-- आदेश --
( पारित दि. 22.03.2011)
द्वारा सौ. अलका उमेश पटेल सदस्या
तक्रारकर्ता इठाबाई भोजराज वरखडे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,..................
1 इठाबाई यांचे पती भोजराज वरखडे यांचा दिनांक 10.07.2008 ला विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यु झाला व ते मृत व्यक्ती शेतकरी असल्यामुळे शेतकरी वारसदारांना अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारी विमा रक्कम त्यांना प्राप्त झालेली नाही.
2 तक्रारकर्ता म्हणतात की, वि.प. यांच्या सेवेत न्यूनता आहे. शेतकरी अपघात बीमा योजनेचे रु.1,00,000/- 18% व्याजासह मिळावे व वि.प. तर्फे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- मिळावे.
3 वि.प.क्रं. 1 यांना मंचाचा नोटीस प्राप्त झाल्यावर देखील स्वतः हजर झालेले नाही व त्यांनी आपले लेखी जबाब दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात. एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश दि.14.03.2011 रोजी पारित करण्यात आला.
4 वि.प.क्रं. 2 म्हणतात की, तक्रारकर्ता विमा कंपनीचा ग्राहक होऊ शकतो ज्यांनी अपघात विम्याची जोखिम राज्य शासनाकडून विमा प्रिमियम घेऊन स्विकारली आहे. आम्ही केवळ सल्लागार आहोत व राज्य शासनाला विना मोबदला सहाय्य करतो. म्हणून आमची वरील तक्रारीतून निर्दोष मुक्तता करण्यात यावी व तक्रारकर्ता तर्फे रु.5000/- अर्जाचा खर्च म्हणून मिळावे.
5 वि.प.क्रं. 3 आपल्या लेखी उत्तरात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली नाही. तशी दि.22.05.2009 च्या पत्राद्वारे सूचना दिली आहे. त.क.ची सदर तक्रार कालबाहय आहे म्हणून खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
6 तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली दस्ताऐवज , शपथपत्रे, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, मृत व्यक्ती हा शेतकरी होता व त्याचा इलेक्ट्रीक शॉकने मृत्यु झाला आहे. तक्रारकर्ता यांनी (2008) 2 CPR 203 आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स क.लि. विरुध्द सिंधुबाई खैरनार हा केस लॉ रेकॉर्डवर दाखल केला आहे. यात आदरणीय महाराष्ट्र , राज्य आयोगाने असे प्रतिपादन केले आहे की, गावातील रेव्हेन्यू अधिकारी व तहसिलदार यांचेवर संबंधित कागदपत्रे गोळा करुन इंशुरन्स कंपनीकडे पाठविण्याची जबाबदारी असते. विधवा स्त्रीची काहीही चूक नसतांना तिचा विमा दावा हा नाकारला जायला नको. अशा परिस्थितीत वि.प.क्रं. 3 यांनी त.क. ला विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- द्यावी असे मंचाचे मत आहे.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 वि.प.क्रं. 3 यांनी त.क. ला शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- ला द्यावे.
2 वि.प. क्रं. 3 यांनी वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाच्या आत करावे.