जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2008/241 प्रकरण दाखल तारीख - 29/09/2010 प्रकरण निकाल तारीख – 06/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. विजय पि. गंगाधर कंचर्लावार वय 53 वर्षे, धंदा व्यवसाय अर्जदार. रा.टिळक नगर, नांदेड. ह.मू.किनवट ता.किनवट जि.नांदेड विरुध्द. व्यवस्थापक दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. नांदेड शाखा,संतकृपा मार्केट, पहिला मजला. नगिना घाट जवळ, नांदेड. गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.पी.कूर्तडीकर गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. 1. अर्जदार यांनी बजाज पल्सर 150 (किक स्टॉर्ट) 2004 च्या मॉडेल क्र.एम.एच.-26/एम-4477 साठी गैरअर्जदार यांचेकडून विमा पॉलिसी नंबर 182001/31/2008/2038 घेतली होती व त्यांचा कालावधी 23.8.2007 ते 22.08.2008 असा होता. दि.29.2.2008 रोजी सदर वाहनाचे स्पेअर पार्टस चोरीला गेले. त्यांची तक्रार 80/2008 द्वारे भाग्य नगर पोलिस स्टेशन येथे देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला.एफआयआर व पंचनाम्याची प्रत तक्रारीसोबत दाखल केली आहे. सदर वाहनाचे किती नूकसान झाले यासाठी अर्जदाराने राघवेंद्र सर्व्हीस सेंटर यांचेकडे इस्टीमेंट घेतले. सदर बिल हे रु.9868.90 होते. गैरअर्जदार यांचेकडे वाहनाच्या पॉलिसी बददल रक्कमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर पी.पी. शेलमानकर यांनी सर्व्हे करुन रिपोर्ट सादर केला व अर्जदारास आर.सी.बूक व शेवटचा तपासणीक अहवाल सादर करण्यास सांगितले त्याप्रमाणे अर्जदाराने कागदपञ दाखल केले. अर्जदार यानी वाहन दि.27.3.2008 रोजी स्वतःच्या खर्चाने दूरुस्त केले. सदर स्पेअर्स पार्टस तेहरा अटोमोबाईल्स यांचेकडे घेतले त्यांची पावती रु.7131.82 एवढे झाले. वाहनाचे टायर्स हे भाटीया टायर्स यांचेकडून दि.30.8.2008 रोजी घेतले ते रु.2500/- आहेत. सदर बिले तक्रारी सोबत दाखल केले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस दि.17.8.2010 रोजी दिले व ती नोटीस गैरअर्जदार यांना दि.18.8.2010 रोजी मिळाली. सदर नोटीस मिळूनही गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम दिली नाही व सदर नोटीसचे उत्तर दिले नाही. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विम्याची रक्कम रु.9,631/- व शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च रु.2000/- असे एकूण रु.16,931/- हे फेब्रूवारी 2008 पासून 12 टक्के व्याजाने मिळावेत. 2. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.अर्जदार यांना तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराचा अर्ज हा वस्तूस्थितीला सोडून कागदपञाच्या विरुध्द दाखल केला आहे. अर्जदाराचा दावा हा गैरअर्जदार यांनी फेटाळलेला नाही त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही प्रि-म्यच्यूअर आहे. गैरअर्जदार यांनी पी.पी.सेलमोकर यांची नियूक्ती केली. त्यांनी त्यांचा अहवाल दि.26.12.2009 रोजी दिला. त्यांनी रु.5806/- चे नूकसान दाखवलेले आहे.एफआयआर मध्ये वाहन क्र.एम.एच.-26-इ-4477 असा लिहीला आहे व विमाकृत वाहनाचा क्रमांक एम.एच.-26-एम-4477 असा आहे. त्यामूळे वाहनाची पडताळणी करण्यास गैरअर्जदार यांना वेळ लागला. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअरच्या रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराचा क्लेम मान्य केला व त्याप्रमाणे अर्जदार यांना सांगितले होते परंतु त्यांनी तक्रार दाखल केली. सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे रु.5806/- चा चेक क्र.513649 दि.26.10.2010 अर्जदार यांना दिला परंतु त्यांनी तो स्विकारला नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणताही शारीरिक व मानसिक ञास दिलेला नाही. अर्जदाराने कोणतीही कायदेशीर नोटीस दिलेली नाही. अर्जदाराला वारंवार कल्पना दिलेली असून त्यांचा क्लेम हा प्रोसेस मध्ये होता परंतु त्यांनी तक्रार दाखल केली. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे व दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एकूण जे खालील मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- 4. अर्जदाराची मोटार सायकल एम.एच.-26-एम-4477 हिची पॉलिसी गैरअर्जदाराकडे काढल्याचे गैरअर्जदार यांना मान्यच आहे. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत या बददल दूमत नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरील मोटारसायकलचे स्पेअर पार्टस दि.29.2.2008 रोजी चोरीस गेले होते त्याबददल अर्जदाराने पोलिस स्टेशन भाग्य नगर येथे रितसर फिर्याद नोंदविली. ज्यावर 80/08 दाखल झाला. अर्जदाराने एफआयआर ची कॉपी दाखल केली आहे. सदरील फिर्यादीची तक्रार पाहता असे दिसते की, जरी सदरील चोरी दि.29.02.2008 रोजीला झाली होती तरी प्रथमतः अर्जदाराने पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दि.08.03.2008 रोजी दाखल केली ? फिर्यादीवरुन असेही दिसते की,अर्जदाराला सदरील मोटारसायकलचे (सूटटे भाग) स्पेअर पार्टस चोरी गेल्याचे दि.01.03.2008 रोजी सकाळी 6 वाजता कळाले होते तरी त्यांनी पोलिस स्टेशनला जाण्यास आठ दिवसांचा अवधी का लावला त्याबददल कोणताही ऊहापोह केलेला नाही ? कागदपञावरुन असेही दिसते की, सदरील फिर्याद दिल्यानंतर अर्जदाराने सर्व प्रथम गैरअर्जदाराला दि.13.1.2010 रोजी माहीती दिली व सदरील सूटटे भाग चोरी झाल्याची माहीती दिली. यावरुन असे दिसते की, फिर्याद दाखल करण्यास अर्जदाराने स्वतःहून आठ दिवस विलंब लावला व गैरअर्जदाराला त्या चोरीची माहीती देण्यासाठी जवळ जवळ दोन वर्षाचा अवधी लावला. त्यामूळे अर्जदाराचे जे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने हेतूपूरस्कर त्यांचा क्लेम मंजूर करण्यास विलंब लावला हे न्यायबूध्दीला पटण्यासारखे नाही. 5. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना माहीती मिळाल्यानंतर त्यांनी सर्व्हेअर श्री. प्रवीण सेलमोहकर यांची नेमणूक केली व त्याप्रमाणे सर्व्हेअरने त्यांचा सर्व्हे रिपोर्ट दि.28.12.2009 रोजी दिला. गैरअर्जदाराच्या लेखी जवाबात त्यांनी चूकीने सदरील सर्व्हे रिपोर्ट त्यांना दि.26.12.2009 रोजी मिळाल्याचा उल्लेख केला आहे ? सदरील सर्व्हे रिपोर्ट वरुन असे दिसते की, त्यांनी म्हणजे सर्व्हेअरनी अंदाजे जे नूकसान झाले त्याबददल आपल्या सर्व्हे रिपोर्ट मध्ये उल्लेख केलेला आहे व असे निर्देशीत केलेले आहे की, सदरील नूकसान अंदाजे रु.5806.30 चे झालेले आहे. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचेकडून कसलाही विलंब झालेला नाही. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे ते वारंवार गैरअर्जदार यांचे कार्यालयात जात होते परंतु दरवेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली, याउलट गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने सूरुवातीला त्यांची मोटार सायकलचा नंबर एम.एच.-26-ई-4477 असा दिला होता परंतु वास्तविक पाहता मोटार सायकलचा नंबर एम.एच.-26-एम-4477 असा आहे. त्यामूळे नंबरचा शोध घेण्यास विलंब झाला. 6. कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराने स्वतःच आपल्या फिर्यादीमध्ये मोटार सायकलच्या पार्टची जी चोरी झाली होती त्यांची किंमत रु.8,000/-लिहीलेली आहे. त्यांच बरोबर अर्जदाराने असे लिहीले आहे की, त्यांच वेळी त्यांची कारची बॅटरी किंमत अंदाजे रु.2800/- चोरी झाली होती. पोलिसांने जो पंचनामा केला त्या पंचनाम्यामध्ये देखील मोटार सायकल व कारच्या पार्टची एकूण किंमत रु.10,000/- दर्शवलेली आहे. 7. अर्जदाराने राघवेंद्र सर्व्हीस सेंटरचे दि.27.3.2008 रोजीचे इस्टीमेंटची सत्यप्रत दाखल केली आहे. यावरुन असे दिसते की, एकूण किंमत रु.9868.50 आहे. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी सदरील मोटार सायकल दूरुस्त करुन घेतली व सूटटे भाग तेहरा अटोमोबाईल्स कडून विकत घेतले. तेहरा अटोमोबाईल्स च्या पावतीची सत्य प्रत त्यांनी दाखल केली आहे. यावरुन असे दिसते की, सदरील सूटटे भागाची एकूण किंमत रु.7131.82 अशी दाखविण्यात आली. सदरील पावतीमध्ये काही ठिकाणी खाडाखोड झालेली आहे व त्यावर पावती देणा-याची सही नाही ? सदरील पूर्ण रक्कम अर्जदाराने तेहरा अटोमोबाईल्सला दिल्याची पावती देखील रेकार्डवर दाखल नाही ? अर्जदाराने दूसरी एक पावतीची सत्यप्रत भाटीया टायर्सची दाखल केली आहे व दोन टायरची किंमत रु.2500/- दाखवलेली आहे. सदरील तेहरा अटोमोबाईल्सची पावती दि.27.3.2008 ची आहे तर भाटीया टायर्सची पावती दि.30.3.2008 ची आहे ? हया दूस-या पावतीवर देखील अर्जदाराने टायरचे पैसे दिल्याचा उल्लेख नाही ? अर्जदाराने सदरील राघवेंद्र सर्व्हीस सेंटरच्या मालकाचे किंवा त्यांचे प्रतिनीधीचे शपथपञही दाखल केलेले नाही किंवा तेहरा अटोमोबाईल्स किंवा भाटीया टायर्स यांचे मालकाचे किंवा प्रतिनीधीचे शपथपञ दाखल केलेले नाही ? पावतीच्या मूळ प्रत देखील रेकार्डवर दाखल केलेल्या नाहीत व ते दाखल न करण्याचे संयूक्तीक कारण सूध्दा तक्रारीमध्ये लिहीलेले नाही ? 8. कागदपञावरुन असे दिसते की, यूक्तीवादाचे वेळी अर्जदारातर्फे शपथपञ व लेखी यूक्तीवाद दाखल करण्यात आले. यावरुन असे दिसते की, अर्जदाराने गैरअर्जदाराचे प्रतिनीधी श्री. राजपूत याचेवर बरीच चीखलफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये श्री. राजपूत सदरील क्लेम मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केली होती व अनेक प्रकारे मानसिक छळ केला होता असा उल्लेख केलेला आहे ? हे जर खरे असते तर अर्जदाराने सदरील गैरकायदेशीर मागणी बददल आपल्या फिर्यादीमध्ये नक्कीच उल्लेख केलो असता परंतु तो केलेला नाही. त्यावरुन असे दिसते की, अर्जदाराने तो आरोप नंतर केलेला आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराने स्वतःच पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यास आठ दिवस उशिर का लावला याबददल संयूक्तीक किंवा साधे कारण ही दिलेले नाही ? जर फिर्याद (एफआयआर) दाखल करण्यास अर्ध्या तासाचा विलंब लावलेला असला तरी ही त्या फिर्यादीकडे संशयाच्या नजरेने पाहता येईल असे विद्यमान न्यायलयाचे निकाल आहेत. येथे तर आठ दिवसाचा विलंब आहे. एवढा विलंब असून देखील फिर्यादीने स्वतःहून मोटार सायकलच्या चोरी गेलेल्या सूटटया भागाची किंमत फक्त रु.8,000/- लिहीलेली आहे ? 9. दोन्ही बाजूच्या कथनाचा विचार करता एक गोष्ट नक्की आहे की, सदरील मोटार सायकलच्या काही सूटटया भागाची चोरी झालेली होती व ती चोरी इन्शूरन्स पॉलिसीच्या कालावधीतीलच होती त्यामूळे अर्जदारास जे काही नूकसान झाले असेल त्यांची भरपाई करुन देणे हे गैरअर्जदारावर बंधनकारक आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराला वकिलामार्फत दि.17.8.2010 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली ज्या बददलची पोहच पावती रेकार्डवर दाखल आहे. असे असून देखील गैरअर्जदार यांनी नोटीस मिळाल्याबददल विनाकारण इन्कार केलेला आहे ? त्यांनी नोटीसचे उत्तर देऊन त्यांना विलंब का लागत आहे त्याबददल कळवून अर्जदाराचे समाधान करता आले असते परंतु त्यांनी तसे केले नाही त्यामूळे त्यांनी त्यांचे सेवेत ञूटी केली हे निश्चित आहे. अर्जदाराची नूकसान भरपाई करुन देणे त्यांना क्रमप्राप्त आहे. 10. वरील विवेचनावरुन आता प्रश्न राहतो तो फक्त नक्की किती रक्कम गैरअर्जदार हा अर्जदारास देणे लागतो ? गैरअर्जदाराने सदरील सर्व्हेअरचा रिपोर्ट दाखल केला आहे. ज्यावरुन असे दिसते की, तो रिपोर्टच मूळात दि.28.12.2009 रोजी तयार करण्यात आला होता परंतु गैरअर्जदाराने आपल्या म्हणण्यामध्ये चूकीने असा उल्लेख केला आहे की, तो रिपोर्ट त्यांना दि.26.12.2009 रोजी प्राप्त झाला ? वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्व्हेअरच्या मते अंदाजे नूकसान रु.5806/- चे झालेले आहे. अर्जदाराने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांचे नूकसान रु.8,000/- चेच झालेले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सदरील फिर्याद घटनेच्या आठ दिवसानंतर दिली त्यामूळे त्या रक्कमेवर नक्कीच वाढ करुन ती तक्रार दिली असावी असे वाटते ? दोन्ही पक्षकाराचे म्हणण्यावरुन व दाखल केलेल्या पावतीवरुन असे दिसते की, फिर्यादीचे नूकसान रु.7,000/- चे नक्कीच झाले असावे. त्यामूळे एवढी नूकसान भरपाई मागण्याचा अर्जदार यांना अधिकार आहे. गैरअर्जदाराने नोटीसचे उत्तर न दिल्यामूळे व काही का कारणामूळे असेना विलंब केल्यामूळे सदरील रु.7,000/- ची नूकसान भरपाई करुन देणे त्यांचेवर बंधनकारक आहे. 11. वरील विवेचनावरुन आम्हास असे वाटते की, एकंदर कागदपञावरुन गैरअर्जदार हे अर्जदारास नूकसान भरपाई म्हणून रु,7,000/- देण्यास जबाबदार आहेत. त्यांच बरोबर त्यांनी विलंब लावल्यामूळे व अर्जदाराला या मंचामध्ये यावे लागल्यामूळे न्यायमंचाचा खर्च रु.1,000/- देणे त्यांचेवर बंधनकारक राहील असे या मंचाचे मत आहे. त्यामूळे अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो व खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. या आदेशाचे दिनांकापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना एकूण मोटार सायकलचे नूकसानीबददल रु.7,000/- अर्जदारास दयावेत, तसे न केल्यास त्या रक्कमेवर पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याज दयावे लागेल. 3. तक्रारीचा खर्च म्हणून गैरअर्जदाराने रु.1,000/- अर्जदारास दयावेत. 4. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |