तक्रार क्र.51/2015.
तक्रार दाखल दिनांक - 05/05/2015. तक्रार नोंदणी दिनांक - 11/06/2015
तक्रार निकाल दिनांक - 12/07/2016
कालावधी 01 वर्ष 01 महिने 01 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
भैयासाहेब पि.बळीराम देवरे, अर्जदार
वय 40 वर्ष धंदा – व्यापार, अॅड.एस.एस.सावंत.
रा. पंचशिलनगर, परभणी.
विरुध्द
प्राचार्य, गैरअर्जदार
इरा किडस, प्री इंग्लीश स्कुल, अॅड.मिर्झा शकील आर.बेग.
वर्मानगर,परभणी.
कोरम - श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. - मा.सदस्या.
नि का ल प त्र
(निकालपत्र पारीत द्वारा – मा. श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा)
अर्जदाराची मुलगी नामे सौंदर्या भैयासाहेब देवरे ही वय चार वर्षाची आहे ती गैरअर्जदाराच्या शाळेमध्ये नर्सरी ग्रुप वर्गात 2014-2015 या वर्षात शिक्षण घेत होती. अर्जदाराची मुलगी सौंदर्या गैरअर्जदाराच्या नर्सरी ग्रुपमध्ये शिक्षणास प्रवेश दिल्यानंतर त्यामध्ये असे ठरले होते की, शैक्षणीक फिस रु.8,000/- एका वर्षाची अर्जदार व गैरअर्जदारामध्ये ठरले आणि सदरील फिस ही नर्सरी वर्गाच्या परिक्षेपर्यंत भरण्याचे ठरले होते. करारानुसार अर्जदाराने रु.150/- दि.15/05/2014 रोजी भरले व रु.2,124/- दि.17/05/2014 रोजी भरले, रु.3,974/- दि.20/05/2014 , रु.2,100/- दि.04/10/2014, रु.1,000/- दि.23/03/2015, रु.1,000/- दि.25/03/2015 रोजी भरले आहेत. दि.25/03/2015 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास शाळेत बोलावले आणि तोंडी सांगीतले की,सौंदयाची फिस जमा करावी. त्याच अर्जदाराने रु.1,000/- जमा केली आणि दि.30/03/2015 रोजी भरली. अर्जदारास कोणत्याही प्रकारे सुचना न देता अर्जदाराची मुलगी हीस दि.30/03/2015 पासुन वर्गामध्ये बसू दिेले नाही. सौंदर्या ही रडत रडत घरी आली आणि तिने झालेला सर्व प्रकार अर्जदरास सांगीतले आणि गैरअर्जदाराने अर्जदाराचे मुलीस किंवा अर्जदारास कोणत्याही प्रकारे सुचना न देता व न सांगता वर्गात प्रवेश दिला नाही त्यामुळे अर्जदाराच्या मुलीच्या कोमल मनावर परीणाम झाला सौंदर्या हीने दि.10/04/2015 रोजीच्या परिक्षेची संपुर्ण तयारी केली होती. सौंदर्या ही शाळेत सकाळी 9.30 वाजता जात होती परंतु दि.30/03/2015 पासून ती शाळेत जावू शकली नाही व मुलीने परीक्षेची संपुर्ण तयारी केली होती. अर्जदारास त्यामुळे मानसिक धक्का बसला आहे. अर्जदाराने दि.31/03/2015 रोजी आयुक्त महानगर पालिका परभणी यांच्याकडे अर्ज दिला आणि त्यामध्ये गैरअर्जदाराचे वर्तनुकीवरुन अर्जदाराचे मुलीचे बालमनावर विपरीत परिणाम झाला आहे. परंतू त्या ठिकाणी गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली नाही. अर्जदाराने रु.11,000/- शैक्षणीक फिस गैरअर्जदाराचे संस्थेत जमा केली. परंतु शासनाने राबविलेल्या योजनेनुसार मुलींना शैक्षणीक फिस माफ आहे. जेंव्हा अर्जदाराने सदरची बाब गैरअर्जदारास सांगीतली तेंव्हा गैरअर्जदाराने उध्दटपणे उत्तर दिले व म्हणाले की कोणीही आम्हाला शिक्षणाचे कायदे सांगू नयेत व अधिकारा विषयी सांगू नये. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराला दि.06/04/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविले. परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतेही प्रतिउत्तर दिले नाही. म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली आहे. गैरअर्जदार यांच्याकडुन नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- त्यावर 18 व्याजासह मिळावे व गैरअर्जदारांना असे आदेश देण्यात यावे की,मानसिक व सेवेतील त्रुटीबद्दल रु.10,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे अशी मंचासमोर विनंती केलेली आहे.
गैरअर्जदाराने सदर केसमध्ये दि.05/03/2016 रोजी हजर होऊन आपले म्हणणे दाखल केले. परंतु गैरअर्जदारा विरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेले असल्यामुळे गैरअर्जदारांनी मा.राज्य आयोग यांचेकडे लेखी म्हणणे दाखल करुन घेण्यासाठी अर्ज केला होता त्याचे रिव्हीजन मंजुर झाले. त्यांनी रु.1,000/- भरल्याची पावती मंचात दाखल केली. त्यांचा उजर असा की, सदर केसमध्ये मुद्दे हे चुकीचे व खोटे आहे. इरा किडस, सी.बी.एस.सी ही शिक्षण संस्था प्रसिध्द असून वर्मानगर, परभणी येथे आहे. शाळेमध्ये उच्च शिक्षीत शिक्षक आहेत व शाळेमधील विद्दार्थ्यांचे जीवन घडवितात. सदरची संस्था ही चांगली बांधकाम केलेली आहे. सदर संस्थेमध्ये भरपूर मुले प्रवेश घेतात त्यापैकी अर्जदाराची मुलगी सौंदर्या ही नर्सरी ग्रुपमध्ये दि. 20/05/2014 रोजी रुजू झाली. शाळेची फिस ही रु.13,650/- एवढी आहे. अर्जदाराने रु.7,526/- भरले आहे अर्जदाराकडे रु.6,124/- येणे बाकी आहे. अर्जदारांना पैसे भरण्यासाठी पुरेशी संधी देवूनही त्यांनी ती भरली नाही. त्यामुळे इतर व्यक्तिवर याबाबीचा चुकीचा संदेश जातो. अर्जदाराने त्यांना घाण शब्दामध्ये शिवीगाळ केली व मानसिक त्रास दिला तसेच कोतवाली पोलिस स्टेशन येथे एन.सी.क्र.3/15 दि.11/04/2015 रोजी नोंदविण्यात आला व अर्जदाराने त्यांची मुलगी सौंदर्या हीचे जन्म दाखला परत मागीतला व आठ दिवसांत देण्यात यावे अशी विनंती केली व आजपर्यंत अर्जदाराने फिस न दिल्यामुळे जन्म दाखला दिला नाही. तसेच अर्जदाराची मुलगी सौंदर्या ही अनियमित विदयार्थीनी होती व तिची वडीलांचे वागणूक ही फारच बेजबाबदारीची होती. गैरअर्जदाराच्या संस्थेस अर्जदाराने चांगली वागणुक कधीच दिली नाही व सदरील संस्थेशी शिस्तबंध्द पध्दतीने वागले नाही. त्यानंतर दि.29/03/2015 रोजी नोटीस दिली. अर्जदाराने सदरील अर्ज गैरअर्जदाराला मानसिक त्रास देण्याच्या हेतुने केलेली आहे व गैरअर्जदाराकडून मोबदला मिळवीण्यासाठी केलेला आहे. सदर अर्जदाराच्या वागणुकीमुळे गैरअर्जदारांना जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल अर्जदाराकडून नुकसान भरपाई देण्यात यावे. सदर केस ही मुलीच्या वडीलांनी दाखल केलेली आहे त्यांना ही केस दाखल करण्याचा हक्क नाही. अर्जदार सदरील केस न्यायमंचात दाखल करण्यास पात्र नाही. सदरची शैक्षणीक संस्था असल्यामुळे शैक्षणीक न्यायमंचात दाखल करणे आवश्यक आहे. म्हणुन अर्जदाराची केस ही चुकीच्या तथ्यावर असल्यामुळे फेटाळण्यात यावी अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. .
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, साक्षीचे शपथपत्र, युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी कथन, साक्षीचे शपथपत्र्, युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालिल मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर.
1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. आदेश काय? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र. 1 - चे उत्तर होय असून अर्जदाराची पाल्य सौंदर्या ही गैरअर्जदाराच्या शाळेत शिक्षणासाठी गेली होती व तिथे तिचे शिक्षण नर्सरी या विभागात दि.15/05/2014 पासून सुरु झाले होते ही बाब गैरअर्जदाराला मंजुर आहे. यात महत्वाची बाब अशी सौदर्या ही वयान अज्ञान असल्याकारणांने तिचे कायदयाचे बाबी बघण्याचे कार्य केवळ तिचे पालक म्हणून आई-वडील पाहू शकतात व सदर केस मध्ये सौंदर्याचे वडील हेच तिचे पालनकर्ते असल्यामुळे सदर केस दाखल करण्यास ते पात्र आहेत. अर्जदाराची मुलगी सौदर्यांची फिस त्यांचे पालक म्हणून अर्जदारच भरणर असल्यामुळे गैरअर्जदारांचा उजर अर्जदार हा ग्राहक होवू शकत नाही व अर्जदाराला अशा प्रकारचा मानसिक त्रास होवू शकत नाही हे यासाठी हिंदू व वारसा कायदयानुसार अर्जदाराला सदरची तक्रार दाखल करण्याचा हक्क प्राप्त होतो. म्हणुन तो गैरअर्जदाराचा ग्राहक होतो.
मुददा क्र. 2 - चे उत्तर होय असून गैरअर्जदाराने आपल्या शैक्षणिक संस्थेचे पोकळ बढाया मारलेल्या दिसून येतात. एका चार वर्षाच्या मुलीला सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत संविधान कायदयाने सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे ही बाब गैरअर्जदार नामंजुर करु शकत नाही. गैरअर्जदाराच्या मतानुसार अर्जदाराची मुलगी सहा वर्षाची नाही. म्हणुन तिला सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत येणारे शिक्षण लागू होत नाही. तसेच गैरअर्जदाराची संस्था ही CBSE Patern घेऊन मुलांना घडवते तर एका चार वर्षाच्या मुलीला CBSE Patern लागु होतो का ? हे पण सांगावे. अर्जदाराच्या वडीलांनी रु.13,650/- भरले नाही. म्हणून अर्जदाराच्या मुलीस शाळेतून घरी पाठवले ही बाब लहान मुलगी येवून आपल्या आई वडीलांना सांगते व गैरअर्जदार आपल्या शैक्षणिक संस्थेचे बढाया मारतो की चांगले खेळाचे मैदान आहे,चांगला शिक्षकवृंद आहे, शाळेला वर्ग चांगले आहेत व चांगल्या पध्दतीचे शिक्षण दिले जाते तर एका मुलीला फिस दिली नाही म्हणुन घरी पाठवणे हे चांगल्या शाळेचे लक्षण आहे का ? दुसरे म्हणजे आपल्या शिक्षणाचा व शाळेचा एवढा गोडवा आपण गात आहात व आपल्या जवळ खुप सारे विदयार्थी आहेत तर एका मुलीच्या वडिलांनी कमी फिस दिली म्हणुन त्या मुलीचे वर्ष वाया जावू दयावे ही आपल्या शैक्षणिक संस्थेची पध्दत आहे का ? एखादया पाल्याचे वर्ष वाया जात आहे हे पाहून कोणत्याही पालकाला वाईट वाटणार नाही का? तो आपल्या मानसिकतेचे संतुलन बिघडून आपणांस काही बोलला तर आपल्या शैक्षणिक संस्थेचे नांव बदनाम का व्हावे ? आपले शिक्षण एवढे कमजोर आहे की कोणी बोलून गेल्याने आपले नांव खराब होवू शकते. अशा प्रकारचे वागणे आपल्या संस्थेला शोभते का ? एक पालक म्हणून त्यांनी मर्यादा सोडली तर तुम्ही शिक्षक म्हणुन मर्यादा सोडाव्यात का? दि.29/03/2015 रोजी गैरअर्जदाराने चार वर्षाच्या मुलीला फिस दिली नाही म्हणुन वर्गातून घरी पाठवणे ही बाब योग्य आहे का? आपण अर्जदाराने फीस वेळेत दिली नाही म्हणुन तारखेनंतर नोटीस पाठविली का ? आपण या प्रकारची कायदयाची कोणती बाजू सांभाळली ज्यामुळे आपला हेतू हा सदहेतू होता हे सिध्द केला. गैरअर्जदाराने एका वर्षाची नर्सरीची फिस रु.13,650/- होते असे म्हटले. गैरअर्जदाराने दिलेल्या पावत्या अर्जदारास दि.15/05/2014 रोजी रु.150/- दि.20/05/2014 रु.3,974/- दि.04/10/2014 रु.2,100/- टयुशन फिस रु.2,000/- टयुशन फीस व रु.1,974/- कीट फिस दि.23/02/2015 रु.1,000/- टयुशन फिस दि.25/03/2015 टयुशन फिस रु.1,000/- व याचे पावती क्र.305 वर दि.30/03/2015 पर्यंत उर्वरीत फिस सांगितली आहे. या सर्व पावत्या पाहता सर्वात प्रथम जी अॅडमीशन फिस रु.150/- एवढीच त्या विदयार्थीनीची खरी फिस आहे. बाकी सर्व फिस आपण टयुशन या नावाखाली कधी रु.2,000/- तर कधी रु.1,000/- अशी अर्जदाराकडून बेकायदेशिररित्या घेतलेली आहे. एका चार वर्षाच्या मुलीला तुमच्या शाळेत शिक्षणांसाठी विदयार्थी म्हणून बसवताय की शिक्षणाचे बाजारीकरण करुन टयुशनच्या नावाखाली शाळा पावती देवून टयुशन म्हणून विदयार्थीनीकडून तुम्ही फिस घेताय हे कोणत्या कायदयात बसते. टयुशन ही कोणत्याच शाळेला कायदयाच्या भाषेत लागू नाही. एका चार वर्षाच्या नर्सरी वर्गातील मुलीला टयुशन म्हणून काय शिकवणार व शिक्षण म्हणून काय शिकवणार असा मुददा येतो? चार वर्षाच्या नर्सरी वर्गाचा अभ्यास तरी किती असावा. त्यानंतर गैरअर्जदार ही शैक्षणिक संस्था अर्जदाराची मुलगी अनियमित येत होती असा उजर नोंदवला आहे. याबाबत गैरअर्जदाराने कोणतेही हजेरीपट न्यायमंचात दाखल केलेला नाही. ज्या उजरचा गैरहजेरीबाबत गैरअर्जदाराने तो सिध्द केलेला नाही. उपरोक्त दिलेली फिस ही रु.8,224/- अर्जदाराने गैरअर्जदाराला देणे क्रमप्राप्त नाही. संस्था जर चालवायची आहे तर रीतसर अॅडमीशन फिस म्हणुन एकदम घ्या? अशी टयुशन फिस कीट फिस म्हणून पैसा घेवू नका ? अर्जदार हा ग्राहक होत नाही व सदरची केस ही हया न्यायमंचात चालू शकत नाही असा उजर देखील गैरअर्जदाराचा आहे. भारतीय संविधानानुसार जो शैक्षणिक क्षेत्राच्या नियमानुसार वागतो त्याच्यासाठी दाद मागण्याचे न्यायालय म्हणजे School Tribunal आहे मात्र अशा प्रकारच्या खाजगी संस्था शिक्षणाच्या नावाखली विदयार्थ्यांना त्रुटीच्या सेवा देत असेत तर त्यासाठी हे न्यायमंच त्रुटीच्या सेवा देण्यात आले म्हणून कोणताही व्यक्ति येवू शकतो. या न्यामंचाचे कार्यक्षेत्र फार मोठे विस्तारीत स्वरुपाचे आहे त्यासाठी कोणत्याही बाबी उजर नोंदवण्याच्या अगोदर गैरअर्जदारांनी विचार करावा. चार वर्षाची मुलीच्या मानसिकतेवर परिणाम करणारी शैक्षणीक संस्था ही चांगले आहोत हे म्हणूच शकत नाही. अर्जदाराच्या पाल्याला दि.29/03/2015 रोजी घरी पाठवले ही गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचे रु.150/- व्यतिरिक्त घेतलेली रक्कम रु.8,000/- अर्जदारास 30 दिवसांचे आंत परत करावी. अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व दाव्याचा खर्च म्हणुन रक्कम रु.2,000/- देण्यात यावा.भ
यास्तव मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश.
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी रक्कम रु.8,000/- अर्जदारास 30 दिवसांचे आंत परत करावी. अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व दाव्याचा खर्च म्हणुन रक्कम रु.2,000/- देण्यात यावा.
3. उभयपक्षकार यांना निकालाची प्रत विनाशुल्क देण्यात यावी.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा