Maharashtra

Nagpur

CC/14/270

Manisha Pramod Thote - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Ltd - Opp.Party(s)

Prabhakar Doble

26 Oct 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/270
 
1. Manisha Pramod Thote
Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Ltd
1st Floor May Fair Towers Pune Mumbai Road Wakdewadi
Pune
Maharastra
2. TheOriental Insurance Company Ltd.
Bhosari Extension Counter Bhosari. Pune.
Pune
Maharastra
3. The Oriental Insurance Company Ltd
Pune Mumbai Road Chinchwad Pune
Pune
Maharastra
4. The Oriental Insurance Company Ltd
REgd & Head Office Oriental House A-25/27 Asaf Ali Road New Dehli 110002
Dehli
Dehli
5. The Oriental Insurance Company Ltd
Mount Road Sadar Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 26 Oct 2017
Final Order / Judgement

 (आदेश पारित व्दारा - श्री  विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्तीने  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ती ही प्रमोद शामराव पोटे यांची विधवा पत्नी आहे.तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 1.5.2018 ला दुर्देवाने अपघतामधे टाटा सुमो क्रं. एमएच-14/वाय-5741 या वाहनाच्या जोरदार धडकेचे मृत्यु झाला. तक्रारकर्तीचे पती जवळ एसएच-14/सीएन-5426 महिन्दा डयुरो ही दुचाकी गाडी होती  सदर वाहनाची विमा पॉलीसी विरुध्‍द पक्षाकडुन काढण्‍यात आलेली होती. तक्रारकर्तीने दि.26.5.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं. 1 ते 3 यांचे कडे वाहनाचे नुकसान भरपाईकरिता नुकसान दावा सादर केला. दिनांक 31.3.2012 व 13.6.2012 विरुध्‍दपक्षाने चालक इतर दोन व्यकतींबरोबर वाहन चालवित होते म्हणुन वाहनाची नुकसान भरपाई देण्‍यास असमर्थ आहोत असे पत्र पाठवून विमा दावा नाकारला. दिनांक 20.10.2012 रोजी व 16.2.2013 रोजी तक्रारकर्तीने वकीलामार्फत कायदेशीर नोटीस विरुध्‍द पक्षाला पाठविली ती नोटीस प्राप्त होऊन ही विरुध्‍द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही, म्हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
  3. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की विरुध्‍द पक्षाने  वाहनाची नुकसान भरपाई व तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी खर्च विरुध्‍द पक्षाकडुन मिळण्‍याचा आदेश व्हावा. 
  4. तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष प्रकरणात हजर होऊन त्यांनी आपले लेखीउत्तर नि.क्रं. 10 वर दाखल केले. विरुध्‍द पक्ष आपले लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की तक्रारकर्तीने तक्रारीत विरुध्‍द पक्ष यांचेवर लावलेले आरोपी हे खोटे असुन त्यांना नाकबुल आहेत. सदर तक्रार कोणत्याही कारण घडलेले नसुन तसेच सदर तक्रार मुदतीच्या बाहेर व या मंचाचे अधिकारक्षेत्रात बसत नसल्याने खारीज होण्‍यास पात्र आहे. विरुध्‍द पक्षाने दिनांक 21.5.2012 रोजी पत्राचे अनुषंगाने योग्य कारण दर्शवून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केलेला होता त्यानंतर पुन्हा कोणत्याही पत्रास उत्तर देण्‍याची गरज नाही. तक्रारकर्तीची सदर तक्रार चुकीची असुन खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  5. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तऐवज, विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्तर, व तोंडी युक्तीवादावरुन मंचासमक्ष खालीलमुद्दे विचारार्थ येतात.

मुद्दे                                                                         उत्तर

  1. तक्रारकर्ती ही  विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                      होय
  2. सदर तक्रार कलम 24(अ) ग्राहक सरंक्षण कायदा 1986

मधे दर्शविलेल्या मुदतीत दाखल करण्‍यात आलेली आहे काय ?       नाही

  1. तक्रारकर्तीची तक्रार या मंचाचे अधिकारक्षेत्रात येते काय ?              नाही
  2. आदेश काय                                                               अंतीम आदेशाप्रमाणे
  3.  

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्र.1 बाबत –  तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्‍द पक्ष –विमा कंपनीकडुन एम एच-14/सीएन-5426 महिन्दा डयुरो ही दुचाकीचा विमा पॉलीसी क्रं.161890/31/2011/2944. घेतली होती.  तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्ती ही पतीची एकटीच वारसदार असुन, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं.1चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.
  2. मुद्दा क्र.2 बाबत –  तक्रारकर्तीचे पती यांचा मृत्यु दिनांक 1.5.2011 ला झाला व त्या अपघातामधे तक्रारकर्तीच्या पतीच्या वाहनाचे नुकसान झाले त्याकरिता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 3 मधे झालेल्या वाहनाचे नुकसानाकरिता रितसर दिनांक 26.5.2011 रोजी विमा दावा दाखल केला व तो दावा दिनांक 21.3.2012 रोजी विरुध्‍द पक्षाने नाकारला सबब सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण पहिल्यांदा दिनांक. 21.3.2012 रोजी घडले. सदर तक्रार दिनांक 27.6.2014 रोजी दाखल करण्‍यात आली असुन सदर तक्रार मुदतीच्या बाहेर आहे असे सिध्‍द होते. सदर तक्रारीसोबत कोणताही विलंब माफीचा अर्ज सादर केलेला नसुन सदर तक्रार कलम 24(2) या नमुद असलेल्या मुदतीत दाखल करण्‍यात आलेले नाही असे सिध्‍द होते.सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.
  3. मुद्दा क्र.3 बाबत  - तक्रारकर्तीने दाखल नि.क्रं.2 दस्त क्रं.1 ते 8 यांची पडताळणी करतांना मंचाचे असे निर्देशनास आले की, तक्रारकर्तीच्या पतीचा अपघात हा पूणे येथे झाला. तक्रारकर्तीचे पतीने वादातीत वाहनाची विमा पॉलीसी पूणे येथुन घेतली असून त्याकरिता विमा दावा विरुध्‍द पक्ष कंपनी चे पूणे येथे असलेले कार्यालय दिलेले आहे. तसेच तक्रारकर्तीचा दावा देखिल पूणे येथील शाखेने नामंजूर केलेला आहे सबब तक्रारकर्ती व विरुध्‍द पक्ष यांचेमधे उद्भवलेला वाद या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. तसेच तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रं.3 व 5 चे नागपूर येथील शाखेसोबत कोणताही व्यवहार केलेला नसल्याने कलम 11(2) अ,ब,क, ग्राहक सरंक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार या मंचाला नाही सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.
  4. मुद्दा क्रं.4 बाबत.–मुद्दा क्रं.1 ते 3 चे विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

-   दे   -

  1. तक्रारकर्तीची तक्रार या मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नसल्याने नस्तीबध्‍द करण्‍यात येते.
  2. तक्रारीचा खर्च उभयपक्षाने आपआपला सोसावा.
  3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.