जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/56 प्रकरण दाखल दिनांक – 04/03/2009. प्रकरण निकाल दिनांक – 28/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. बळीराम पि.धोंडीबाराव मोरे, वय 50 वर्षे, धंदा,शेती रा. टेळकी ता. लोहा जि. नांदेड अर्जदार विरुध्द 1. पोस्ट मास्तर, ग्रामीण पोस्ट वीभाग, टेळकी ता. लोहा जि. नांदेड. 2. पोस्ट मास्तर, पोस्ट आफिस उस्मान नगर ता. लोहा जि. नांदेड. गैरअर्जदार 3. पोस्ट मास्तर, जनरल, हेड पोस्ट ऑफिस, नांदेड जि. नांदेड. 4. पोस्ट मास्तर, जनरल वीभागीय कार्यालय, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे. - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार 1 ते 4 तर्फे - अड.व्ही.बी.देशमुख. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार पोस्ट ऑफिस यांचे सेवेचया ञूटी बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार हे रा.टेळकी ता. लोहा येथील रहीवासी असून त्यांनी ग्रामीण पोस्ट ऑफिस टेळकी येथील पोस्टातून रु.50,000/- ची ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी दि.30.03.2007 रोजी घेतली आहे. त्यांचे पोटी गैरअर्जदार यांनी रु.1176/- प्रिमियम घेतला. सदरील प्रिमियम हे दर सहा महिन्यांनी भरावयाचे होते परंतु सहा महिन्यापर्यत अर्जदार यांनी प्रतीक्षा करुनही गैरअर्जदार क्र.1 यांनी पॉलिसीचे पासबूक व पॉलिसी अर्जदार यांना दिली नाही. त्यामूळे पूढचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांचेकडे अनेक वेळा तकार करुनही त्यांनी यांची दखल घेतली नाही म्हणून दि.01.09.2008 रोजी लेखी तक्रार करुन पासबूक उपलब्ध करुन दयावे अशी विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून झालेल्या नूकसानी बददल रु.25,000/-, पॉलिसीचे रु.50,000/-, दावा खर्च म्हणून रु.10,000/- मिळावेत म्हणून मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे रु.50,000/- ची ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शूरन्स पॉलिसी रु.1176/- भरुन दि.30.03.2007 रोजी अर्जदार यांना दिली व त्या बददल पावती नंबर 22687 दिली हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. प्रपोजल घेताना ते मान्य करण्यापूर्वी अर्जदार यांनी मेडीकल फिटनेस प्रमाणपञ देणे रुल 14(1) पीओआयएफ प्रमाणे देणे आवश्यक होते ते त्यांनी दिले नाही. म्हणून आजही अर्जदाराचे विमा प्रपोजल पोस्टाने मान्य केलेले नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही चूक आहे. अर्जदाराने या पूढील दर सहा महिन्यानी रु.1176/- चा हप्ता भरला नाही. आजही गैरअर्जदार हे थकलेले हप्ते भरीत असेल तर विमा पॉलिसी देण्यास तयार आहेत किंवा हे अर्जदार यांना मान्य नसेल तर प्रिमियमचा भरलेला एक हप्ता रु.1176/- अर्जदार यांनी रितसर अर्ज केल्यानंतर त्यांना देण्यास तयार आहेत. यात गैरअर्जदार यांनी सेवेतील कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून अर्जदार यांचा तक्रार अर्ज खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी दि.30.3.2007 रोजी रु.1176/- प्रिमियम रु.50,000/- च्या ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसीसाठी भरले ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे परंतु पोस्टाच्या नियम नंबर 14(1) पीओआयएफ याप्रमाणे स्वतःच्या प्रकृती बददलचे मेडीकल फिटनेस प्रमाणपञ न दिल्यामूळे पॉलिसीला अद्यापही मान्यता देण्यात आलेली नाही असे जरी म्हटले असले तरी त्यांनी अर्जदार यांना लेखी पञ देऊन तूमचे प्रपोजल अपूर्ण आहे तेव्हा मेडीकल प्रमाणपञाची पूर्तता करावी अशी लेखी सूचना दिलेली नाही. केवळ तोंडी म्हणण्यावर त्यांचे म्हणणे गृहीत धरता येणार नाही. गैरअर्जदार यांनी प्रिमियमची रक्कम स्विकारली आहे व अद्यापपर्यत अर्जदारास पासबूक वारंवार मागणी करुनही दिले नाही. अर्जदार म्हणतात की, पूढील विम्याचे दोन हप्ते टेळकी येथील पोस्टमनला दिलेले आहेत परंतु त्यांची पावती त्यांचेकडे नाही. पावती नसेल तर अर्जदाराचे म्हणणे मान्य करता येणार नाही. परंतु हे मान्य करता येईल की, पोस्टाचे पासबूक नसल्याकारणाने अर्जदाराने हप्त्याची रक्कम कशी भरावी ? त्यामूळे अर्जदाराची हप्ते भरण्याची तयारी होती हे दिसून येते. अर्जदार व गैरअर्जदार या दोघाचीही विम्याच्या पॉलिसी बददल गफलत झाल्याचे दिसून येते व पॉलिसी व पासबूक देणे गैरअर्जदार यांचे कर्तव्य होते. पॉलिसी मान्य नसेल किंवा त्यात काही ञूटी असेल तर तसे लेखी अर्जदारास कळवणे भाग होते परंतु या दोन्ही गोष्टी गैरअर्जदार यांनी केलेल्या नाहीत. यूक्तीवाद करते वेळेस गैरअर्जदाराने अर्जदारांना एक ऑफर दिली त्यात अजूनही ते विम्याची पॉलिसी देण्यास तयार आहेत परंतु अर्जदारांनी उर्वरित विम्याचे हप्ते भरले पाहिजेत ही अट घातलेली आहे व ती अर्जदाराने यूक्तीवादाचे वेळेस मान्यही केलेली आहे. त्यामूळे अर्जदाराची मागणी ही पूर्ण होणार आहे. अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात विम्याची रक्कम रु.50,000/-, मानसिक ञासाबददल रु.10,000/- मागितले आहेत. पॉलिसीची रक्कम ही मृत्यू झाल्यानंतरच मिळते किंवा पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभासह मिळते. अर्जदार हयात असताना व प्रपोजल मंजूर झालेले नसताना अशा रक्कमेची मागणी करणे हे चूक आहे परंतु गैरअर्जदारांनी पॉलिसी व पासबूक न देऊन किंवा काय अडचण आहे हे न कळवून सेवेत ञूटी केल्याचे दिसून येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी या निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचेकडून उर्वरित थकबाकीचे हप्ते स्विकारावेत व अर्जदार यांना पोस्टाचे पासबूक व ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.2,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/-मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |