ग्राहक तक्रार क्रमांकः-288/2006 तक्रार दाखल दिनांकः-17/06/2006 निकाल तारीखः-15/09/2008 कालावधीः-01वर्ष02महिने28 दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.राम नवल चौरासिया शॉप नं.ए/24,युनायटेड पॅलेस, राहुल पार्क,भाईंदर (पू) ठाणे.401 105 ...तक्रारकर्ता विरुध्द 1.दि रिलायन्स एनर्जी तर्फे मॅनेजींग डायरेक्टर श्री.अनिल डी.अंबानी पवन पुत्र बिल्डींग फाटक मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पू), ठाणे. ...वि.प.1(एकतर्फा) 2.दि कमीशनर, मिरा भाईंदर महानगरपालीका, भाईंदर (प), ठाणे ... वि.प.2 3.दि कलेक्टर रुरल, ठाणे (प) ... वि.प.3(एकतर्फा) 4.श्री.संजय जैन, सिव्हील कॉन्ट्रॅक्टर तर्फे दि इंजिनिअर, बढकम समिती डिपार्टमेंट, एम.बी.एम.सी. भाईंदर (प) ठाणे. 401 105 ...वि.प. 4(एकतर्फा) 2/- गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.आर.बी.चौधरी विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्रीमती ए.आर.आपटे निकालपत्र (पारित दिनांक-15/09/2008) मा.श्री.पी.एन.शिरसाट , मा.सदस्य यांचेद्वारे आदेशः- तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सदर तक्रार दिनांक 17/06/2008 रोजी दाखल केली आहे त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः-
1.तक्रारदाराने हि तक्रार 1 व 4 या विरुध्द पक्षकाराविरुध्द दाखल केली आहे व त्यामध्ये 2,50,000/- ची मागणी केली आहे. तसेच विरुध्दपक्षकार नं.3 यांनी गैर प्रशासनीक कार्य केल्यामुळे तक्रारदाराला 1,50,000/- नुकसान भरपाई द्यावी. तसेच दुकानातील सामानाचे व फर्निचरचे झालेले नुकसान रु.2,35,000/- भरपाई देण्यासाठी तसेच तक्रारदाराला व त्यांचे नातेवाईकांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.6,35,000/- द्यावेत. तसेच तक्रारदाराला दररोजचा रु.1,000/-, धंदयामध्ये नुकसान झाले ती भरपाई मिळण्यासाठी सदरची तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे.
2.सदरच्या तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षकार नं.1 व 3 यांना मिळाली तरी ते हजर झाले नाहीत व त्यांनी त्यांचा 3/- लेखी जबाबही सादर केले नाहीत. विरुध्द पक्षकार नं.2 हे हजर झाले व त्यांनी नि.5 वर वकीलपत्र सादर केले व लेखी जबाब दाखल करण्यात आला नाही. विरुध्दपक्षकार नं.1 व 3 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. दिनांक 22/06/2007 रोजी उशिराने विरुध्द पक्षकार नं.2 ने नि.7 वर लेखी जबाब सादर केला. तसेच लेखी युक्तीवाद नि.8 वर सादर केला. परंतू विरुध्द पक्षकार नं.4 यांना नोटीस लागु न झाल्याने तक्रारदाराला ''दैनिक सामना'' पेपरमध्ये विरुध्द पक्षकार नं.4 चे विरोधात नोटीस प्रकाशीत करण्यास परवानगी दिली. तरीही ते मंचासमोर दाखल झाले नाहीत. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. विरुध्द पक्षकार नं.2 ने आपले लेखी जबाबामध्ये तक्रारकर्त्याचे सर्व म्हणणे अव्हेरले व त्यांनी तक्रारदाराच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी किंवा न्युनता तसेच बेजबाबदारपणा दाखविला नाही असे कथन केले.
3.वरील तक्रारीसंबंधी एकमेव मुद्दा मंचाचे निर्णयासाठी उपस्थित होतोः-
विरुध्दपक्षकार नं.1 ते 4 यांनी सेवेमध्ये न्युनता/ त्रुटी किंवा बेजबाबदारपणा दाखविला आहे काय.?
वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नकारार्थी देत असून त्याप्रित्यर्थ खालील कारण मिमांसा देत आहे.
4/- कारणमिमांसा तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये कोठेही विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रुटी/न्युनता किंवा बेजबाबदारपणा दाखविला असे स्पष्ट नमुद केले नाही. विरुध्द पक्षकार नं.2 ने आपल्या लेखी युक्तीवादामध्ये जे नि.8 वर दिले आहे त्यामध्ये मेसर्स एस.एम.कन्स्ट्रक्शन्स् या कंपनीला जबाबदार व आवश्यक विरुध्द पक्षकार बनवणे जरुरी होते ते त्यांनी केले नाही. तसेच तक्रारदाराने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. पोलीसांनी दिनांक 23/03/2006 रोजी पंचनामा केला त्यातील वर्णन खालीलप्रमाणेः-
''पंच श्री.रंगी गौड वय वर्ष 60 वर्ष व पंच श्री मोहमद आजम वय वर्ष 38 पंचनामा लिहून देतो की, खबर देणार राम नवल शामलाल चौरसिया हे समक्ष कळवितात की, भाईंदर पूर्व, राहूल पार्क, युनायटेड पॅलेस येथे त्यांच्या मालकीचे पानबिडी शॉप तसेच एस.टी.डी/पीसीओ कम्युनिकेशनचे दुकान असून सदर दुकानात इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली व आगीत त्याचे फर्निचर, एसटीडी मशिन, टेलिफोन वायर व पानाचे सामानाचे रु.1,35,000/- नुकसान झाले. खबर देणार यांचे शटर जवळ जॉइन्ट असल्यामुळे तेथे स्पार्किंग होऊन आग लागली असे वाटते.- सही पो.हेड कॉन्स्टेबल. मिरा रोड पोलीस स्टेश्ान.'' तक्रारदाराचे नुकसान कोणाचे सेवेतील त्रुटीमुळे / न्युनतेमुळे किंवा बेजबाबदारपणामुळे झाले ते स्पष्ट केले नाही. त्यामुळे पक्षकारांना विनाकारणच यामध्ये गोवणे विधियुक्त कायदेशीर व न्यायोचित होणार नाही. 5/- 4.श्री श्रीकांत पांडुरंग मयेकर, महापालिका शिक्षण मंडळ,मिरा भाईंदर महानगपालीका यांनी आयुक्त, मिरा भाईंदर महानगपालीका यांना किंवा तारखेचे लिहिलेले नुकसान भरपाई देण्याबाबत विनंतीपत्र ''ठेकेदार जैन यांना जबाबदार धरुन नुकसान भरपाई द्यायला प्रवृत्त करावे'' असा उल्लेख आहे. तक्रारदाराचे कांहीही म्हणणे नाही. तक्रारदाराने बिगर तारखेचे मा.आयुक्त,मिरा भाईंदर महानगरपालीका यांना नुकसान भरपाई मिळण्यास विनंती अर्ज केला. पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र सादर केले नाही ती सेवेतील त्रुटी आहे हे ग्राहय धरता येणार नाही.तक्रारदाराने फायर ब्रिगेड, मिरा भाईंदरला दिनांक 28/03/2006 रोजी पत्र लिहून त्यांच्या दुकानाला 23/03/2006 रोजी आग लागली असे प्रमाणपत्राची मागणी केली. परंतु ते सर्टीफिकेट पुरावा म्हणुन जोडले नाही. तसेच फोटोग्राफ जोडले परंतू त्याचे प्रतिज्ञापत्र जोडले नाही. या ठिकाणी तक्रारदार हे ''ग्राहक'' या संज्ञेत मोडतात काय? हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार ''ग्राहक'' म्हणजे व्याख्या व स्पष्टीकरण.
डी) ''ग्राहक'' म्हणजे अशी व्यक्ती जीः- 1) ''अंशतः अगर पूर्णतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार करुन वस्तू विकत घेते, किंवा अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे भावी काळात मोबदला देण्याचा करार करुन वस्तूचा ताबा घेते किंवा मोबदला दिलेल्या व्यक्तीच्या संमतीने वापर करते. परंतु यात वस्तूची फेरविक्री करणारी किंवा व्यापारी कारणाकरिता वस्तूचा वापर करणा-या 6/- व्यक्तींचा समावेश होणार नाही.''
2) ''भाडे करार तत्वावर अंशतः अगर पूर्णतः मोबदला देऊन अथवा देण्याचा करार करुन किंवा प्रचलित प्रथेनुसार भावी काळात मोबदला देण्याचा करार करुन कोणतीही सेवा उपलब्ध करुन घेतल्यास. यामध्ये ज्याच्यासाठी सेवा घेतली आहे अशा व्यक्तीने प्रत्यक्ष मोबदला दिलेला नसला तरी त्याचाही यात समावेश होतो. परंतु त्यासाठी त्याला अंशतः अगर पूर्णतः मोबदला दिलेल्या अथवा भावी काळात मोबदला देण्याचा करार केलेल्या किंवा त्याबाबत आश्वासन दिलेल्या व्यक्तींची संमती असणे आवश्यक आहे.'' या सर्व गोष्टींचा विचार करुन हे मंच असा निष्कर्ष काढत आहे की, तक्रारदार हे''ग्राहक''या संज्ञेत मोडत नसल्यामुळे या एकाच कारणास्तव ही तक्रार खारीज करणे क्रमप्राप्त आहे. या सर्व गोष्टीचा विचार करुन तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आणि सत्य आढळून न आल्यामुळे खालील आदेश पारीत करण्यात आला.
आदेश
1.तक्रारदार यांचा तक्रार अर्ज रद्दबातल ठरविण्यात आला असून खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
2.सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 7/- 3.तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.
दिनांकः-15/09/2008 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील ) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|