- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 24 एप्रिल 2015)
1. अर्जदार गैरहजर. अर्जदार तर्फे वकील हजर. अर्जदार तर्फे वकिलांचा प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदाराचे तक्रारीतील थोडक्यात हकीकत अशी आहे की, दि.27.12.2011 ला ब्रम्हपुरी पासून आरमोरी येथे जाताना त्याच्या वाहनाला जाताना अपघात झाला. सदर वाहनाचा विमा नुकसानीचा क्लेम म्हणून जानेवारी 2012 ला अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रितसर अर्ज केले व त्यानंतर मे 2012 मध्ये गैरअर्जदाराचे सांगण्यावरुन अर्जदाराने सदर क्लेमबाबत दस्ताऐवजावर स्वाक्षरी केली. अर्जदार गैरअर्जदारकाडे सदर विमा क्लेम संबंधीत मागणी केली असून गैरअर्जदार त्या विमा क्लेमवर काहीही प्रतिसाद दिला नसल्याने अर्जदार दि.16.2.2015 रोजी त्याचे वकीलामार्फत सदर विमा क्लेमचे मागणी करीता नोटीस पाठविली. सदर नोटीसावर गैरअर्जदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून सदर तक्रार गैरअर्जदाराविरुध्द या मंचात दाखल करण्यात आली आहे.
2. अर्जदाराची तक्रार व अर्जदार तर्फे अधिवक्ता यांचा युक्तीवाद ऐकूण
खालील मुद्दे विचारात घेण्यात आले आहे.
मुद्दे : निष्कर्ष
1) सदर तक्रार कलम 24-अ ग्राहक संरक्षण कायद्याचे : नाही
कलम अन्वये 2 वर्षाचे आंत दाखल करण्यात आलेली
आहे काय ?
2) आदेश काय ? : नि.क्र.1 वर अंतिम आदेश
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
3. अर्जदाराचे तक्रारीत परिच्छेद क्र.4 मध्ये असे नमूद आहे की, अर्जदाराचे वादातील वाहनाचे क्लेमबाबत पूर्ण माहिती व जानेवारी 2012 मागीतली होती. त्यानंतर गैरअर्जदाराचे सांगण्यावरुन दस्ताऐवजावर सही करुन त्याचीही पुर्तता मे 2012 मध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतर गैरअर्जदारानी सदर विमा क्लेमबाबत वारंवार विचारणा करुन सुध्दा त्याची भरपाई किंवा विमाक्लेम स्विकृत केला नाही. यावरुन, असा निष्कर्ष निघते की, सदर तक्रार दाखल करण्याचे पहिले कारण मे 2012 मध्ये घडले होते. सदर तक्रार मंचा समक्ष दि.18.4.2015 ला दाखल करण्यात आली. कलम 24-अ ग्राहक संरक्षण कायदा प्रमाणे ग्राहक तक्रार दाखल करण्याचे पहिले कारण घडल्यानंतर, ग्राहक तक्रार 2 वर्षाचे आंत दाखल करणे आवश्यक आहे. परंतु, सदर तक्रार प्रथम कारण घडल्यापासून 2 वर्षाचे आंत दाखल करण्यात आली नसून, तसेच सदर तक्रारसोबत कोणताही विलंबमाफीचा अर्ज दाखल केले नसून सदर तक्रार वरील नमूद असलेल्या कलमानुसार मुदतीच्या बाहेर आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोदंविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
4. मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन नि.क्र.1 वर अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- निशाणी क्र.1 वर अंतिम आदेश -
1) अर्जदाराची तक्रार मुदतीचे बाहेर असल्याने व कोणताही विलंब माफीचा अर्ज सदर तक्रार सोबत दाखल केला नसल्याने सदर तक्रार अस्विकृत करण्यात येते.
2) अर्जदाराने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावे.
3) अर्जदाराला आदेशाची प्रत विमामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-24/4/2015