जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/242. प्रकरण दाखल तारीख - 03/11/2009 प्रकरण निकाल तारीख – 22/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा पिंगळीकर,देशमूख - सदस्या गजानन पि. बालाजी मेडेवार वय, 20 वर्षे, धंदा निरंक रा. एनडी-42, एच 39/5, ज्ञानेश्वर नगर, सिडको, नांदेड अर्जदार विरुध्द. दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत वीभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार संतकृपा मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.प्रवीण अग्रवाल. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या ) अर्जदाराने हा अर्ज त्यांला गैरअर्जदार ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी यांनी दिलेलया ञूटीच्या सेवे बददल दाखल केलेला आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा 12 वी वर्गात शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड येथे शिक्षण घेत होता. सदरील महाविद्यालयाने राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेखाली गैरअर्जदार इन्शूरन्स कंपनीकडून त्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्याचा विमा काढलेला होता. अर्जदार हा दि.19.08.2008 रोजी तिरुपती येथून येत असताना रेल्वेमधे पडून अपघात झाला व त्यामध्ये तो जखमी झाला. या अपघातात अर्जदाराचा उजवा पाय गुडघ्याचे वरुन निकामी झाला व त्यांस अपंगत्व आले. सदरील अपघाताचे कागदपञ तिरुपती रेल्वे पोलिस स्टेशन कडून अर्जदाराने घेतले आणि दि.25.6.2008 रोजी गैरअर्जदार यांचे कार्यालयात दाखल केले. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने पून्हा अर्जदाराने 6.4.2009 रोजी गैरअर्जदाराचे कार्यालयात क्लेम फॉर्म व सर्व कागदपञाची पूर्तता केली व राजीव गांधी योजनेखाली क्लेम देण्याची विनंती केली. दि.26.06.2009 रोजी गैरअर्जदार यांचे कार्यालयात अर्जदाराने पून्हा इन्शूरन्स क्लेम देण्या बाबत विनंती केली व सदरील योजनेचा लाभ त्वरीत देण्याची मागणी केली. तरी ही गैरअर्जदाराने अर्जदारास विमा रक्कम दिली नाही म्हणून अर्जदाराने वकिलामार्फत दि.10.08.2009 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व सदरची तक्रार दाखल केली. अर्जदाराने या मध्ये इन्शूरन्सीची रक्कम रु.30,650/- त्यावर दि.19.08.2008 पासून 12 टक्के व्याजाने दयावी अशी मागणी केली आहे. तसेच मानसिक ञासाबददल रु.1,00,000/- व दावा खर्च म्हणून रु.10,000/- मागितले आहेत. अर्जदाराने नि.क्र.2 वर शपथपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार कंपनी हजर झाली व त्यांनी आपले शपथपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचे म्हणणेप्रमाणे सदरची विमा पॉलिसी ही महाराष्ट्र शासनाने काढलेली असल्यामूळे अर्जदार हा ग्राहक होऊ शकत नाही.गैरअर्जदार यांनी शपथपञ दाखल केलेले आहे व महाराष्ट्र शासनाचे योजने संबंधीचे परिपञक दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ यांची तपासणी करुन खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदार हे गैरअर्जदाराकडून विमा रक्कम घेण्यास पाञ आहे काय ? होय. 3. गैरअर्जदार विमा कंपनी हे अर्जदारास विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ते 3 ः- अर्जदार हा बारावी वर्गात शिकत असताना दि.19.08.2008 रोजी तिरुपती येथून येत असताना रेल्वेमधून पडून त्यांचा अपघात झाला होता व त्यांचा उजवा पाय गुडघ्याचे वरपासून निकामी झालेला होता. अर्जदाराने दाखल केलेले अपघाताबददलचे कागदपञ,, तिरुपती रेल्वे पोलिस स्टेशन कडून कागदपञ मंचासमोर दाखल केले. दि.25.6.2008 व दि.16.4.2009 या दोन्ही दिनाकांना अर्जदाराने क्लेम फॉर्म व कागदपञ गैरअर्जदाराकडे दिलेले होते. तरी आजतागायत गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम सेटल केलेला नाही. म्हणून गैरअर्जदाराला वकिलामार्फत नोटीस पाठवून मंचामध्ये तक्रार दाखल करणे भाग पडले. गैरअर्जदाराने आपले निवेदन दाखल केले. सदरची विमा पॉलिसी महाराष्ट्र शासनाने काढली असल्यामूळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होऊ शकत नाही तसेच अर्जदार हा ज्या संस्थेत शिक्षण घेत आहे ती संस्था शासनाकडे अनुदान मान्य शाळा नाही म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम आजपर्यत सेटल केलेला नाही. पण हे गैरअर्जदाराचे म्हणणे तथ्यहीन वाटते. कारण जर शाळा मान्यता प्राप्त किंवा अनुदानीत नाही तर शासनाकडून प्रिमियन भरुन घेत असताना त्यांचा विचार गैरअर्जदाराने करणे आवश्यक होते म्हणून गैरअर्जदार यांनी दाखवलेले कारण हे त्यांचे म्हणण्यास पूष्ठी देणारे वाटत नाही. अर्जदाराने घेतलेला वैद्यकीय इलाज त्यांस लागणारी औषधी, या बददलचे पूरावे तसेच घेतलेल्या औषधाची बिले सर्व मंचासमोर दाखल केलेली आहेत (नि.क्र.4) या प्रकारची सर्व कागदपञ दाखल केलेली आहेत. यावरुन अर्जदाराचा अपघात झालेला होता हे सिध्द होते. राजीव गांधी विद्यार्थी सूरक्षा योजनेचा तो लाभार्थी आहे या नीर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. शासनाच्या परिपञकाप्रमाणे एका पायाचे नूकसान झाल्यास त्यांस रु.20,000/- विमा रक्कम व रु.10,000/- औषधी खर्च, शैक्षणीक खर्च वाया गेल्याबददलचे शूल्क म्हणून रु.650/-ही रक्कम अपघातग्रस्त विद्यार्थ्यास दयावी अशा प्रकारचा नियम आहे. त्या नियमास धरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.30,650/- दयावेत या नीर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. अपघात दि.19.08.2008 रोजी झालेला होता. दि.25.8.2008 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कमेची मागणी केलेली होती. संपूर्ण कागदपञ ही दाखल केलेले होते तरी ही गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराची मागणी मंजूर केली नाही. म्हणून दि.01.11.2008 रोजी पासून गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.30,650/- 9 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम एक महिन्याचे आंत दयावी असा नीर्णय हे मंच करीत आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात येतो. 1. 2. अर्जदारास गैरअर्जदार यांनी 9 टक्के व्याजाने दि.01.11.2008 पासून रु.30,650/- एक महिन्याचे आंत दयावेत, एक महिन्यात सदर रक्कम जमा न केल्यास संपूर्ण रक्कमेवर 12 टक्के व्याजाने संपूर्ण रक्कमे मिळेपर्यत व्याज गैरअर्जदार यांनी दयावे. 2. 3. दाव्याचा खर्च रु.500/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दयावा. 4. उभयपक्षाना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील सौ.सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |