान भरपाईची रक्कम हा निर्णय लागल्या पासुन एक महिन्यात द्यावी. तसे न केल्यास एक महिन्यानंतर रु.1,00,000/- रक्कमेवर 9 टक्के दराने रक्कम फिटेपर्यंत व्याज गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावे. 4. गैरअर्जदार क्र. 1 व 4 यांच्या विरुध्द कुठलाही आदेश नाही. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री. बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.एस.आर.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक |