-- आदेश --
( पारित दि. 18.03.2011)
द्वारा सौ. अलका उमेश पटेल सदस्या
तक्रारकर्ता अज्ञानबाई धनिराम गजभिये यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,..................
1 अज्ञानबाई यांचा मुलगा जितेंन्द्र धनिराम गजभिये यांचा दि. 14.10.2008 ला रेल्वे अपघातात मृत्यु झाला व तो मृत व्यक्ती शेतकरी असल्यामुळे शेतकरी वारसदारांना अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारी विमा रक्कम त्यांना प्राप्त झालेली नाही.
2 तक्रारकर्ता मागणी करतात की, शेतकरी अपघात बीमा योजनेचे रु.1,00,000/- 18% व्याजासह मिळावे व वि.प. तर्फे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- मिळावे.
3 वि.प.क्रं. 1 आपल्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी दि. 16.02.2009 ला प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार या कार्यालयाने सदर प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांना पाठविलेला आहे व आवश्यक असणारी कागदपत्रे तक्रारकर्ता यांनी स्वतः वरिष्ठ कार्यालयास सादर केली.
4 वि.प.क्रं. 2 म्हणतात की, तक्रारकर्ता विमा कंपनीचा ग्राहक होऊ शकतो ज्यांनी अपघात विम्याची जोखिम राज्य शासनाकडून विमा प्रिमियम घेऊन स्विकारली आहे. आम्ही केवळ सल्लागार आहोत व राज्य शासनाला विना मोबदला साहय करतो. सदर दावा हा ओरियण्टल इन्शुरन्स कंपनीकडे दि. 04.01.2010 रोजी पाठविण्यात आला. म्हणून आमची वरील तक्रारीतून निर्दोष मुक्तता करण्यात यावी व तक्रारकर्ता तर्फे रु.5000/- अर्जाचा खर्च म्हणून मिळावे.
5 वि.प.क्रं. 3 आपल्या लेखी उत्तरात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली नाही. तशी दि.21.01.2010 च्या पत्राद्वारे सूचना दिली आहे. त.क.ची सदर तक्रार कालबाहय आहे म्हणून खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
6 तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली दस्ताऐवज , शपथपत्रे, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प. क्रं. 3 यांनी पाठविलेले दि. 21.1.2010 चे आवश्यक असलेले कागदपत्र मिळाले नाही म्हणून फाईल बंद केली आहे असे सांगणारे सदर पत्र त.क. ला मिळाले अशी पोचपावती व रसीद रेकॉर्डवर दाखल नाही. म्हणून सदर पत्र त.क.ला मिळाले असे ग्राहय धरता येत नाही. तक्रारकर्ता यांनी (2008) 2 CPR 203 हा केस लॉ रेकॉर्डवर दाखल केला आहे. मृत व्यक्ती हा शेतकरी होता व त्याचा अपघातात मृत्यु झाला आहे अशा परिस्थितीत वि.प.क्रं. 3 यांनी त.क. ला विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- द्यावी असे मंचाचे मत आहे.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 वि.प.क्रं. 3 यांनी त.क. ला शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- ला द्यावे.
2 वि.प. क्रं. 3 यांनी वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाच्या आत करावे.