निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 18/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 30/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 03/02/2014
कालावधी 01 वर्ष. 04 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सय्यद ईस्माईल पिता सय्यद खुदबोदीन. अर्जदार
वय 58 वर्षे. धंदा.शेती. अॅड.एस.बी.चौधरी.
रा. शेळगाव ता.सोनपेठ जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषि अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,सोनपेठ, स्वतः
ता.सोनपेठ.जि.परभणी.
2 शाखा व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
युनायइटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि.
दयावान कॉम्प्लेकस,स्टेशन रोड, परभणी.
3 विभागीय व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन, एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग.
प्लॉट नं. 7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर, सिडको, औरंगाबाद.
4 विभागीय व्यवस्थापक,
युनायइटेड इंडीया इंन्शुरन्स कं.लि.
मंडल कार्यालय, क्रं. 2 अंबीका हाउस, शंकर नगर चौक,
नागपुर 400101.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पत्नीचा अपघात विमादावा नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा शेळगाव ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून तिच्या पत्नीच्या नावे मौजे शेळगाव ता.सोनपेठ येथे गट क्रमांक 83 मध्ये शेत जमीन होती, व याबाबतची नोंद 7/12 उतारा, 8 अ, 6 ड, 6 क, प्रमाणपत्रा मध्ये आलेली आहे व त्याची पत्नी शेतकरी होती.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराची पत्नी परभणी येथे दिनांक 29/11/2009 रोजी जिप क्रमांक MH – 22- H- 3899 ने विवाह सोहळयासाठी गेले होते, व सदर दिवशी विवाह सोहळा झाल्यानंतर परभणीहून शेळगावकडे वापस जात असतांना दैठणा जवळ टेम्पो क्रमांक MH-04-F 4529 ने समोरुन येवुन सदर जिपला जोरदार धडक दिली व त्या अपघतात अमीनाबी व इतर तिघेजन ठार झाले व इतर सहाजन गंभीर जखमी झाले होते. सदर घटनेची माहिती दैठणा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर संबंधीत पोलीसांनी स्थळ पंचनामा व मरणोत्तर पंचनामा केला व मयताचे पी.एम. करण्यासाठी शासकीय रुग्णालय परभणी येथे डेथबॉडी पाठवण्यात आली.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पत्नीच्या मृत्यू नंतर त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दिनांक 07/12/2009 रोजी सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह गैरर्अदार क्रमांक 1 कडे तिच्या मयत पत्नीचा विमादावा दाखल केला.
सदरचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 याने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचेकडे सादर केला व जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर केला, गैरअर्जदार क्रमांक 3 याने तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 विमा कंपनीकडे पाठवला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरचा विमादावा दाखल केल्यानंतर त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमादाव्या बाबत चौकशी केली, त्यावेळी त्याने उत्तर दिले की, तुमचा विमादावा मंजुरीसाठी विमा कंपनीकडे पाठविला आहे व मंजूर झाल्यानंतर तुम्हांस कळवु असे सांगीतले.त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने दिनांक 10/02/2011 रोजी अर्जदारास पत्र पाठवुन कळविले की, मयताचे 7/12 वरील नाव हे पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशी नव्हते व पॉलिसी जारी केल्यानंतर नाव टाकण्यात आलेले आहे, हे कारण दाखवुन विमादावा नामंजूर केला व सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 1 लाख रु. मृत्यू झाल्या तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे अर्जदारास द्यावेत. व तसेच गैरअर्जदाराना असा आदेश करावा की, त्याने शारीरिक व मानसीक त्रासापोटी 25,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 6 वर 5 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यास लिहिलेला अर्ज, Repudiation Letter, लिफाफा, 7/12 उतारा, फेर क्रमांक 1876 ची प्रत दाखल केले आहे. तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 27 वर एफ.आय.आर.कॉपी, पी.एम. रीपोर्ट, घटनास्थळ पंचनाम्याची प्रत, दाखल केली आहे. व तसेच नि.क्रमांक 29 वर 7 कागदपत्रांच्या यादीसह 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये क्लेमफॉर्म भाग 2, 6 क, 8 अ, रेशनकार्डची प्रत, क्लेमफॉर्म भाग 1, एफ.आय.आर.ची प्रत दाखल केली आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 10 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची पत्नी अमीनाबी इस्माईल रा.शेळगाव ता.सोनपेठ यांनी शेतकरी अपघात योजनेचा लाभ मिळवण्याकरीता सर्व कागदपत्राची पुर्तता करुन संबंधीताकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला, सदर प्रस्ताव दिनांक 01/02/2010 रोजी प्राप्त झाला व त्यात आढळून आलेल्या त्रुटीबाबत संबंधीताकडून पुर्तता करुन घेवुन परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केला.सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर विमा कंपनीने आम्हांस मंजुरी बाबत कळविले नाही व सदर प्रस्तावा बाबत गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दुरध्वनी वरुन विचारणा केली असता सदर प्रस्ताव विमा कंपनीने नामंजुर केल्याचे कळविले. आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही व आम्हांस दोषी धरणे योग्य नाही.
गैरअर्जदार क्रमांक 3 यास मंचाची नोटीस तामील होवुनही ( नि.क्रमांक 24 वर आर.पी.ए.डी. पावती ) मंचासमोर हजर नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 19 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे, गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 15/08/2009 रोजी असलेल्या शेतक-यांनाच पॉलिसी दिली आहे. व सदर पॉलिसीचा कालावधी हा 15/08/2009 ते 14/08/2010 असा होता व प्रस्तुत तक्रारी मधिल मयत ही दिनांक 15/08/2009 रोजी शेतकरी नव्हती व तिच्या नावे दिनांक 20/10/2009 रोजी फेरफार मंजूर झाला होता व हे 7/12 उता-यावरुन दिसून येते. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 31/12/2010 रोजी च्या पत्रान्वये मयताचे नाव दिनांक 15/08/2009 रोजी 7/12
उता-यावर नव्हते, व तो शेतकरी नव्हता हे कारण दाखवुन अर्जदाराचा विमादावा फेटाळला तो योग्यच आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 21 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 25 वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 विमा कंपनीने अर्जदाराचा
विमादावा फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
मयत सय्यद अमीनाबी ईस्माईलचा दिनांक 29/11/2009 रोजी जिप क्रमांक MH-22- 3899 परभणीहून शेळगावकडे बसून जात असतांना दैठणा जवळ सदरची जिप आली असता समोरुन भरधाव वेगाने टॅम्पो क्रमांक MH-4- 4529 ने धडक देवुन अपघात झाला, व सदर अपघातात अमीनाबीचा मृत्यू झाला ही बाब नि.क्रमांक 27/6 वर दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनामा, नि.क्रमांक 27/7 वर दाखल केलेल्या इन्क्वेस्ट पंचनामा, नि.क्रमांक 27/9 वर दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक 98/09 च्या दैठणा पोलिस स्टेशनच्या एफ.आय.आर. प्रतवरुन सिध्द होते. व तसेच सदर अपघातामुळेच अमीनाबीचा मृत्यू झाला ही बाब नि.क्रमांक 27/10 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेम अहवाला वरुन सिध्द होते. अमीनाबीच्या मृत्यूनंतर अर्जदाराने गैरअर्जदार कमांक 1 कडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 29/6 वरील क्लेमफॉर्म भाग 1, 29/1 वरील क्लेमफॉर्म भाग 2 वरुन सिध्द होते.
अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने मयत सय्यद अमीनाबी ही पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशी म्हणजेच 15/08/2009 रोजी शेतकरी म्हणून 7/12 उता-यावर नाव नव्हते व पॉलिसी जारी केल्यानंतर मयत अमीनाबीचे नाव 7/12 वर लावले असल्या कारणाने अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला होता, ही बाब नि.क्रमांक 6/2 वर दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते, याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, सदर पॉलिसीचा कालावधी हा 15/08/2009 ते 14/08/2010 असा होता ही बाब नि.क्रमांक 25/1 वरील पॉलिसीची प्रत वरुन सिध्द होते.सदर पॉलिसीच्या प्रतचे अवलोकन केले असता पॉलिसी ही 15/08/2009 ते 14/08/2010 पर्यंत वैध होती असे दिसून येते, व अर्जदाराच्या पत्नीचा मृत्यू पॉलिसी कालावधीतच झाला हे सिध्द होते. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा मयत अमीनाबी ही पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशी शेतकरी नव्हती, म्हणून विमादावा नामंजूर केला सदरचे विमा कंपनीचे कारण मंचास योग्य वाटत नाही, कारण याबाबत अर्जदाराने पुराव्यासाठी दाखल केलेले नि.क्रमांक 6/5 वरील अनुक्रमांक 1876 च्या फेरफारचे अवलोकन केले असता मयत अमीनाबीच्या नावे दिनांक 20/10/2009 रोजी फेर मंजूर होवुन तिचे नाव 7/12 वर आले हे दिसुन येते. म्हणजेच अमीनाबी ही मृत्यू समयी शेतकरी होती ही बाब नि. क्रमांक 6/4 वरील 7/12 उता-यावरुन सिध्द होते, व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या नि.क्रमांक 25/5 वरील Maharashtra Government Resolution नं शेअवि-2009/प्र.क्र. 268/11-अे, चे अवलोकन केले असता गैरअर्जदार विमा कंपनीने दर्शविलेल्या असा या नियमाचा कोठेही उल्लेख केला नाही की, पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशीच मयताचे नाव शेतकरी म्हणून 7/12 उता-यावर असणे आवश्यक आहे. केवळ गैरअर्जदार विमा कंपनीने त्याच्या पॉलिसीतील नियमांचे कारण पुढे करुन अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने नाकारल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना ही मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. या बाबत अर्जदाराच्या विधीज्ञाने दाखल केलेले केसलॉ मध्ये मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली यांनी रिव्हीजन पिटीशन क्रमांक 1664/ 2011 रिलायंस जनरल इंशुरन्स विरुध्द साक्रोबा व इतर मध्ये असे म्हंटले आहे की, We carefully perused the conditions laid down by the Government in which it is mentioned that age of an agriculturist must be between 12 to 70 years. The registered farmer who is less than 12 years will be automatically covered in the future from the date he completes 12 years and will be covered under the scheme till he attains the age of 70 years till the end of the financial year. Considering this provision of resolution of Government we can safely conclude that it was the intention of the Government to extend the benefits of the scheme to those farmers who acquire eligibility criteria even after the commencement of the policy. And accordingly, since the deceased had become registered farmer after the inception of policy, he was deemed to have been covered under the insurance scheme. If the Government wanted to exclude the farmer who had become registered farmer after the inception of policy then in the case the Government would have made specific reference in the GR for exclusion of benefits to those farmers who have acquired land after the inception of policy. No such exclusion clause is found in the resolution. We are of the opinion that it was the intention of the Government to extend the benefits of the scheme automatically to those famers who became registered farmer after the inception of the policy. Farmers who completes the age of 12 years are automatically covered under the scheme and therefore, by necessary implication it can be inferred that the farmers who acquire the land or who become the registered farmers after the commencement of policy are also deemed to have been covered under the scheme automatically. Therefore, the heirs of the deceased are also entitled to get the benefits under the scheme. It is the settled principle of interpretation that when two views are possible, than the view favorable to the insured should be preferred. Insurance policy is a contract for the benefit of insured and interpretation should promote its object and serve intention of consumer. If two interpretations are possible, one which favours the consumer is to be adopted. Further it is also settled principle of interpretation of statutes that when policy conditions are not clear and capable of more than interpretation, the interpretation beneficial to consumer should be adopted. In light of these principles we are of the firm opinion that though the deceased had become registered farmer after the inception of the policy he was well covered under the scheme as soon as he acquired the land and became registered farmer during the policy period or after the inception of the policy. व तसेच उच्च न्यायालय यांनी शकुंतला विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र व इतर या प्रकरणात (2010) (2) MLJ पान क्रमांक 880 असे म्हंटले आहे की, personal accident insurance policy for benefit of farmers – Said scheme is social welfare scheme and is beneficial to the family members of the farmers who expire in accidental death—Farmer having died in accident, Insurance Company declined to grant the claim for compensation on ground that deceased was not registered farmer insurance company adopted obstructive attitude and deprived the petitioner from the claim of compensation—Government Resolutions dated 5-1-2005 and 31-3-2005 from where the said scheme of personal accident insurance emanates, nowhere whispers about the term, “ registered farmer ” – Compensatory cost of Rs. 10,000/- imposed on respondent. सदर दोन्ही केसचे निकाल प्रस्तुत प्रकरणात तंतोतंत लागु पडते. सदरील निकालाचा आधार घेवुन मंचाचे ठाम मत आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नकारुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 विमा कंपनीने (Jointly and Severely) आदेश
तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास तिच्या मयत पत्नीच्या
विमा दाव्यापोटी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- फक्त
(अक्षरी रु.एकलाख फक्त ) द्यावेत.
3 गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारीचा खर्च म्हणून अर्जदारास रु.1,000/-
फक्त (अक्षरी रु.एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.