जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/76. प्रकरण दाखल दिनांक – 01/04/2009. प्रकरण निकाल दिनांक – 21/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. निलाबाई भ्र. बदू घोती वय, 47 वर्षे, धंदा घरकाम रा.पोतरडी ता.किनवट, जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, किनवट ता. किनवट जि.नांदेड. 2. व्यवस्थापक/मॅनेजर नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. स्टलिंग सिनेमा बिल्डींग, दुसरा मजला 65, मर्झबान रोड,डि.ओ.14 ख फोर्ट, मुंबई – 400 001 गैरअर्जदार 3. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगिना घाट रोड, नांदेड. 4. कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. दीशा अलंकार शॉप नं.2, टाऊन सेंटर सिडको कॅनॉट, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे. - अड.पी.जी.नरवाडे गैरअर्जदार क्र.1 तर्फे - स्वतः गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - अड.एम.बी.टेळकीकर गैरअर्जदार क्र.4 तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे पोतरडी ता.किनवट येथील रहीवासी असून मयत खंडू बदू घोती यांची अर्जदार ही आई आहे.गैरअर्जदार क्र.1 हे तहसीलदार किनवट आहेत व गैरअर्जदार क्र.2 हे नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे मूख्य कार्यालय असून गैरअर्जदार क्र.3 ही त्यांची शाखा आहे. अर्जदार हिचा मूलगा मयत खंडू यांचा दि.21.4.2007 रोजी विहीरीतील मोटर पंपाचा नट बोल्ट ठिक करण्यासाठी गेला असता तोल जाऊन पाण्यात बूडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची माहीती किनवट पोलीस स्टेशन येथे अपघाती मृत्यू म्हणून दि.21.4.2007 रोजी गून्हा क्र.20/2007 प्रमाणे करण्यात आली. अर्जदार यांचे नांवे मौजे पोतरंडी येथे गट नंबर 40, क्षेञफळ 01 हेक्टर 00 आर एवढी जमीन आहे. शेतीचा 7/12 चा उतारा व नमुना नं.8 चा उतारा व 6-क चा उतारा तक्रारीत दाखल आहे. तसेच अपघातासंबंधी इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ मंचात तक्रारी सोबत दाखल केले आहेत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी शेतक-यांचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे काढली व त्यांचे प्रिमीयम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे भरले आहेत त्यामूळे अर्जदार हे विम्याचे लाभार्थी आहेत. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.15.7.2006 ते 14.7.2007 असा होता व घटना ही दि.21.4.2007 ची आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपञकाप्रमाणे मृत्यूनंतर तहसील कार्यालयात विम्याची रक्कम मिळण्यासाठी दि.10.05.2007 रोजी आवश्यक कागदपञासह विनंती अर्ज व क्लेम फॉर्म सादर केला. परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.14.2.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना ते पञ गैरअर्जदार क्र.1 यांना दि.24.2.2008 रोजी मिळाले, त्या पञात क्लेम दाखल करण्यास उशिर झाला म्हणून कळविले. दावा दाखल करण्याचे कारण हे दि.14.2.2008 रोजी घडले म्हणून दावा मूदतीत आहे. अर्जदाराचा दावा न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.10.5.2007 पासून 12 टक्के व्याज तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार ही मयत खंडू यांची आई आहे तसेच पाण्यात बूडून मृत्यू झाला हे सर्व त्यांना मान्य आहे. सदरचा दावा दि.21.5.2007 रोजी इन्शूरन्स कंपनीकडे पाठविण्यात आलेला आहे त्यामूळे त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी नसून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी आपले म्हणणे एकञित व संयूक्तीकरित्या दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांचा पहिला आक्षेप असा आहे की. दावा मूदतीत नाही. विमा पॉलिसीतील शर्थी व अटी विरुध्द तो विसंगत आहे. दावा संबंधी पॉलिसीच्या अधीन नसून तो फेटाळण्याजोगा आहे. अर्जदाराचा तक्रारीमधील अपघात हा त्यांना मान्य नाही. अर्जदार यांनी विहीर स्वतःची आहे की दूस-याची आहे या संबंधी काहीही सांगितलेले नाही. अर्जदाराच्या शेतात विहीर व मोटार पंप नाही तेव्हा अर्जदाराच्या मूलाचा मृत्यू हा अपघाती नसून तो नैसर्गीक आहे. अर्जदाराचे नांवाने पॉलिसी ही हे त्यांना मान्य आहे व तो पॉलिसीचा कालावधी सूध्दा त्यांना मान्य आहे. पण अपघात हा त्यांना मान्य नाही. अर्जदाराचा क्लेम प्रस्ताव हा मूदतीत दाखल झालेला नाही. तसेच विलंबासंबंधी खूलासा देखील केलेला नाही. अर्जदार यांनी रक्कमेसंबंधी केलेली मागणी ही योग्य व कायदेशीर नसून त्यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.4 यांनी आपले लेखी म्हणणे पोस्टाने पाठविले आहे. त्यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्कम मानधन म्हणून देखील स्विकारत नाहीत. त्यामूळे त्यांचे विरुध्द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्लेम त्यांचेकडे दि.25.01.2008 रोजी तहसिलदार यांचेकडून आला परंतु एमओयू प्रमाणे क्लेम हा 90 दिवसांनी उशिराने आला व त्यांची ती योग्य ती कारणे दिलेले नाहीत. त्यामूळे पॉलिसीतील शर्ती व अटीनुसार अर्जदार यांना क्लेम मिळू शकणार नाही. त्यामूळे तो न स्विकारता दि.16.2.2008 रोजी तहसिलदार यांचेकडे वापस पाठविण्यात आला. मध्यस्थ करणे व शेतक-यांच्या प्रस्तावाची छाननी करणे व योग्य त्या शिफारशीसह इन्शूरन्स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्यांचे काम आहे. त्यामूळे त्यांचे विरुध्दचा दावा खारीज करावा. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांचे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजना पॉलिसी अंतर्गत पॉलिसी घेतलेली आहे. सदर शेतकरी अपघात विमा योजना यांचा प्रिमियम गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे भरलेला आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून कबाल इन्शूरन्स यांचेकडे दि.25.01.2008 रोजी कागदपञासहीत घटनास्थळ पंचनामा, पोलिस अधिका-याने सांक्षाकीत केलेले, इन्क्वेस्ट पंचनामा, 7/12, 8(अ), 6(क) चा उतारा ज्यावर मयत व्यक्तीचे नांव समाविष्ट असणे गरजेचे आहे मूळ प्रत, मयताचा पोस्ट मार्टेम अहवाल, मरण्णोत्तर प्रमाणपञ, इत्यादी आवश्यक कागदपञासह पाठविले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी या मंचामध्ये शेतकरी अपघात विमा योजना, तलाठयाचे प्रमाणपञ, गांव नमूना 7/12 चा उतारा, नमूना 8 (अ) चा उतारा, गांव नमूना 6 (क) चा उतारा, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा ही कागदपञे या मंचामध्ये या अर्जाचे कामी दाखल केलेली आहेत. सांक्षाकीत केलेले पोस्ट मार्टेम रिपोर्ट, ही सर्व कागदपञे मंचामध्ये दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी सदर मंचाची नोटीस मिळाल्यानंतर या मंचामध्ये हजर झालेले आहेत. त्यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये अर्जदार यांनी त्यांचा अर्ज मूदतीत दाखल केलेला नाही. त्यामूळे त्यांना सदरची विमा क्लेमची रक्कम घेण्यास ते पाञ नाहीत वगैरे मूददे उपस्थित केलेले आहेत. अर्जदार यांनी त्यांचे लेखी यूक्तीवादामध्ये त्यांनी क्लेम फॉर्म हा मूदतीत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दाखल केलेला होता त्यांचा आवक जावक नोंदणी क्र.2827 दि.10.5.2007 असा आहे. त्यामूळे त्यांनी दावा उशिरा दाखल केलेला नाही हे स्पष्ट होते. अर्जदाराचा अपघात झाला आहे या बाबत वाद नाही पण गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या शेतात विहीर नाही असा आक्षेप घेतलेला आहे. अर्जदाराचा विमा हा अपघाती विमा आहे. मग तो अपघात कोठेही झालेलो असो, पॉलिसी करारामध्ये असे कूठेही म्हटलेले नाही की, अपघात अर्जदाराच्या शेतामधील विहीरीमध्ये झालेला असला पाहिजे. शेतकरी विमा अपघात योजनेचे परिपञक पाहिले असता असता “ शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव विहीत कागदपञासह विमा योजनेच्या कालावधीत केव्हाही प्राप्त झाला तरी तो घेणे बंधनकारक राहील. दूर्घटना सिध्द होत असेल व अपवादात्मक परिस्थितीत एखादया कागदपञाची पूर्तता होऊ शकत नसेल तर पर्यायी दाखला पाहता शासनाशी विचारविनिमय करुन पूर्तता करुन घेऊन नूकसान भरपाई अदा करावी. प्रस्तूत तरतूदीनुसार फेटाळली जाणार नाही या बाबत दक्षता घ्यावी व योजनेची परीणामकारक उल्लघंन होण्याचे दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी ” असे नमूद केलेले आहे. सदर परिपञकाचा व त्यामधील बाबीचा विचार करता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून प्राप्त झालेल्या कागदपञाची छाननी करुन योग्य ती कारवाई करणे न्याय व आवश्यक असे होते परंतु गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये हजर झाल्यानंतरही विमा क्लेम देणे बाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी यूक्तीवादाचे वेळी एक सायटेशन 2000 (I) Suprem Court Cases, page no. 98, Regional Provident Fund Commissioner Vs Shivkumar Joshi या वरिष्ठ कोर्टाचे निकाल पञ दाखल केलेले आहेत. सदर निकाल पञाचे अवलोकन केले असता अर्जदार हे बेनिफिशियरी ग्राहक असल्याच्या बाबी स्पष्ट होत आहेत. गैरअर्जदार क्र.1 हे मंचात हजर राहून त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा दावा क्लेम त्यांनी दि.21.05.2007 रोजी इन्शूरन्स कंपनीकडे पाठविल्याचे नमूद केलेले आहे. त्यामूळे त्यांचेकडून कोणतीही सेवेतील कमतरता नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही. तसेच गैरअर्जदार क्र.4 यांचेकडून ही काही सेवेतील कमतरता झालेली स्पष्ट होत नाही. त्यामूळे त्यांचे विरुध्द ही कोणताही आदेश कारणे योग्य ठरणार नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेल्या कागदपञाचे अवलोकन केले असता शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार यांनी विमा क्लेमची रक्कम अर्जदार यांना अदा करणे आवश्यक असे होते परंतु गैरअर्जदार यांनी विमा क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज दाखल करावा लागलेला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचे मुलाचा मृत्यू दि.21.04.2007 रोजी झालेला आहे परंतु अर्जदार यांना रक्कम रु.1,00,000/- विमा क्लेमची रक्कम आज अखेर मिळाली नाही. त्यामूळे रक्कम रु.1,00,000/- एवढया रक्कमेस अर्जदार यांना वंचित राहावे लागलेले आहे. त्यामूळे अर्जदार हे सदर रक्कम रु.1,00,000/- यांचे आर्थिक नूकसानी पोटी व्याज गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेला लेखी यूक्तीवाद व वरिष्ठ कोर्टाचे निकाल पञ, गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, शपथपञ, व लेखी यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 1. विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दयावेत,सदर रक्कमेवर दि.30.04.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह होणारी रक्कम अदा करावी. 2. मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 3. गैरअर्जदार क्र.1 व 4 विरुध्द आदेश नाहीत 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |