Maharashtra

Ahmednagar

CC/18/222

Smt. Manisha Suresh Bhusal - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Ltd. Through its Manager, - Opp.Party(s)

Adv. N. G. Kale

09 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/222
( Date of Filing : 18 Jul 2018 )
 
1. Smt. Manisha Suresh Bhusal
R/o Umbri, Tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Ltd. Through its Manager,
Pune Regional Office No. 3, 321/1A2, Oswal Bandu Samaj Building, J. N. Road, Pune 411042 Through Notice Manager The Oriental Insurance Co. Ltd Through its Manager, Amber Plaza Building, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv. N. G. Kale, Advocate
For the Opp. Party: Adv.A.K.Bang, Advocate
Dated : 09 Jan 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०९/०१/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)


१.   तक्रारदार हिने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदार ही गरीब शेतकरी कुटुंबातील असुन ती मौजे उंबरी, तालुका संगमनेर, जि.अहमदनगर येथील रहीवासी आहे. तक्रारदर हिचे पती सुरेश पांडुरंग भुसाळ हे शेतकरी होते. तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्‍याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविला होता. सदर विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता. पॉलिसीच्‍या नियमानुसार मयताच्‍या वारसांचा अपघाती मृत्‍यु आल्‍यास किंवा दोन अवयव गेल्‍यास रक्‍कम रूपये २,००,०००/- किंवा १ हात, १ पाय किंवा एक डोळा निकामी झाल्‍यास रक्‍कम रूपये १,००,०००/- नुकसान भरपाई देण्‍याची तरतुद आहे. दिनांक १५-१०-२०१७ रोजी संध्‍याकाळी ९.१५ वाजता तक्रारदार यांचे पतीचा इलेक्‍ट्रीक शॉक लागुन मृत्‍यू झाला. त्‍यानंतर त्‍यांचे ग्रामीण रूग्‍णालय, लोनी येथे शवविच्‍छेदन करण्‍यात आले व लोनी पोलीस स्‍टेशन येथे खबर देण्‍यात आली. सदर खबर सी.आर.पी.सी कलम १७४ प्रमाणे नोंदविण्‍यात आली व पोलींसामार्फत स्‍पॉट पंचनामा व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा करण्‍यात आला. तक्रारदार हिने कायदेशीर वारस म्‍हणुन संपुर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी तथा नोडल ऑफीसर यांचेमार्फत सामनेवाले विमा कंपनीकडे सादर केला. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक ०६-०६-२०१८ रोजी पत्र देऊन तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा त्‍यांना स्‍वतःला झालेल्‍या जखमेमुळे झाला आहे, असे कारण देऊन विमा दावा नामंजुर केला आहे. अशा प्रकारे चुकीचे कारणाने तक्रारदार हिचा विमा दावा नाकारला म्‍हणुन तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करून परिच्‍छेद क्र.९ प्रमाणे मागणी केली आहे.

     तक्रारदार हिने तक्रारीसोबत निशाणी क्र.५ दस्‍तऐवज यादीसोबत एकुण १७ कागदपत्रांचे छायांकीत प्रती जोडलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये सामनेवाले यांचे नामंजुरीचे पत्र, क्‍लेम फॉर्म, ‘८ अ’ चा उतारा, सातबारा उतारा, गाव नमुना  ६ सी, प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्‍याचा दाखला, खबर, स्‍पॉट पंचनामा, इन्‍वेस्‍ट  पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, एम.एस.ई.बी. नोट, आधार कार्ड दाखल केले आहे.

३.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मंचामार्फत नोटीस काढण्‍यात आली. सामनेवालेने त्‍यांची कैफीयत नि.१२ ला दाखल केली आहे. त्‍यात सामनेवालेने तक्रारदार यांचे पती मयत सुरेश पांडुरंग भुसाळ हे मिक्‍सर दुरूस्‍त करत असतांना त्‍यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे त्‍यांना इलेक्‍ट्रीक शॉक लागला. त्‍यांनी मिक्‍सर दुरूस्‍तीसाठी इलेक्‍ट्रीशीयनची मदत घेतली नाही त्‍यामुळे शॉक लागुन त्‍यात जखमी झाल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यु झाला आहे. सदर बाब विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये अंतर्भूत नसल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व नियमानुसार सदरील विमा दावा नाकारल्‍याचे सामनेवालेने म्‍हटले आहे. तसेच कुठल्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा योग्‍य कारणाने नाकारला आहे. सामनेवाले यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही, त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी मंचात केली आहे.

४.   तक्रारदार हिने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्‍यांचे वकील श्री.एन.जी. काळे यांनी केलेला युक्तिवाद.  तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवालेतर्फे वकील श्री.ए.के. बंग यांनी केलेला युक्तिवाद याचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

होय

(४)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

५.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हिचे मयत पती सुरेश पांडुरंग भुसाळ यांनी सामनेवाले यांच्‍याकडे शासनाच्‍या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २ लाख रूपयांचा विमा उतरविला होता. सदर विम्‍याचा कालावधी ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता. विमा उत‍रविलेची बाब सामनेवालेने त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीत मान्‍य केल आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत ही बाब सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

६.  मुद्दा क्र. (२ व ३)  -  तक्रारदार हिचे पतीचा विमा कालावधीत दिनांक १५-१०-२०१७ रोजी संध्‍याकाळी ९.१५ वाजता तक्रारदार यांचे पतीचा इलेक्‍ट्रीक शॉक लागुन मृत्‍यू झाला. त्‍यानंतर त्‍यांचे ग्रामीण रूग्‍णालय, लोनी येथे शवविच्‍छेदन करण्‍यात आले व लोनी पोलीस स्‍टेशन येथे खबर देण्‍यात आली. सदर खबर सी.आर.पी.सी कलम १७४ प्रमाणे नोंदविण्‍यात आली व पोलींसामार्फत स्‍पॉट पंचनामा व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा करण्‍यात आला. तक्रारदार हिने कायदेशीर वारस म्‍हणुन संपुर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी तथा नोडल ऑफीसर यांचेमार्फत सामनेवाले विमा कंपनीकडे सादर केला. तक्रारदार हिने निशाणी क्र.६ ला तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू दाखला जोडलेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे कथनला त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये असे उत्‍तर दिले आहे की, त्‍यात सामनेवालेने तक्रारदार यांचे पती मयत सुरेश पांडुरंग भुसाळ हे मिक्‍सर दुरूस्‍त करत असतांना त्‍यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे त्‍यांना इलेक्‍ट्रीक शॉक लागला. त्‍यांनी मिक्‍सर दुरूस्‍तीसाठी इलेक्‍ट्रीशीयनची मदत घेतली नाही त्‍यामुळे शॉक लागुन त्‍यात जखमी झाल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यु झाला आहे. सदर बाब विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये अंतर्भूत नसल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व नियमानुसार सदरील विमा दावा नाकारल्‍याचे सामनेवालेने म्‍हटले आहे. या संदर्भात उभयपक्षांचा युक्तिवाद व त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदार हिचे पतीचा मृत्‍यु इलेक्‍ट्रीक शॉक लागुन झालेला असल्‍याने तो अपघात आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्‍याकडे उतरविला होता. त्‍यामुळे सामनेवाले यांनी सदरची रक्‍कम देणे आवश्‍यक होते. परंतु सामनेवाले यांनी चुकीच्‍या कारणाने विमा दावा नाकारला आहे, ही बाब सिध्‍द झाली आहे. अशाप्रकारे चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारणे ही सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍याप्रती सेवेत दिलेली त्रुटी आहे. तक्रारदार यांनी विमा दाव्‍याची नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाले यांच्‍याकडे आवश्‍यक क्‍लेम फॉर्म, सातबारा उतारा, मृत्‍यु प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यु अपघाती होता व सदर विमा पॉलिसी ही शेतकरी अपघात विमा पॉलिसी म्‍हणुन उतरविली होती.

७.   सामनेवालेने तक्रारदार हिचे पती मयत सुरेश पांडुरंग भुसाळ यांचा मृत्‍यू  स्‍वतःच्‍या निष्‍काळजीपणामुळे इलेक्‍ट्रीक शॉक लागुन मृत्‍यू झाला असुन  विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार विमा दावा देता येणार नाही, असे कथन केले. तक्रारदार हिचे पतीचा मिक्‍सर दुरूसती करतांना इलेक्‍ट्रीक शॉक लागुन झालेला मृत्‍यु हा अपघाती आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी आपले म्‍हणणेचे पुष्‍टयर्थ मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, दिल्‍ली यांचे पुढील न्‍यायनिवाडे दाखल केले आहे.

  1.  Revision Petition No.973/2007 Dt. 24-10-2007   

          Rita Devti @ Rita Gupta Vs. National Insurance Comapny Ltd. And Other.

Page No.-13

‘ From the aforesaid law developed in other countries and in this country, it is clear that the injury or death caused by lightening, sun-stroke or earthquake has been held to be accidental. Further, where a man in the course of his work is exposed to excessive heat coming from a boiler and becomes exhausted and death occurs, it would be an accidental death.’  

   

 2.  Revision Petition No.1664/2011 Dt.27-08-2012 

         Reliance General Insurance Company Ltd. Vs. Smt. Sakorba Hetubba Jadeja and Ors.  

‘  Therefore, the heirs of the deceased are also entitled to get the benefits under the scheme. It is the settled principle of interpretation that when two views are possible, than the view favaouable to the insured should be preferred, Insurance policy is a contract for the benefit of insured and interpretation should promote its object and seve interest of consumer. If two interpretations are possible, one which favours the consumer is to be adopted.’

                वरील न्‍यायनिवाड्यांमधील वरील तथ्‍य सदर प्रकरणात लागु होत असुन त्‍याचा आधार घेण्‍यात येत आहे. सदरचे तक्रारीतील तक्रारदाराचे  कथन, कागदपत्र व त्‍यांनी केलेला युक्तिवाद यावरून सदर तक्रारदार हिने सिध्‍द केले आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरता येत नाही. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्‍तर हाकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.   

८.   तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीचे कारणाने विमा दावा नाकारला म्‍हणुन सदरील मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे व मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्‍कम तक्रारदार हिस देणे न्‍यायाचे ठरेल.

९.   मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

 

आदेश

 

      १. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्‍याची रक्‍कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्‍यावर दिनांक ०६-०६-२०१८ पासून संपुर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

 

३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा.

 

४  वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.