निकालपत्र (पारीत दिनांक 05 आक्टोंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता यांचे पती श्री हरीराम कृपाल यांचा दिनांक 04/07/2007 रोजी खुन झाला. त्यानंतर तीन वर्ष होवूनही विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना जनता व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत असणा-या विमा पॉलिसीची रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्ता ..2.. ..2.. यांनी सदर ग्राहक तक्रार दाखल केली असून मागणी केली आहे की, त्यांना रुपये 3,20,000/- ही रक्कम 18% व्याजासह दिनांक 04/07/2007 पासून विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावी तसेच ग्राहक तक्रारीचा खर्च हा सुध्दा विरुध्दपक्ष यांचेवर लादण्यात यावा. 2. विरुध्दपक्ष त्यांचे लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांचा दावा हा मुदतीचे आत नाही. तक्रारकर्ता यांचे पतीच्या मृत्यूची माहिती त्यांना उशिरा देण्यात आली व संबधीत दस्ताऐवजाची मागणी करुन सुध्दा तक्रारकर्ता यांनी दिलेले नाहीत. तक्रारकर्ता यांच्या पतीचा मृत्यू हा अपघात नसल्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात यावी. कारणे व निष्कर्ष 3. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांना त्यांच्या पतीच्या मृत्युची माहिती ही दिड वर्षानी दिली जेव्हा की, पॉलिसीच्या अटी प्रमाणे सदर माहिती ही एक महिण्याच्या आत दयावयास पाहीजे होती. मात्र विरुध्दपक्ष यांनी मृत्युची माहिती उशिरा मिळाल्यामुळे तक्रारकर्ता यांचा विमादावा नाकारलेला नसल्यामुळे त्यांना या अटीचा फायदा घेता येणार नाही. 4. दिनांक 09/01/2009 रोजी तक्रारकर्ता यांचे विरुध्दपक्ष यांना प्राप्त झालेले पत्र यामध्ये पॉलिसीचा नंबर हा नमूद करण्यात आलेला आहे तरी सुध्दा विरुध्दपक्ष यांनी दिनांक 13/05/2010 रोजी तक्रारकर्ता यांना पत्र लिहून त्यांच्या पॉलिसी क्रमांकासह संपर्क करण्यास सांगीतले आहे. शिवाय आजच्या काळात पॉलिसींची नांव व क्रमांकासह काम्प्युटरमध्ये नोंद घेतलेली असते. 5. दिनांक 09/01/2009 रोजी तक्रारकर्ता यांचा विमा दावा प्राप्त झाल्यानंतर अजूनही त्या संदर्भात विरुध्दपक्ष यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही मुदतीत आहे असे म्हणता येते. 6. विरुध्दपक्ष म्हणतात की, तक्रारकर्ता यांच्या पतीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू नाही. जी पदमावती विरुध्द आंध्र बँक व इतर या IV (2005) C.P.J. 543 APCDRC मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय आंध्र प्रदेश ग्राहक वाद निवारण आयोग यांनी असे प्रतिपादन केले आहे की, खुन हा अपघात या सदरात मोडतो. 7. विमादावा हा विरुध्दपक्ष यांना दस्ताऐवजासह प्राप्त झाला तसेच विसेरा रिपोर्ट हा दिनांक 13/05/2010 रोजी विरुध्दपक्ष यांना देण्यात आला आहे तरी सुध्दा विमा दाव्याबद्दल ..3.. ..3.. निर्णय न घेणे ही विरुध्दपक्ष यांच्या सेवेतील न्युनता आहे. असे तथ्य व परीस्थीत असतांना सदर आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विमादाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) ही दिनांक 13/05/2010 पासून ती रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होत पर्यंत 9% व्याजासह दयावी. 2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना पॉलिसीचे सर्व लाभ दयावेत. 3. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 3,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- दयावेत. 4. आदेशाचे पालन हे विरुध्दपक्ष यांनी आदेशाच्या तारखेपासून एक महिण्याचे आत करावे.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |