Maharashtra

Nagpur

CC/11/393

Smt. Anuradha Ritesh Ranglani - Complainant(s)

Versus

The Proprietor, Prince Art Dyers and Dry Cleaners - Opp.Party(s)

Adv. M.M.Nawathe

16 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/393
 
1. Smt. Anuradha Ritesh Ranglani
Housing Board Colony, in front of Garden, M.I.G. 92,
Balaghat
MP
...........Complainant(s)
Versus
1. The Proprietor, Prince Art Dyers and Dry Cleaners
205-A, West High Court Road, Dharampeth
Nagpur
Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. M.M.Nawathe, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 16/04/2012)
 
1.           तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तिचा लाछा खराब झाल्‍याने तिने वि.प.कडे ड्रायक्‍लीनसाठी दि.20.07.2010 ला दिला व त्‍यादाखल रु.360/- देण्‍यात आले होते. वि.प.कडून लाछा बंद पाकिटात घेतल्‍यानंतर, दि.19.09.2010 रोजी सदर पाकिट उघडले असता, लाछा हा फाटलेला होता. तक्रारकर्ती बाहेरगावी राहत असल्‍याने तिने वि.प.ला मोबाईलवर याबाबत सांगितले असता वि.प.ने तिला तिचा लाछा आधीच फाटलेला होता असे सांगितले व तेथील व्‍यवस्‍थापकाने मालकाशी बोलण्‍यास सांगितले. म्‍हणून तिने वि.प.ची नागपूर येथे येऊन भेट घेतली. वि.प.ने वैयक्‍तीक भेटीत दाद न दिल्‍याने 07.10.2010 ला नोटीस दिला. तो वि.प.ला प्राप्‍त झाला. तक्रारकर्तीने सदर तक्रारीत लाछाची किंमत रु.18,560/-, शिलाई रु.400/-, ड्रायक्‍लीनींग रु.150/-, करीता मागणी केली. एकूण तक्रारीसोबत 4 दस्‍तऐवज, रसीद, कायदेशीर नोटीस, पोच पावती इ. चा समावेश आहे.  
 
2.          सदर तक्रारीची नोटीस वि.प.ना पाठविली असता, त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले. वि.प.चे म्‍हणणे थोडक्‍यात असे आहे की, वि.प.ने आपल्या लेखी उत्‍तरात प्राथमिक आक्षेपात म्‍हटले की, सदर तक्रार खोटी व खोडसाळ स्‍वरुपाची असून तक्रारकर्ती ग्राहक परिभाषेत बसत नाही. तक्रारकर्ती महागडे ड्रेसेस लग्‍न व इतर प्रसंगी किरायाने देण्‍याचा व्‍यवसाय करते व त्‍याचे नाव ‘अनुराधा टेलरींग, बालाघाट’ असे आहे व लाछा हे वस्‍त्र व्‍यापारीक कामाकरीता वापरतात, त्‍यामुळे तक्रारकर्ती ग्राहक ठरत नाही व तक्रारकर्ती लाभ मिळण्‍यास पात्र नाही. वि.प.ने म्‍हटले की, तक्रारकर्तीने हेतू पुरस्‍पर डॅमेंज लाछा मंचासमोर दाखल केलेला नाही. जर तक्रारकर्तीने तथाकथीत फाटलेला लाछा मंचासमोर दाखल केला असता तर स्‍वतंत्र तज्ञांचा अहवाल प्राप्‍त करुन तक्रार निकाली काढणे संयुक्‍तीक झाले असते. त्‍यामध्‍ये विभिन्‍न सात प्रकारचे प्रश्‍न उपस्थित केले. वि.प.ने तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या बिलावर आक्षेप घेतला. कारण तक्रारकर्तीने लाछा विकत घेतेवेळी त्‍याच्‍या कापडाची गॅरंटी दिलेली नाही. वि.प.ने म्‍हटले की, सदर लाछा ड्रायक्‍लीनींगला देतांनाच तक्रारकर्तीच्‍या निदर्शनास आणून दिले होते की, लाछा हा डॅमेज आहे व त्‍याच्‍या रंगाची व मटेरीयलची शाश्‍वती घेतलेली नव्‍हती व सदर बाब ड्रायक्‍लीनींगच्‍या बिलावरुन स्‍पष्‍ट होते व त्‍या अटी व शर्ती तक्रारकर्तीने मान्‍य केल्‍या होत्‍या. तक्रारकर्त्‍याने वि.प.च्‍या ग्राहक सेवेतील त्रुटीबाबत, निष्‍काळजीपणाबाबत नाकारले व तक्रारकर्ती योग्‍य तक्रार केली नाही व स्‍वच्‍छ हाताने मंचासमोर आलेली नाही. सदर तक्रार खोटी व मंचासमोर चालविण्‍यायोग्‍य नसल्‍याने खारीज करण्‍याची मागणी केली. तसेच तक्रारकर्तीची मागणी ही पूर्णतः अवास्‍तव व चुकीची असल्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली.
3.          सदर तक्रार युक्‍तीवादाकरीता ठेवण्‍यात आली होती, परंतू दोन्‍ही पक्ष 17.02.2012 प्रमाणे 16.03.2012 अंतिम संधी देऊनही गैरहजर होते. मंचाने तक्रारीसोबत दाखल दस्‍तऐवजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले.
 
-निष्‍कर्ष-
5.          तक्रारकर्तीने श्री शंकर कलेक्‍शन, बालाघाट कडून रु.18,560/- चा लाछा खरेदी केला होता, हे पृ.क्र. 13 वरुन स्‍पष्‍ट होते. 13.07.2010 ला दोन लाछा, दोन चोली, दोन ओढणी व इतर वस्‍त्रे वि.प.क्र. 1 ला ड्रायक्‍लीनींगकरीता रु.360/- शुल्‍क (पृ. क्र. 14) दिले, तक्रारकर्तीने ड्रायक्‍लीनींगची सेवा घेतल्‍याने ती वि.प.क्र. 1 ची ग्राहक ठरते. वि.प.ने आक्षेप घेतला की, तक्रारकर्ती ही अनुराधा टेलरींग नावाने महागडे वस्‍त्र लग्‍न व इतर प्रसंगी भाडयाने देण्‍याचा व्‍यवसाय बालाघाट येथे करते, म्‍हणून ती वि.प.ची ग्राहक ठरत नाही हे म्‍हणणे तथ्‍यहीन असल्‍याने मंचाने नाकारले. तक्रारकर्तीने ड्रायक्‍लीनींगकरीता दिलेला लाछा ड्रायक्‍लीनींगनंतर फाटलेल्‍या स्थितीत मिळाला असे म्‍हटले आहे. त्‍यावर  वि.प.ने म्‍हटले की, त्‍यांना ड्रायक्‍लीनींगला देतांनाच लाछा डॅमेज होता असे तक्रारकर्तीला सांगितले होते. ि वि.प.ने म्‍हटले की, तक्रारकर्तीने सदर लाछा हेतूपूरस्‍पर निरीक्षण व अवलोकनाकरीता मंचासमोर दाखल केला नाही, जेणेकरुन योग्‍य निवाडयाकरीता मंच स्‍वतंत्र तज्ञांचा अहवाल प्राप्‍त करुन सत्‍य बाबीची शहानिशा करु शकले असते. परंतू तक्रारकर्तीने सदर लाछा मंचासमोर दाखल करु शकली नाही, त्‍यामुळे लाछा फाटण्‍याची कारणे, लाछा कितीदा वापरण्‍यात आलेला आहे, लाछाचे वय, किंमत व सदर डॅमेज दुरुस्‍त करण्‍यास लायक आहे व तक्रारकर्तीस झालेले नुकसान हे स्‍पष्‍ट करणे योग्‍य झाले असते. वि.प.ने आक्षेप घेतल्‍याप्रमाणे तक्रारकर्तीने सदर लाछा मंचासमोर योग्‍य निवाडयाकरीता दाखल करणे आवश्‍यक होते असे मंचाचे मत आहे. तसेच ग्रा.सं.का.चे कलम 13 (1) (क) (डी) अंतर्गत वस्‍तूत काही दोष आढळल्‍यास तज्ञामार्फत योग्‍य अहवाल प्राप्‍त करुन तक्रार निकाली काढावी असे ग्रा.सं.कायद्यास अभिप्रेत आहे. परंतू तक्रारकर्तीने वि.प. च्‍या आक्षेपानंतरसुध्‍दा फाटलेला लाछा दाखल केला नाही व त्‍याबाबतचा तज्ञ अहवाल स्‍वतः दाखल केला नाही व मंचास तज्ञ अहवाल प्राप्‍त करण्‍याची संधीसुध्‍दा दिली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्ती स्‍वतःच तिचे म्‍हणणे सिध्‍द करण्‍यास अपयशी ठरली आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ती वि.प.ची सेवेतील त्रुटी सिध्‍द करु शकली नाही, म्‍हणून तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍यात येते.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.