Maharashtra

Kolhapur

CC/09/750

Keraba Rama Patil. - Complainant(s)

Versus

The Orietal Insurance Co ltd. - Opp.Party(s)

P.S.Bharma,

20 Jul 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/750
1. Keraba Rama Patil.Tarle.Tal-Radhanagri.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Orietal Insurance Co ltd.Near Ajani Chowk.Vardh Road.Nagpur.2. Kabal Insurance Services Pvt. Ltd.109, Karandikar House Near Mangal Theater,Shivajinagar, Pune-05 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.S.Bharma,, Advocate for Complainant
Sou.C.A.Jadhav., Advocate for Opp.Party

Dated : 20 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

(निकालपत्र  (सौ.वर्षा एन.शिंदे)    (दि.20/07/2010      ( 

 

1)         प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

 

            तक्रारदाराचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना अंतर्गतचा योग्‍य व न्‍याय्य क्‍लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केली आहे. 

 

(2)         तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे तारळे खुर्द ता.राधानगरी जि.कोल्‍हापूर येथील कायमचे रहिवाशी असून ते शेती व्‍यवसाय करतात. सदर गावी गट नं.93 ही देवस्‍थानची जमीन कसणेसाठी दिलेली आहे. प्रस्‍तुत सामनेवाला विमा कंपनी असून विमा व्‍यवसाय करते.

 

            ब) तक्रारदाराचा विमा महाराष्‍ट्र शासन निर्णय एनएआयएस 1204/प्र.क्र.166/11ए मधील 5 जानेवारी 2005 निर्गमीतनुसार शेतकरी अपघात विमा उतरविला होता. नमुद विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने सामनेवालांना अदा केलेला होता.

 

            क) तक्रारदार दि.23/10/2007 रोजी भातांनी भरलेली पोती बैलगाडीतून घराकडे घेऊन जात असताना अपघात होऊन त्‍याचे उजव्‍या पायास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तक्रारदारस सी.पी.आर. हॉस्पिटलमध्‍ये नेले. तरीही पाय बरा झालेला नाही. त्‍यांच्‍या उजव्‍या पायास 40 टक्‍के अपंगत्‍व आले आहे व सदर अपंगत्‍व कायमचे आहे. अपंगत्‍वाचा दाखला सिव्‍हील सर्जन यांनी दिलेला आहे.

 

            ड) दि.15/2/2008 रोजी तक्रारदाराने योग्‍य ते सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह क्‍लेम फॉर्म भरुन क्‍लेम मागणी केली असता दि.24/03/2009 रोजीच्‍या पत्राने पॉलीस अंतर्गत अपंगत्‍व 50 टक्‍केच्‍या वर असेल तर दावा मान्‍य होऊ शकतो या कारणावरुन क्‍लेम नाकारला आहे. सबब तक्रारदार हे गरीब शेतकरी असून त्‍यांचेवर कुटूंबाची जबाबदारी आहे. सदर अपघाताने तक्रारदाराचे मनावर आघात झालेला आहे. सदरचा क्‍लेम न मिळाल्‍यास त्‍याचे कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. सबब सामनेवालांनी क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सबब तक्रारदाराच तक्रार मंजूर करुन तक्रारदारास विमा रक्‍कम रु.50,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह वसूल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.

 

(3)         तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत तक्रारदाराने तहसिलदार यांचेकडे केलेला अर्ज, क्‍लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, गावकामगार तलाठी यांचा पंचनामा, पंचनामा, पोलीस पाटील यांचा दाखला, अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, गट नं.93 चा 7/12 उतारा, जिल्‍हाधिकारी कोल्‍हापूर यांचा आदेश, तक्रारदाराचे ओळखपत्र, तक्रारदारचे बँकेचे पासबुक, रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, सामनेवाला क्र.1 यांनी दावा नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

 

(4)         सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराचे तक्रार अर्जातील मजकूर खोटा व चुकीचा असल्‍याने तो सामनेवाला यांना मान्‍य व कबूल नाही; सदर अर्ज कायदयाने चालणेस पात्र नाही. सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. तक्रार अर्जातील कलम 2 मधील मजकूर तक्रारदाराने पुरावा देवून शाबीत करावा. तक्रार अर्जातील कलम 3 ते 6, 9 (अ) ते (क) मधील मजकूर मान्‍य नाही. तक्रार अर्जातील कलम 7 वर भाष्‍य करणेचे कारण नाही.

            याबाबत वस्‍तुस्थिती अशी आहे की, तक्रारदाराचा सामुहिकरित्‍या जनता (शेतकरी) व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. त्‍यावेळी तक्रारदाराने विमा पॉलीसीतील अटी व शर्ती मान्‍य केल्‍या होत्‍या व आहेत. करारपत्रातील अटी व शर्तीनुसार तसेच रिस्‍क कव्‍हरेज डिटेल्‍स प्रमाणे कलम 5 प्रमाणे एक अवयव पूर्णपणे निकामी झालेस विमा रक्‍कमेच्‍या 50 टक्‍के रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र असू शकतो. मात्र पार्शियल डिसअ‍ॅबिलमेंट करिता त्‍याला पॉलीसीचा लाभ मिळणार नाही असे स्‍पष्‍ट नमुद केले आहे. तक्रारदारास 40 टक्‍के अपंगत्‍वाचा दाखला दिलेला असल्‍याने सदर अपंगत्‍व हे पार्शियल डिसअ‍ॅबलमेंट आहे हे स्‍पष्‍ट आहे. सबब तक्रारदाराचा क्‍लेम अस्विकृत केला आहे. तसेच नमुद अपंगत्‍व प्रमाणपत्र कोर्ट कामाचे उपयोगाचे नाही. असा स्‍पष्‍ट उल्‍लेख सदर प्रमाणपत्रावर नमुद असलेने सदर प्रमाणपत्र याकामी वाचता येणार नाही. सबब तक्रारदाराने खोटा दावा दाखल केल्‍यामुळे तो खर्चासह फेटाळणेत यावा व तक्रारदारास दंड करावा अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे.

 

(5)         सामनेवाला क्र.1 यांनी आपले लेखी म्‍हणणेसोबत पॉलीसी प्रत अ‍ॅग्रीमेंट व शेडयूलसह दाखल केली आहे.

 

(6)         तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षाचे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.

1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?             --- होय.

2) तक्रारदार विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?         --- होय.

3) काय आदेश ?                                              --- शेवटी दिलेप्रमाणे

मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचा विमा सामनेवाला क्र.1 कडे उतरविलेला आहे. तसेच दि.24/03/2009 रोजी तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला क्र.1 यांनी नाकारलेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराचा दि.23/10/2007 रोजी अपघात झाला हे दाखल F.I.R. व पंचनाम्‍यावरुन निर्विवाद आहे. तक्रारदार भात्‍याची पोती बैलगाडीतून आणत असताना बैल गाडी पलटी होऊन त्‍यांचे उजव्‍या पायास दुखापत झाली. त्‍याबाबत सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्‍हापूर येथे उपचार झाले. तक्रारदाराचा पाय या अपघातात मोडला आहे. सिव्‍हील सर्जन यांनी तक्रारदारास 40 टक्‍के अपंगत्‍व आलेचा दाखल दिला आहे. तसेच सदरचे अपंगत्‍व कायमचे (Permanant) असल्‍याचे नमुद केलेले आहे. म्‍हणजेच सदर अपंगत्‍व Partial नाही. पूर्वीप्रमाणे त्‍याच ताकदीने शेतीची कामे करु शकणार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच सामनेवाला यांनी सदर अपंगत्‍व प्रमाणपत्राचा आधार घेऊनच 40 टक्‍के अपंगत्‍व असल्‍याने दावा नाकारला आहे. सबब सदर प्रमाणपत्र कोर्टात वापरता येणार नाही हे प्रमाणपत्रावर नमुद असलेने या कामी वाचता येणार नाही हा आक्षेप हे मंच फेटाळत आहे. सिव्‍हील सर्जनचे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र हे विश्‍वासार्ह पुरावा म्‍हणून विचारात घेवून यापूर्वी बरेच निकाल दिलेले आहेत.

 

            सामनेवालांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.1,00,000/- असून करारपत्रातील अटी व शर्तीप्रमाणे क्‍लॉज 5 चा विचार करता Loss of one Limb or one eye 50 % of the capital of sum insured असे नमुद आहे. नमुद क्‍लाजचा विचार करता तक्रारदाराचे उजव्‍या पायास कायमचे अपंगत्‍व आलेले आहे हे सिव्‍हील सर्जनच्‍या प्रमाणपत्रावरुन सिध्‍द होते तसेच कुठलेही अपंगत्‍व हे कायमचे आहे की तात्‍पुरते आहे हे Nature of Injury (जखमेचे स्‍वरुप) व तो करत असलेले कामकाज यावर ठरते नाही अपंगत्‍वाच्‍या टक्‍केवारीवर. नमुद अपघातात तक्रारदाराचा उजवा पाय मोडल्‍यामुळे त्‍यास कायमचे अपंगत्‍व आलेले आहे. त्‍यामुळे पूर्वीच्‍या ताकदीने शेतकरी म्‍हणून तो शेतीची कामे करु शकणार नाही ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. त्‍याकरिता हे मंच पुढील पुर्वाधारचा आधार घेत आहे.

NATIONAL CONSUMER DISPUTES RESDRESSAL COMMISSION NEW DELHI -  Revision Petition No.1390 of 2006 Sh. Mahendra Agarwal S/o Shri B.S.Gupta Vs. Oriental Insurance Co.Ltd. मध्‍ये प्रस्‍तुत राष्‍ट्रीय आयोगाने असे नमुद केले आहे की, प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये उजव्‍या डोळयास 30 टक्‍के अपंगत्‍व आलेले आहे. मात्र डोळयाची दृष्‍टी कायमची गेलेली आहे. याचा विचार करता अपघातामध्‍ये उजव्‍या डोळयास कायमचे अपंगत्‍व आलेने विमा रक्‍कमेच्‍या 50 टक्‍के रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असा आदेश केलेला आहे. सबब प्रस्‍तुत तक्रारीस सदरचा पूर्वाधार तंतोतंत लागू होतो. पॉलीसीचा लाभ Partial Disabilenent साठी मिळणार नाही असे क्‍लॉजमध्‍ये नमुद आहे. तक्रारदाराचे उजवे पायास कायमचे अपंगत्‍व आलेले आहे हे Partial Disabilenent नाही. तक्रारदार पूर्वीच्‍या ताकदीने शेतीची कामे करु शकणार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. पॉलीसी कालावधी हा दि.15/08/2007 ते 14/08/2008 असून तक्रारदाराचा अपघात दि.23/10/2007 रोजी झालेला आहे. सबब विमा कालावधीत अपघात होऊन तक्रारदाराचे उजवे पायास कायमचे अपंगत्‍व आलेले आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा मूळ उद्देश विचाराता न घेता निव्‍वळ तां‍त्रीक कारणावरुन तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेला आहे. तक्रारदारांना विमा रक्‍कम न देणे ही सामनेवाला क्र.1 यांच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला क्र;2 हे फक्‍त मध्‍यस्‍थ आहेत. त्‍यांना विमा रक्‍कम देणेसाठी जबाबदार धरता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनानुसार तक्रारदार पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.50,000/- व्‍याजासहीत मिळणेस पात्र आहेत.

 

मुद्दा क्र.3 :- सामनेवाला क्र.1 यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास तक्रार दाखल करावी लागल्‍याने तक्रारदार तक्रार खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

                              आदेश

 

1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

2) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्‍कम रु.50,000/-(रु.पन्‍नास हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.24/03/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.

 

 

 

           

               


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT