निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 14.12.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16.12.2010 तक्रार निकाल दिनांकः- 30.04.2010 कालावधी 4 महिने 14दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. शब्बीर अहमद शेख हबीब अर्जदार वय 69 वर्षे धंदा सेवा निवृत्त रा.व्दारा, ( स्वतः ) बाबा कटपीस सेंटर काजी बाग दर्गाह रोड, परभणी. n विरुध्द दि.प्रोफेशनल कुरीयर्स गैरअर्जदार आंध्रा बॅकेजवळ शिवाजी रोड, ( अड.अजय व्यास ) परभणी ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती अनिता ओस्तवाल सदस्या ) गैरअर्जदाराने सेवात्रूटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार याने गैरअर्जदाराच्या कुरीयर सर्व्हीस मार्फत गट विमा योजना, भविष्य निर्वाह निधी व अल्प बचतीची रक्कम काढण्यासाठी प्रस्ताव तयार करुन श्री.सलीम यांच्या सहया करीता हैद्राबादेत पाठविले होता परंतू सदरचे कुरीअर गहाळ झाल्यामुळे अर्जदारास स्वतः हैद्राबादला जावून नवीन प्रस्ताव तयार करावा लागला. या सर्व प्रक्रीयामध्ये अर्जदारास जवळपास रुपये 1500/- चा खर्च व प्रवासाची दगदग झाली. म्हणून अर्जदाराने ही तक्रार मंचासमोर दाखल करुन मानसिक त्रासापोटी व अर्थिक नुकसानीबद्यल गैरअर्जदाराने रक्कम रुपये 5000/- द्यावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 3 व नि. 4 वर मंचासमोर दाखलकेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीसमिळाल्यानंतर व अनेक वेळा संधी दिल्यानंतर ही गैरअर्जदाराने लेखी निवेदन मंचासमोर दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरोधात No say चा आदेश मंचाने पारीत केला. अर्जदाराच्या कैफीयतीवरुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदारानी अर्जदारास त्रूटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने गट विमा योजना भविष्य निर्वाह निधी व अल्प बचतीचे रक्कम काढण्याकरीता प्रस्ताव तयार करुन श्री. सलीम यांच्या सहयाकरीता गैरअर्जदाराच्या कुरीअर सर्व्हीस मार्फत हैद्राबाद येथे पाठविला होता परंतू सदरचे कागदपत्र इच्छीतस्थळी अद्याप ही पोहचलेले नाही किंवा अर्जदारास ते परत ही करण्यात आलेले नाही याचा अर्थ असा निधतो की, गैरअर्जदाराच्या हलगर्जीपणामुळे ते गहाळ झालेले आहे व त्याचा अर्जदारास स्वतः हैद्राबाद येथे जाऊन पुन्हा प्रस्ताव तयार करावा लागला यासाठी अर्जदारास नाहक भूर्दंड सोसावा लागला याशिवाय प्रवासाची दगदग झाली ती वेगळी अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. मंचासमोर कागदपत्र सादर केली त्याची पडताळणी केली असता दिनांक 05.04.2010 रोजी अर्जदाराने कागदपत्र गैरअर्जदार कुरीअर सर्व्हीसमार्फत हैद्राबाद येथे पाठविलेले दिसते परंतू ते गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणा मुळे गहाळ झाले असे अर्जदाराचे म्हणणे आहे व त्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र ही अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले असल्यामुळे त्यावर अविश्वास दाखविता येणार नाही तसेच गैरअर्जदारास अनेक वेळा संधी देवून ही त्याने त्याचे म्हणणे मंचासमोर दाख्ंल केलेले नाही अथवा अर्जदाराने केलेल्या आरोपाचे खंडण ही केलेले नाही. यावरुन अर्जदाराचे कथनात तथ्य असल्याचे जाणवते म्हणून वरील सर्व बाबीचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. . आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारानी निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत सेवा त्रूटीपोटी व मानसिक त्रासाबद्यल एकूण रक्कम रुपये 700/- अर्जदारास द्यावे.. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |