Maharashtra

Nagpur

CC/252/2015

Jaswantsingh S/o Singarasingh Shekhu - Complainant(s)

Versus

The Reliance General Insurance Pvt. Ltd., through Branch Manager - Opp.Party(s)

M.L. Chandrikapure

31 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/252/2015
( Date of Filing : 27 May 2015 )
 
1. Jaswantsingh S/o Singarasingh Shekhu
Plot No. 149,Chandranagar, Juni Pardi, Nagpur (At Presently in custody in Central Jail at Nagpur, Through Its wife Sau. Charanjit Kaur W/o Jaswantsingh Shekhu
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. The Reliance General Insurance Pvt. Ltd., through Branch Manager
Shop No. 13,14,15 Ayodhya Building, 1st floor, 119, Near Bajaj Nagar, Chowk, Behind Akruti Furniture, Bajaj Nagar, Nagpur 10
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:M.L. Chandrikapure, Advocate
For the Opp. Party:
Dated : 31 Jan 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, त्‍याने ट्रक क्रं. एम.एच.31/सी.क्‍यु.9610 हे वाहन स्‍वतःच्‍या उपजिवीकेकरिता विकत घेतले होते व विरुध्‍द पक्षाकडे विमा पॉलिसी क्रं. 1705542723334000262 अन्‍वये रुपये 15,00,000/- चा विमा दि. 14.02.2014 ते दि. 13.02.2015 या कालावधीकरिता काढला होता.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याचा मुलगा चिरमल सिंग दि. 15.03.2014 ला रात्री 10.00 वाजता कोरबावरुन एम.आय.डी.सी. नागपूर येथे 7 अॅल्‍युमिनियम वायर बन्‍डल या मालाची वाहतूक सदरच्‍या ट्रकने करीत होता. चिरमल याला भूक लागल्‍याने त्‍याने सदरचे वाहन जवाहरनगर जि.भंडारा पेट्रोल पंप जवळील धाब्‍या जवळ राष्‍ट्रीय महामार्ग क्रं. 7 वर ट्रक लॉक करुन सुरक्षित जागी वाहन पार्क केले व ट्रकची चाबी सोबत घेऊन धाब्‍यावर जेवायला गेला.   जेवण झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने ज्‍या ठिकाणी वाहन पार्क केले होते त्‍या ठिकाणी गेला असता त्‍याला सदरचे वाहन आढळून नाही.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाने ट्रक चोरीला गेल्‍याची तक्रार नोंदविली आणि त्‍याने केलेल्‍या तक्रारीवरुन  एम.सी.ए.नं. 270/2014 मध्‍ये जे.एम.एफ.सी. भंडारा यांचे आदेश दि. 04.10.2014 अन्‍वये आय.पी.सी. च्‍या कलम 379 आणि फौजदारी क्रं. 91/14 अन्‍वये गुन्‍हा नोंदविला असून अद्याप पर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या ट्रकचा शोध लागला नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाने त्‍याच्‍या वडिलांच्‍या वतीने दि. 17.03.2014 ला विरुध्‍द पक्ष यांना ट्रक चोरीबाबत माहिती दिली व ट्रकच्‍या चोरीमुळे झालेल्‍या नुकसानीची माहिती दिली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ. चरंजीत कौर जसवंतसिंग शेखु (तक्रारकर्त्‍याची आममुख्‍यत्‍यार पत्रधारक) व तिचा मुलगा चिर्मलसिंग जसवंतसिंग शेखु याने विरुध्‍द पक्षाचे कार्यालय दुकान क्रं. 13, 14, 15 अयोध्‍या बिल्‍डींग पहिला माळा 119 बजाजनगर चौक,  बजाजनगर, नागपूर येथे भेट दिली आणि विरुध्‍द पक्षाकडे चोरीला गेलेल्‍या मालासह ट्रकच्‍या विम्‍याची मागणी केली.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दि. 20.01.2015 ला विरुध्‍द पक्षाच्‍या व्‍यवस्‍थापकाने सांगितले की, तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मागणी प्रस्‍ताव दि. 17.03.2014 ला प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 26.09.2014 ला यापूर्वीच पत्र पाठविले आहे. परंतु त्‍यांना दि. 26.09.2014 चे पत्र प्राप्‍त झाले नसल्‍याचे सांगितल्‍याने संबंधीत ब्रान्‍च मॅनेजरने तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीला दि. 26.09.2014 च्‍या पत्राची प्रत दिली व मोटार वाहन विमा पॉलिसीच्‍या कलम 5 अन्‍वये तक्रारकर्त्‍याचा विमा दावा फेटाळल्‍याचे दि. 26.09.2014 चे पत्र तक्रारकर्त्‍याला दि. 22.01.2015 ला प्राप्‍त झाले. विरुध्‍द पक्षाने विमा नाकारलेल्‍या पत्रामध्‍ये चुकिने नमूद केले की, विरुध्‍द पक्षांच्‍या अधिका-याने विमा प्रस्‍तावा सोबत दाखल केलेल्‍या चौकशीची कागदपत्रे बघितली व ट्रकची इग्‍नीशन चाबी ट्रक मध्‍ये राहिली आणि वाहनाची काळजी न घेता निष्‍काळजीपणे वाहन वाहून नेण्‍याच्‍या स्थितीत ठेवले असल्‍याचे निदर्शनास आले.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पु्ढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाने दि. 17.03.2014 ला विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयाला ट्रक चोरीबाबतची माहिती दिल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाच्‍या शाखा कार्यालयातून एक व्‍यक्‍ती घरी आला आणि तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाकडे वाहन चोरी झाल्‍याबाबतची चौकशी केली व लवकरच विमा दावा मंजूर होऊन  विमा रक्‍कम देण्‍यात येईल असे सांगितले व घाईने चिर्मलसिंगला कोणतेही दस्‍तऐवज वाचू न देता त्‍याच्‍या काही दस्‍तऐवजावर स्‍वाक्ष-या घेतल्‍या. विरुध्‍द पक्षाने सुरुवातीपासून धोकाधडीने व अप्रामाणिकपणे चौकशी दस्‍तऐवज बनविले व तक्रारकर्त्‍याने मोटार विमा पॉलिसीच्‍या कलम 5 चा भंग केल्‍यामुळे विमा दावा नाकारला असल्‍याचे सांगितले. यावर तक्रारकर्त्‍याने चिर्मलसिंग यांचे प्रतिज्ञापत्र तक्रारी सोबत दाखल केले आणि त्‍यामध्‍ये मोटार विमा पॉलिसीच्‍या कलम 5 चा भंग केला नसल्‍याचे नमूद केले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या नुकसानीची मागणी नाकारल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रुपये 15,00,000/- मंजूर करावा व त्‍यावर ट्रक चोरीला गेलेल्‍या तारखेपासून 18 टक्‍के दराने व्‍याज मिळावे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष यांनी आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचा विमा दावा उशिराने विरुध्‍द पक्षाकडे  कोणतेही दस्‍तऐवज दाखल न करता सादर केले व विमा पॉलिसीच्‍या अट क्रं. 1 चा भंग केला. तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रस्‍ताव उशिराने प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडे आवश्‍यक दस्‍तऐवजाची विमा दावा निकाली काढण्‍याकरिता मागणी केली. परंतु तक्रारकर्त्‍याने विमा दावा निकाली काढण्‍यास सहकार्य केले नाही. विमा दावा प्रस्‍तावाची छाननी केल्‍यानंतर असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वाहनाची चाबी वाहनातच ठेवून पार्क केले होते. सदर वाहनाच्‍या सुरक्षितेबाबत काळजी न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीतील अट क्रं. 5 चा भंग केला आहे व याकारणाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍या योग्‍य आहे. म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.

  

  1.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ           होय

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

            निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने ट्रक क्रं. एम.एच.31/सी.क्‍यु.9610 हे वाहन स्‍वतःच्‍या उपजिवीकेकरिता विकत घेतले होते व विरुध्‍द पक्षाकडे विमा पॉलिसी क्रं. 1705542723334000262 अन्‍वये रुपये 15,00,000/- चा विमा दि. 14.02.2014 ते दि. 13.02.2015 या कालावधीकरिता काढला होता, याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2(7) वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याचा विमा दावा विरुध्‍द पक्षाने विमा पॉलिसीच्‍या अट क्रं. 5 चे उल्‍लंघन केलयाच्‍या कारणाने नाकारला आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या दि. 26.09.2014 च्‍या पत्रानुसार तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या ट्रकची इग्‍नीशन चाबी वाहनात सोडून वाहन चालविण्‍याच्‍या स्थितीत ठेवून कोणतीही काळजी न घेता ठेवले होते. परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍याबाबतचा कोणताही पुरावा मंचाच्‍या अभिलेखावर दाखल केला नाही किंवा तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या जवळ असलेली ट्रकची इग्‍नीशन चाबी विरुध्‍द पक्षाकडे जमा करण्‍याबाबत कोणतेही पत्र दिले नाही किंवा त्‍याबाबतचे दस्‍तऐवज मंचात दाखल केलेले नाही. तक्रारकर्त्‍याने तक्रार व त्‍यातील नमूद मजकूर व तक्रारी सोबत दाखल दस्‍तऐवज खरी असल्‍याबाबतचे प्रतिज्ञापत्र मंचाच्‍या अभिलेखावर दाखल केले आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रस्‍ताव दि. 17.03.2014 ला विरुध्‍द पक्षाकडे सादर केल्‍याचे दि. 26.09.2014 चे विरुध्‍द पक्षाचे पत्रावरुन दिसून येते व तक्रारकर्त्‍याने प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी, भंडारा यांच्‍या आदेशावरुन सदर गुन्‍हयाचा शोध घेण्‍यात आला हे दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन ही स्‍पष्‍ट होते. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

                 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 15,00,000/- व 

त्‍यावर दि. 17.03.2014 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.