Maharashtra

Wardha

CC/54/2012

SAU. ASMITA ANANDRAO DOFE - Complainant(s)

Versus

THE ORIENTLAL INSURANCE CO.LTD. THROUGH MANAGER,NAGPUR - Opp.Party(s)

HAJARE

17 Sep 2013

ORDER

DISTT.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
SEWAGRAM ROAD
NEAR YASHVANT COLLEGE
WARDHA 442001
MAHARASHTRA (PH.NO.0752-243550)
 
Complaint Case No. CC/54/2012
 
1. SAU. ASMITA ANANDRAO DOFE
R/O KOLONA,DEOLI
WARDHA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTLAL INSURANCE CO.LTD. THROUGH MANAGER,NAGPUR
NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Milind B.Pawar PRESIDENT
 HONABLE MR. Shri Milind R. Kedar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकालपत्र
( पारीत दिनांक :17/09/2013 )
( द्वारा अध्‍यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगडे) )
 
01. अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.
1.   गैरअर्जदार यांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा
   योजने अंतर्गत मिळणारी राशी रु.1,00,000/- ही
   18 टक्‍के व्‍याजदराने द्यावी.
2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीचा खर्च
    रु.5000/-
 
अर्जदाराच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे आहे.
 
अर्जदार हिने सदर तक्रार अर्जामध्‍ये नमुद केले आहे की, अर्जदार हि मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे यांची मुलगी आहे. मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे यांचे नावे मौजा-कोळोणा (चोरे), ता.देवळी, जि.वर्धा येथे  भुमापन क्र. 219 अंतर्गत शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्‍त शेतक-यांस व त्‍याच्‍या कुटुंबियास लाभ देण्‍याकरीता 15 ऑगस्‍ट 2007 ते 14 ऑगस्‍ट 2008 या कालावधीकरिता शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना काढली होती. 
अर्जदार यांनी नमुद केले आहे की, मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे व वडील मयत श्री. अंबादासजी वडगुजी भस्‍मे हयांनी दिनांक 21/10/2007 रोजी चुकीने विषबाधीत शेवळया खाल्‍यामुळे उपचारादरम्‍यान दिनांक 22/10/2007 चे मध्‍यरात्री त्‍यांचा मृत्‍यु झाला. अर्जदार हिने पुढे नमुद केले आहे की, त्‍यानी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत राशी मिळण्‍याकरीता गैरअर्जदार क्र.2 तर्फे गैरअर्जदार क्र.3 यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांना विमा दाव्‍यासह सर्व कागदपत्रे दिले. अर्जदार हिने गैरअर्जदार यांच्‍याकडे वारंवार विमा दाव्‍याच्‍या रकमेविषयी विचारणा केली असता तिला उडवाउडविचे उत्‍तर देण्‍यात आले असे अर्जदार हिचे म्‍हणणे आहे. अर्जदार हिने पुढे नमुद केले आहे की, आजतागायत गैरअर्जदार यांनी अर्जदार हिचा विमा दावा मंजुरही केला किंवा नाही किंवा खारीजही केला नाही किंवा त्‍याबाबत कुठल्‍याही प्रकारचा पत्रव्‍यवहार गैरअर्जदार यांनी तिच्‍याशी केलेला नाही. गैरअर्जदार हिने विमा दाव्‍यासंबंधीचे सर्व कागदपत्रे देवुनही गैरअर्जदार यांनी त्‍या विषयी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रृटी असुन त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचामध्‍ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
 
02. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्‍यानुसार गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने/ आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हिने मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे हिच्‍या दुस-या इतर वारसदारांबाबत कोणताही उल्‍लेख केलेला नाही तसेच अर्जदार हिला दिनांक 31/12/2009 रोजी पत्र पाठवुन आवश्‍यक कागदपत्राची पुर्तता करण्‍याबाबत कळविण्‍यात आलेले होते व ती न केल्‍यास विमा दावा नामंजुर करण्‍यात येईल असेही कळविण्‍यात आले होते व त्‍याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार हिचा विमा दावा कट ऑफ डेट नुसार नामंजुर केला आहे. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदार हिने विमा दाव्‍या संबंधीचे कागदपत्रे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांच्‍याकडे विहीत मुदतीमध्‍ये पुरविले किंवा नाही हयाबाबत काहीही माहिती नाही. त्‍यामुळे त्‍यांनी वेळोवेळी गैरअर्जदार क्र.3 व अर्जदार यांना कागदपत्रांची मागणी केलीली होती, परंतु गैरअर्जदार क्र.3 व अर्जदार यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता न केल्‍यामुळे सदरचा विमा दावा नामंजुर करण्‍यात आला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यांच्‍याकडुन सेवे मध्‍ये कोणतीही टाळाटाळ किंवा दिरंगाई करण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे अर्जदाराची त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
03. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हयांना प्रस्‍तुत प्रकरणात नोटीस प्राप्‍त होवुनही ते मंचासमक्ष हजर झाले नाही त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुध्‍द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा निर्णय मा.मंचाने घेतला आहे. 
04. अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत गाव नमुना सात बारा, अकस्‍मात मृत्‍यु खबरी, घटनास्‍थळ पंचनामा, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, मृत्‍युप्रमाणपत्रे, इत्‍यादी एकुण 11 दस्‍तावेंजांच्‍या छायांकीत प्रती व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला  आहे.
-: कारणे व निष्‍कर्ष :-
05      सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांकरिता ‘‘ गृप पर्सनल अक्‍सींडेट पॉलिसी’’ अंतर्गत अपघाती मृत्‍यु किंवा अपंगत्‍व आल्‍यास शेतकरी व त्‍यांच्‍या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतूने महाराष्‍ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्रं. 1 विमा कंपनीने उपरोक्‍त विमा योजनेनुसार जोखीम स्विकारली, याबद्दल वाद नाही.   
06. अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्‍तावेजांवरुन असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार हिने, मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे  यांचे वारसदार या   नात्‍याने, विमाधारक मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे हे दिनांक 21/10/2007 रोजी सायंकाळी 8.00 वाजता विषारी औषधीचा डब्‍बा शेवळयांच्‍या डब्‍यावर पडला व त्‍यामुळे शेवळयांनासुध्‍दा विष लागले व त्‍या विषबाधीत शेवळया खाल्‍यामुळे उपचारादरम्‍यान दिनांक 22/10/2007 चे मध्‍यरात्री त्‍यांचा मृत्‍यु झाला हे नि.क्र.2 वरील अनुक्रमांक 1 ते 6 वरील पोलिस कागदपत्रावरुन व पोष्‍टमार्टेम रिपोर्टवरुन दिसून येते, व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्‍कमेची मागणी केलेली आहे.
07.     मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे  हया शेतकरी होत्‍या या पुष्‍ठर्थ भुमापन क्र.219 मध्‍ये मौजा-कोळोणा(चोरे), ता.देवळी, जि.वर्धा  येथील 7/12 उतारा निशानी क्र.2/8 कडे दाखल करण्‍यात आला आहे. यावरुन मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे  हया शेतकरी होत्‍या व त्‍यांचा, शासन निर्णया नुसार दिनांक 15ऑगस्‍ट2007  ते 14 ऑगस्‍ट 2008या कालावधी करीता शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा काढण्‍यात आला होता ही बाब स्‍पष्‍ट दिसुन येते.
 
08. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले म्‍हणणेमध्‍ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे दिनांक 31/12/2009 रोजीचे पत्राप्रमाणे मागणी केलेले कागदपत्र पुरविले नाही त्‍यामुळे कट ऑफ डेट नुसार कागदपत्राअभावी विमा दावा नामंजुर करण्‍यात आला व तसे अर्जदार हिला कळविण्‍यात आले होते असे कथन केले आहे. मात्र दिनांक 31/12/2009 रोजी अर्जदार हिला कागदपत्रे मागविले होती त्‍या बाबतचा पत्र व्‍यवहार किंवा त्‍यांची झेरॉक्‍स प्रत इ. एकही पुरावा याकामी गैरअर्जदार यांनी दाखल केला नाही. तसचे या कारणास्‍तव विमा प्रस्‍ताव नाकारण्‍यात येत आहे हे सुध्‍दा गैरअर्जदार यांनी तक्रारकर्ती हिला कळविले होते किंवा नाही याबाबतचा पत्र व्‍यवहार गैरअर्जदार यांनी पुराव्‍यानिशी दाखल केलेला नाही. त्‍यामुळे, अर्जदार हिने कागदपत्रे दिली नव्‍हती म्‍हणुन विमा दावा नामंजुर करण्‍यात आला हे गैरअर्जदार क्र.1 यांचे कथन तथ्‍यहीन ठरते. गैरअर्जदार क्र.2 यांनीही अर्जदार हीचा प्रस्‍ताव सर्व त्रुटींची पुर्तता करुन गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे पाठविला हे नि.2/10 व नि.2/11 वरुन दिसुन येते. पोलीस पेपर तसेच वैद्दकीय दाखला, पोस्‍ट मार्टेन अहवालामध्‍ये    मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे  हया विषबाधेमुळे मरण पावल्‍या असे स्‍पष्‍ट लिहीले आहे. त्‍यामुळे मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे हया विषबाधेमुळे मरण पावल्‍या आहे या गोष्‍टीस पुष्‍ठी मिळते व तसे मा.मंचाचे मत आहे.       
09.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी, अर्जदार हिने इतर वारसदारांना समाविष्‍ट केले नाही असा आक्षेप घेतला आहे. मात्र नि.2/10 वरील तलाठी यांचे वारसा प्रमाणपत्रात मयतास अर्जदार हीच एकमेव वारस मुलगी आहे असा उल्‍लेख केलेला दिसतो. त्‍यामुळे इतर वारसांचा प्रश्‍नच उद्भवत नाही.
 
10. प्रस्‍तुत प्रकरणातील हकीकत व परिस्थितीवरुन असे दिसुन येते की, मयत सौ.मुद्रकाबाई अंबादासजी भस्‍मे  यांचा अपघाती मृत्‍यु झालेला आहे. या शिवाय गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे अर्जदाराचा विमा प्रस्‍ताव योग्‍य मार्गाने गैरअर्जदार क्र.2 व 3 मार्फत पोहचविण्‍यात आला, तरीही गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणत्‍याही सबब कारणांशिवाय नाकारला तसेच त्‍याबाबत कोणताही पत्रव्‍यवहार पुराव्‍यासह वि.मंचासमक्ष दाखल केला नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांचे कृती मुळे अर्जदार यांना विमा लाभ मिळाला नाही. म्‍हणुन अश्‍या परिस्थितीत, अर्जदारास विमा योजनेतील लाभापासुन वंचित ठेवणे हे न्‍यायोचित होणार नाही.
11.   उपरोक्‍त सर्व दस्‍ताऐवज, पुरावे व प्रतिज्ञालेखावरील पुरावे ग्राहय धरुन आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार महाराष्‍ट्र शासनामार्फत राबविण्‍यात येणा-या वैयक्तिक शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ रु.1,00,000/- (रुपये एक लाख) मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचास वाटते.
12. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्‍या कर्तव्‍यात निष्‍काळजीपणा व हलगर्जीपणा केला, म्‍हणुन अर्जदारास विमा योजनेतील लाभांपासुन वंचित राहावे लागले, तसेच सदर प्रकरण दाखल करावे लागले ही बाब ग्राहय धरुन आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार, गैरअर्जदार क्र.1 कडुन मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 1500/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्‍यास पात्र आहे.
13)   गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांच्‍याकडे आलेला विमा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे पोहचता केला व आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे विरुध्‍द कोणताही आदेश पारीत करणे उचीत ठरणार नाही.
     उपरोक्‍त सर्व विवेचनांवरुन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
// आदेश //
1)      अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.
2)     गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी अर्जदार हिला  
   विमा रक्‍कम रुपयेः 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्‍त )     
   सदर निकालाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासुन 30 दिवसांच्‍या आंत 
   द्यावे, तसेच   या रक्‍कमेवर दिनांक 11/05/2012 (तक्रार
   दाखल दिनांक) पासून ते पुर्ण रक्‍कम अदा करे पर्यंत
   दरसाल दरशेकडा 12 टक्‍के दराने होणा-या व्‍याजाची रक्‍कम
   अर्जदार यांना देण्‍यात यावी.
3)      वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झालेल्‍या 
   दिनांकापासुन 30 दिवसांच्‍या आंत करावे. मुदतीत आदेशाचे
   पालन न केल्‍यास, मुदतीनंतर उपरोक्‍त रुपये 1,00,000/-  
   व या रक्‍कमेवर दिनांक 11/05/2012 (तक्रार दाखल
   दिनांक) पासून ते पुर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत दरसाल
   दरशेकडा 18 टक्‍के दराने दंडणीय व्‍याजासह रक्‍कम देण्‍यास
   गैरअर्जदार क्र.1 जवाबदार राहतील.                                
4)      अर्जदार यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल 
    गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास रुपये 1500/- ( रुपये
    एक हजार पाचशे फक्‍त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 1000/-
    (रुपये एक हजार फक्‍त) सदर निकाल प्राप्‍ती पासून तीस 
    दिवसांचे आंत द्यावे.
5)      मा.सदस्‍यांसाठीच्‍या फाईल्‍स संबंधीतांनी परत
    घेवुन जाव्‍यात.
6)      निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्‍तव व
    उचित कार्यवाहीकरीता पाठविण्‍यात याव्‍यात. 
7)      गैरअर्जदार क्र.2 व 3 विरुध्‍द आदेश नाही.
 
 
[HON'ABLE MR. Milind B.Pawar]
PRESIDENT
 
[HONABLE MR. Shri Milind R. Kedar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.