जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 301/2014 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 24/07/2014.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-23/06/2015.
1. स्वाती सुभाष पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
2. जयवंताबाई पंढरीनाथ पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः काही नाही,
रा.काढोली,ता.एरंडोल,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
दि.ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि,सेंट्रल फुले मार्केट,
जळगांव,ता.जि.जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
विलंब माफीच्या अर्जावरील आदेश व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदाराने ग्राहक तक्रार अर्ज क्र.301/2014 सोबत तक्रार दाखल करण्यास विलंब झाला तो माफ करुन मिळावा व तक्रार दाखल करण्यास परवानगी मिळावी म्हणुन दाखल केलेला आहे. सदरील अर्जाचे अवलोकन केले. तसेच तक्रारीत नमुद केलेल्या बाबींचे अवलोकन केले. तक्रारदाराने दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले. सदरील तक्रार दाखल करण्यास कारण सन 2009 मध्ये घडले. सदरील तक्रार ही 3 वर्षे 1 महीना 26 दिवस विलंबाने दाखल केली आहे. तक्रारदारास सामनेवाला यांना नोटीसीची बजावणी करण्याकामी हमदस्त हाती दिले ते दि.13/10/2014 रोजी दिल्याचे निर्दशनास येते. सदरील तारखेपासुन ते आजपावेतो तक्रारदार तसेच त्यांचे वकील या मंचासमोर हजर राहुन नोटीस बजावणी झाल्याबाबत पुर्तता अहवाल दाखल केला नाही तसेच तक्रार दाखल करण्यास का विलंब झाला आहे त्याचे संयुक्तीक व न्याय कारण दिलेले नाही. तक्रारदार व त्यांचे वकील सतत गैरहजर असल्यामुळे तसेच तक्रार दाखल करण्याचा विलंबाचा कालावधी लक्षात घेता या मंचाचे मत की, तक्रारदाराचे चुकीमुळे सदरील अर्ज रद्य होण्यास पात्र आहे. सबब आदेशः
आ दे श
1) तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज रद्य करण्यात येतो. सबब या मंचासमोर दाखल केलेली ग्राहक तक्रार क्र.301/2014 ही अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
ज ळ गा व
दिनांकः- 23/06/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.