सौ. सुषमा प्र. जोशी, मा. सदस्या हयांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. तक्रारकर्त्याचे मालकीचे दुचाकी वाहन क्रमांक –MH-32/M-3369 असून सदर वाहनाचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे काढलेला होता.
CC/89/2011 2. वाहनाचे पॉलिसीचा कालावधी वैध असताना त.क.ने कामा निमित्य दिनांक 14.10.2009 रोजी आर्वी नाका परिसर, ठाकरे भंडार जवळ वर्धा येथे सायंकाळी 6.00 ते 6.15 वाजताचे दरम्यान वाहन उभे केले व काम झाल्यानंतर परत आले असता तेथे सदर वाहन आढळून आले नाही. वाहनाचा खूप शोधाशोध करुनही वाहन न आढळल्यामुळे त्या विषयी दिनांक 15.10.2009 रोजी पोलीस स्टेशन वर्धा येथे तक्रार केली असता पोलीसांनी पंचनामा केला व विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक 16.10.2009 रोजी सुचना दिली. 3. विमाकृत वाहनाचे चोरी नंतर, वि.प.विमा कंपनीचे मागणी नुसार वाहनाचे दस्तऐवज पुरविण्यात आले तसेच वाहनाच्या चाब्या देण्यात आल्यात परंतु ओळख असल्याने पोच घेण्यात आली नाही आणि विमा क्लेम लवकरात लवकर निश्चीत होईल अशी अपेक्षा होती.
4. वि.प.विमा कंपनीने दिनांक 06.06.2011 रोजीचे पत्र पाठवून त.क.चा विमा क्लेम नामंजूर केला आणि नमुद केले की, वाहनास चाबी लावून ठेवल्यामुळे वाहन चोरीस गेले. वस्तुतः त.क.वाहनास चाबी नव्हती, ती त.क. जवळच होती व त्यानंतर त.क.ने ती कंपनीला हस्तांतरीत केलेली आहे. वि.प.विमा कंपनीने त.क.चा विमा क्लेम नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. तसेच विमा क्लेम नामंजूर केल्या बाबत त.क.ला कळविण्या करीता वि.प.विमा कंपनीस 22 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. अशाप्रकारे वि.प.विमा कंपनीने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे त.क.ला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे.
5. म्हणून त.क.ने वि.प.विमा कंपनी विरुध्द नुकसान भरपाई म्हणून वाहनाची घोषीत विमा रक्कम रुपये-48,000/- त्यावरील व्याज, शारिरीक मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई, प्रस्तुत तक्रारीचा खर्च असे एकूण रुपये-74,040/- मिळावेत अशी प्रार्थना केलेली आहे. 6. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत एकूण 11 दस्तऐवज दाखल केले, त्यामध्ये विमा पॉलिसी प्रत, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, वि.प.विमा कंपनीशी केलेला पत्रव्यवहार दाखल आहेत.
CC/89/2011 7. वि.प.विमा कंपनीने न्यायमंचा समक्ष उपस्थित होऊन दिनांक 04.01.2012 रोजी आपला लेखी जबाब दाखल केला आणि नमुद केले की, सदर वाहनाचा विमा त्यांचेकडे काढलेला होता. वि.प.विमा कंपनीला सदर विमाकृत वाहन चोरीस गेल्या बाबतची सूचना त.क.ने उशिरा दिलेली आहे. वि.प.विमा कंपनीस वाहन चोरी संबधाने माहिती मिळाल्या नंतर व त.क.ने कागदपत्र पुरविल्या नंतर पूर्ण चौकशी केली व त्यानंतर सर्व कागदपत्राची सर्व्हे रिपोर्ट व पोलीस पेपर्सचे वाचना नुसार सदर विमाकृत वाहनाचे चोरीस त.क.चा निष्काळजीपणा जबाबदार आहे कारण त.क.ने घटनेचे दिवशी वाहन उभे करताना, वाहनाची चाबी न काढता, ती तशीच ठेवली होती व त्यामुळे वाहन चोरीस गेलेले आहे. वि.प.विमा कंपनीने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त.क.चा विमा क्लेम पॉलिसी अंतर्गत नियम व अटी नुसार देय नाही आणि म्हणून त.क.चा विमा क्लेम नामंजूर केलेला आहे. सबब वि.प.विमा कंपनी तर्फे कोणतीही दोषपूर्ण सेवा त.क.ला दिलेली नाही आणि म्हणून त.क.ची तक्रार खर्चासह खारीज व्हावी, अशी विनंती वि.प.विमा कंपनी तर्फे करण्यात आली. 8. उभय पक्षांचे शपथे वरील लेखी कथन, दाखल कागदोपत्री पुरावे, लेखी युक्तीवाद यांचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर व उभय पक्षांचा युक्तीवाद काळजीपूर्वक ऐकल्या नंतर मंचाद्वारे निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) त.क. चा विमा क्लेम नामंजूर करुन वि.प.विमा कंपनीने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. (2) जर होय, तर, त.क. वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? होय. (3) काय आदेश? अंतीम आदेशा नुसार : कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 व 2 9. त.क.यांनी प्रस्तुत तक्रार त्यांचे वाहन चोरीस गेल्यामुळे व सदर वाहनाचा विमा वि.प.विमा कंपनीने काढला असल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी व सेवेतील त्रृटी करीता दाखल केलेली आहे.
CC/89/2011 10. वि.प.यांचे म्हणण्या नुसार त.क.वाहनचालक/मालक यांनी निष्काळजीपणाने घटनेचे वेळी वाहन उभे करताना वाहनाची चाबी वाहनास तशीच ठेवली असल्याने वाहन चोरीस गेले आणि त्यामुळे वि.प.यांनी विमा क्लेम नामंजूर करुन कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे कथन केले आहे. तसेच त.क.यांनी, वि.प.यांना उशिराने वाहन चोरीला गेल्याचे कळविले आहे, म्हणून दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. 11. मंचाने उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज यांचे सुक्ष्म वाचन केले त्यावरुन त.क.यांचे वाहन दिनांक 14.10.2009 रोजी चोरीला गेल्याचे दिसून येते व त्या बाबत दिनांक 16.10.2009 रोजी वि.प.यांना कळविलेले आहे, असे पान क्रं 19 वरुन स्पष्ट होते. 12. मंचाने, घटनास्थळ पंचनाम्याचे वाचन केले असता त्यामध्ये वाहनाला कुलूप लावलेले नव्हते व चाबी मोटरसायकलला तशीच ठेऊन, 10 ते 15 मिनिटानंतर गाडी ज्या ठिकाणी ठेवली होती, त्या ठिकाणी परत आले असता, गाडी दिसली नाही व कोणीतरी अज्ञात इसमाने गाडी चोरुन नेल्याचे दिसून आले. 13. सदर घटनास्थळ पंचनामा हा दिनांक 18.10.2009 रोजीचा आहे व चोरीची घटना ही दिनांक 14.10.2009 रोजीची आहे असे कागदपत्रा वरुन दिसून येते. तसेच घटनास्थळ पंचनाम्यावर त.क./वाहनमालकाची सही नाही किंवा वरील पंचनाम्यातील माहिती ही त.क.ने कथन केली असे कुठेही नमुद नाही, त्यामुळे सदर पंचनाम्यातील नमुद माहिती ही कोठून आली हे मंचा समक्ष स्पष्ट झालेले नाही.तसेच घटनास्थळ पंचनामा हा घटनेच्या तारखे नंतर चार दिवसांनी तयार केलेला आहे असेही स्पष्ट होते. त्यामुळे वि.प.विमा कंपनीचे कथन की, त.क.यांनी वाहनास निष्काळजीपणाने चाबी लावून ठेवल्याने वाहन चोरीस गेले ही बाब मंचा समक्ष सिध्द झालेली नाही. 14. सबब मंचाचे मते, त.क.यांचा योग्य व कायदेशीर विमा दावा, वि.प.विमा कंपनीने नाकारुन सेवेत त्रृटी केलेली आहे म्हणून वि.प.विमा कंपनीने वाहनाची (घसारा वजा) किंमत विम्यापोटी त.क.ला देय करावी. खरेदी नुसार वाहनाची किंमत सन 2007 मध्ये रुपये-48,000/- होती आणि वाहन हे सन 2007 चे मॉडेल आहे व यामुळे विमा रक्कम ही वाहनाचा योग्य तो घसारा वजा जाता वि.प.ने त.क.ला द्यावी, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. CC/89/2011 15. त.क.यांनी तक्रारीचे विनंती मध्ये उर्वरीत विविध कलमा खाली नुकसान भरपाई , वि.प.कडून कशी देय आहे? हे मंचा समक्ष सिध्द केलेले नाही. म्हणून त.क.ने मागणी केलेली संपूर्ण नुकसान भरपाई व कोर्टखर्च जसाचे तसा देणे हे न्यायोचित , विधीयुक्त व संयुक्तिक राहणार नाही. 16. मंचाचे असेही मत झाले आहे की, असे असले तरी, त.क.यांना त्यांचे वाहनाची विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झालेले आहे तसेच त्यांना या सर्व प्रकारामुळे मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागलेला आहे व त्याकरीता नुकसान भरपाई म्हणून रुपये-2000/- व प्रस्तुत तक्रार खर्च म्हणून रुपये-1000/- देणे न्यायोचित राहिल, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 17. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार ,वि.प. विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.यांनी,त.क.ला वाहनाचे विम्यापोटी, वाहनाचे किंमती मधून योग्य व कायदेशीर घसारा कपात करुन, उर्वरीत रक्कम आणि तीवर दिनांक- 14.10.2009 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज यासह रक्कम त.क.ला देय करावी. 3) वि.प.यांनी, त.क.ला झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानीपोटी रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) त.क.ला देय करावे. 4) सदर आदेशाचे अनुपालन, वि.प.यांनी सदर आदेश प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत करावे, अन्यथा अक्रं 2 प्रमाणे येणा-या वाहनाचे विम्याचे रकमेवर दिनांक- 14.10.2009 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के दरा प्रमाणे दंडनीय व्याजासह त.क.ला रक्कम देण्यास वि.प. जबाबदार राहतील. 5) उभय पक्षांना निकालपत्राची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 6) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ.सोमाणी) | (मिलींद रामराव केदार) | (सौ.सुषमा प्र. जोशी ) | अध्यक्ष. | सदस्य. | सदस्या. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |