Maharashtra

Gondia

CC/18/138

JAYANT ZALURAO VAIDYA - Complainant(s)

Versus

THE SR.SUPDT. OF POST OFFICE, NAPGUR - Opp.Party(s)

MR. L. N. CHOURE

16 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 24, SECOND FLOOR, NEW ADMINISTRATIVE BUILDING,
JAYSTAMBH CHOWK, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/18/138
( Date of Filing : 31 Oct 2018 )
 
1. JAYANT ZALURAO VAIDYA
R/O. BANK COLONY, RISAMA WARD NO. 3, AMGAON, TAH. AMGAON
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE SR.SUPDT. OF POST OFFICE, NAPGUR
R/O. MFL DV. NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
2. ASST. SUPDT. OF POST OFFICE NP (NORTH) SUB-DIVI.GONDIA
R/O. NEAR B.G.W.HOSPITAL, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
3. THE SUPDT. OF POST OFFICE , THROUGH SHRI. V.K.UEKY
R/O. SUB-POST OFFICE AMGAON, TAH. AMGAON
GONDIA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SARITA B. RAIPURE MEMBER
 
For the Complainant:MR. L. N. CHOURE, Advocate
For the Opp. Party: MR., Advocate
 MR., Advocate
 MR., Advocate
Dated : 16 Jan 2020
Final Order / Judgement

        तक्रारकर्ता तर्फे वकील     ः- श्री. एल.एन. चवरे,  

        विरूध्‍द पक्ष क्र. 1 2 व 3 ः- स्‍वतः

                  (युक्‍तीवादाच्‍या वेळी)

निकालपत्रः- कु. सरीता ब. रायपुरे, सदस्‍या,     -ठिकाणः गोंदिया.           

 

                                                                                            निकालपत्र

                                                                            (दिनांक  16/01/2020 रोजी घोषीत )     

01.  तक्रारकर्त्‍याला विरूध्‍द पक्षाने आवर्ती ठेवची परिपक्‍वता रक्‍कम व्‍याजासह कमी दिल्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या    कलम 12 खाली दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

 तक्रारकर्ता श्री. जयंत झालुराव वैदय, रा. आमगाव ता.जि. गोंदिया यांनी पोस्‍ट ऑफिस आमगांव यांच्‍या निर्देशानूसार आवर्ती ठेव खाते क्र. 2028720410 उघडले व त्‍या खात्‍यामध्‍ये तक्रारकर्ता दरमहा रू. 2,000/-,प्रमाणे रक्‍कम भरीत होता. तक्रारकर्त्‍याने हि आवर्ती ठेव पाच वर्ष कालावधीसाठी सुरू केली होती. विरूध्‍द पक्ष क्र  3 ने दि. 10/10/2017 रोजी तक्रारकर्त्‍याची आवर्ती ठेव परिपक्‍व झाल्‍याची माहिती देऊन ती रक्‍कम तुम्‍ही पोस्‍ट ऑफिस बचत खात्‍यात जमा करावे असे कळविले. त्‍यानूसार तक्रारकर्त्‍याने रक्‍कम जमा करण्‍यासाठी फॉर्म भरून दिला.  त्‍यानंतर विरूध्‍द पक्ष क्र 3 ने तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये रू. 1,31,473/-, एवढी रक्‍कम वळती केली. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे रू. 1,49,800/-, व्‍याजासह खात्यामध्ये जमा व्‍हायला पाहिजे होते. परंतू विरूध्‍द पक्ष क्र 3 ने हेतुपरस्‍पर रू. 18,327/-, एवढी रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये वळती केली नाही. विरूध्‍द पक्ष क्र 3 ने सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये वळती न करता त्‍याचा उपयोग स्‍वतःच्‍या फायदयासाठी केला. त्‍याकरीता विरूध्‍द पक्ष भारतीय दंड सं‍हिताचे कलम 176 नूसार फौजदारी कार्यवाहीसाठी जबाबदार आहे. तसेच विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ग्रा.सं. अधिनियम 1986 कलम 2 (g) & (o) नूसार सेवा देण्‍यात त्रृटी केली. तक्रारकर्त्‍याने अनेकदा विरूध्‍द पक्ष क्र 2 व 3 कडे लेखी तक्रार करून व्‍याजासह पूर्ण रक्‍कम खात्‍यामध्‍ये जमा करण्‍याची विनंती केली. परंतू विरूध्‍द पक्षाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. त्‍यामूळे तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचात दाखल करून विरूध्‍द पक्ष क्र 1 ते 3 ने तक्रारकर्त्‍याची आवर्ती ठेव रक्‍कम रू. 18,327/-, 6 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रू. 50,000/-,ची मागणी केली.  

3.   तक्रारकर्त्‍याची तक्रार विद्यमान न्‍यायमंचाने दि.05/11/2018 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर, विरूध्‍द पक्ष यांना मंचातर्फे नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या. विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्यानंतर, विरूध्‍द पक्ष क्र 1 ते 3 यांनी मंचात हजर होऊन त्‍यांचा लेखीजबाब दाखल केला.

4.   विरूध्‍द पक्ष क्र 2 ने स्‍वतः हजर होऊन त्‍यांचा लेखी जबाब मंचात दाखल केला. तसेच त्‍यांनी विरूध्‍द पक्ष क्र 2 नी दाखल केलेला लेखी जबाब हा विरूध्‍द पक्ष क्र 1 ला मान्‍य असल्‍याची पुरसीस दाखल केली.

5.  विरूध्‍द पक्ष क्र 2 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा लेखीजबाब दाखल केला. विरूध्‍द पक्ष क्र 2 यांनी त्‍यांच्‍या लेखीजबाबामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या  तक्रारीचे परिच्‍छेद निहाय कथन अमान्‍य केले. तसेच विरूध्‍द पक्ष क्र 2 ने आपल्‍या लेखीजबाबामध्‍ये प्रथम आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष क्र 3 विरूध्‍द तक्रार दाखल केली त्‍यात त्‍यांनी मा. अधिक्षक पोस्‍ट ऑफिस आमगांव असा उल्लेख केला परंतू विरूध्‍द पक्ष क्र 3 हे उपविभाग पोस्‍ट ऑफिस आमगांव आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार दाखल करण्‍यास योग्‍य नाही. कारण तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये विरूध्‍द पक्ष क्र 3 चे पदनाम चुकीचे लिहीले आहे. त्‍याबद्दल तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी असे त्‍यांनी म्‍हटले आहे. विरूध्‍द पक्ष क्र 2 ने त्‍यांच्‍या लेखी जबाबामध्‍ये विशेष कथन दिले त्‍यात त्‍यांनी म्‍हटले आहे की, विरूध्‍द पक्ष क्र 1 हे मा. अधिक्षक (Supt. Of post Office ) पोस्‍ट ऑफिस आहे आणि त्‍याच्‍या अख्‍यत्‍यारीत नागपुर विभाग येतो तसेच गोंदिया जिल्‍हा येतो. विरूध्‍द पक्ष क्र 2 मा. सहाय्यक अधिक्षक (Assistant  Supt. Of post Office Gondia  ) पोस्‍ट ऑफिस आहे आणि त्‍यांच्‍या अधिकार क्षेत्रामध्ये गोंदिया जिल्‍हा तसेच आमगांव तालुका येतो. विरूध्‍द पक्ष क्र 3 हे उपविभागीय पोस्ट ऑफिस आमगांव (sub  post Office Amgoan ) असुन पोस्‍टमास्‍टर हा या पोस्ट ऑफिसचा प्रभारी   असतो. विरूध्‍द पक्ष क्र 2 ने आपल्‍या लेखी जबाबामध्‍ये म्‍हटले आहे की, भारत सरकारने पोस्‍ट ऑफिससाठी संपूर्ण भारतभर पाच वर्ष मुदतीची आवर्ती ठेवमध्‍ये रक्‍कम ठेवण्‍याची योजना ग्राहकासाठी सुरू केली. त्‍यानूसार पोस्‍टाचे ग्राहक या योजनेनूसार पाच वर्ष किंवा 60 महिन्‍यासाठी प्रतिमाह या दराने रक्‍कम जमा करू शकते व जो ग्राहक या योजनेनूसार पाच वर्ष पर्यंत खंड न पडता प्रतिमहा रक्‍कम त्‍याच्‍या आवर्ती ठेव खात्‍यामध्‍ये भरेल त्‍यांनाच या योजनेनूसार व्याज देण्‍यात येईल. परंतू एखादया ग्राहकाने या योजनेच्‍या अटी व शर्तीचा भंग केला आणि आवर्ती ठेव दरमहा या खात्‍यामध्‍ये रक्‍कम जमा केली नाही त्‍या ग्राहकाला पोस्‍टाद्वारे फक्‍त सामान्‍य व्‍याजदर जसे बचत खात्यावर मिळते त्‍याप्रमाणे देण्‍यात येईल. सदरची आवर्ती ठेव योजना भारत सरकारने ठरविलेल्‍या ऑन लाईन (online) सिस्टम प्रमाणे आहे. त्‍यामुळे विरूध्‍द पक्षाकडे हि योजना हाताळयासाठी कोणत्‍याही प्रकारचे वेगळे म्‍यॉनुअल  नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता सुध्‍दा एक ग्राहक आहे आणि तक्रारकर्त्‍याने पोस्‍ट ऑफिस आमगांव येथे आवर्ती ठेव खाता उघडला त्‍यानूसार तक्रारकर्त्‍याने आवर्ती ठेव खात्‍यामध्‍ये रू. 2,000/-, प्रतिमहा रक्‍कम भरण्‍यासाठी दि. 23/10/2012 ला सुरूवात केली आणि या आवर्ती ठेव खात्‍यातील रक्‍कम दि. 24/10/2017 ला परिपक्‍व होणार होती. परंतू तक्रारकर्त्‍याने रक्‍कम परिपक्‍व होण्‍याच्‍या मुदत पूर्वीच दि. 18/10/2017 ला आवर्ती ठेव रक्कम काढली. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष  क्र 3 ने आवर्ती ठेव योजनेच्‍या अटी व शर्तीनूसार देय असलेली व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा केली. यात विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 ची काहीही चुक नाही. तसेच विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सेवा देण्‍यात त्रृटी केली नाही. करीता तक्रारकर्त्‍याची सदरची तक्रार विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 विरूध्‍द खारीज करण्‍यात यावी असे त्‍यांनी आपल्‍या लेखीजबाबामध्‍ये म्‍हटले आहे.           

6.  विरूध्‍द पक्ष क्र 3 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा लेखीजबाब दाखल केला. विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या लेखीजबाबात म्‍हटले आहे की, तक्रारकर्ता हा POSB नियमाप्रमाणे आवर्ती ठेव खाता तक्रारकर्ता व पोस्‍ट ऑफिस आमगांव येथील कर्मचारी मिळून चालवितात. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 हे सर्वस्वी जबाबदार नाही. तक्रारकर्ता हा स्‍वतः दि. 10/10/2017 रोजी पोस्‍ट ऑफिस आमगाव येथे आवर्ती ठेव खाता क्र. 2028720410 येथे रक्‍कम जमा करण्‍यास आला आणि त्‍याने प्रतिमहा रक्‍कम रू. 2,000/- प्रमाणे रक्‍कम जमा केली. परंतू 60 महिने हप्‍ता भरून झाल्याने तुमची आवर्ती ठेवची भरलेली रक्‍कम ज्या तारखेला खाता उघडला त्‍या दिनांक 23/10/2012 पासून पाच वर्ष पूर्ण झाल्‍यामूळे परिपक्‍व होईल असे विरूध्‍द पक्ष क्र 3 ने तक्रारकर्त्‍याला सांगीतले. त्‍यामुळे तकारकर्ता परत गेला आणि तक्रारकर्ता दि. 18/10/2018 ला पोस्‍ट ऑफिस आमगावला येऊन परिपक्‍वता रक्‍कम बचत खात्‍यामध्‍ये जमा करण्‍याविषयी विरूध्‍द पक्ष क्र 3 ला सांगीतले. त्‍यानूसार ती रककम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये वळती करण्‍यात आली. तक्रारकर्ता हा आवर्ती ठेव बंद करण्‍याच्‍या वेळेस स्‍वतः हजर होता आणि त्‍याने स्‍वतः Withdrawal फॉर्म भरून दिला. त्‍यानूसार आवर्ती ठेवची रक्‍क्‍म तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये वळती करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याने आवर्ती ठेव उघडला त्‍यवेळी जी सही केली ती सही तंतोतंत जुळते. तसेच तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष क्र 3 वरती जबरदस्‍तीने आणि आवाज वाढवून आवर्ती ठेवची रक्‍कम वळती करण्‍यास सांगीतले. त्‍यानूसार तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात रक्‍कम वळती करण्‍यात आली. परंतू तक्रारकर्त्‍याने आवर्ती ठेव खाता बंद केल्‍यनंतर तक्रार दाखल केली. ती तक्रार दि. 15/12/2017 ला डिव्‍हीजन ऑफिसने स्विकारून  तक्रारकर्त्‍याची तक्रार ASP - Gondia Sub Division ला देण्‍यात आली. त्‍यानूसार विरूध्‍द पक्ष क्र 2 ने सदर तक्रारीची चौकशी केली तेव्‍हा असे आढळले की, तक्रारकर्त्‍याने सदर आवर्ती ठेवची रक्‍कम पाच वर्ष पूर्ण होण्‍या अगोदर काढली त्‍यामुळे आवर्ती ठेवच्‍या रकमेवरीत व्‍याज कमी आले. यात पोस्‍ट ऑफिस आमगांवचा काहीही दोष नाही. विरूध्‍द पक्ष क्र 3 ने तक्रारकर्त्‍याला आवर्ती ठेव परिपक्‍व होण्‍या अगोदर बंद करण्‍यासाठी मनाई केली होती. परंतू तक्रारकर्त्‍याने आवर्ती ठेव खाता स्‍वतः बंद करण्‍यास दबाव टाकला. त्‍याकरीता तक्रारकर्ता हा स्‍वतः आवर्ती ठेवची कमी रक्‍कम मिळण्‍यास स्‍वतः जबबादार आहे. करीता तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी असे त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबामध्‍ये म्‍हटले आहे.

7.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, दाखल केलेले दस्‍ताऐवज तसेच विरूध्‍द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांचे लेखीउत्‍तर इत्‍यादीचे मंचातर्फे अवलोकन करण्‍यात आले. यावरून खालील मुद्दे ग्राहक मंचासमोर उपस्थित होतात. 

क्र..

मुद्दे

उत्‍तर

1

 तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे  काय?

होय.

2.

विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात  त्रृटी केली  ही बाब तक्रारकर्ता सिध्‍द करतात काय?

होय.

3

अंतीम आदेश

कारणमिमांसेप्रमाणे .

कारण मिमांसा

मुद्दा क्र. 1 व 2     

8. सदरच्‍या तक्रारीमध्‍ये तक्रारकर्त्‍याने पोस्‍ट ऑफिसमध्‍ये 5 वर्ष कालावधीकरीता रू. 2,000/-,प्रतिमहा प्रमाणे आवर्ती खाते उघडले आणि त्‍या आवर्ती खात्‍यामध्‍ये नियमितपणे एकही महिना न चुकता रक्‍कम  भरली. तक्रारकर्त्‍याने शेवटच्‍या महिन्‍याची रक्‍कम रू. 2,000/-, दि. 04/09/2017 रोजी भरली. त्‍यानूसार तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये रू. 1,20,000/-, जमा झाले आणि तक्रारकर्त्‍याचे 5 वर्ष कालावधीसाठी उघडलेली आवर्ती ठेवची मुदत संपली होती त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला पोस्‍टाने व्‍याजासह भरलेली रक्‍कम देणे बंधनकारक आहे. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारीमध्‍ये दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरून हे स्‍पष्‍ट होते की, ज्‍यावेळी तक्रारकर्ता दि. 10/10/2017 रोजी पोस्‍ट ऑफिसला जाऊन रक्‍कम रू. 2,000/-, भरली ती रक्‍कम पोस्टाने स्विकारली  यातच विरूध्‍द पक्षाने चुकी केली असे निदर्शनास येते. कारण आवर्ती ठेवची मुदत ठेव ही दि. 04/09/2017 ला तकारकर्त्‍याने शेवटचा 60 महिन्‍याची रक्‍कम भरली त्‍यावर पोस्टाचा शिक्‍का आहे.  यावरून हे स्‍पष्‍ट होते की, पोस्‍टाने तक्रारकर्त्‍याकडून रक्‍कम स्विकारली. तेव्‍हाच तक्रारकर्त्‍याला विरूध्‍द पक्षाने सांगायला पाहिजे होते की, तुमची आवर्ती ठेवीची मुदत संपली आणि ही तुमच्‍या शेवटच्‍या महिन्‍याची रक्‍कम  आहे. परंतू विरूध्‍द पक्ष क्र 3 ने मात्र तसे न करता तक्रारकर्ता ज्‍यावेळी दि. 10/10/2017 ला पैसे भरण्यास आला  त्‍यावेळी त्‍याच्‍याकडून रक्‍कम स्विकारली. तसेच विरूध्‍द पक्ष क्र 1 ने त्‍याच्‍या लेखी जबाबामध्‍ये म्हटले आहे की, भारत सरकारने ग्राहकासाठी 5 वर्षाची आवर्ती ठेव योजना चालु केली आणि त्‍या योजनेचे सर्व कामकाज ऑनलाईन चालते आणि परत म्‍हणतात की, तक्रारकर्त्‍याने Pre- matured रक्‍कम दि. 18/10/2017 ला काढली त्‍यामुळे त्‍याला व्‍याज कमी देण्‍यात आले. ही विरूध्‍द पक्ष क्र 1 चे म्‍हणणे चुकीचे आहे. कारण System मध्‍ये संपूर्णपणे नमूद असते  आणि तक्रारकर्त्‍याने 60 महिने पर्यंत दि. 04/09/2017 ला पूर्णपणे रक्‍कम भरली होती तर मग विनाकारण ग्राहकांना कमी व्याज देऊन त्‍यांना त्रास देणे हे कायदयाच्‍या दृष्‍टीने अयोग्‍य आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने लेखी तक्रार केली तसेच दोनदा स्‍मरणपत्र दिले तरी सुध्‍दा तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल न घेणे यात तक्रारकर्त्‍याला विरूध्‍द पक्ष क्र 3 ने सेवा देण्‍यात त्रृटी केली हे दिसुन येते. करीता विरूध्‍द पक्ष क्र 1, 2 व 3 ने वैयक्तिक व संयुक्तिकरीत्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या भरलेल्‍या रकमेवरती व्‍याज रक्‍कम रू.18,327/-, द.सा.द.शे 6 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू. 5,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 5,000/-,तक्रारकर्त्‍याला दयावे. करीता मुद्दा क्रं. 1 व 2 चा निःष्‍कर्ष आम्ही ‘होकारार्थी’  नोंदवित आहोत.          

9.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                             ::आदेश::

(01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरूध्‍द पक्ष क्र 1, 2 व 3 ने वैयक्तिक व संयुक्तिकरीत्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या भरलेल्‍या रकमेवरती व्‍याज रक्‍कम रू.18,327/-, द.सा.द.शे 6 टक्‍के व्‍याजासह तक्रार दाखल दि. 31/10/2018 पासून  अदा करेपर्यंत तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू. 5,000/-, (अक्षरी रूपये पाच हजार) व तक्रारीचा खर्च रू. 5,000/-,(अक्षरी रूपये पाच हजार) तक्रारकर्त्‍याला दयावे.

(03) विरूध्‍द पक्ष क्र 1,2 व 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्‍या  निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 यांनी 30 दिवसांत पालन न केल्‍यास, द.सा.द.शे 9 टक्‍के व्‍याज देय राहिल.

(05) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध      करुन देण्‍यात याव्‍यात.

(06)  तक्रारकर्त्‍याला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SARITA B. RAIPURE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.