Shivkumar Shivanand Nagapure, filed a consumer case on 05 Feb 2015 against The Proprietor, in the Latur Consumer Court. The case no is CC/11/3 and the judgment uploaded on 21 Apr 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 03/2011 दाखल तारीख :18/01/2011
निकाल तारीख :05/02/2015
कालावधी : 04वर्षे 0म. 17 दिवस
शिवकुमार शिवानंद नागापुरे,
वय 31 वर्षे, धदा खाजगी नौकरी,
रा. लातूर ता. जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) प्रोप्रायटर, नंदी मोबाईल बाजार,
द्वारा कलकोटे कॉम्प्लेक्स, पाण्याच्या टाकी जवळ,
बार्शी रोड, लातूर, ता. जि. लातूर.
2) प्रोप्रायटर, नंदी मोबाईल सर्व्हीस स्टेशन,
नंदी मोबाईल नंदी स्टॉप, देशपांडे कॉम्प्लेक्स,
औसा रोड, लातूर , ता;. जि. लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एस.एन.कानवटे.
गै.अ.क्र.1 व 2 : एकतर्फा.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा लातूर येथील राहणारा असून, व्यवसायाने ड्रायव्हर म्हणुन खाजगी गाडीवर लातूर येथे काम करतो. गैरअर्जदार क्र. 1 हे मोबाईल विकणारे नंदी मोबाईलच नावाचे दुकान आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे नंदी मोबाईलचे सर्व्हीस स्टेशन आहे. लातूर शहरात त्याचे दोन ठिकाणी दुकान आहे. अर्जदाराने मोबाईल हॅन्डसेट स्पाईस कंपनीचे मॉडेल क्र. 5161 आएमईआय नंबर 910070200370312 आणि 91007020030320 हा मोबाईल रु. 2600/- ला दि. 06.07.2010 रोजी बॅटरी व चार्जर सहीत विकत घेतला. त्याची पावती क्र. 116 आहे. मोबाईल विकत घेतल्या नंतर कार्ड अर्जदाराने मोबाईल मध्ये कार्ड टाकले. त्याचा नंबर 9890521346 असा असून हा मोबाईल हॅण्डसेट एक महिना वापरला व त्यानंतर तो हॅन्डसेट अचानक खराब झाला, व त्यातुन काही दिसेना गेले व सदरचा मोबाईल गैरअर्जदाराने डिफेक्टीव्ह पीस अर्जदाराला विकले, त्यामुळे अर्जदाराचे नुकसान झाले. म्हणुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे चांगल्या क्वॉलिटीचा नवीन मोबाईल मला दयावा, अथवा मला रु. 2600/- रुपये वापस करावे, त्यावर गैरअर्जदार क्र.1 ने त्याचे म्हणणे नाकारले व त्याला गैरअर्जदार क्र. 2 कडे मोबाईल रिपेअर करण्यास सांगीतले. गैरअर्जदार क्र. 2 कडे अर्जदाराने सदरचा मोबाईल रिपेअर करण्यासाठी दिला. गैरअर्जदार क्र. 2 ने सदरचा मोबाईल चांगला दुरुस्त करुन 4 ते 5 दिवसात देतो आणि त्यासाठी रु. 650/- दुरुस्ती चार्जेस मागीतले. 8 दिवस अर्जदाराने वाट पाहुन गैरअर्जदार क्र. 2 कडे सदरचा मोबाईल देण्यास विनंती केली. परंतु त्यामध्ये दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नविन मोबाईल देण्याची विनंती केली. परंतु त्यांनी ते दिले नाही. म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली असून रु. 2600/- चे नुकसान झाले आहे. म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी नुकसान भरपाई म्हणुन रु. 2600/- किंवा मोबाईल नवीन हॅण्डसेट दयावा, व मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 5000/- व दाव्याचा खर्च रु. 1000/- , 18 टक्के व्याजासह देण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदारांना नोटीस दि. 29.04.2011 रोजी प्राप्त झाली, तरी देखील गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी हजर झाले नाही, म्हणुन त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश दि.19.07.2011 रोजी करण्यात आले.
अर्जदाराचे दिलेले कागदपत्र पाहता, गैरअर्जदार क्र. 1 यांनी रु. 2600/- ला मॉडेल क्र. 5161 स्पाईस नावाचा मोबाइल शिवशंकर नागापुरे यास दि. 06.07.2010 रोजी विकलेला दिसून येतो. तसेच गैरअर्जदार क्र. 2 ने पावती क्र. 853 वर दि. 23.08.2010 ला डिस्पले साठी मोबाईल ठेवुन घेतला, व सदरच्या पावतीवर कोणताही दोष मोबाईलमध्ये आढळल्यास 8 दिवसाची वॉरंटी पिरियड देण्यात आला, व सदरचा मोबाईल तुम्ही 15 दिवसात घेवुन जावु शकता, असे म्हटले आहे.तसेच अर्जदाराने कागदोपत्री पुराव्यावरुन केस सिध्द केलेली आहे. सदर केसमध्ये गैरअर्जदार क्र 1 व 2 यांना नोटीस प्राप्त होवुन ही ते हजर झाले नाहीत. म्हणुन त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. व अर्जदाराने स्पाईस कंपनीला पार्टी केलेले दिसून येत नाही. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने गैरअर्जदाराने कोणताही उजर घेतलेला नसल्यामुळे, सदरची तक्रार त्यांना मान्य असल्याचे दिसून येते. तसेच सदरची केस ही 2011सालची आहे, व गैरअर्जदारास सदर केसची नोटीस प्राप्त असून ही तो हजर राहिला नाही, म्हणुन हे न्यायमंच तक्रार अर्ज गुणवत्तेवर निकाली काढीत आहे. तसेच अर्जदाराने स्पाईस कंपनीला पार्टी न केल्यामुळे मोबाईल हॅन्डसेट तसाच्या तसा परत मागता येणार नाही. अर्जदाराने आपल्या केसमध्ये स्पाईस कंपनीला पार्टी करणे गरजेचे होते, म्हणुन केवळ मोबाईल हॅण्डसेटची रक्कम जी गैरअर्जदार क्र. 1 ने स्विकारली ती अर्जदारास देण्यात येईल. म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 यांनी रु. 2600/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत, तसेच मोबाईल दुरुस्ती चार्जेस रु. 650/- दयावेत आणि शारिरीक व मानसिक त्रासापोटी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी प्रत्येकी रु. 500/- दयावेत.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.