जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/71 प्रकरण दाखल दिनांक – 21/03/2008. प्रकरण निकाल दिनांक – 28/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. शंकरराव पुणाजी राठोड वय, 56 वर्षे, धंदा नौकरी, रा.जयदुर्गा गृह नीर्माण संस्था प्लॉट नंब.5/ए गारखेडा परिसर, औरंगाबाद अर्जदार विरुध्द एस.एम.पी.आर होमीओपॅथीक कॉलेज, नांदेड मार्फत प्राचार्य, नविन नांदेड. गैरअर्जदार अर्जदारा तर्फे. - स्वतः गैरअर्जदारा तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार होमीओपॅथीक कॉलेज यांनी बीएचएमएस प्रवेशासाठी मागितलेली रक्कम वापस न करुन सेवेतील ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. कू.वैशाली शंकरराव राठोड हिने मार्च,2008 च्या 12 वी परिक्षेत उतीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय मिरिट नुसार गैरअर्जदार यांचे शैक्षणीक संस्थेत बी.एच.एम.एस. या अभ्यासक्रमासाठी दि.25.7.2008 रोजी प्रवेश घेतला व त्यांच दिवशी फिस रु.8750/- देखील जमा केली.मूलीच्या वैयक्तीक कारणामूळे तिला प्रवेश रदद करण्याची इच्छा होती म्हणून तिने दि.18.9.2008 रोजी कॉलेजच्या प्रार्चायाना प्रवेश रदद करण्याविषयी अर्ज दिला व भरलेली फिस वापस मागितली. माहीती पञकातील नियम नंबर 3.2 प्रमाणे असा घेतलेला प्रवेश भरलेल्या रक्कमेतून रु.1,000/- कपात करुन वापस मिळेल असे प्रयोजन आहे परंतु गैरअर्जदार यांनी दि.8.9.2008 रोजीच्या पञानुसार फिस परत करण्यासाठी थोडा वेळ लागेल असे सांगितले व सर्व मूळ कागदपञे जे आधीच वापस केले होते परंतु फिसची रक्कम वापस केली नाही त्यासाठी बॉडीचा ठराव व्हावा लागेल व तो अद्यापही झालेला नाही असे सांगितले. अर्जदार यांची मागणी एवढीच आहे की, नियमाप्रमाणे त्यांना रु.7750/- गैरअर्जदाराकडून वापस मिळावेत. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी कू.वैशाली शंकर राठोड हिला महाविद्यालयात प्रवेश दिला हे मान्य केले आहे. त्याशिवाय रु.8750/- ची फिस भरली होती हे ही मान्य केले आहे. कू.वैशाली यांचा प्रवेश रदद करण्याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तिला इतर ठिकाणी प्रवेशासाठी अडथळा येऊ नये म्हणून मूळ प्रमाणपञ त्याच दिवशी वापस केले परंतु तांञिक अडचणीमूळे डि.डि. एवढया लवकर देणे शक्य नव्हते त्यावर वेळ लागणार होता. म्हणून डि.डि. देण्यास विलंब झाला.यासाठी अर्जदार यांना गैरअर्जदार यांचेशी संपर्क न करता सरळ ग्राहक मंचात तक्रार नोंदविली आहे. गैरअर्जदार यांना पैसे देण्यावीषयी इन्कार नव्हता. दि.29.5.2009रोजी क्रॉस चंक नंबर 600204 यूनियन बँक ऑफ इंडिया याद्वारे रु.7750/- रजिस्ट्रर पोस्टाने अर्जदार यांना दि.30.6.2009 रोजी पाठविण्यात आले व ते त्यांना मिळाले असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून कागदपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार यांनी हे प्रकरण चालू असताना अर्जदार यांना यूनियन बँक ऑफ इंडिया चा चेक नंबर 600204 दि.30.06.2009 रोजी पाठविल्याचे म्हटले आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे केस परत घ्यावी असे कळविले आहे. आपल्या सूचनेप्रमाणे आपणास येऊन चेक घेण्यास वेळ नसल्यामूळे चेक नोंदणीकृत पोस्टाने पाठविला आहे असे पञ दिले आहे. या सोबत चेकची झेरॉक्स व मिळाल्या बददलचे पोस्टाचे पोहच पावती त्यावर अर्जदार यांची दि.13.6.2009 रोजी मिळाल्या बददलची सही आहे. अर्जदाराने मंचात स्वतः उभे टाकून चेक अद्यापही मिळाला नाही असे उत्तर लिहीलेले जरी असले तरी परंतु तो मिळून जाईल असे म्हटले आहे. चेक मिळाल्याचा पूरावा यात उपलब्ध आहे. महाविद्यालयाचे नियम नंबर 3.2 प्रमाणे गैरअर्जदारानी भरलेली फिस मधून रु.1000/- कमी करुन अर्जदार यांना दिले आहेत व ते त्यांना मान्य आहे व त्यांची मागणी ही तेवढीच आहे. तक्रार अर्जात अर्जदाराने दावा खर्च व मानसिक ञासा मागितला नाही. अर्जदाराची मागणी पूर्ण झालेली आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. अर्जदाराची मागणी पूर्ण झाल्यामूळे याबददल आदेश नाही. 3. पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |