Maharashtra

Jalna

CC/57/2011

smt,Reja Gangaram Bodke - Complainant(s)

Versus

The President, Max Newyork Life Insurance Co, Ltd, - Opp.Party(s)

28 Dec 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/57/2011
 
1. smt,Reja Gangaram Bodke
Plot No,82,prayag nagar,behind sai Kirti dhaba,jalna,
jalna
Maharashtra,
...........Complainant(s)
Versus
1. The President, Max Newyork Life Insurance Co, Ltd,
Max House,3rd floor,Dr,za Marg,olks,New Delhi,
Delhi
Delhi
2. The Br,Manager,Max Newyork life insurance co,Ltd,
Near Pagarita Auto, city pride Hotel 2 nd Floor,Mondha Naka, ,
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mr. D. S. Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 HONABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 28.12.2011 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
      विमा कंपनीच्‍या सेवेत त्रुटी असल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      थोडक्‍यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार मॅक्‍स न्‍युयॉर्क लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनीच्‍या मॅनेजरने तिला पॉलीसी घेण्‍याचा आग्रह केला. त्‍यावेळी तिने तिच्‍या मुलीच्‍या शिक्षणासाठी चाईल्‍ड प्‍लॅन अंतर्गत रुपये 10,104/- प्रिमियम असलेली पॉलीसी घेण्‍याकरीता गैरअर्जदार विमा कंपनीच्‍या एजंटकडे रुपये 10,104/- चा धनादेश मार्च मध्‍ये दिला. परंतू गैरअर्जदारांनी पॉलीसीचे कागदपत्र नोव्‍हेंबर पर्यंत दिले नाहीत आणि नोव्‍हेंबरमध्‍ये ज्‍यावेळी पॉलीसीचे कागदपत्र दिले त्‍यावेळी तिने ज्‍या पॉलीसीसाठी विमा हप्‍ता भरला होता ती पॉलीसी न देता दुसरीच पॉलीसी दिली. सदर पॉलीसी तिला मान्‍य नसल्‍यामुळे तिने गैरअर्जदाराकडे त्‍याबाबत तक्रार केली असता. त्‍यांनी असे सांगितले की, तिने भरलेल्‍या विमा हप्‍त्‍यानुसार जी पॉलीसी देणे शक्‍य आहे तिच पॉलीसी दिलेली आहे. त्‍यानंतर तिने गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार दिली. तिच्‍या तक्रारीनंतर युनिट मॅनेजरने तिच्‍याकडून पॉलीसी बदलून देण्‍याचा फॉर्म बदलून घेतला व तिच्‍याकडून रुपये 5,000/- चा धनादेश व पॉलीसीचे सर्व कागदपत्र जमा करुन घेतले. परंतू त्‍यानंतर गैरअर्जदारांनी पॉलीसी बदलून दिली नाही किंवा कोणताही पत्रव्‍यवहार केला नाही आणि शेवटी दिनांक 14.02.2011 रोजी पॉलीसी बदलून मिळणार नसल्‍याचे सांगितले. म्‍हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदाराकडून विमा हप्‍त्‍याची रक्‍कम रुपये 15,104/- व्‍याजासह मिळावेत.
      गैरअर्जदारांना पुरेशी संधी देवूनही त्‍यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही. म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍द ही तक्रार लेखी निवेदनाविना चालविण्‍यात आली.
तक्रारदाराच्‍या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
     
       मुद्दे                                     उत्‍तर
 
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्‍या सेवेत त्रुटी आहे काय ?                  होय 
 
 
2.आदेश काय ?                                         अंतिम आदेशा प्रमाणे
 
कारणे
मुद्दा क्रमांक 1 तक्रारदाराने दिनांक 30.06.2009 रोजीचा रक्‍कम रुपये 10,104/- चा धनादेश विमा हप्‍त्‍यापोटी गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिला होता ही बाब तक्रारदाराने दाखल केलेली पावती नि.3/1 वरुन दिसुन येते. तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून प्राप्‍त झालेली पॉलीसी योग्‍य नसुन तिला जी पॉलीसी पाहिजे होती ती गैरअर्जदारांनी दिली नसल्‍यामुळे गैरअर्जदाराकडे दिनांक 30 नोव्‍हेंबर, 2009 रोजी तक्रार (नि.3/2) दिली होती. तक्रारदाराच्‍या सदर तक्रारीबाबत गैरअर्जदार विमा कंपनीने कोणताही खुलासा केला नाही. मंचासमोर देखील गैरअर्जदार विमा कंपनीने कोणतेही म्‍हणणे सादर केले नाही.
      तक्रारदाराने ज्‍या पॉलीसीसाठी प्रस्‍ताव दिला होता तिला तिच पॉलीसी देण्‍यात आली होती अशा प्रकारचा खुलासा गैरअर्जदार विमा कंपनीने मंचासमोर सादर केलेला नाही. विमा कंपनीला मंचासमोर लेखी म्‍हणणे दाखल करुन आणि तक्रारदाराने त्‍यांच्‍याकडे विमा उतरविण्‍याबाबत दिलेला प्रस्‍ताव व तिला देण्‍यात आलेली पॉलीसी सादर करुन तक्रारदाराचे म्‍हणणे चुकीचे असल्‍याचे मंचाच्‍या निदर्शनास आणता आले असते. परंतू विमा कंपनीने मंचासमोर लेखी म्‍हणणे दाखल केले नाही आणि तक्रारदाराचे म्‍हणणे चुकीचे असल्‍याचे सिध्‍द् करण्‍यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. विमा कंपनीने तक्रारदाराचे म्‍हणणे खोडलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यावर अविश्‍वास दाखविण्‍याचे कोणतेही कारण उरत नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराकडून दिनांक 30 नोव्‍हेंबर, 2009 रोजी तिला देण्‍यात आलेल्‍या पॉलीसी बाबत तक्रार (नि.3/2) प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍वरीत तिच्‍या मागणी प्रमाणे योग्‍य पॉलीसी देणे आवश्‍यक होते आणि जर पॉलीसी बदलून देणे शक्‍य नसेल तर विमा कंपनीने तिला विमा हप्‍त्‍याची रक्‍कम परत करणे आवश्‍यक होते. तसेच जर विमा हप्‍त्‍याची रक्‍कम परत मिळण्‍यास तक्रारदार पात्र नसेल तर त्‍याबाबतचा खुलासा विमा कंपनीने तक्रारदाराला कळविणे आवश्‍यक होते. परंतू विमा कंपनीने यापैकी कोणतीही कृती केली नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराला तिच्‍या मागणी प्रमाणे पॉलीसी दिलेली नसल्‍यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराला विमा हप्‍त्‍याची रक्‍कम परत करणे न्‍यायोचित ठरते. तक्रारदाराच्‍या प्रस्‍ताव व मागणी प्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराला पॉलीसी न देवून व तिच्‍या मागणी प्रमाणे तिला दिलेली चुकीची पॉलीसी बदलून देण्‍यास टाळाटाळ करुन गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराला निश्चितपणे त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
      तक्रारदाराने तिला विमा हप्‍त्‍याची रक्‍कम रुपये 15,104/- परत मिळावेत अशी मागणी केली आहे. परंतू तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे केवळ रुपये 10,104/- भरल्‍याचा पुरावा सादर केलेला आहे. तक्रारदाराने रुपये 5,000/- गैरअर्जदाराकडे कधी भरले याचा काहीही खुलासा केलेला नाही व त्‍याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. म्‍हणून तक्रारदार गैरअर्जदार विमा कंपनीकडून केवळ रुपये 10,104/- व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे असे आमचे मत आहे.
म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
 
  1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.  
  2. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मॅक्‍स न्‍युयॉर्क लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनीने तक्रारदारास रुपये 10,104/- दिनांक 30.06.2009 पासून पुर्ण रक्‍कम देई पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह निकाल कळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्यावेत.
  3. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मॅक्‍स न्‍युयॉर्क लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- निकाल कळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्यावेत.   
  4. संबंधितांना आदेश कळविण्‍यात यावा.         
 
 
 
[HONORABLE Mr. D. S. Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER
 
[HONABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.