Maharashtra

Dhule

CC/12/24

Parag ShamPatil At Post Amelner Diss Dhule - Complainant(s)

Versus

The Oryental Insurans Co Ltd K m Bhavsar Complex Lan no 5 Dhule - Opp.Party(s)

R V Nikam

13 Jun 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/24
 
1. Parag ShamPatil At Post Amelner Diss Dhule
...........Complainant(s)
Versus
1. The Oryental Insurans Co Ltd K m Bhavsar Complex Lan no 5 Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

                               


 

                                 ग्राहक तक्रार क्रमांक –    २४/२०१२


 

                                  तक्रार दाखल दिनांक – २७/०२/२०१२


 

                                 तक्रार निकाली दिनांक – १३/०६/२०१३


 

 


 

पराग शाम पाटील   


 

उ.व. २९, धंदा – शिक्षण


 

रा. राजाराम मॅनार, ढेकू रोड,


 

अमळनेर, ता. अमळनेर,


 

जि. जळगाव.                                      ................ तक्रारदार


 

 


 

        विरुध्‍द


 

शाखाधिकारी


 

दि. ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. शाखा धुळे


 

के.एम. भावसार कॉम्‍पलेक्‍स


 

गल्‍ली नं.५, धुळे ता.जि. धुळे.                        ............ सामनेवाला


 

 


 

 


 

 


 

न्‍यायासन  


 

(मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.आर.व्‍ही. निकम)


 

(सामनेवाला तर्फे – ए.बी. देशपांडे)


 

 


 

 


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.सदस्‍या – सौ. एस.एस. जैन)


 

 


 

सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर न केल्‍याने तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी इंडिगो CS ही TATA कंपनीची गाडी नं.MH-19-AP500 ही  उज्‍वल  ऑटो   मोबाईल्‍स प्रा.लि. यांचे कडुन विकत घेतली होती. सदर गाडीचा विमा दि.२०/०४/२०१० रोजी सामनेवाला यांचेकडुन काढलेला होता. सदर विमा पॉलिसीचा कालावधी दि.२०/०४/२०१० ते दि.१९/०४/२०११ पर्यंत होता. दि.१०/०१/२०११ रोजी तक्रारदार यांचे वडील शाम पाटील हे पारोळयाकडून अमळनेरकडे येत असतांना सदर गाडीचा अपघात झाला. त्‍यामुळे संपूर्ण गाडीचे रू.४,५०,०००/- चे नुकसान झालेले आहे. सदर अपघाताची अमळनेर पोलीस स्‍टेशनला खबर स्‍टेशन डायरी क्रं.१०/२०११ नुसार नोंद आहे. तसेच गाडीच्‍या अपघाताबाबतचा पंचनामा अमळनेर पोलिसांनी केलेला आहे.


 

 


 

२.   तक्रारदार यांचे  पुढे  असे  म्‍हणणे आहे की,  त्‍यांनी  गाडीच्‍या झालेल्‍या नुकसान भरपाईची मागणी केली असता सामनेवाला यांनी दि.०५/०४/२०११ रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदार यांचेकडे गाडीच्‍या कागदपत्रांची मागणी केली. त्‍यानुसार तक्रारदार यांनी पुर्तता करूनही नुकसानभरपाईची रक्‍कम अदा केलेली नाही. सदर गाडीच्‍या दुरूस्‍तीसाठी लागलेला खर्च रू.४,५०,०००/- तक्रारदार याने उज्‍वल ऑटो मोबाईल्‍स यांना अदा केलेला आहे.


 

 


 

३. तक्रारदार यांनी वारंवार मागणी करूनही सामनेवाला यांनी नुकसान भरपाईची रककम न दिल्‍याने तक्रारदारने सामनेवाला यांना दि.२३/०५/२०११ रोजी रजि. नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी रक्‍कम अदा केली नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रृटी केली आहे.


 

 


 

४.   तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून गाडीची नुकसान भरपाई रक्‍कम रू.५,००,०००/- मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू.५०,०००/- तसेच तक्रार अर्जाचा खर्चरू.१०,०००/- देण्‍याचा आदेश करावा, अशी विनंती केली आहे.


 

 


 

५.   तक्रारदार यांनी आपले म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ नि.४ सोबत खबर (फिर्याद) पंचनामा, पॉलीसीची झेरॉक्‍स प्रत, नोटीस, पोहच पावती, उज्‍वल ऑटोमोबाईल्‍स यांच्‍या बिलाची झेरॉक्‍स प्रत, वाहन चालकाचा परवाना पत्राची झेरॉक्‍स प्रत, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.


 

 


 

६.   सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणे नि.६ वर दाखल केले आहे. त्‍यात त्‍यांनी तक्रारीतील मागणी खोटी आहे. तक्रार चालविण्‍याचा मंचाला अधिकार नाही. तसेच विमा कंपनीने कोणत्‍याही प्रकारे सेवेत कमतरता केलेली नाही. सबब सदरचा अर्ज रदद करण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.


 

 


 

७.   विमा कंपनीने पुढे असे म्‍हटले आहे की तक्रारदाराला वाहनाबाबत कागदपत्र देणे संबंधी दि.२२/०२/११, दि.१७/०६/११, दि.२२/०३/१२ व दि.१४/०६/१२ पत्रांदवारे कळवूनही तक्रारदारने कोणतेही कागदपत्रे न दिल्‍याने दि.१३/०८/१२ रोजी रजि. पोस्‍टाने कळवून त्‍याची फाईल बंद करण्‍यात आलेली आहे. सर्वेअरने केलेल्‍या अहवालानुसार नुकसानीचे मुल्‍यमापन रू.२,७२,०१६.५४ पैसे इतके आहे. 


 

 


 

८.   विमा कंपनीने आपले म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ नि.८ वर शपथपत्र, नि.९ सोबत तक्रारदारला दि.२२/०२/११, दि.१७/०६/११, दि.२२/०३/१२ व दि.१४/०६/१२ रोजी पाठविलेल्‍या पत्रांची प्रत, पोच पावत्‍या, सर्वेअर पी.के. राठी यांचा रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.


 

 


 

९.   तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्तिवाद ऐकल्‍यानंतर व दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍या समोर निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.


 

 


 

 


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

१.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना    


 

दयावयाच्‍या सेवेत त्रृटी केली आहे काय ?                               होय


 

२.     तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास


 

पात्र आहे ?                               अंतिम आदेशाप्रमाणे


 

३.     अंतिम आदेश ?                                 खालीलप्रमाणे


 

 


 

विवेचन


 

१०. मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांचे वडील शाम पाटील हे दि.१०/०१/२०११ रोजी सकाळी १०.०० ते १०.३० वाजेच्‍या दरम्‍यान  प्रवास  करीत  असतांना   गाडीच्‍या पुढील चाकाची हवा निघाल्‍याने गाडीचा तोल जावून गाडी झाडाला ठोकली गेली व त्‍यामुळे गाडीचे रक्‍कम रू.४,५०,०००/- नुकसान झाले. सदर अपघाताची नोंद अमळनेर पोलीस स्‍टेशन डायरी क्रं.१०/२०११ नुसार नोंद करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे त्‍यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता विमा कंपनीने त्‍यांना रक्‍कम दिली नाही व सेवेत त्रृटी केली आहे.


 

 


 

११. या संदर्भात विमा कंपीनने आपल्‍या खुलाश्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदारला वेळोवेळी पत्रव्‍यवहार करून अपघातग्रस्‍त वाहनाचे कागदपत्र देणेबाबत कळवूनही तक्रारदारने कोणतेही कागदपत्र न दिल्‍याने दि.१३/०८/२०१२ रोजीच्‍या पोस्‍टाने कळवून त्‍यांची फाईल बंद करण्‍यात आलेली आहे. तसेच कंपनीच्‍या सर्वेअर कडून अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या नुकसानीचे मुल्‍यमापन विमा कंपीनीने केलेले आहे. सर्वेअरच्‍या अहवालानुसार तक्रारदारचे रू.२,७२,०१६.५४ पैसे इतके नुकसान झालेले आहे. असे नमुद केलेले आहे.


 

 


 

१२. तक्रारदार यांच्‍या तक्रारीत तसेच त्‍यांचे वकिलांनी केलेल्‍या युक्‍तीवादात त्‍यांनी विमा कंपनीला संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करून देखील नुकसान भरपाईची रक्‍कम अदा केलेली नाही असे नमुद केले आहे. त्‍याकरिता आम्‍ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या नि.४ वरील कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्‍यात तक्रारदार यांनी गाडीच्‍या अपघाता संबंधी पंचनामा, फिर्याद (खबर), इ. कागदपत्रे दाखल केलेले आहे. 


 

 


 

१३. वास्‍तविक विमा कंपनीने श्री.पी.के. राठी जे की मुल्‍यांकन करणारे तज्ञ आहेत त्‍यांचा अहवाल दाखल केलेला आहे. श्री. सर्वेअर पी.के. राठी हे तज्ञ असल्‍यामुळे त्‍यांनी दिलेला अहवाल मान्‍य करणे उचित राहिल असे आम्‍हास वाटते.


 

 


 

     या संदर्भात आम्‍ही सन्‍मानीय राष्‍ट्रीय आयोग, न्‍यु दिल्‍ली यांचा निवाडा 2008 CTJ 580 (CP) (NCDRC) – NATIONAL CONSUMER DISPUTES REDREESAL COMMISSION, NEW DEHLHI – United India Insurance Company Ltd. V.s. Smt. Maya चा आधार घेत आहोत. त्‍यामध्‍ये मा. राष्‍ट्रीय आयोगाने खालील प्रमाणे मत व्‍यक्‍त केलेले आहे.


 

 


 

            A surveyor’s report should not be dismissed summarily. It has to be given the importance it deserves as surveyor is an independent and qualified person under the relevant provisions of the Insurance Act. 


 

 


 

१४. अश्‍या परिस्थितीत विमा कंपनीने त्‍यांना अपघात  झाल्‍याचे  मान्‍य  असून,  तसेच  त्‍यांनी  अपघातग्रस्‍त    वाहनाच्‍या नुकसानीचा सर्व्‍हे करूनही केवळ गाडी संदर्भात कागदपत्रे दिले नाहीत हया तांत्रिक कारणामुळे तक्रारदार यांना नुकसान भरपाईची रक्‍कम न देवून सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्‍ही आलो आहोत. म्‍हणून मुददा क्रं.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१५. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून गाडीची नुकसान भरपाईची रककम रू.५,००,०००/- शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.५०,०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रू.१०,०००/- ची मागणी केली आहे. आमच्‍या मते तक्रारदार हे विमा कंपनीच्‍या सर्वेनुसार नुकसान भरपाई रक्‍कम रू.२,७२,०१६.५४/- पैसे मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे. तक्रारदार यांना सदर तक्रार दाखल करण्‍यासाठी खर्च व मानसिक त्रास झालेला आहे हे नाकारता येत नाही. त्‍यामुळे तक्रारदार मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू.५०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रू.१,०००/- मिळण्‍यास पात्र आहेत.


 

 


 

१६. मुद्दा क्र.३-  वरील विवेचनावरून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.


 

 


 

आ दे श


 

 


 

१.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.  (अ) सामनेवाला दि. ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. शाखा धुळे यांनी तक्रारदारास रक्‍कम रू.२,७२,०१६.५४/- पैसे आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३०    दिवसाच्‍या आत दयावेत.  


 

 


 

     (ब) सदर रक्‍कम मुदतीत न दिल्‍यास, संपूर्ण रक्‍कम देईपावेतो    द.सा.द.शे. ९% दराने व्‍याजासहीत रक्कम दयावी.


 

 


 

३.  सामनेवाला दि. ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. शाखा धुळे यांनी मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू.५०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रू.१०००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाच्‍या आत दयावेत.


 

 


 

 


 

                 (सौ.एस.एस. जैन)                  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                 सदस्‍या                            अध्‍यक्षा


 

                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.