-: निकालपत्र :-
( पारित दिनांक : 28 जानेवारी 2015 )
मा. सदस्य श्री. ए.सी. ऊकळकर , यांचेनुसार :-
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर दरखास्त प्रकरणात, निशाणी-6 प्रमाणे तक्रारकर्ती यांनी दिनांक 03/01/2015 रोजी स्वत:हून तक्रार मागे घेण्याकरिता पुर्सीस दाखल केली. त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
सदर प्रकरण वि. न्यायालयात दाखल असून, सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार दि. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा वाशिम हयांनी तक्रारकर्तीस वि. न्यायमंचाच्या आदेशाप्रमाणे रक्कम ( दिनांक 05/12/2014 धनादेश क्र. 046909 रुपये 1,31,000/- ) दिली आहे. सदर रक्कम तक्रारकर्तीस पावली आहे. त्याकरिता सदर प्रकरण पुढे चालविणे नाही.
सोबत धनादेशाची प्रत जोडलेली आहे व तक्रारकर्तीने स्वत:हून आपली दरखास्त मागे घेण्याचे पुर्सीसमध्ये नमुद केले आहे.
अशास्थितीत, सदर दरखास्त प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर दरखास्त, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर दरखास्त प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.