Maharashtra

Nagpur

CC/516/2018

SAU. KANTA SHYAM UMBARKAR - Complainant(s)

Versus

THE RISING HEAVEN REALITIES - Opp.Party(s)

ADV. Padeep Sabale

17 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/516/2018
( Date of Filing : 02 Aug 2018 )
 
1. SAU. KANTA SHYAM UMBARKAR
R/O. 19, LODHI LAYOUT, GAJANAN NAGAR, MANEWADA RING ROAD, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. THE RISING HEAVEN REALITIES
OFF. AT, THE RISING HEAVEN REALITIES, 225, BEHIND DINANATH HIGHSCHOOL, DHANTOLI, NAGPUR-12/ AT BRANCH, 338, KUKDE LAYOUT, RAMESHWARI ROAD, NAGPUR-440027
NAGPUR
Maharashtra
2. THE RISING HEAVEN REALITIES, THROUGH PROMOTER SAU. KAVITA AGRAWAL
PLOT NO. 13, RAJLAXMI VIHAR, BELTARODI ROAD, IN FRONT SUNRAISE SCHOOL, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
3. SHRI. DINESH WANI, DIRECTOR OF THE RISING HEAVEN REALITIES
PLOT NO. 13, RAJLAXMI VIHAR, BELTARODI ROAD, IN FRONT SUNRAISE SCHOOL, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
4. SHRI. ASHISH DINESH WANI, PROPERTY CONSULTANT OF THE RISING HEAVEN REALITIES
PLOT NO. 13, RAJLAXMI VIHAR, BELTARODI ROAD, IN FRONT SUNRAISE SCHOOL, NAGPUR-440034
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 17 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ या कंपनीचे प्रर्वतक आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ या कंपनीचे संचालक आहे व विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ हे मालमत्‍ता सल्‍लागार आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ संस्‍थेअंतर्गत मौजा किन्‍नाळा, पटवारी हलका नंबर ६७, खसरा नंबर १२, तहसिल हिंगना, जिल्‍हा नागपूर मध्‍ये टाकलेल्‍या लेआऊट मध्‍ये प्‍लॉट क्रमांक ५ व ६, एकूण क्षेञफळ ३८७५.०४ चौ. फुट रुपये ११० प्रति चौ. फुट प्रमाणे एकूण रक्‍कम रुपये ४,२६,२५४/- इतक्‍या रकमेत खरेदी करण्‍याचा करार विरुध्‍द पक्ष यांचेशी रुपये १००/- चे स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक १७/०२/२०१२ रोजी केला. तसेच त्‍याच लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ३७ व ३८, एकूण क्षेञफळ २५८३.३६ चौ. फुट रुपये १०० प्रति चौरस फुटाप्रमाणे एकूण रुपये २,५८,३३६/- एवढ्या किंमतीत खरेदी करण्‍याचा करार रुपये १०० चे स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक १७/०२/२०१२ रोजी केला.
  3. तक्रारकर्तीने प्‍लॉट नंबर ५,६,३७ व ३८ च्‍या खरेदीपोटी विरुध्‍दपक्षाला धनादेश क्रमांक ९५९०८४, युको बॅंक, दिनांक ५/१२/२०११ अन्‍वये रुपये १,०५,३७७/- इतकी रक्‍कम अदा केली. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षाला प्‍लॉट नंबर ५,६,३७ व ३८ ची खरेदीपोटी दिनांक १४/०३/२०१२ ते दिनांक १६/०४/२०१३ या कालावधीत एकूण रुपये २,०५,०००/- अदा केले असे एकूण प्‍लॉट खरेदीपोटी रुपये ३,२५,३७७/- विरुध्‍द पक्षाला अदा केले व विरुध्‍द  पक्षाने त्‍याबाबतची पावती तक्रारकर्तीला दिले. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट चे विक्रीपञ करुन देण्‍याबाबत विनंती केली परंतू विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीची दिशाभुल करुन टाळाटाळ करीत होता. त्‍यामुळे तक्रारकर्तीला संशय आल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदर जमिनीचा संगणीकृत सातबारा दिनांक १८/०७/२०१७ रोजी काढला असता संदर्भीय लेआऊट टाकलेली जमिन ही आदिवासी इसमाची असल्‍यामुळे ती अहस्‍तांतरणीय मिळकत असुन ती द़ुस-याचे नावे असल्‍याचे निर्दशनास आले. तक्रारकर्तीला फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर तिने मा. पोलिस आयुक्‍त, गुन्‍हे शाखा, संबंधीत पोलिस स्‍टेशनला लेखी तक्रार दिली परंतू त्‍याचा उपयोग झाला नाही करीता तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडुन प्‍लॉट नंबर ५,६,३७ व ३८ चे विक्रीपोटी स्विकारलेली एकूण रक्‍कम रुपये ३,२५,३७७/-, २४ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला परत करावे.
  2. तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ मंचात हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ३१/०७/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना स्‍थानिक वर्तमानपञातुन जाहीर नोटीस काढण्‍यात आली. परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ मंचात हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक १०/१२/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज, लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे नोंदविले आहे.

अ.क्र.                       मुद्दे                                                                      उत्‍तर

  1. तक्रारकर्ती  हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?          होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांनी मौजा किनाळा, पटवारी हलका नंबर ६७, खसरा नंबर १२, तहसिल हिंगना, जिल्‍हा नागपूर मध्‍ये  टाकलेल्‍या  लेआऊट मध्‍ये प्‍लॉट क्रमांक ५ व ६, एकूण क्षेञफळ ३८७५.०४ चौ. फुट रुपये ११० प्रति चौ. फुट प्रमाणे एकूण रक्‍कम रुपये ४,२६,२५४/- इतक्‍या रकमेत खरदी करण्‍याचा करार विरुध्‍द पक्ष यांचेशी रुपये १००/- चे स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक १७/०२/२०१२ रोजी केला. तसेच त्‍याच लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ३७ व ३८, एकूण क्षेञफळ २५८३.३६ चौ. फुट रुपये १०० प्रति चौरस फुटाप्रमाणे एकूण रुपये २,५८,३३६/- एवढ्या किंमतीत खरेदी करण्‍याचा करार रुपये १०० चे स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक १७/०२/२०१२ रोजी केला.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडुन प्‍लॉट नंबर ५,६,३७ व ३८ च्‍या विक्रीपोटी एकूण रक्‍कम रुपये ३,२५,३७७/- एवढी रक्‍कम स्विकारली. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर निर्दशनास येते की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ (१७) वर दाखल संगणकीय सातबारा चे अवलोकन केल्‍यावर असे निर्दशनास येते की, विरुध्‍द पक्षाने आदिवासी व्‍यक्‍तीचे नावावर असलेल्‍या  शेतजमिनीवर लेआऊट टाकूण त्‍यामधील प्‍लॉट नंबर ५,६,३७ व ३८ तक्रारकर्तीला विकुन तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला प्‍लॉट नंबर ५,६,३७ व ३८ ची विक्री करुन तक्रारकर्ती प्रती अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे. करीता खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना निर्देश देण्‍यात येते की,  त्‍यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीकडुन प्‍लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये ३,२५,३७७/- तक्रारकर्तीला अदा करावी व त्‍यावर द.सा.द.से. १८ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.