Complaint Case No. CC/19/25 | ( Date of Filing : 11 Feb 2019 ) |
| | 1. Vanitai Nanaji Madavi | R/o Ratnapur Tah.Sindewahi, Dist.Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. The Oriental Insurance Company | Branch Near LTV School, Main Road, Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA | 2. Jayaka Insurance Brokerage ltd. | Second Floor Jayka Building, Commercial Road,Civil Line, Nagpur Tah.Dist.Nagpur | Nagpur | MAHARASHTRA | 3. Taluka Krushi Adhikari | Sindewahi, Dist.Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA | 4. Shrikant Nanaji Madhavi | R/o Ratnapur ,Tah- Sindevahi,Chandrapur | Chandrapur | Maharshtra | 5. Ravikant Nanaji Madhavi | R/o Ratnapur ,Tah- Sindevahi,Chandrapur | Chandrapur | Maharshtra | 6. Pratibha Purshottam Kukmeye | Uprala Chauk,post-Marodha,Mul,Dist-Chandrapur | Chandrapur | Maharshtra | 7. Vaishaki Pramode Kumre | Ward no.2,Chilemav Chiski,Chandrapur | Chandrapur | Maharshtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारित दिनांक २२/०६/२०२२) - तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ती ही मौजा रत्नापूर, तह. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून मय्यत नानाजी रामजी मडावीची पत्नी आहे. तिच्या पतीचा मृत्यु दिनांक १२/०४/२०१७ रोजी सरडपार, तह. सिंदेवाही येथे रोड अपघाताने झाला तसेच मृतक हा शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आवश्यक कागदपञासह दोन प्रतीत क्लेम फॉर्म तलाठी मार्फत दिनांक २६/०५/२०१७ रोजी सादर केला. त्यानंतर दोन वर्षे उलटून सुध्दा विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला दावा रक्क्म दिली नाही. तक्रारकर्तीचे पती विमाधारक महाराष्ट्रातील शेतकरी असून अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. तक्रारकर्तीने विमा क्लेम करुन दोन वर्षे उलटूनही विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला काहीही उत्तर न देऊन तक्रारकर्तीप्रति न्युनतापूर्ण सेवा दिलेली असल्यामुळे सदर तक्रार आयोगासमोर दाखल केली आहे.
- तक्रारकर्तीने आयोगासमोर अशी मागणी केली की विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीला शेतकरी अपघात विम्याची रक्क्म रुपये २,००,०००/- व्याजासह द्यावे तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक ञासापोटी रुपये ५०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रुपये २०,०००/- देण्यात यावे.
- तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ ह्यांना आयोगातर्फे नोटीस काढण्यात आले.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी आयोगासमोर उपस्थित राहून तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन खोडून काढीत नमूद करुन प्राथमिक आक्षेप घेतला की, शेतकरी विमा पॉलिसी हा महाराष्ट्र राज्य जायका इन्शुरंन्स व विमा कंपनी यांच्यातील ञिसुञी करार आहे परंतु सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनातर्फे तक्रारकर्तीने कृषी आयुक्त, पुणे यांना आवश्यक पार्टी म्हणून जोडलेले नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी तसेच विमा कंपनीला तक्रारकर्तीचा कोणताही दावा प्रपञ प्राप्त झालेले नसल्यामुळे सदर विमा कंपनी सदर तक्रारकर्तीला विमा दावा देण्यास जबाबदार नाही. पुढे विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी त्यांच्या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्तीने मय्यत नानाजी यांचा रस्ता अपघातात मृत्यु झाला. कथीत मोटार अपघाताच्या वेळी मोटार सायकलवर तीन व्यक्ती होते परंतु मोटार सायकलची आसन क्षमता नियमानुसार दोन असते तसेच हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे तसेच मय्यत व्यक्तीजवळ कोणतेही वैध लायसन्स नव्हते. तक्रारकर्तीचे पती दिनांक १२/४/२०१७ रोजी मरण पावले परंतु तक्रारकर्तीने सदर तक्रार दिनांक ११/०२/२०१९ रोजी दाखल केली. त्यामुळे सदर तक्रार दाखल करण्यास अवास्तव विलंब झालेला असून तक्रारीत विलंब माफीचा कोणताही अर्ज जोडलेला नाही. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या मृत्यु झाल्यावर नियमानुसार ९० दिवसाच्या आत कृषी अधिका-याकडे दावा दाखल करावयास हवा होता परंतु असा दावा मुदतीत दाखल केलेला आहे असा कोणताही पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीने खोटी तक्रार दाखल केली असून खोट्या स्वाक्ष-या व बोगस कागदपञे तयार केली असल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ हे तक्रारकर्तीला कोणताही विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार नाही.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी त्यांचे उत्तर दाखल करीत नमूद केले की, या योजनेअंतर्गत तक्रारकर्तीला तिचे दावे विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांच्याकडे सादर करावे लागतात. त्यानंतर ते दावे कृषी अधिकारी विरुध्द पक्ष क्रमांक २ कडे पाठवितात त्यानंतर विरुध्द पक्ष क्रमांक २ हे दावे विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे मंजुरी करिता पाठवितात. प्रत्येक दाव्याची शाहनिशा करुन ते मंजूर किंवा नामंजूर करणे हे विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या अखत्यारीत असते. त्यात विरुध्द पक्ष क्रमांक २ चा सहभाग नसतो ते फक्त तक्रारकर्ती व शासन यांच्यातील मध्यस्थी म्हणून काम करतात. सदर प्रकरणात कृषी अधिका-यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा व कागदपञे विरुध्द पक्ष क्रमांक २ कडे पाठविले व त्यांनी त्वरीत विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे दिनांक २१/०६/२०१८ रोजी पाठविले आहेत. यावरुन स्पष्ट होते की, विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी त्यांची जबाबदारी चोख बजाविली आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ हे फक्त विमा सल्लागार असून त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्तीने विनाकारण विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना तक्रारीत खेचले असल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी त्यांचे लेखी उत्त्र दाखल करीत नमूद केले की तक्रारकर्तीचा दावा प्रस्ताव त्यांना दिनांक १८/११/२०१७ रोजी प्राप्त झाला. सदर दावा प्रस्ताव मा. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात दिनांक १८/११/२०१७ रोजी सर्व मुळ कागदपञासह सादर केला. सदर दावा प्रस्तावातील ञुटीचे कागदपञ पूर्ततेकरिता दिनांक २२/०१/२०१८ रोजी कॅम्प आयोजीत करुन कागदपञे प्राप्त करुन जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडे सादर केला.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ चे लेखी उत्तर व उभयपक्षांचे लेखी व तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्याकरिता खालील कारणमीमांसा व त्यावरील निष्कर्ष कायम करण्यात आले.
कारणमीमांसा - तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी अपघात योजनेचा दावा अर्ज, गाव नमुना, सातबारा ग्रामपंचायत रत्नापूर, वारसानपञ, गाव नमुना फेरफार नोंदवही, शिधापञक, एफ.आय.आर., इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा इत्यादीच्या प्रति दाखल केलेल्या आहेत. त्यावरुन तक्रारकर्तीच्या पतीची मौजा रत्नापूर येथे शेतजमीन आहे तसेच दिनांक १२/०४/२०१७ रोजी वाहन अपघातात जखमी होऊन तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला ही बाब स्पष्ट होत आहे. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिचा पती शेतकरी असल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आवश्यक कागदपञासहीत दोन प्रतित क्लेम फॉर्म दिनांक २६/०५/२०१७ रोजी तलाठी मार्फत सादर केला परंतु त्यानंतर दोन वर्ष उलटूनही क्लेम दिला नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा दावा हा विलंबाने दाखल केला असल्यामुळे मुदतबाह्रय आहे तसेच विरुध्द पक्ष यांनी त्याच्या उत्तरात तसेच शपथपञ व लेखी युक्तिवादात तक्रारकर्तीचा पती हा अपघाताच्यावेळी वैध परवाना नसतांना तिहेरी सीट मोटर सायकल चालवित होता ही बाब मोटर वाहन कायदान्वये बेकायदेशीर आहे तसेच शेतकरी जनता अपघात विमा योजना मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक ४ डिसेंबर २००९ नुसार जर शेतक-याचा मृत्यु वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातात शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी दाव्यासोबत वैध वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील. तक्रारकर्तीने तिच्या पतीचा वाहन परवाना तक्रारीत दाखल केलेला नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे.
विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीने त्याच्याकडे वेळेत दावा दाखल केला नाही असे कथन केले आहेत परंतु कागदपञाचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष क्रमांक ३ तालुका कृषी अधिकारी यांना तक्रारकर्तीचा दावा प्रस्ताव दिनांक १८/११/२०१७ रोजी प्राप्त झाला व कृषी अधिका-यामार्फत क्लेम अर्ज विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना प्राप्त झाला व त्यांनी त्वरीत विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे विचाराकरिता दिनांक २१/०६/२०१८ रोजी पाठविला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघात विमा दावा हा योग्य प्रकारेच विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठविला आहे परंतु विरुध्द पक्ष यांचेकडून तक्रारकर्तीला अजूनपर्यंत दावा मंजूर वा नामंजूर पञ प्राप्त झालेले नाही परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा क्लेम का मंजूर झाला नाही याबद्दल खुलासा त्याच्या लेखी युक्तिवाद व शपथपञ मध्येकेलेला आहे, त्यात त्यांनी तक्रारकर्तीचा पती हा अपघाताच्या वेळी मोटर सायकल चालवित होता परंतु त्याचेजवळ गाडी चालविण्याचे लायसन्स नव्हते ही बाब मोटर कायद्यानुसार बेकायदेशीर आहे तसेच सदर गाडी ही त्याच्या मालकीची सुध्दा नाही तसेच तक्रारकर्तीने सदर दावा कृषी अधिका-याकडे वेळेत दाखल केलेा असल्यामुळे तो मुदतबाह्य आहे असा बचाव केलेला आहे परंतु आयोगाने तक्रारीत दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केले असता एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचानामा मध्ये तोंडी रिपोर्ट मध्ये मय्यत नानाजी मडावी मोटर सायकलवर मागे बसलेला होता असे लिहीलेले आहे. यावरुन स्पष्ट होत आहे की, अपघाताच्या वेळेस तक्रारकर्तीचा मय्यत पती नानाजी मडावी हे गाडी चालवित नव्हते त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारीत दाखल केलेले महाराष्ट्र शासनाने परिपञक या प्रकरणात लागू होणार नाही तसेच प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीने तक्रारीत आवश्यक दस्तऐवजासह विमा दावा दाखल केल्याचे दिसून येत आहे. सर्व कागदपञे विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांचेकडून रितसर पाठवून ञुटी पूर्ण करुनही विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दावा मंजूर वा नामंजूर केल्याचे कळविले नाही तसेच विरुध्द पक्ष यांनी त्याच्या उत्तरात विमा दावा ९० दिवसानंतर उशीरा विमा दावा दाखल केल्याचे कारण नमूद करुन विरुध्द पक्ष यांनी कृती योग्य असल्याचे निवेदन केले. वरील बाबींचा विचार करता तक्रारकर्तीचा दावा विलंबासारख्या तांञिक मुद्दयावर दावा नाकारणे अयोग्य आहे. सबब सदर प्रकरणी तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्याचे दिसून येते व तो शेतकरी असल्याने महाराष्ट्र शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सदर विम्याचा लाभार्थी असल्याचे स्पष्ट होत आहे. तक्रारकर्ती हीचे वारसदार तक्रारीत दुरुस्ती आदेशानुसार जोडण्यात आलेले असून शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास ते पाञ असल्याचे दिसून येत असल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीचा योग्य विमा दावा नाकारुन तक्रारकर्तीप्रति सेवेत न्युनता दिली आहे असे आयोगाचे मत आहे सबब खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्यांची तक्रार क्रमांक २५/२०१९ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यांना त्यांचे वडील नानाजी रामजी मडावी यांच्या अपघाती मृत्युबाबत गोपीनाथ मुंडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसीची रक्कम रुपये २,००,०००/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक .ञासापोटी रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये ५,०००/- अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |